Saturday, 19 April 2025

महिला स्पेशल अंतराळ पर्यटनानंतर महिला पर्यटकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

 

 

 

Blue Origin -15 एप्रिल

 Blue Originच्या ह्या महिला स्पेशल अंतराळ पर्यटनाचे लाईव्ह प्रसारण ब्लू ओरिजिनच्या website वरून करण्यात आले त्या वेळी संस्थेतील मान्यवर तेथे उपस्थित होते Blue ओरिजिनच्या Host-Cararissa Thompson ह्यांनी उड्डाणा आधी आणि नंतर ह्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांची अंतराळ पर्यटना आधीची  आणि पर्यटनावरून परतल्यानंतरची मनस्थिती जाणून घेतली ह्या पर्यटनाचा अनुभव कसा होता हेही जाणून घेतले तेव्हा काही क्षण त्या निशब्द झाल्या त्यांना भावना अनावर झाल्या त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले 

 

केटी पेरी - ह्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सोबत नेलेले डेझीचे फुल दाखविले त्या म्हणाल्या,"माझ्या मुलीचे नाव डेझी आहे डेझीचे हे फुल मी सोबत नेले होते कारण हे फुल कुठेही कशाही परिस्थितीत तग धरून उगवते भिंतीच्या दगडाच्या फटीत सिमेंट मध्ये कठीण परिस्थितीवर मात करून फुलणारे ताजे टवटवीत नाजूक लवचिक असणारे हे फुल सामर्थ्याचे स्त्री शक्तीचे प्रतीक आहे आणि पृथ्वीप्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी हे फुल मला योग्य वाटले  अंतराळातून परतल्यावरही पहा ते कसे टवटवीत राहिले आहे त्याची जपणूक करण्याची गरज आहे अंतराळातील पर्यटनाचा हा अनुभव अद्भुत होता अंतराळातून पृथ्वी सोंदर्य पाहण्याचा क्षण विलक्षण होता ! तिथे गेल्यावर मला आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची,माझ्यातल्या  ममत्वाची जाणीव झाली फक्त महिला अंतराळ प्रवाशी पर्यटनाची हि सामुदायिक ऊर्जा भविष्यकालीन महिलांना अंतराळ पर्यटनासाठी आणि अद्भुत जगाचा आनंद घेण्यासाठी प्रेरित करेल आपण हे सार फक्त तिथेच अनुभवू शकतो हे तारे चंद्र अंतराळ सारच अद्भुत ! अविश्वसनीय आहे! पेरी ह्यांनी Blue Origin च्या New Shepard यानाला देवदूताची उपमा दिली आहे त्यांचे प्रतीक चिन्ह देखील पंख आहे अस वाटत होत कि माझी आई पंख पसरून मला हाक मारतेय आज माझ्या मुलीने देखील मला अंतराळात उड्डाण करताना पाहिल ती इथे हजर होती हा आनंद हा क्षण अविस्मरणीय आहे 

लॉरेन - "माझ्या भावना अनावर झाल्या आहेत डोळ्यातून अश्रू येत आहेत सहसा असे होत नाही हा क्षण निशब्द करणारा आहे ह्या अंतराळ पर्यटनाच्या अद्भुत अनुभवासाठी देवाचे आणि Blue Origin टीमचे आभार मानायला हवेत ह्या टीममधील सर्वजण अंतराळ पर्यटनासाठी खूप मेहनत घेतात अंतराळात आम्ही सर्वजणी एकत्र होतो आमच्या भावना सारख्या होत्या अंतराळातील चंद्र पूर्ण आणि गुलाबी दिसत होता इथूनही तो तसाच दिसत होता का? ते दृश्य खूप सुंदर विलोभनीय होत वरून खाली पृथ्वीकढे पाहिल तेव्हा पृथ्वी शांत दिसत होती खूप अद्भुत आनंद होता तो! इथे पृथ्वीवरची वेगवेगळी राज्य तिथून एकत्र दिसत होती जेफने मला हा पर्यटनाचा अनुभव घ्यायला प्रवृत्त केल  मला मी परत येईन कि नाही अशी भीती वाटत होती पण मी परतलेय आणि हा अद्भुत आनंद घेऊन आलेय त्या साठी त्याचेही आभार ! उड्डाणा आधी गेलला पण खूप भीती वाटत होती भीतीपोटी तिने कानही टोचले नसल्याचे तिने मला सांगितले  

