काश्मीर मध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे आलेल्या पुराच्या तांडवान काश्मीर मधल्या व्यावसायिकांच आतोनात नुकसान झाल श्रीनगर मधल्या लाल चौक मधली अध्ययावत काश्मिरी शोरूमस पुर बाधित झाल्यान करोडोच नुकसान झाल त्यातल्या वस्तू ,कपडे चिखलान माखाल्यान मातीमोल झाले ज्यांची दुकाने पुरापासून लांब होती व ज्यांनी पुराचा धोक्याचा इशारा मिळताच थोडफार सामान बाहेर काढण्यात यश मिळवल त्याचं सामान वाचल पण बहुसंख्य लोकांची दुकान पुराच्या तडाख्यात सापडल्यान आपल नुकसान कस भरून काढाव ह्या विवंचनेत ते आहेत.
दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी थंडी सुरु होताच काश्मीरमधून काश्मिरी शाल,स्वेटर्स ,साड्या ,ड्रेस मटेरियल ,स्कार्फ व इतर वस्तू विक्रीसाठी आलेले अनंतनाग इथल्या" मटन नम्बई" ह्यागावचे रहिवासी "साहिल भट व मोहोम्मद भट" सांगत होते ,गेल्या ३६ वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय आहे त्यांचे एकत्र कुटुंब आहे त्यांची तीन घरे व हॉटेल आहे त्यातली दोन घरे,शेती ,त्यातली तांदूळ,आक्रोड्ची झाडे व इतर पिके पुरात वाहून गेल्याच ते सांगतात एक घर व हॉटेल पुराच्या क्षेत्रापासून लांब असल्याने ते वाचल" नम्बईमटन" गावात त्याचं " जन्नत ई काश्मीर{क्राफ्ट ऑफ काश्मीर }" नावाच शोरूम आहे त्यांचे कुटुंबीय कापड विकत घेऊन त्यावर काश्मिरी कशिदाकारी करतात. एक ड्रेस विणायला चार दिवस लागतात पण त्याचा मोबदला मात्र फार कमी पोटापुरता मिळतो कारण तिथे घराघरात विणकर आहेत त्या मुळे स्पर्धा असतेच आणि त्यांचा माल दलाला मार्फत विकल्या जातो ह्या वर्षी मात्र त्यांच्यावर निसर्गाची अवकृपा झालीय त्यांनी काही माल आधीच विक्रीसाठी पाठवल्याने तो वाचला त्यांच्या लुधियानातील एका मित्रांनी त्यांना ह्या संकटकाळात मदत केलीय व आपल्या जवळील स्वेटर्स विक्रीसाठी उधारीवर दिलेत पण श्रीनगर मधल्या पूरग्रस्तांचे लाकडी हातमाग यंत्र व इतर साधन पुराच्या पाण्याने खराब झाली त्या मुळे तिथला धंदा ठप्प आहे शिवाय ज्या मेंढया पासून पश्मीना वूल मिळते त्या देखील पुरात वाहून गेल्यान नुकसान झालय
म्हणूनच ह्या वर्षी त्यांच्या जवळील शाल साड्या , ड्रेस मटेरियल्स महाग आहेत त्यांची किंमत ५००ते १५-२०हजरा पर्यंत आहेत ह्या वर्षी त्यांनी पश्मीना वूलच्या तलम व मऊ पण उबदार शाली विक्री साठी आणल्यात त्यांच्याकडे ४०gm वजनाची सिल्कची साडी व शाल विक्रीसाठी उपलब्ध आहे
काश्मिरी कशिदा विणकर महिला -फोटो सौजन्य - साहिल भट |
काश्मिरी काशिदाकरीत मग्न असलेल्या महिला -फोटो सौजन्य -साहिल भट |
साहिल भट व महम्मद चाचा सांगतात कि काश्मिर मध्ये पर्यटक आले कि आमच्या मालाला चांगला भाव मिळतो बरेच दिवसांनी काश्मीर पर्यटकांनी गजबजल होत आता तिथे सिनेमाच शुटींगही सुरु झाल होत पण निसर्गाची अवकृपा झाली अन होत्याच नव्हत झाल तिथल्या परिस्थिती बद्दल सांगताना ते म्हणतात असा पूर आम्ही ह्या आधी पहिला नव्हता भयंकर हाहाकार उडाला सार क्षणात पाहता,पाहता जमीनदोस्त झाल ज्यांची घर पक्क्या विटांची होती ती वाचली पण ज्यांची घर कच्या मातीची होती ती घर ,दुकान शेत त्यातली पिक सारी वाहून गेली आक्रोड ,सफरचंदाच्या बागा ,बदाम सुकामेवा ,तांदूळ आणि इतर पिक तर गेलीच पण सर्वात जास्त नुकसान केशर बागेच झालय त्या मुळे त्याच पिक अत्यल्पच उरल्यान त्याचे भावही भरपूर असतील
काश्मीर हळू,हळू पुरातून सावरत असल तरीही अजूनही ५० टक्के लोक टेंट किव्हा पत्र्याच्या घरात राहताहेत ज्यांची घरे,दुकान,शेती पुरात वाहून गेली त्यांचा परतीचा मार्ग बंद झालाय तिथले लोक सरकारवर नाराज आहेत कारण त्यांना कायमस्वरूपी निवारा हवा आहे सरकारन प्रत्येक कुटुंबाला २५kg तांदूळ ,पीठ व इतर आवश्यक सामान मोफत देण सुरु केलय पण ते किती दिवस पुरणार? असा प्रश्न तिथली जनता विचारतेय.
लोक काश्मिरमध्ये यायला घाबरतात पण फक्त सीमेवरच तणाव असतो बाकी ठिकाण शांत आहेत अस ते सांगतात त्यांच्या भागात कितीतरी हिंदू कुटुंबीय आहेत व ते बरयाचर्षापासून एकत्र शांततेत राहतात काहीची मुले शिक्षणासाठी,नोकरीनिमित्याने बाहेरगावी परदेशी गेलीत ते तर एकटे राहतात! त्यांना कोणतीही भीती नाही अस ते म्हणतात .
तिथल्या सरकारवर लोकांचा राग आहे ते जनतेच्या हिताची कामे करत नाहीत शिवाय यंदाची निवडणूक घाईन घेण्यापेक्षा पुरग्रस्तांचा प्रश्न सोडवण महत्वाच होत अस तिथल्या जनतेच म्हणण होत त्या मुळे तिथल्या जनतेन मतदाना कडे पाठ फिरवली आहे पंतप्रधान मोदीवर मात्र ते खुश आहेत व त्यांना त्यांच्या सरकारकडून बरयाच अपेक्षाही आहेत
No comments:
Post a Comment