Friday, 25 April 2025

नासाचे अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexy Ovchinin आणि Ivan Vagner स्थानकातून पृथ्वीवर परतले

 

 नासाच्या अंतराळ मोहीम 71/72 मधील अंतराळवीर सोयूझ MS -26 अंतराळयानातून पृथ्वीवर खाली उतरताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -25 एप्रिल 

नासाच्या अंतराळ मोहीम 71/72 चे तीन अंतराळवीर Don Pettit रशियन अंतराळवीर Alexy Ovchinin आणि Ivan Vagner स्थानकातील सात महिन्यांचे वास्तव्य संपवून वीस एप्रिलला पृथ्वीवर परतले आहेत विशेष म्हणजे अंतराळवीर Don Pettit ह्यांचा वीस तारखेला 70 वा वाढदिवस होता पृथ्वीवर परतल्यावर ते थोडेसे थकले होते पण नंतर ते नॉर्मल झाले

हे अंतराळवीर वीस तारखेला संद्याकाळी 5.57 मिनिटाला पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले आणि संद्याकाळी 9.20 मिनिटाला (स्थानिक वेळ सकाळी 6.20 मिनिटे ) पृथ्वीवर परतले ह्या तीन अंतराळवीरांसह सोयूझ MS-26 अंतराळयान कझाकस्थानातील Dzhezkagan येथे पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले नासाच्या रिकव्हरी टीमने ह्या अंतराळवीरांना अंतराळ यानातून बाहेर आणले टीम मधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केले त्या नंतर त्यांना रुटीन Postlanding मेडिकल चेकअप साठी कझाकस्थानातील  Recovery Staging area Karaganda येथे नेण्यात आले ह्या सर्व अंतराळवीरांना फायनल चेकअप नंतर नासाच्या विमानाने त्यांच्या गावी पाठवण्यात आले 

 

नासाचे अंतराळवीर Don Pettit आणि सहकारी अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर Pettit ह्यांना अंतराळयानातून बाहेर आणताना रिकव्हरी टीममधील सदस्य -फोटो नासा संस्था

निघण्याआधी ह्या अंतराळवीरांचा स्थानकात  Change The Commmond Ceremony कायर्क्रम पार पडला  स्थानकाचे कमांडर Alexy ह्यांनी स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Onishi ह्यांच्या हाती सोपवली आणि आपल्या ह्या स्थानकाचा नीट सांभाळ कर असे म्हटले त्या वेळी अंतराळवीर Alexy आणि Onishi ह्यांनी त्यांच्या मैत्रीला उजाळा दिला "आपण 2016 मध्ये भेटलो तेव्हा पासून एकत्र आहोत नासाच्या अंतराळ मोहीम -48 मध्ये आपण एकत्र होतो एकत्र संशोधन केल खूप छान मजेत वेळ घालवला असे म्हणत नासा संस्थेतील मान्यवर व टीम मधील सर्वांचे आभार मानले त्यांनी त्यांच्या सहकारी अंतराळवीरांचेही आभार मानले आपण सारे मिळून केलेल वास्तव्य,संशोधन सतत आठवणीत राहील त्या बद्दल आभार !

अंतराळवीर Onishi ह्यांनी देखील Alexy ह्यांचे आभार मानले ते म्हणाले ," तुझ्या हातून स्थानकाची हि चावी घेताना मला आनंद होत आहे हा माझा बहुमान आहे स्थानक खूप महत्वपूर्ण आहे अंतराळ स्थानकात जाण,तिथे वास्तव्य करण आणि संशोधन करण सोप नाही इथे अंतराळवीर नियमित येजा करतात वास्तव्य करतात नवनवीन संशोधन करतात हा अनुभव अमूल्य आहे पिढ्यानपिढ्या ह्या मोहिमा सुरु राहतील त्या साठी नासा संस्थेचे आभार तुझ्या सोबतचा अनुभव रॉकिंग होता  !"  

   Roscosmos cosmonaut Alexey Ovchinin hands over command of the International Space Station to JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Takuya Onishi as the rest of the Expedition 72 crew looks on.

अंतराळ स्थानकातून निघण्याआधी Change The Commamd Ceremony कार्यक्रमात अंतराळवीर Alexy Ovchinin स्थानकाची चावी जपानी अंतराळवीर Takuya Onishi ह्याच्या हाती सोपवताना -फोटो -नासा संस्था 

हे तीनही अंतराळवीर 17 सप्टेंबर 2024 मध्ये स्थानकात राहायला गेले होते आता सात महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत ह्या अंतराळवीरांनी स्थानकात 220 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Pettit चवथ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले होते त्यांच्या ह्या चार वेळच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी स्थानकात 590 दिवस वास्तव्य केले त्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान स्थानकात सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी Metal 3D printing Capabilities,Advance Water Sanitization Technologies Explore,स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील वातावरणातील पाण्याच्या कमीजास्त उपलब्धतेत रोपांची लागवड आणि वाढीवर संशोधित माहिती गोळा केली शिवाय स्थानकातील वातावरणात गोलाकार पेटणाऱ्या अग्नीच्या ज्योती संदर्भातील संशोधित निरीक्षण नोंदवले आणि ह्या कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात काही युनिक सायंटिफिक प्रयोग केले आणि अंतराळातील फोटो काढून ते सोशल मीडियावर सर्वांसाठी प्रकाशित केले

