Monday 21 March 2016

नासाचे तीन अंतराळवीर सोयुझ यानाने अंतराळ स्थानकात रवाना


            नासा अंतराळवीर जेफ विल्यमस,रशियन अंतराळवीर अलेक्सी आणि ओलेग
नासा संस्था -19 मार्च
नासाच्या मोहीम सत्तेचाळीसद्वारे आणखी तीन अंतराळवीरांनी सोयुझ TMA.20 ह्या यानाने एकोणीस मार्चला अंतराळात झेप घेतली ह्या मोहिमेत रशियन कमांडर  अलेक्सी ओव्ह्चीनीन , फ्लाईट इंजिनिअर ओलेग स्क्रीपोचका आणि अमेरिकेचे फ्लाईट इंजिनिअर जेफ विल्यमस ह्यांचा समावेश आहे  हे तीन अंतराळवीर काझाकीस्थान इथल्या बैकोनुर ह्या अवकाशतळावरून शनिवारी सोयुझ यानाने अंतराळ स्थानकात  पाच महिने राहण्यासाठी गेले आहेत  अवकाश यानाला रशियाचे पहिले अंतराळवीर युरी गागारीन ह्यांचा फोटो लावण्यात आला होता त्यांनी बारा एप्रिल 1961साली पहिल्यांदा अवकाशात झेप घेतली होती अंतराळस्थानकात आता सहा अंतराळवीर मिळून पाच महिने जवळपास अडीचशे पेक्षा जास्त प्रयोग करणार आहेत त्या मध्ये Earth science,  Biology,Human research,physical sciences आणि technology ह्या विषयांचा समावेश आहे
सध्या नासाचे जेफ विल्यम्स हे अंतराळ स्थानकात सहा महिने राहण्यासाठी गेले असून त्यांच्या ह्या मोहीम पुर्ती नंतर ते सर्वात जास्त दिवस राहणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर ठरतील त्यांनी आतापर्यंत तीनदा अंतराळ स्थानकात मुक्काम केला असून हि  त्यांची चवथी अंतराळ मोहीम आहे ते सर्वात जेष्ठ अंतराळवीर असून त्यांना तीन नातवंडेही आहेत
मार्च महिन्याच्या शेवटी सुरु झालेल्या ह्या संशोधन मोहिमेत प्रथमच वास्तव आगीशी संबंधित व पृथ्वीच्या वातावरणात शिरणारया उल्कांसंबंधित संशोधन केले जाइल तसेच सूक्ष्म गुरूत्वाकर्षणात मातीवर होणारया परिणामाचेही निरीक्षण केले जाइल
ह्या मोहिमेतील अंतराळ वीरांना नवीन Expandable Activity Module (BEAM)  ची टेस्ट करण्याची संधी मिळणार आहे हे  मोड्यूल नंतर कार्गो मार्फत अंतराळात पोहोचवले जाइल व अंतराळ स्थानकाला जोडले जाइल हे नवे मोड्युल विस्तारित होणारे असून त्यात राहण्याची सोयही आहे  सध्या अंतराळ वीरांना त्यात राहता येणारनसले तरीही वेळोवेळी टेस्टिंग साठी त्यांना त्यात प्रवेश करता येईल हे  मोड्यूल दोन वर्ष अंतराळात राहण्याच्या क्षमतेचे आहे का ह्याची वेळोवेळी चाचणी घेतल्या जाइल ह्याचा उपयोग आगामी मंगळ मोहिमेसाठी नासा करणार आहे हे नवे मोड्यूल विस्तारित करता येत असल्याने ते रॉकेट मध्ये कमी जागा व्यापेल व राहण्यासाठी जास्त जागा मिळेल ह्या मोहिमेतील अंतराळ वीरांना रशियातून खाद्य सामुग्री ,इंधन व प्रयोगासाठीचे सामान मिळणार आहे
ह्या मोहिमेतील जेफ विल्यम्स सहा मिहीन्याच्या अंतराळ निवासानंतर स्कॉट केली ह्यांचा अंतराळ स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम मोडतील चार जूनला विल्यम्स मोहीम अठ्ठेचाळीसची सूत्रे हाती घेतील व कोप्रा ,Malenchenko व  Peake हे अंतराळवीर पाच जूनला पृथ्वीवर परततील
गेल्या पंधरा वर्षापासून अंतराळवीर अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर शक्य नसलेले प्रयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करत आहेत व त्यात यशही मिळवत आहेत हे शोध दूरवरच्या खोल  अंतराळाचे  गूढ उलगडण्याच्या मानवी स्वप्नांना यशस्वी वाटचालीकडे नेणारी पाऊलवाट निर्माण करताहेत ह्या अंतराळातील सूक्ष्मगुरुत्वाकर्षणातील अनोख्या प्रयोगशाळेत आजवर सतराशेहून अधिक प्रयोग केल्या गेले असून त्यात 15  देशातील दोनशे अंतराळ संशोधकांचा सहभाग आहे       

No comments:

Post a Comment