Friday 12 December 2014

तिरुपती तिरुमला देवस्थानात भाविकांची गर्दी ,सुरक्षा व्यवस्था कडक

     

       सप्तगीरीच्या पर्वत रांगेच्या निसर्गरम्य व घनदाट वृक्ष राईत वसलेल्या तिरुपतीच्या दर्शनाला नेहमीच हजारो भाविकांची गर्दी असते सहा डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्या नंतर झालेल्या दंगलीमुळे इथे सहा डिसेंबरला नेहमीच कडक तपासणीला सामोरे जावे लागते ह्या वर्षी सहा डिसेंबर व सात डिसेंबरला विक एन्ड आल्याने पर्यटन प्लस श्रद्धा साधत ,आंध्र ,तेलंगणा व इतर भागातील लोकांनी तिरुपती दर्शनासाठी गर्दी केली होती त्या मुळे चेकपोष्ट जवळ वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या तेथे येणारया पर्यटकांची ,वाहनांची कडक तपासणी होत होती त्या नंतरच तिरुपतीत प्रवेश मिळत होता.

           " गोविंदा ,गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा  S S s s s "च्या गजर करत हजारो भाविक तिरुपतीचे दर्शन घेत होते.  धर्म दर्शन ,स्पेशल दर्शन आणि तिरुपतीच्या नियमित सेवांचे दर्शन घेणारया भाविकांच्या लांबचलांब रांगा मंदिराच्या बाहेर पर्यंत लागल्या होत्या नेहमीच्या सुप्रभातामच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केल्याने  सभामंडप भरून गेला त्या मुळे  बरयाच भाविकांना सभा मंडपा बाहेर थांबावे लागले.


              मंदिरात लोटांगण प्रदक्षिणा घालणारया भाविकांचीही रांग होती त्यांना त्या नंतर मोफत दर्शन दिल्या जाते असे काहींनी सांगितले सद्या काही समाजसेवक तिथे तिरुपतीची मोफत सेवा करण्यासाठी आले असून त्यात काही शिक्षित तरुणही होते ते नियमित तिथे आठवडाभरासाठी येतात व रांग नियंत्रण ,भोजन व्यवस्था व इतर कामे करतात असेही त्यांनी सांगितले.
           तिरुपतीला आलेले काही भाविक तिरुपतीला केस अर्पण करतात त्यात सुशिक्षित तरुण जोडपे लहान,थोर नागरिक ,काही कुटुंबही आपले मुंडन करतात हिंदु संस्कृतीत सवाष्ण बायका मुंडण करत नसल्या तरी आंध्र तेलंगणात मात्र सर्रास बायका देवाला केस अर्पण करतात त्या साठीही कल्याण कट्टयावर रांग लागते मागे एक महाराष्ट्रीयन तरुणांचा ग्रुप भेटला तेव्हा त्यांनी ते सारेच नियमित तिरुपतीला येतात व केस अर्पण करतात असे सांगितले होते.
          तिरुपतीचा लाडूचा प्रसाद हा जगप्रसिद्ध आहे त्या मुळे लाडू विकत घेण्यासाठीहि रांग लावावी लागते तेही कुपन काढून दररोज इथे लाखो लाडूंची विक्री होते शुद्ध तुपातल्या लाडूत भरपूर सुका मेवा,खडीसाखरेचा वापर केलेला असतो तिरुपती दर्शना नंतर लाडूचा प्रसाद दिल्या जातो पण आता त्याचा आकार वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे खूप छोटा झाला आहे तिरुपतीला आलटून पालटुन दही भात,चिंचेचा भात गोड भाताचाही प्रसाद वाटल्या जातो तिरुपतीचा उडीद वड्याचा प्रसादही प्रसिद्ध आहे पण आता तो मिळत नाही फक्त दिवसभरच्या विशिष्ठ सेवांच्या दर्शन तिकीट घेणारयांनाच तो दिल्या जातो तोही अल्प प्रमाणातच मिळतो
                खाली गोविंदराज टेंपल मधेही भाविक गर्दी करतात इथे तिरुपती बालाजीची मापावर डोके ठेवलेली निद्रिस्थ मूर्ती आहे तिरुपती हा श्रीमंत देव त्या मुळे पैसे मोजता मोजता त्याला झोप लागली अशी आख्यायिका सांगितल्या जाते तिरुपतीला असलेल्या हुंडीत दररोज लाखो रुपये व सोने दान स्वरूपात जमा होते. 

No comments:

Post a Comment