
Space X Crew Dragon Freedom नासाची अंतराळवीर सुनीता विल्ल्यम्स,Butch Wilmore ,Nick Hague आणि रशियन अंतराळवीर Alexsandr Gorbunov ह्या अंतराळवीरांसह Florida येथील Tallahassee येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले -फोटो नासा संस्था
नासा संस्था -18 मार्च
Boeing Starliner अंतराळयानाच्या ऊड्डान चाचणी साठी अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणी ButchWilmore हे दोन्ही अंतराळवीर एक आठवड्यासाठी स्थानकात रहायला गेले होते पण Starliner अंतराळयानातील हेलीयमच्या गळती मुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे नऊ महिने लांबले होते अखेर बुधवारी पहाटे 5.57 वाजता Space X Crew -9 मोहीमेतील दोन अंतराळवीरांसोबत हे दोन्ही अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत

पृथ्वीवर परतण्याआधी ह्या चारही अंतराळवीरांनी स्थानकात काढलेला त्यांचा फोटो -नासा संस्था
Space X-Crew Dragon Freedom अंतराळयान 17 मार्चला Space X Crew-9 मोहिमेतील अंतराळवीर Nick Hague रशियन अंतराळवीर Alexsandr Gorbunov नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणी Butch Wilmore ह्यांच्यासह 11.05p.m.(EST) वाजता स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणी बुधवारी पहाटे पृथ्वीवर पोहोचले अमेरीकेतील Florida येथील Tallahassee समुद्राच्या खाडीत Freedom Dragon आणी अंतराळवीर पॅराशुटच्या सहाय्याने समुद्रात खाली ऊतरले
हे अंतराळवीर खाली ऊतरताच नासाचे Recovery Ship आणी दोन बोटी तीथे पोहोचल्या नासाच्या recovery टिममधील पथकाने Space X Dragon जहाजावर चढवत Docking प्रक्रिया पार पाडली त्या नंतर रिकव्हरी टिममधील डॉक्टर्सनी ह्या अंतराळविरांचे प्राथमिक चेकअप केले टिममधील सदस्यांनी त्यांना यानातुन ऊचलुन बाहेर काढले आणी डेकवर आणून खुर्चीवर बसवले त्यांना प्यायला पाणी दिले हे अंतराळवीर Dragon मधून सर्वांना हात दाखवत आनंदित चेहऱ्याने बाहेर पडले
ह्या चारही अंतराळवीरांसह Space X Dragon समुद्रात ऊतरले तेव्हा रिकव्हरी बोटीजवळ दोन डॉल्फिन मासे समुद्रात विहरत होते
ह्या अंतराळवीरांचे पुन्हा अंतीम हेल्थ चेकअप करण्यात आले त्या नंतर त्यांना नासाच्या हेलिकॉप्टरने Johonson Space Center मध्ये पोहोचवण्यात आले तेव्हा ह्या अंतराळवीरांचे नातेवाईक त्यांच्या स्वागतासाठी हजर होते
ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर सुरक्षित पोहोचण्याने आम्ही आनंदीत झालो आहोत असे नासाचे Acting Administrator Janet Petro म्हणाले,"ह्या अंतराळवीरांचे येणे लांबले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Tramp ह्यांच्या निर्देशा नंतर आम्ही त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरु केली होती त्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले ह्या अंतराळवीरांचे वास्तव्य आकस्मित समस्येमुळे नऊ महिने लाबंले असले तरीही त्यांनी त्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जात तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले आणी स्थानकाच्या तांत्रिक दुरूस्तीसाठी स्पेसवॉकही केले ह्या अंतराळवीरांनी Stem Cell tecnology Blood Diseases ,Autoimmune Disorder,कॅन्सरविषयी संशोधन केले आणि झिरो ग्रॅव्हीटीतील रोपांची लागवड व त्यांच्या वाढीचे निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती गोळा केली
अंतराळवीर Nick Hague आणी Alexsandr Gorbunov 28 सप्टेंबर 2024 मध्ये स्थानकात रहायला गेले होते आणी अंतराळवीर सुनिता विल्ल्यम्स आणी Butch Wilmore 5 जुन 2024 मध्ये स्थानकात गेले होते
No comments:
Post a Comment