
Blue Origin च्या NS -31 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवासी महिला उड्डाणाच्या तयारीत -फोटो -Blue Origin Blue Origin - 15 एप्रिल
अमेरिकेने अंतराळविश्वातील अंतराळ प्रवासासाठी खाजगी कंपन्यांना मान्यता दिल्या नंतर Blue Origin ने आजवर अनेक सामान्य नागरिकांना New Shepard अंतराळ यानातून अंतराळ पर्यटन घडवले आहे NS-30 अंतराळ मोहिमेतील नागरिक अंतराळ पर्यटनावरून परतल्यानंतर Blue Originने NS -31 मोहिमेत फक्त महिलांना अंतराळ पर्यटनास नेणार असल्याचे जाहीर केले होते
14 एप्रिलला Blue Origin च्या ह्या NS-31 महिला स्पेशल अंतराळ मोहीमे अंतर्गत अंतराळ पर्यटन करणाऱ्या प्रवाशांमध्ये फक्त सहा महिलांचाच समावेश होता 1963 मध्ये पहिल्यांदा सोव्हिएट युनियनच्या Valentina Trreshkova ह्यांनी अंतराळ प्रवास केला होता त्या नंतर आजवर एकाही महिलेने सहकारी अंतराळवीरांशिवाय अंतराळप्रवास केला नाही त्या मुळे ह्या फक्त महिला अनंतराळ प्रवाशांच्या अंतराळ पर्यटनाची सर्वानाच उत्सुकता होती
ह्या मोहिमेत पॉप सुपरस्टार केटी पेरी,पत्रकार आणि लेखिका लॉरेन सांचेझ ,Rocket Scientist आयेशा बोवे Bioastronautic Scientist आमंडा नुयेन,पत्रकार आणि अँकर गेल किंग आणि फिल्म निर्माती कॆरियन फ्लीन ह्या त्यांच्या क्षेत्रातील नामवंत आणि यशस्वी कर्तबगार अंतराळ प्रवाशी महिलांचा समावेश आहे ह्या महिला टिमचे नेतृत्व लारेन ह्यांच्या कडे सोपविण्यात आले होते
14 एप्रिलला Blue Origin च्या West Texas येथील उड्डाण स्थळावरून New Shepard अंतराळयान सकाळी 9.30 वाजता ह्या साऱ्यांना घेऊन NS रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेपावले आणि काही वेळातच अत्यंत वेगाने अंतराळात पोहोचले तेव्हा स्वयंचलित यंत्रणेने नियोजित टप्पे पार करीत यानाचा वेग वाढवीत यान रॉकेट पासून वेगळे झाले आणि पुढील प्रवासास मार्गस्थ झाले आणि काही मिनिटातच अंतराळातील 62 मैल अंतरावरील अंतराळ आणि पृथ्वी ह्यांच्यातील karman रेषेपर्यंत पोहोचले
अंतराळयान अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला आणि यानात 360 अंशातून सर्व बाजूने तरंगण्याचा आनंद लुटला त्या वेळी सर्वांच्याच तोंडून उत्स्फूर्तपणे Oh ! My God! Look That is our cute Moon! Wow!Amazing! look at the Blue Line ! असे आनंदोद्गार बाहेर पडले त्या वेळी सर्वांनीच सोबत आणलेले Zero g इंडिकेटर दाखविले केटी पेरी ह्यांनी सोबत नेलेले डेझीचे फुल दाखविले आणि लुई आर्मस्ट्रॉंग ह्यांचे What a Wonderful World ह्या गाण्याची ओळ म्हटली अवघ्या दहा बारा मिनिटांचा हा पृथ्वी ते अंतराळ असा अंतराळ पर्यटनाचा आंनद लुटून सर्वजण पृथ्वीवर सुखरूप खाली उतरले उड्डाणा आधी आणि परतल्यानंतर ह्या सहाही जणींना भेटायला त्याचे नातेवाईक मित्र आणि Blue Origin मधील मान्यवर हजर होते सर्वजणी आनंदी चेहऱ्यांनी अंतराळयानातून बाहेर पडल्या तेव्हा भावनावश झाल्या होत्या केटी पेरी आणि गेल किंग ह्यांनी यानातून बाहेर येताच खाली वाकून जमिनीला नमस्कार करत देवाचे आभार मानले सर्वांनीच त्यांच्या ह्या अंतराळ पर्यटनाचा अनुभव व्यक्त केला Blue Originच्या Host Cararissa Thompson ह्यांनी उड्डाणा आधी आणि नंतर ह्या महिलांशी संवाद साधला
सहा महिलांची हि टीम अंतराळ पर्यटनाला जाताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले असे New Shepard चे वरिष्ठ अधिकारी Phil Joyce म्हणतात ह्या टीममधील प्रत्येक महिला एक कथाकार आहे त्या ह्या मोहिमेवर वैयक्तिक आणि एकत्रितपणे आजच्या ह्या अभूतपूर्व अंतराळ पर्यटनाच्या निमित्याने पृथ्वी दर्शनाचा आनंद देणाऱ्या कथा लिहतील त्यांच्या ह्या अद्भुत प्रवासाच्या अनुभवाने सर्वांना प्रेरित करतील आणि त्यांची हि अंतराळातील ऐतिहासिक पाऊलवाट पिढ्यानपिढ्या स्रियांना प्रेरणादायी ठरेल त्या साठी त्यांचे आभार
Blue Origin NS -31 मोहिमेतील अंतराळ पर्यटक अंतराळवीर महिलांसाठी तयार करण्यात आलेला Patch -फोटो -Blue Origin
ह्या सर्व महिलांना अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट आणि त्यांची कर्तृत्ववैशिष्ठ चिन्हांकित केलेला Blue Origin ने तयार केलेला Patch देऊन गौरविण्यात आले
No comments:
Post a Comment