Thursday, 14 April 2016

शनीच्या कड्यांचे हे मनमोहक दृश्य

      फोटो-नासा व इसा संस्था
नासा संस्था -13 एप्रिल 2016          
शनीच्या कड्यांचे हे मनमोहक दृश्य नासाच्या शास्त्रज्ञांनी नुकतेच टिपले आहे शनीच्या कड्याचा हा प्रकाशमान  दिसणारा रुंद भाग छायाचित्रीत करणे अत्यंत कठीण असले तरीही नासा व इसा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कॅसिनी ह्या स्पेस क्राफ्ट च्या narrow angle कॅमेऱ्याच्या सहाय्याने हा फोटो टिपला आहे
शनीच्या कड्याच्या ह्या भागाची रुंदी मोजणेही कठीणच असले तरी शास्त्रज्ञांच्या मते हा भाग बुध ग्रहा एव्हढा  रुंद असून त्याची रुंदी 2980 मैल आहे
 हा भाग शनीच्या Mimas ह्या चंद्रामुळे तयार झाला असावा असे शास्त्रज्ञांना वाटते ह्या फोटोत दिसणारया शनीच्या कड्याचा भाग शनीच्या mimas ह्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातील फिरणाऱ्या धुळ व वायूंच्या कणांमुळे तयार झाला असावा जेव्हा mimas हा चंद्र शनिभोवती एक फेरी पूर्ण करतो तेव्हा ह्या कॅसिनी भागातील पार्टिकलस मात्र दोन फेरया पूर्ण करतात  

Wednesday, 13 April 2016

एअर फोर्सच्या T-380 विमानाने घातली सूर्याला गवसणी



    फोटो -नासा संस्था
नासा संस्था -12 एप्रिल 2016
नासाच्या एअर फोर्स टेस्ट पायलट स्कुलच्या  T-380 ह्या विमानाने नुकतीच आकाशात सुर्यासामोरून भरारी मारली तेव्हा अत्यंत वेगाने जाणारया ह्या विमानाच्या वेगामुळे  निर्माण झालेल्या Super Sonic Waves नासाच्या शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून छायाचित्रीत केल्या आहेत
schlieren imagery हि जर्मनीतली दीडशे वर्षे जुनी छायाचित्रण पद्धत आहे त्याच पद्धतीला संशोधित आधुनिक पद्धतीची जोड देऊन नासाच्या शास्त्रज्ञांनी हा फोटो टिपला आहे
ह्या आधुनिक पद्धतीने सूर्याचा पृष्ठभाग व कॅमेरा ह्या मधून एखाधी वस्तू किंवा विमान जाते तेव्हा वेगामुळे निर्माण होणारया Super Sonic Waves  छायाचित्रीत करणे शक्य होते
ह्या फोटोत एअर फोर्सच्या विमानाच्या वेगामुळे Super Sonic Waves तयार झाल्या आहेत आणि ह्या छायाचित्राच्या माहितीचा उपयोग आता कमी Super Sonic Waves निर्माण करणारया एअर क्राफ्टची निर्मिती करण्यासाठी होईल अशी आशा शास्त्रज्ञांना वाटतेय