अंतराळवीर Ovchinin हे देखील चवथ्यांदा स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या चारवेळच्या अंतराळवारीत स्थानकात 595 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Vagner हे दुसऱ्यांदा स्थानकात राहायला गेले होते त्यांनी त्यांच्या दोनवेळच्या अंतराळ कारर्कीर्दीत स्थानकात 416 दिवस वास्तव्य केले आणि तेथील संशोधनात सहभाग नोंदवला 

Saturday, 19 April 2025

महिला स्पेशल अंतराळ पर्यटनानंतर महिला पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

 

 

 

Blue Origin -15 एप्रिल

 Blue Originच्या ह्या महिला स्पेशल अंतराळ पर्यटनाचे लाईव्ह प्रसारण ब्लू ओरिजिनच्या website वरून करण्यात आले त्या वेळी संस्थेतील मान्यवर तेथे उपस्थित होते Blue ओरिजिनच्या Host-Cararissa Thompson ह्यांनी उड्डाणा आधी आणि नंतर ह्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांची अंतराळ पर्यटना आधीची  आणि पर्यटनावरून परतल्यानंतरची मनस्थिती जाणून घेतली ह्या पर्यटनाचा अनुभव कसा होता हेही जाणून घेतले तेव्हा काही क्षण त्या निशब्द झाल्या त्यांना भावना अनावर झाल्या त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले 

 

केटी पेरी - ह्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सोबत नेलेले डेझीचे फुल दाखविले त्या म्हणाल्या,"माझ्या मुलीचे नाव डेझी आहे डेझीचे हे फुल मी सोबत नेले होते कारण हे फुल कुठेही कशाही परिस्थितीत तग धरून उगवते भिंतीच्या दगडाच्या फटीत सिमेंट मध्ये कठीण परिस्थितीवर मात करून फुलणारे ताजे टवटवीत नाजूक लवचिक असणारे हे फुल सामर्थ्याचे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे आणि पृथ्वीप्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी हे फुल मला योग्य वाटले  अंतराळातून परतल्यावरही पहा ते कसे टवटवीत राहिले आहे त्याची जपणूक करण्याची गरज आहे अंतराळातील पर्यटनाचा हा अनुभव अद्भुत होता अंतराळातून पृथ्वी सोंदर्य पाहण्याचा क्षण विलक्षण होता ! तिथे गेल्यावर मला आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची,माझ्यातल्या  ममत्वाची जाणीव झाली फक्त महिला अंतराळ प्रवाशी पर्यटनाची हि सामुदायिक ऊर्जा भविष्यकालीन महिलांना अंतराळ पर्यटनासाठी आणि अद्भुत जगाचा आनंद घेण्यासाठी प्रेरित करेल आपण हे सार फक्त तिथेच अनुभवू शकतो हे तारे चंद्र अंतराळ सारच अद्भुत ! अविश्वसनीय आहे! पेरी ह्यांनी Blue Origin च्या New Shepard यानाला देवदूताची उपमा दिली आहे त्यांचे प्रतीक चिन्ह देखील पंख आहे अस वाटत होत कि माझी आई पंख पसरून मला हाक मारतेय आज माझ्या मुलीने देखील मला अंतराळात उड्डाण करताना पाहिल ती इथे हजर होती हा आनंद हा क्षण अविस्मरणीय आहे 

लॉरेन - "माझ्या भावना अनावर झाल्या आहेत डोळ्यातून अश्रू येत आहेत सहसा असे होत नाही हा क्षण निशब्द करणारा आहे ह्या अंतराळ पर्यटनाच्या अद्भुत अनुभवासाठी देवाचे आणि Blue Origin टीमचे आभार मानायला हवेत ह्या टीममधील सर्वजण अंतराळ पर्यटनासाठी खूप मेहनत घेतात अंतराळात आम्ही सर्वजणी एकत्र होतो आमच्या भावना सारख्या होत्या अंतराळातील चंद्र पूर्ण आणि गुलाबी दिसत होता इथूनही तो तसाच दिसत होता का? ते दृश्य खूप सुंदर विलोभनीय होत वरून खाली पृथ्वीकढे पाहिल तेव्हा पृथ्वी शांत दिसत होती खूप अद्भुत आनंद होता तो! इथे पृथ्वीवरची वेगवेगळी राज्य तिथून एकत्र दिसत होती जेफने मला हा पर्यटनाचा अनुभव घ्यायला प्रवृत्त केल  मला मी परत येईन कि नाही अशी भीती वाटत होती पण मी परतलेय आणि हा अद्भुत आनंद घेऊन आलेय त्या साठी त्याचेही आभार ! उड्डाणा आधी गेलला पण खूप भीती वाटत होती भीतीपोटी तिने कानही टोचले नसल्याचे तिने मला सांगितले  