 अमांडा -"माझ अंतराळात जाण्याच स्वप्न पूर्ण झाल हा अनुभव अद्भुत आहे अविस्मरणीय आहे त्या साठी Blue Origin मधील शास्त्रज्ञ इंजिनिअर्स संस्थापकांचे आभार त्यांनी अंतराळ पर्यटन साध्य केल त्या मुळे जीवनात अशक्य काही नाही अंतराळात तुम्ही जाऊ शकता हे सिद्ध झाल मी स्वत:शीच निश्चय केला होता मी न घाबरता अंतराळ पर्यटन करेल तो पूर्ण झाला मी सोबत Zero g इंडिकेटर नेला होता तो परत आणलाय ते आपल्याला झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेशल्याची सूचना देतात आपल्या सोबत तरंगतातही मी हे सार कागदावर लिहून ठेवलय !"

कॆरियन - "माझ्याही भावना अनावर झाल्या आहेत सॉरी मला अश्रू रोकता येत नाहीत ह्या क्षण शब्दातीत आहे तिथे अंतराळात मला आकाशातील सुंदर चंद्र आणि खाली पृथ्वीच अलौकिक सौन्दर्य पाहायला मिळाल आणि अंतराळातील भयाण अंध:कार पण ! तरंगण्याचा अनुभव अद्भुत होता त्यांनी मुलासाठी लिहलेल्या कथेबद्दल विचारले तेव्हा त्या म्हणाल्या हा अनुभव महत्वाचा आहे मी आता अंतराळात जाऊन आले तसे इतर माताही जाऊ शकतात!"

गेल किंग -"गेल आनंदित होत्या त्या म्हणाल्या हा अनुभव माझ्यासाठी खूप स्पेशल होता मला उड्डाणाची भीती वाटत होती पण आमच्या प्रशिक्षकाने आमची खूप छान तयारी करून घेतली ते म्हणतात मी सर्वात स्पेशल आहे कारण मी भीतीवर मात केलीय त्यांना आणि मलाही आता माझा अभिमान वाटतोय भीतीमुळे मी माझे कान टोचले नव्हते पण आता मी टोचेन आता माझी भीती गेली झिरो ग्रॅव्हीटीत तरंगण्याचा सीटवरून बाहेर पडताना पुन्हा सीट पकडतानाची धडपड मजेशीर होती सर्वांनी पेरीला तो क्षण सेलिब्रेट करण्यासाठी गायला लावल !" गेलच्या अंतराळ पर्यटनाच्या वेळी त्यांची मैत्रीण ओप्रा विन्फ्रे आल्या होत्या त्या म्हणाल्या गेलला अंतराळ पर्यटनाची भीती वाटत होती पण मी तिला धैर्य दिल आता मला तिचा अभिमान वाटतोय आम्ही दोघे सतत सोबत असतो पण ह्या अंतराळ पर्यटनाच्या वेळी मात्र मी जाऊ शकले नाही जायला पाहिजे होत आता नंतर मी जाईंनही पण ह्या पहिल्या महिला स्पेशलच वैशिष्ठ नसेल माझाही त्यात सहभाग व्ह्यायला हवा होता

आयेशा - "खूप अद्भुत,सुंदर अनुभव होता! विशेषतः झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेशल्या नंतरचा आम्ही साऱ्या सीटवरून उठलो तो क्षण अविस्मरणीय होता,थरारक होता त्या क्षणी आम्ही साऱ्यांनी एकमेकीकडे पाहील तो क्षण आम्हाला स्क्रीन वर पाहायचाय वरून खिडकीतून दिसणार पृथ्वी सौन्दर्य फक्त खिडकी पुरत मर्यादित नव्हत पूर्ण स्क्रीन व्यापली होती अंतराळाला सीमा नाही ते अमर्याद आहे आज माझे वडील स्वर्गातून मला पहात असतील आणि म्हणतील WOW! ते देवदूत आहेत मला अंतराळ प्रवास करेन अस वाटल नव्हत पण ते शक्य झाल माझ स्वप्न साकार झाल माझे 92 वर्षाचे आजोबा मला न्यायला आले त्यांनी माझ उड्डाण पाहील आपल स्वप्न साकार होऊ शकत त्या साठी प्रयत्न करायला हवेत विशेषतः ज्यांना अंतराळ पर्यटनास जायच आहे त्यांनी !"

No comments:

Post a Comment