Monday, 4 April 2016

तप्त ग्रहावरील उष्ण वारयाच वादळ

            फोटो -नासा संस्था      तप्त ग्रहावरील उष्ण वारयाच वादळ
 नासा संस्था -3 एप्रिल
नासाच्या स्पीटझर स्पेस दुर्बिणीने H D 80606b ह्या ग्रहावरील अति उष्ण वायूच्या वादळाचे हे छायाचित्र टिपले आहे हा ग्रह  दर 111 दिवसांनी त्याच्या तारयांच्या जवळ येतो तेव्हा अतिशय तप्त होतो ह्या ग्रहाचे अत्युच्च तापमान 2000 डिग्री f. आहे तर त्याचे सर्वात न्यूनतम तापमान  400 f . आहे
गेल्या दशकात शास्त्रज्ञांनी अंतराळाचा वेध घेत सुर्यमालेबाहेरील जवळपास दोन हजार ग्रहांचा शोध लावला असून अजूनही हजारो ग्रह अंतरिक्षात भ्रमण करत असल्याचा शास्त्रज्ञांचा कयास आहे
हे शोधलेले नवीन ग्रह तप्त गुरु (Hot Jupiters) ह्या गटात येतात हे ग्रह गुरु सारखेच तप्त वायु ग्रह असले तरी त्यांची ग्रहाभोवती फिरण्याची कक्षा मात्र वेगळी आहे कधी ती तारयापासून खूप दूर तर कधी अगदी जवळ असते तप्त गुरूची माहिती शास्त्रज्ञांनी शोधुन काढली असली तरीही हे ग्रह कधी व कसे तयार झाले आणि त्यांची भ्रमण कक्षा एकसारखी का नाही ? ह्याचे गूढ  उकलण्यात मात्र अजूनही शास्त्रज्ञांना यश आलेले नाही
ह्या  फोटोतला  H D 80606b हा ग्रह पृथ्वीपासून 190 प्रकाश वर्षे दूर असून त्याच्या वेगवेगळ्या भ्रमण काक्षेनुसार तो तारयांच्या जवळ येताच त्याचे उष्णतामान अत्युच्च होत 2000 डिग्री f . इतके होते संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षा नुसार हा ग्रह मोठ्या कक्षेतून लहान कक्षेत भ्रमण करत असावा व त्याच्या जवळील ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो त्या ग्रहांच्या कक्षेत ओढला जाऊन त्याची कक्षा अशी बदलत असावी संशोधक ह्या विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत  

Tuesday, 29 March 2016

मंगळावर सेडीमेंटरी दगडांचे अस्तित्व



            मंगळावरील खोल पाण्याचे कुंड व सेडीमेंटरी दगडाचे अस्तित्व 
             फोटो -NASA/JPL-Caltech /Univ.of Arizona

नासा संस्था - 24 मार्च 
नासाच्या शास्त्रज्ञांना मंगळावर पूर्वी पाणी होते हे सिद्ध करणारा सबळ पुरावा पुन्हा एकदा मिळाला आहे
23 जानेवारी 2016 ह्या दिवशी नासाच्या HIRSE ह्या कॅमेरयाने घेतलेल्या मंगळावरील  Saheki   विवरावरील  छायाचित्रात तिथे असलेल्या दोन खोल पाण्याच्या कुंडाचा भाग छायांकित झाला 
त्या कुंडामध्ये सेडीमेंटरी दगड सापडले आहेत हे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात आलेल्या गाळापासून बनलेले आहेत दगडावर पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्याही खुणा सापडल्या आहेत त्या मुळे पूर्वी मंगळावरील ह्या भागात वाहत्या पाण्याचे कुंड अस्तित्वात होते हे सिद्ध झाले आहे त्यात असलेले दगड त्याच वाहत्या नदीच्या पाण्याबरोबर वहात आलेल्या धूळ माती वाळू व कचऱ्याच्या गाळ तिथेच साचल्याने तयार झाले आहेत वर्षानुवर्षे एकावर एक असे गाळाचे थर तयार होऊन अशा सेडीमेंटरी दगडाची निर्मिती होते त्या मुळे शास्त्रज्ञांना आता ह्या दगडाच्या थरावरून ते किती वर्ष आधी तयार झाले असावेत शिवाय त्याची खोली किती असेल ह्याचा शोध घेणे शक्य झाले असून मंगळावर पाणी कधी अस्तित्वात होते आणि ते कधी आटले आणि नष्ट झाले ह्याचाही शोध घेता येणार आहे    
मंगळाचा हा भाग अंतराळवीरांनी घेतलेल्या छायाचित्रात बरयाच वेळा दिसला पण त्यावर अस्तित्वात असलेले वाहत्या पाण्याचे झरे ,कुंड व सेडीमेंटरी रॉक मात्र जानेवारीत सापडले 
नासाच्या टक्सन येथील अंतराळ व तंत्रज्ञान संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी मंगळ संशोधन प्रकल्पा अंतर्गत  हे छायाचित्र घेतले आहे   