 अमांडा -"माझ अंतराळात जाण्याच स्वप्न पूर्ण झाल हा अनुभव अद्भुत आहे अविस्मरणीय आहे त्या साठी Blue Origin मधील शास्त्रज्ञ इंजिनिअर्स संस्थापकांचे आभार त्यांनी अंतराळ पर्यटन साध्य केल त्या मुळे जीवनात अशक्य काही नाही अंतराळात तुम्ही जाऊ शकता हे सिद्ध झाल मी स्वत:शीच निश्चय केला होता मी न घाबरता अंतराळ पर्यटन करेल तो पूर्ण झाला मी सोबत Zero g इंडिकेटर नेला होता तो परत आणलाय ते आपल्याला झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेशल्याची सूचना देतात आपल्या सोबत तरंगतातही मी हे सार कागदावर लिहून ठेवलय !"

कॆरियन - "माझ्याही भावना अनावर झाल्या आहेत सॉरी मला अश्रू रोकता येत नाहीत ह्या क्षण शब्दातीत आहे तिथे अंतराळात मला आकाशातील सुंदर चंद्र आणि खाली पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य पाहायला मिळाल आणि अंतराळातील भयाण अंध:कार पण ! तरंगण्याचा अनुभव अद्भुत होता त्यांनी मुलासाठी लिहलेल्या कथेबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या हा अनुभव महत्वाचा आहे मी आता अंतराळात जाऊन आले तसे इतर माताही जाऊ शकतात!"

गेल किंग -"गेल आनंदित होत्या त्या म्हणाल्या हा अनुभव माझ्यासाठी खूप स्पेशल होता मला उड्डाणाची भीती वाटत होती पण आमच्या प्रशिक्षकाने आमची खूप छान तयारी करून घेतली ते म्हणतात मी सर्वात स्पेशल आहे कारण मी भीतीवर मात केलीय त्यांना आणि मलाही आता माझा अभिमान वाटतोय भीतीमुळे मी माझे कान टोचले नव्हते पण आता मी टोचेन आता माझी भीती गेली झिरो ग्रॅव्हीटीत तरंगण्याचा सीटवरून बाहेर पडताना पुन्हा सीट पकडतानाची धडपड मजेशीर होती सर्वांनी पेरीला तो क्षण सेलिब्रेट करण्यासाठी गायला लावल !" गेलच्या अंतराळ पर्यटनाच्या वेळी त्यांची मैत्रीण ओप्रा विन्फ्रे आल्या होत्या त्या म्हणाल्या गेलला अंतराळ पर्यटनाची भीती वाटत होती पण मी तिला धैर्य दिल आता मला तिचा अभिमान वाटतोय आम्ही दोघे सतत सोबत असतो पण ह्या अंतराळ पर्यटनाच्या वेळी मात्र मी जाऊ शकले नाही जायला पाहिजे होत आता नंतर मी जाईंनही पण ह्या पहिल्या महिला स्पेशलच वैशिष्ठ नसेल माझाही त्यात सहभाग व्ह्यायला हवा होता

आयेशा - "खूप अद्भुत,सुंदर अनुभव होता! विशेषतः झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेशल्या नंतरचा आम्ही साऱ्या सीटवरून उठलो तो क्षण अविस्मरणीय होता,थरारक होता त्या क्षणी आम्ही साऱ्यांनी एकमेकीकडे पाहील तो क्षण आम्हाला स्क्रीन वर पाहायचाय वरून खिडकीतून दिसणार पृथ्वी सौन्दर्य फक्त खिडकी पुरत मर्यादित नव्हत पूर्ण स्क्रीन व्यापली होती अंतराळाला सीमा नाही ते अमर्याद आहे आज माझे वडील स्वर्गातून मला पहात असतील आणि म्हणतील WOW! ते देवदूत आहेत मला अंतराळ प्रवास करेन अस वाटल नव्हत पण ते शक्य झाल माझ स्वप्न साकार झाल माझे 92 वर्षाचे आजोबा मला न्यायला आले त्यांनी माझ उड्डाण पाहील आपल स्वप्न साकार होऊ शकत त्या साठी प्रयत्न करायला हवेत विशेषतः ज्यांना अंतराळ पर्यटनास जायच आहे त्यांनी !"

