यवतमाळ येथे गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची उघड्या नाल्या बंद करा अशी मागणी आहे पण नगरपरिषद ह्या बाबतीत उदासीन आहे. यवतमाळात सद्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असून हि समस्याही बरयाच वर्षाची आहे यवतमाळकरांना सतत डास पिटाळून लावणाऱ्या साधनांचा वापर करावा लागतो मध्यंतरी डासांचा त्रास होऊ नये म्हणून डास फवारणी यंत्र आणले गेले काही दिवस फवारणी करण्यात आली पण नंतर ते यंत्र व फवारणी दोन्हीही दिसेनासे झाले.
सद्या सर्वत्र डासांमुळे उदभवणारया मलेरिया व डेंग्यू ह्या रोगाची साथ आहे काही ठिकाणी हत्तीरोगाचे रुग्णही आढळले आहेत पण तरीही नगर परिषदेकडून डास निर्मूलनाचे उपाय केल्या जात नाहीत.
डासांची उत्पत्ती उघडया नाल्यामुळेही होते.नाल्यात उडून आलेल्या कचरयामुळे किंव्हा काही नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे नाल्या तुंबतातआणि त्या भरून वाहू लागतात त्याच घाण पाण्यात रोगजंतू व डासांची पैदास होते ह्या नाल्या नियमित साफ केल्या जात नाहीत नगरसेवक व नगरपरिषद ह्या कडे दुर्लक्ष करतात नागरिक तक्रार करतात त्याहीकडे ते दुर्लक्ष करतात त्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते कधी,कधी नाली भरल्याने हे घाणपाणी रस्त्यावरून वहात नागरिकांच्या घरातही शिरते. शिवाय ह्या नाल्यात डूकरेही शिरतात आणि घाणीत भर टाकतात म्हणूनच नगराध्यक्षांनी ह्या कडे लक्ष देऊन कडक कारवाई करणे आवश्यक आहे शिवाय जे नगर सेवक कामे करत नाहीत त्यांच्यावरही कडक कारवाई करणे आवश्यक आहे पण तसे होत नाही
नाली अंडर ग्राउंड करणेही अत्यंत आवश्यक आहे त्या मुळे डासांचा त्रास कमी होईल शिवाय दोन्ही बाजूच्या उघडया नाल्यांमुळे रस्त्याची रुंदी कमी होते व रहदारीस अडथळा होतो तो होणार नाही. पण अंडर ग्राउंड नाल्यांना प्राधान्य न देता नको तिथे खर्च केल्या जातोय विशेषत: बागेवर पण बागेपेक्षा लोकांचे आरोग्य महत्वाचे आहे डेंगू मुळे काहींना जीव गमवावा लागलाय ही गंभीर बाब असतानाही त्या कडे दुर्लक्ष केल्या जातेय .
आता नागरिकांनी अशा गोष्टींना विरोध करावा आणि नगरपरिषदेची निवडणूक दरवर्षी धेणे भाग पाडावे कारण एकदा निवडून आले की हे नेते पाच वर्षे निश्चिंत होतात व काहीही करत नाहीत रस्त्यावरचे खड्डे, नियमित पाणीपुरवठा या सारख्या नागरिकांच्या अनेक समस्येशी त्यांना काहीही देणेघेणे नसते.
शास्त्री नगर मधली तुंबलेली नाली |
भरून वाहणारी नाली |
No comments:
Post a Comment