Monday, 21 March 2016

नासाचे तीन अंतराळवीर सोयुझ यानाने अंतराळ स्थानकात रवाना


            नासा अंतराळवीर जेफ विल्यमस,रशियन अंतराळवीर अलेक्सी आणि ओलेग
नासा संस्था -19 मार्च
नासाच्या मोहीम सत्तेचाळीसद्वारे आणखी तीन अंतराळवीरांनी सोयुझ TMA.20 ह्या यानाने एकोणीस मार्चला अंतराळात झेप घेतली ह्या मोहिमेत रशियन कमांडर  अलेक्सी ओव्ह्चीनीन , फ्लाईट इंजिनिअर ओलेग स्क्रीपोचका आणि अमेरिकेचे फ्लाईट इंजिनिअर जेफ विल्यमस ह्यांचा समावेश आहे  हे तीन अंतराळवीर काझाकीस्थान इथल्या बैकोनुर ह्या अवकाशतळावरून शनिवारी सोयुझ यानाने अंतराळ स्थानकात  पाच महिने राहण्यासाठी गेले आहेत  अवकाश यानाला रशियाचे पहिले अंतराळवीर युरी गागारीन ह्यांचा फोटो लावण्यात आला होता त्यांनी बारा एप्रिल 1961साली पहिल्यांदा अवकाशात झेप घेतली होती अंतराळस्थानकात आता सहा अंतराळवीर मिळून पाच महिने जवळपास अडीचशे पेक्षा जास्त प्रयोग करणार आहेत त्या मध्ये Earth science,  Biology,Human research,physical sciences आणि technology ह्या विषयांचा समावेश आहे
सध्या नासाचे जेफ विल्यम्स हे अंतराळ स्थानकात सहा महिने राहण्यासाठी गेले असून त्यांच्या ह्या मोहीम पुर्ती नंतर ते सर्वात जास्त दिवस राहणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर ठरतील त्यांनी आतापर्यंत तीनदा अंतराळ स्थानकात मुक्काम केला असून हि  त्यांची चवथी अंतराळ मोहीम आहे ते सर्वात जेष्ठ अंतराळवीर असून त्यांना तीन नातवंडेही आहेत
मार्च महिन्याच्या शेवटी सुरु झालेल्या ह्या संशोधन मोहिमेत प्रथमच वास्तव आगीशी संबंधित व पृथ्वीच्या वातावरणात शिरणारया उल्कांसंबंधित संशोधन केले जाइल तसेच सूक्ष्म गुरूत्वाकर्षणात मातीवर होणारया परिणामाचेही निरीक्षण केले जाइल
ह्या मोहिमेतील अंतराळ वीरांना नवीन Expandable Activity Module (BEAM)  ची टेस्ट करण्याची संधी मिळणार आहे हे  मोड्यूल नंतर कार्गो मार्फत अंतराळात पोहोचवले जाइल व अंतराळ स्थानकाला जोडले जाइल हे नवे मोड्युल विस्तारित होणारे असून त्यात राहण्याची सोयही आहे  सध्या अंतराळ वीरांना त्यात राहता येणारनसले तरीही वेळोवेळी टेस्टिंग साठी त्यांना त्यात प्रवेश करता येईल हे  मोड्यूल दोन वर्ष अंतराळात राहण्याच्या क्षमतेचे आहे का ह्याची वेळोवेळी चाचणी घेतल्या जाइल ह्याचा उपयोग आगामी मंगळ मोहिमेसाठी नासा करणार आहे हे नवे मोड्यूल विस्तारित करता येत असल्याने ते रॉकेट मध्ये कमी जागा व्यापेल व राहण्यासाठी जास्त जागा मिळेल ह्या मोहिमेतील अंतराळ वीरांना रशियातून खाद्य सामुग्री ,इंधन व प्रयोगासाठीचे सामान मिळणार आहे
ह्या मोहिमेतील जेफ विल्यम्स सहा मिहीन्याच्या अंतराळ निवासानंतर स्कॉट केली ह्यांचा अंतराळ स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मोडतील चार जूनला विल्यम्स मोहीम अठ्ठेचाळीसची सूत्रे हाती घेतील व कोप्रा ,Malenchenko व  Peake हे अंतराळवीर पाच जूनला पृथ्वीवर परततील
गेल्या पंधरा वर्षापासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर शक्य नसलेले प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करत आहेत व त्यात यशही मिळवत आहेत हे शोध दूरवरच्या खोल  अंतराळाचे  गूढ उलगडण्याच्या मानवी स्वप्नांना यशस्वी वाटचालीकडे नेणारी पाऊलवाट निर्माण करताहेत ह्या अंतराळातील सूक्ष्मगुरुत्वाकर्षणातील अनोख्या प्रयोगशाळेत आजवर सतराशेहून अधिक प्रयोग केल्या गेले असून त्यात 15  देशातील दोनशे अंतराळ संशोधकांचा सहभाग आहे       