Friday, 18 April 2025

Blue Origin NS -31महिला स्पेशल अंतराळ मोहिमेतील सहा महिला अंतराळ पर्यटन करून पृथ्वीवर परतल्या

 

 Blue Origin च्या NS -31 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवासी महिला उड्डाणाच्या तयारीत -फोटो -Blue Origin  Blue Origin - 15 एप्रिल

अमेरिकेने अंतराळविश्वातील अंतराळ प्रवासासाठी खाजगी कंपन्यांना मान्यता दिल्या नंतर Blue Origin ने आजवर अनेक सामान्य नागरिकांना New Shepard अंतराळ यानातून अंतराळ पर्यटन घडवले आहे NS-30 अंतराळ मोहिमेतील नागरिक अंतराळ पर्यटनावरून परतल्यानंतर Blue Originने NS -31 मोहिमेत फक्त महिलांना अंतराळ पर्यटनास नेणार असल्याचे जाहीर केले होते 

14 एप्रिलला Blue Origin च्या ह्या NS-31 महिला स्पेशल अंतराळ मोहीमे अंतर्गत अंतराळ पर्यटन करणाऱ्या प्रवाशांमध्ये फक्त सहा महिलांचाच समावेश होता 1963 मध्ये पहिल्यांदा सोव्हिएट युनियनच्या Valentina Trreshkova ह्यांनी अंतराळ प्रवास केला होता त्या नंतर आजवर एकाही महिलेने सहकारी अंतराळवीरांशिवाय अंतराळप्रवास केला नाही त्या मुळे ह्या फक्त महिला अनंतराळ प्रवाशांच्या अंतराळ पर्यटनाची सर्वानाच उत्सुकता होती

ह्या मोहिमेत पॉप सुपरस्टार केटी पेरी,पत्रकार आणि लेखिका लॉरेन सांचेझ ,Rocket Scientist आयेशा बोवे Bioastronautic Scientist आमंडा नुयेन,पत्रकार आणि अँकर गेल किंग आणि फिल्म निर्माती कॆरियन फ्लीन ह्या त्यांच्या क्षेत्रातील नामवंत आणि यशस्वी कर्तबगार अंतराळ प्रवाशी महिलांचा समावेश आहे ह्या महिला टिमचे नेतृत्व लारेन ह्यांच्या कडे सोपविण्यात आले होते 

14 एप्रिलला Blue Origin च्या West Texas  येथील उड्डाण स्थळावरून New Shepard अंतराळयान सकाळी 9.30 वाजता ह्या साऱ्यांना घेऊन NS रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेपावले आणि काही वेळातच अत्यंत वेगाने अंतराळात पोहोचले तेव्हा स्वयंचलित यंत्रणेने नियोजित टप्पे पार करीत यानाचा वेग वाढवीत यान रॉकेट पासून वेगळे झाले आणि पुढील प्रवासास मार्गस्थ झाले आणि काही मिनिटातच अंतराळातील 62 मैल अंतरावरील अंतराळ आणि पृथ्वी ह्यांच्यातील karman रेषेपर्यंत पोहोचले 

अंतराळयान अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला आणि यानात 360 अंशातून सर्व बाजूने तरंगण्याचा आनंद लुटला त्या वेळी सर्वांच्याच तोंडून उत्स्फूर्तपणे Oh ! My God! Look That is our cute Moon! Wow!Amazing! look at the Blue Line ! असे आनंदोद्गार बाहेर पडले त्या वेळी सर्वांनीच सोबत आणलेले Zero g इंडिकेटर दाखविले केटी पेरी ह्यांनी सोबत नेलेले डेझीचे फुल दाखविले आणि लुई आर्मस्ट्रॉंग ह्यांचे What a Wonderful World ह्या गाण्याची ओळ म्हटली अवघ्या दहा बारा मिनिटांचा हा पृथ्वी ते अंतराळ असा अंतराळ पर्यटनाचा आंनद लुटून सर्वजण पृथ्वीवर सुखरूप खाली उतरले उड्डाणा आधी आणि परतल्यानंतर ह्या सहाही जणींना भेटायला त्याचे नातेवाईक मित्र आणि Blue Origin मधील मान्यवर हजर होते सर्वजणी आनंदी चेहऱ्यांनी अंतराळयानातून बाहेर पडल्या तेव्हा भावनावश झाल्या होत्या केटी पेरी आणि गेल किंग ह्यांनी यानातून बाहेर येताच खाली वाकून जमिनीला नमस्कार करत देवाचे आभार मानले सर्वांनीच त्यांच्या ह्या अंतराळ पर्यटनाचा अनुभव व्यक्त केला Blue Originच्या Host Cararissa Thompson ह्यांनी उड्डाणा आधी आणि नंतर ह्या महिलांशी संवाद साधला

सहा महिलांची हि टीम अंतराळ पर्यटनाला जाताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे New Shepard चे वरिष्ठ अधिकारी Phil Joyce म्हणतात ह्या टीममधील प्रत्येक महिला एक कथाकार आहे त्या ह्या मोहिमेवर वैयक्तिक आणि एकत्रितपणे आजच्या ह्या अभूतपूर्व अंतराळ पर्यटनाच्या निमित्याने पृथ्वी दर्शनाचा आनंद देणाऱ्या कथा लिहतील त्यांच्या ह्या अद्भुत प्रवासाच्या अनुभवाने सर्वांना प्रेरित करतील आणि त्यांची हि अंतराळातील ऐतिहासिक पाऊलवाट पिढ्यानपिढ्या स्रियांना प्रेरणादायी ठरेल त्या साठी त्यांचे आभार 

