विधानसभेची निवडणूक जाहीर होताच राजकीय गदारोळ उडाला प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी वेगळा झालाय राजकीय घडामोडींना वेग आलाय तरीही यवतमाळ येथे दुर्गोत्सव उत्साहात साजरा होतोय दुर्गादेवी बसवणाऱ्या मंडळाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललेय संध्याकाळी यवतमाळ विद्युत रोषणाईने झगमगून जात असून गावोगावहून देवी पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गर्दीने रस्ता फुलून गेला आहे.
बालाजी चौक मंडळाने "White Temple" चा देखावा साकारला आहे. त्या साठी थर्माकोलचा वापर करून छतावर व बाजूला ग्यालरी बनवून त्यावर आकर्षित सजावट केली आहे मूर्तीचे सिंहासन व सभामंडप चांदीने बनविले आहे
|
बालाजी चौक |
|
आदिवासीच्या वेशातला पहारेकरी |
ह्या वर्षी दुर्गादेवी मंडळाचे प्रमाण वाढलेले असून एकाच भागात तीनचार देवी बसवलेल्या आहेत बहुतेक सगळ्याच मंडळा तर्फे दररोज प्रसाद वाटप केल्या जात असून काही ठिकाणी फोडणीचा भात तर काही ठीकाणी पूर्ण जेवण दिल्या जात आहे शिवाय बरयाच ठिकाणी फराळाच्या पदार्थाची दुकानेहि थाटण्यात आली आहेत .
|
जयहिंद दुर्गोत्सव मंडळाचा सुशोभित मंडप |
|
जयहिंद दुर्गोत्सव मंडळाची दुर्गेची मूर्ती |
|
हनुमान भक्तीचा चलचित्र देखावा |
जयहिंद दुर्गोत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ह्या वर्षी मंडळाने" हनुमान भक्ती"हा चलचित्र देखावा साकारला आहे हे चलचित्र मुंबई येथील कारागिरांनी बनविला आहे मंडळातर्फे दररोज प्रसाद वाटप होते शिवाय वेवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते 1oct.ला राज्यस्तरावर निवड झालेल्या ११ वर्षीय श्रावणी पाचखेडे हिने योगाचे प्रात्यक्षिक सादर केले
All Photos taken by -Pooja Duddalwar BE(soft.) BMC ((UTS)
No comments:
Post a Comment