Thursday, 17 March 2016

नासा अंतराळवीर स्कॉट केली एक एप्रिलला निवृत्त होणार

             नासाच्या होस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटर मध्ये स्कॉट केली ,मार्क केली चार्लस बोल्डेन व इतर
             फोटो -नासा संस्था
नासा संस्था -16 मार्च
नासा अंतराळवीर स्कॉट केली एक एप्रिलला  निवृत्त होणार आहेत स्कॉट केली ह्यांनी 1996 साली नासा ह्या संस्थेत प्रवेश केला होता नुकतेच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात  सलग एक वर्ष राहण्याचा विक्रम करून परतले आहेत
1987 साली न्यूयार्क university तून Electrical Engineer झाल्यानंतर त्यांनी टेनेसी युनिव्हरर्सिटीमधून Aviation System मध्ये मास्टर्स केल 1989च्या जुलै मध्ये केली नेव्हल एअर स्टेशन मध्ये नेव्हल एव्हियेटर म्हणून नोकरीत दाखल झाले आणि 1993 मध्ये त्यांची U.S. Naval Test Pilot School मध्ये जाण्यासाठी निवड झाली 1994साली ट्रेनिंग पूर्ण होताच 1996 साली त्यांचा नासा संस्थेत प्रवेश झाला त्यांच्या ह्या वीस वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात त्यांनी चारवेळा अंतरीक्ष वारी  केली आणि ह्या चार मोहिमेदरम्यान आता पर्यंत ते 520 दिवस अंतराळ स्थानकात राहून आलेत 
1999 साली पहिल्यांदा त्यांनी  S.T.S.-103  ह्या हबल स्पेस टेलिस्कोप सार्व्हीसिंग मिशन मध्ये डिस्कव्हरी ह्या यानाने अंतरिक्षात झेप घेतली 
दुसरयांदा ते S.T.S.-118 ह्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मोहिमेचे पहिले कमांडर म्हणून अंतरिक्षात गेले 
2010 सालच्या Expedition ह्या 26 व्या अंतराळ मोहिमेतहि ते कमांडर म्हणूनच सहा महिन्यासाठी गेले होते 
आणि आता ते सलग एक वर्ष आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून सर्वात जास्त दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम प्रस्थापित करून आणि संशोधित उपयुक्त माहिती गोळा करून मार्च मध्ये पृथ्वीवर परतले आहेत 
केली हे जरी निवृत्त झाले तरी निवृत्ती नंतरही ते नासा ह्या संस्थेत कार्यरत राहणार आहेत ह्या दरम्यान त्यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील संशोधनातील गोळा केलेल्या माहिती व नमुन्याच्या सखोल संशोधनात ते सहभागी होतील त्यांनी आणलेले त्यांचे अंतराळ स्थानकातील वास्तव्या दरम्यानचे त्यांचे मेडिकल नमुने आणि त्यांचा जुळा भाऊ मार्क केली ह्यांच्या मेडिकल नमुन्याशी संबंधित त्यांचे संशोधन ते नासा संस्थेत सुरूच ठेवतील केली व त्यांचा भाऊ मार्क केली हे दोघे मिळून उर्वरित पुढील संशोधन करतील 
आपल्या एक वर्षाच्या अंतराळ प्रवासा विषयी सांगताना केली म्हणतात हा प्रवास माझ्यासाठी एकमेव अविस्मर्णीय सुंदर पर्वणीच होती आमच्यासाठी रोजचा दिवस म्हणजे एक नव आव्हानच होत माझ्या नेव्हीतल्या आणि नासातल्या करिअर मूळे मला हे अतुलनीय व अलौकिक काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली आम्हाला आमची बौद्धिक क्षमता ,पात्रता सिद्ध करण्याची संधीही मिळाली अंतरिक्षात जास्त दिवस राहून आम्ही गोळा केलेली माहिती ,केलेले प्रयोग आता आगामी मंगळ व इतर ग्रहांच्या अवकाश मोहिमेत जास्त दिवस राहण्यासाठी उपयोगी पडेल अजूनही मला नासाच्या आगामी अंतरीक्ष यात्रेत सहभागी व्हायला आवडेल नासाच्या सौर सिस्टीम मध्ये काम करायचीही इच्छा आहे आणि नव्या पिढी सोबत सायन्स आणि Technology च्या संशोधनात सहभागी व्हायला आवडेल 