 

 Blue Origin NS -31 मोहिमेतील अंतराळ पर्यटक अंतराळवीर महिलांसाठी तयार करण्यात आलेला Patch -फोटो -Blue Origin

ह्या सर्व महिलांना अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट आणि त्यांची कर्तृत्ववैशिष्ठ चिन्हांकित केलेला Blue Origin ने तयार केलेला Patch  देऊन गौरविण्यात आले

Tuesday, 15 April 2025

नासाच्या Space X Crew -11 अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांची निवड जाहीर

  NASA’s SpaceX Crew-11 members stand inside the Space Vehicle Mockup Facility at the agency’s Johnson Space Center in Houston. From left are Mission Specialist Kimiya Yui from JAXA (Japan Aerospace Exploration Agency), Commander NASA astronaut Zena Cardman, Mission Specialist Oleg Platonov of Roscosmos, and Pilot NASA astronaut Mike Fincke.

 नासाच्या Space X Crew -11 अंतराळ मोहिमेतील जपानचे अंतराळवीर Kimiya Yui नासाच्या अंतराळवीर Zena Cardman अंतराळवीर Mike Fincke आणि रशियन अंतराळवीर Oleg Platonov -फोटो -नासा संस्था

 

 नासा संस्था -15 एप्रिल

नासाच्या Space X Crew-10 मोहिमेतील अंतराळवीर अंतराळस्थानकात पोहोचल्यानंतर नासा संस्थेने Space X Crew -11 अंतराळमोहिमेतील चार अंतराळवीरांची निवड निश्चित केली आहे ह्या मोहिमे अंतर्गत नासाच्या अंतराळवीर Zena Cardman अंतराळवीर Mike Fincke जपानचे अंतराळवीर Kimiya yui आणी रशियन अंतराळवीर Oleg Platonov हे चार अंतराळवीर जुलै महिन्यात सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत 

ह्या मोहीमेत अंतराळवीर Zena Cardman ह्या कमांडर पद,Mike Fincke पायलटपद अंतराळवीर Kimiya yui  आणी अंतराळवीर Oleg Platonov हे दोघे मिशन स्पेशालिस्टपद सांभाळणार आहेत ह्या आधी अंतराळवीर Zena ह्यांची Space X Crew -9 मोहिमेसाठी निवड झाली होती पण त्यावेळी नियोजित कार्यक्रमातील बदलामुळे त्या स्थानकात जाऊ शकल्या नव्हत्या आणी अंतराळवीर Mike ह्यांची निवड Boeing Starliner -1 मोहिमेसाठी झाली होती आता नासा संस्थेने त्यांची ह्या मोहिमेसाठी पुन्हा निवड केली आहे 

अंतराळवीर Zena Cardman पहिल्यांदाच स्थानकात रहायला जाणार आहेत 2017 मध्ये त्यांची नासा संस्थेत अंतराळवीर पदासाठी निवड झाली होती त्या Williamsburg Virginia येथील रहिवाशी असुन त्यांनी North Carolina University मधून BSc (Biology)MSc (Marine Science)ची पदवी प्राप्त केली आहे त्यांनी Geoscience मध्ये Phd केले आहे  त्यांनी geobiology आणि geochemical cycling ह्या मध्ये संशोधन केले असून त्यांनी वातावरणातील आणी समुद्रतळातील गाळामधील मायक्रो ऑरगॅनिझम विषयी सखोल संशोधन केले आहे नासा संस्थेतील Station Oprations आणि Lunar Surface Exploration Planning मध्ये त्यांचा सहभाग आहे

Mike Fincke Pennsylvania येथील रहिवासी असून ते निवृत्त US Air Force कर्नल आहेत ते US Air Force Test Pilot School मधील पदवीधरआहेत त्यांनी Massachusetts Institute Of Technology Cambridge मधून Aeronautics आणि Astronautics मध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि California येथील Stanford University मधून ह्या दोन्ही विषयात मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे त्यांना तीस हुन जास्त वेगवेगळ्या विमानांतून 2000 तास उड्डाणाचा अनुभव आहे हि त्यांची चवथी अंतराळवारी आहे त्यांनी त्यांच्या तीन वेळच्या अंतराळ कारकिर्दीत 382 दिवस स्थानकात वास्तव्य केले आहे 2004 मध्ये मोहीम -9,2008 मध्ये मोहीम -18आणि 2011मध्ये  STS- 134 अंतर्गत त्यांनी स्थानकात वास्तव्य केले होते 

