मंगळावरील खोल पाण्याचे कुंड व सेडीमेंटरी दगडाचे अस्तित्व
फोटो -NASA/JPL-Caltech /Univ.of Arizona
नासा संस्था - 24 मार्च
नासाच्या शास्त्रज्ञांना मंगळावर पूर्वी पाणी होते हे सिद्ध करणारा सबळ पुरावा पुन्हा एकदा मिळाला आहे
23 जानेवारी 2016 ह्या दिवशी नासाच्या HIRSE ह्या कॅमेरयाने घेतलेल्या मंगळावरील Saheki विवरावरील छायाचित्रात तिथे असलेल्या दोन खोल पाण्याच्या कुंडाचा भाग छायांकित झाला
त्या कुंडामध्ये सेडीमेंटरी दगड सापडले आहेत हे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात आलेल्या गाळापासून बनलेले आहेत दगडावर पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्याही खुणा सापडल्या आहेत त्या मुळे पूर्वी मंगळावरील ह्या भागात वाहत्या पाण्याचे कुंड अस्तित्वात होते हे सिद्ध झाले आहे त्यात असलेले दगड त्याच वाहत्या नदीच्या पाण्याबरोबर वहात आलेल्या धूळ माती वाळू व कचऱ्याच्या गाळ तिथेच साचल्याने तयार झाले आहेत वर्षानुवर्षे एकावर एक असे गाळाचे थर तयार होऊन अशा सेडीमेंटरी दगडाची निर्मिती होते त्या मुळे शास्त्रज्ञांना आता ह्या दगडाच्या थरावरून ते किती वर्ष आधी तयार झाले असावेत शिवाय त्याची खोली किती असेल ह्याचा शोध घेणे शक्य झाले असून मंगळावर पाणी कधी अस्तित्वात होते आणि ते कधी आटले आणि नष्ट झाले ह्याचाही शोध घेता येणार आहे
मंगळाचा हा भाग अंतराळवीरांनी घेतलेल्या छायाचित्रात बरयाच वेळा दिसला पण त्यावर अस्तित्वात असलेले वाहत्या पाण्याचे झरे ,कुंड व सेडीमेंटरी रॉक मात्र जानेवारीत सापडले
नासाच्या टक्सन येथील अंतराळ व तंत्रज्ञान संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी मंगळ संशोधन प्रकल्पा अंतर्गत हे छायाचित्र घेतले आहे
No comments:
Post a Comment