नासाच्या होस्टन इथल्या फ्लाईट डिपार्टमेंटचे डायरेक्टर ब्रेन केली म्हणतात ,स्कॉट केली ह्याचं नासामधील योगदान प्रचंड आहे ह्या एक वर्षात त्यांनी प्रदीर्घकाळ मानवी अंतराळवास्तव्यादरम्यान त्याच्या शारीरिक मानसिक होणारया परिणामाच्या संशोधनात सहभाग घेतला व उपयुक्त माहिती गोळा केली हि माहिती आगामी मंगळ व इतर ग्रहाच्या अंतराळ मोहिमेसाठी अत्यंत उपयोगी आहे त्यांची कामावरील निष्ठा ,आवड व अभ्यासू वृत्ती इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी वेळोवेळी पाठवलेली माहिती व फोटो मुळे लोकांना नासाच्या कार्याची ओळख झाली त्या मुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत 
नासाच्या Administrator चार्लस बोल्डेन म्हणतात ,जेव्हा पहिला अमेरिकन अंतराळवीर मंगळावर पहिले पाऊल ठेवेल तेव्हा तो स्कॉट केली ह्यांनी दाखवलेल्या पाऊल वाटेवरून चालत असेल 
स्कॉट केली ह्यांचे अंतराळ स्थानकातील हे वास्तव्य खरोखरच सोपे नव्हते आधी अंतराळात प्रवेश करण्याचे अग्निदिव्य त्यातून सहीसलामत अंतराळात पोहोचुन अंतराळ स्थानकात प्रवेशणे आणि तिथल्या सूक्ष्म गुरुत्वाकार्षणात स्वत:ला adjust करणे तिथे इथल्या सारख गुरुत्वाकर्षण नसल्यान वस्तूच काय त्यांचही तरंगण मग खाण ,पिण ,झोपण ह्यासाठीची कसरत शिवाय दिवस रात्र ह्याच्या वेळा कार्यकाळ सारच वेगळ त्याच्याशी जुळवून घेताना होणारा त्रास, अपुरी झोप अंतराळात शरीरातील द्रव्य पदार्थही पायाकडे खालच्या दिशेने वाहतात ह्या विपरीत परिस्थितीत इतक्या दिवस राहून संशोधन करण सोप नव्हतच आणि सर्वात महत्वाच म्हणजे किट्ट अंधारात कुठेही मानवी अस्तित्वच काय ,वातावरण झाड फळे फुले प्राणी पक्षी पाणी अन्न काहीच नाही! ना ताजे जेवण ना शांत झोप! ना गरम पाण्यानी अंघोळ ना थंड वारयाची झुळूक ! आपले आप्त स्वकीय मित्र मैत्रीण कोणाचाही संपर्क नाही झालाच तर अधून मधून फोनवरून असल्या रुक्ष वातावरणातही ह्या अंतराळवीरांनी प्रयोग करून अंतराळ स्थानकात लेट्युस ,झीनियाची फुले दररोज देखभाल करून उगवून दाखवली आणि त्याचे फोटो काही तासांच्या आत पृथ्वीवरील लोकांना पहाण्यासाठी पाठवले तंत्रज्ञानाची प्रगती अफाट असली तरी हि प्रगती तितक्याच उत्साहाने तत्परतेने पाठवण्याच श्रेय ह्या अंतराळवीरानांच ध्याव लागेल आजवर अशी त्वरित माहिती पृथ्वीवरील लोकांना आधीच्या मोहिमेतून मिळाली नव्हती ह्या अत्यंत बिझी व रुक्ष वातावरणात स्कॉट केली ह्यांनी खेळकरपणे , मिस्किलतेन तिथले आनंदी क्षण अचूक टिपलेच शिवाय ह्या अंतरीक्ष स्थानकाच्या भ्रमणा दरम्यानही ग्रह,तारे ,आकाशगंगा ,उगवती पृथ्वी सूर्योदय ,सूर्यास्त वै असे जवळपास सातशे फोटो पृथ्वीवरील नागरिकांना पाठवून त्यांचा आनंद अविस्मरणीय क्षण त्वरित पृथ्वी वासियांशी शेअर केले एव्हढेच नाही तर त्यांनी ह्या अंतराळ स्थानकातील वास्तव्या दरम्यान अंतराळ विषयक माहितीपर प्रश्न विचारण्याची संधी नागरिकांना व पत्रकारांना नासा संस्थेतर्फे दिली नासाचे अंतराळवीर Scott Kelly ह्यांनी ह्या एक वर्ष दरम्यान अंतराळात तीनवेळा स्पेस walk केला  डिसेंबरमध्ये त्यांनी अंतराळ स्थानका बाहेर तीन तास सोळा मिनिटेचा  space walk करून विक्रम केला होता त्या दरम्यानचा त्यांचा सेल्फीही त्यांनी पाठवला होता
(  केली ह्यांनी पाठवलेले फोटो व संशोधनाच्या बातम्या ह्याच ब्लॉग वर वाचा  )    