अंतराळवीर Yui ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे त्यांनी स्थानकात 142 दिवस वास्तव्य केले आहे 2009 मध्ये त्यांची JAXA मध्ये निवड झाली त्यांनी अंतराळ मोहीम 44/45 मध्ये Flight Engineer पद सांभाळले आणि JAXA चे H-11 Transfer Vehicle Capture करणारा पहिला अंतराळवीर म्हणून त्यांची नोंद झाली Kibo वर नवीन प्रायोगिक वातावरण निर्मिती आणि संशोधित 25 सायंटिफिक प्रयोग त्यांनी केले आहेत 

अंतराळवीर Oleg Platonov ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळयात्रा असून ते प्रथमच स्थानकात राहायला जाणार आहेत 2018 मध्ये त्यांची अंतराळवीर पदासाठी निवड झाली आणि 2021 मध्ये त्यांची Test Cosmonaut पदी निवड झाली त्यांना Aircraft Pilot पदाचा दीर्घ अनुभव आहे शिवाय त्यांना Zero Gravity Training ,Scuba Divinig आणि Wilderness Survival चा अनुभव आहे 


Saturday, 5 April 2025

नासाच्या अंतराळ मोहीम 72/73 चे तीन अंतराळवीर आठ महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार

 The Roscosmos Soyuz MS-27 spacecraft will launch from the Baikonur Cosmodrome in Kazakhstan to the International Space Station with (pictured left to right) NASA astronaut Jonny Kim and Roscosmos cosmonauts Sergey Ryzhikov and Alexey Zubritsky.

नासाच्या अंतराळ मोहीम 72/73 चे नासाचे अंतराळवीर Jonny KIm रशियन अंतराळवीर Sergey ryzhikov आणि Alexey Zubritsky -फोटो नासा संस्था

 

नासा संस्था- 5 एप्रिल

नासाचे अंतराळवीर Jonny kim रशियन अंतराळवीर Sergey Ryzhikov आणी अंतराळवीर Alexy Zubritsky हे तीनही अंतराळवीर आठ महिन्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत आठ एप्रीलला कझाकस्थानातील बैकोनुर येथील ऊडाणस्थळावरून हे तीनही अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी ऊड्डाण करतील सोयूझ MS-27 अंतराळयान ह्या तिघांना घेऊन सकाळी 1.47 a.m.( 10.47 a.m.स्थानिक वेळ) वाजता स्थानकात जाण्यासाठी अंतराळ स्थानकाच्या दिशेने अंतराळात उड्डाण करेल

तीन तासांच्या अंतराळ प्रवासानंतर सोयुझ यान स्थानकाजवळ पोहोचेल आणी स्थानकाभोवती दोन फेऱ्या मारेल अंदाजे 5.03 a.m.वाजता सोयुझ यान स्थानकाच्या Prichal module जवळ पोहोचेल त्या नंतर सोयुझ यान आणी अंतराळस्थानक ह्यांच्यातील Hatching आणी Docking प्रक्रिया पार पडेल त्या नंतर हे तीनही अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील 

स्थानकात सध्या रहात असलेले अंतराळ मोहीम 72/73 चे अंतराळवीर Nicole Ayers ,Anne McClain ,Don Pettit ,Tokuya Onishi आणि रशियन अंतराळवीर Alexy Ovichinin ,Kiril Peskov आणि Ivan Vagner हे सर्वजण ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत करतील हे अंतराळवीर स्थानकात आठ महिने वास्तव्य करतील आणी ह्या मोहीम 72/73च्या अंतराळवीरांसोबत तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील डिसेंबरमध्ये हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील

नासाचे अंतराळवीर Jonny kim आणी रशियन अंतराळवीर Alexey Zubritsky हे पहिल्यांदाच स्थानकात रहायला जाणार असून हि त्यांची पहिलीच अंतराळवारी आहे अंतराळवीर Sergey Rhyzikov मात्र तिसऱ्यांदा स्थानकात रहायला जाणार असुन हि त्यांची तिसरी अंतराळवारी आहे 

ह्या अंतराळविरांच्या पृथ्वीवरून स्थानकाकडील ऊड्डाण आणी स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टि.वी. वरुन करण्यात येणार आहे 

   

Friday, 28 March 2025

नासाच्या अभिनव ऊपक्रमाअंतर्गत आर्टिमस मोहिमेसाठी नाविन्यपूर्ण Zero g indicater बनविण्यासाठी स्पर्धा जाहीर

Artemis II crew members shown inside the Neil Armstrong Operations and Checkout Building at NASA’s Kennedy Space Center.

नासाच्या आर्टीमस II मोहिमेतील अंतराळवीर Jeremy Hansen अंतराळ वीर Victor Glover अंतराळवीर Reid Wiseman आणि अंतराळवीर Christina Koch-नासाच्या Kennedy Space Center -Florida येथे -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था- 28 मार्च 

नासाची आर्टिमस II चंद्र मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे लवकरच नासाचे चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत नासा संस्था नेहमीच वेगवेगळे ऊपक्रम राबवून नागरिकांनाही त्यात सहभागी होण्याची संधी देते अशाच अभिनव ऊपक्रमा अंतर्गत नासा संस्थेने सर्जनशील नागरीकांसाठी आर्टिमस मोहीमेतील अंतराळविरांसोबत नेण्यासाठी नाविन्यपूर्ण Zero g indicator ची प्रतीकात्मक रचना बनविण्याची संधी उपलब्ध केली आहे

 खेळणीच्या किंवा बाहुलीच्या आकारातील छोट्या स्वरूपातील ZGI अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणीय वातावरणातुन पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळातील सुक्ष्म गुरुत्वाकर्षणीय वातावरणात प्रवेश करतात तेव्हा वातावरण बदलाचे संकेत देतात त्यामुळे अंतराळवीर स्वतःला आणि अंतराळयानाला हानी होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतात अंतराळात गुरुत्वाकर्षणच नसल्यामुळे सर्वच वस्तू तरंगतात त्यामुळे अंतराळवीर सीटच्या मागेपुढे कोठेही धडकू शकतात त्यांना इजा होण्याची शक्यता असते शिवाय ह्या ZGI मुळे अंतराळवीरांना अंतराळातील यानाची स्थिती,दिशा आणि अंतराळातील झिरो ग्रॅविटीतील उंचीची माहिती मिळते

नासाचे अंतराळवीर आणि आर्टीमस मोहिमेतील कमांडर Rid Wiseman म्हणतात," ह्या ZGI स्पर्धेतील अंतिम निवड झालेल्या स्पर्धकाने तयार केलेला नाविन्यपूर्ण ZGI आमच्या सोबत Orion अंतराळ यानातुन अंतराळ प्रवास करेल चंद्रभूमीवर जाईल आणी आम्हाला अंतराळातील Zero g वातावरणात पोहोचल्याचे संकेत देईल आम्ही चौघे अंतराळवीर चंद्राभोवती फिरताना आमच्या सोबत असेल,आम्हाला पृथ्वी पासून दूर परग्रहावर असल्याची जाणीव करून देईल आणि पृथ्वीवासीयांची आठवण देईल ह्या  प्रतिकात्मक ZGI ची रचना तुमच्या पैकीच कोणीतरी एकाने केलेली असेल नासाने जगभरातील सर्जनशील नागरिकांना दिलेली अमुल्य सुवर्ण संधी दुसरी कोणती असु शकते ?"

ह्या आधीच्या आर्टीमस I मानव विरहित मोहिमेत Orion अंतराळयानासोबत Snoopy Doll ZGI चंद्रावर पाठवण्यात आली होती आणि त्याही आधी नासाच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात जाताना  ZGI सोबत नेले होते अंतराळवीर Reid Wiseman ह्यांनी सोयूझ अंतराळयानातून जिराफाच्या स्वरूपातील ZGI सोबत नेला होता त्यांच्या आईने तो त्यांच्या मुलीला आणि मुलींनी त्यांना अंतराळस्थानकात नेण्यासाठी दिला होता आणि अंतराळ प्रवासात आणि स्थानकातील वातावरणात हा जिराफ कसा प्रतिसाद देतो हे पाहण्यासाठी त्या उत्सुक होत्या अंतराळवीर Christina Koch ह्यांनी देखील नासाच्या अंतराळ मोहिमेत स्थानकात जाताना त्यांच्या टीम मधील मित्रांची आठवण म्हणून Boll च्या आकारातील ZGI सोबत नेला होता काही अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मुलांनी देखील वेगवेगळ्या खेळणीच्या स्वरूपातील ZGI स्वतः तयार केले होते 

आर्टीमस मोहिमेतील ह्या स्पर्धेतील ZGI हा कमी वजनाचा छोट्या आकाराचा आणी नासा संस्थेने ठरवून दिलेल्या वस्तू पासून बनविलेला,अग्नी रोधक,अंतराळात नेण्यासाठी सोयीचा भरीव व नाविन्यपूर्ण असावा शिवाय हा ZGI अंतराळ स्थानकात वरच्या बाजूला लवचिक धाग्याने लटकवता येण्याजोगा Strechable असणे आवश्यक आहे 

ही स्पर्धा वेगवेगळ्या गटात घेण्यात येणार असुन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधुन 25अंतीम स्पर्धकांची निवड करण्यात येणारआहे ह्या 25 निवडक स्पर्धकांमधून नासा संस्थेतील मान्यवर आणी आर्टिमस ll मोहिमेतील अंतराळवीर अंतिम स्पर्धकाची निवड करतील आकर्षक नाविन्यपूर्ण रचनेला प्राधान्य देण्यात येईल ह्या स्पर्धेत सहभागी  निवडक स्पर्धकांना नासा संस्थेतर्फे बक्षिस देण्यात येणार आहे सर्जनशील नागरिकांच्या नाविन्यपूर्ण आणि नासाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या भरीव हलक्या वजनाच्या छोट्या आकर्षक रूपातील ZGI ची निवड केली जाईल 