Wednesday, 9 March 2016

नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ वीरांगना

                                   नासाच्या अंतराळ वीरांगना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -8 मार्च
आठ मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्याने नासाने अंतराळ वीरांगनाचा हा फोटो सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केलाय
एप्रिल 2010 साली अंतराळ  स्थानकात गेलेल्या अंतराळ वीरांच्या  मोहीम  S T S 131 मध्ये काही महिला वैज्ञानिकांचाही समावेश होता त्याच मोहिमेदरम्यान ह्या अंतराळ वीरांगनांचा टिपलेला हा फोटो
ह्या फोटोत  डावीकडून
जपानच्या एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी च्या Naoko Yamazaki
नासाच्या  Dorothy Metcalf आणि Lindenburger
आणि Expedition 23 च्या फ्लाईट इंजिनीअर ट्रेसी Caldwell  Dyson
ह्या चार अंतराळ वीरांगना दिसत आहेत 2010 सालच्या एप्रिलमध्ये गेलेल्या S T S 131 ह्या अंतराळ मोहिमेतील ह्या टीम सदस्य अंतराळ स्थानकाच्या " मल्टी पर्पज लॉजिस्टिक मोड्युल" विभागापासून रोबोटिक आर्मच्या सहाय्याने अंतराळ स्थानकातील कार्गो वेगळे करून दुसरीकडे हलवत आहेत
ह्या अंतराळ मोहिमेत सुरवातीला सात अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले नंतर नासाच्या केनडी स्पेस स्टेशन मधून उर्वरित सहा अंतराळवीर अंतराळ स्थानकात त्यांच्या सोबत राहायला गेले तेव्हा प्रथमच ह्या अंतराळ मोहिमेत ह्या चार अंतराळ वीरांगना एकत्र आल्या होत्या