आर्टीमस II मोहिमेत नासाचे अंतराळवीर Reid Wiseman,Victor Glover,Christina Koch आणि कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Hansen चंद्रावर जाणार आहेत तेथील भूमीवर पाऊल ठेवून चंद्रभूमी आणि तेथील वातावरणाची संशोधित माहिती गोळा करणार आहेत ह्या अंतराळवीरांसोबत आर्टीमस मोहिमेतील Orion अंतराळयान,Space Launch System Rockets आणि इतर अत्याधुनिक उपकरणांची चाचणी घेण्यात येणार आहे

Wednesday, 19 March 2025

नासाच्या Space X Crew- 9 मोहिमेतील अंतराळवीरांसोबत अखेर अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणी Butch Wilmore सुखरूप पृथ्वीवर परतले

 

 

Space X Crew Dragon Freedom नासाची अंतराळवीर सुनीता विल्ल्यम्स,Butch Wilmore ,Nick Hague आणि रशियन अंतराळवीर Alexsandr Gorbunov ह्या अंतराळवीरांसह Florida येथील Tallahassee येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले -फोटो नासा संस्था

नासा संस्था -18 मार्च        

Boeing Starliner अंतराळयानाच्या ऊड्डान चाचणी साठी अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणी ButchWilmore हे दोन्ही अंतराळवीर एक आठवड्यासाठी स्थानकात रहायला गेले होते पण Starliner अंतराळयानातील हेलीयमच्या गळती मुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे नऊ महिने लांबले होते अखेर बुधवारी पहाटे 5.57 वाजता Space X Crew -9 मोहीमेतील दोन अंतराळवीरांसोबत हे दोन्ही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत

 

 

 Four people are in a circular opening, smiling at the camera. They are wearing polo shirts in different colors. Suni Williams' (far right) hair spills outward toward a display of patches.

 

 पृथ्वीवर परतण्याआधी ह्या चारही अंतराळवीरांनी स्थानकात काढलेला त्यांचा फोटो -नासा संस्था

Space X-Crew Dragon Freedom अंतराळयान 17 मार्चला Space X Crew-9 मोहिमेतील अंतराळवीर Nick Hague रशियन अंतराळवीर  Alexsandr Gorbunov नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणी Butch Wilmore ह्यांच्यासह 11.05p.m.(EST) वाजता स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणी बुधवारी पहाटे पृथ्वीवर पोहोचले अमेरीकेतील Florida येथील Tallahassee समुद्राच्या खाडीत Freedom Dragon आणी अंतराळवीर पॅराशुटच्या सहाय्याने समुद्रात खाली ऊतरले

हे अंतराळवीर खाली ऊतरताच नासाचे Recovery Ship आणी दोन बोटी तीथे पोहोचल्या नासाच्या recovery टिममधील पथकाने Space X Dragon जहाजावर चढवत Docking प्रक्रिया पार पाडली त्या नंतर रिकव्हरी टिममधील डॉक्टर्सनी ह्या अंतराळविरांचे प्राथमिक चेकअप केले टिममधील सदस्यांनी त्यांना यानातुन ऊचलुन बाहेर काढले आणी डेकवर आणून खुर्चीवर बसवले त्यांना प्यायला पाणी दिले हे अंतराळवीर Dragon  मधून  सर्वांना हात दाखवत आनंदित चेहऱ्याने बाहेर पडले

ह्या चारही अंतराळवीरांसह Space X Dragon समुद्रात ऊतरले तेव्हा रिकव्हरी बोटीजवळ दोन डॉल्फिन मासे समुद्रात विहरत होते

ह्या अंतराळवीरांचे पुन्हा अंतीम हेल्थ चेकअप करण्यात आले त्या नंतर त्यांना नासाच्या हेलिकॉप्टरने Johonson Space Center मध्ये पोहोचवण्यात आले तेव्हा ह्या अंतराळवीरांचे नातेवाईक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते 

ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर सुरक्षित पोहोचण्याने आम्ही आनंदीत झालो आहोत असे नासाचे  Acting Administrator Janet Petro म्हणाले,"ह्या अंतराळवीरांचे येणे लांबले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Tramp ह्यांच्या निर्देशा नंतर आम्ही त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरु केली होती त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले ह्या अंतराळवीरांचे वास्तव्य आकस्मित समस्येमुळे नऊ महिने लाबंले असले तरीही त्यांनी त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जात तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले आणी स्थानकाच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी स्पेसवॉकही केले ह्या अंतराळवीरांनी Stem Cell tecnology Blood Diseases ,Autoimmune Disorder,कॅन्सरविषयी संशोधन केले आणि झिरो ग्रॅव्हीटीतील रोपांची लागवड व त्यांच्या वाढीचे निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती गोळा केली

अंतराळवीर Nick Hague आणी Alexsandr Gorbunov 28 सप्टेंबर 2024 मध्ये स्थानकात रहायला गेले होते आणी अंतराळवीर सुनिता विल्ल्यम्स आणी Butch Wilmore 5 जुन 2024 मध्ये स्थानकात गेले होते