नासाच्या आर्टीमस II मोहिमेतील अंतराळवीर Jeremy Hansen अंतराळ वीर Victor Glover अंतराळवीर Reid Wiseman आणि अंतराळवीर Christina Koch-नासाच्या Kennedy Space Center -Florida येथे -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 28 मार्च
नासाची आर्टिमस II चंद्र मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे लवकरच नासाचे चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत नासा संस्था नेहमीच वेगवेगळे ऊपक्रम राबवून नागरिकांनाही त्यात सहभागी होण्याची संधी देते अशाच अभिनव ऊपक्रमा अंतर्गत नासा संस्थेने सर्जनशील नागरीकांसाठी आर्टिमस मोहीमेतील अंतराळविरांसोबत नेण्यासाठी नाविन्यपूर्ण Zero g indicator ची प्रतीकात्मक रचना बनविण्याची संधी उपलब्ध केली आहे
खेळणीच्या किंवा बाहुलीच्या आकारातील छोट्या स्वरूपातील ZGI अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणीय वातावरणातुन पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळातील सुक्ष्म गुरुत्वाकर्षणीय वातावरणात प्रवेश करतात तेव्हा वातावरण बदलाचे संकेत देतात त्यामुळे अंतराळवीर स्वतःला आणि अंतराळयानाला हानी होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतात अंतराळात गुरुत्वाकर्षणच नसल्यामुळे सर्वच वस्तू तरंगतात त्यामुळे अंतराळवीर सीटच्या मागेपुढे कोठेही धडकू शकतात त्यांना इजा होण्याची शक्यता असते शिवाय ह्या ZGI मुळे अंतराळवीरांना अंतराळातील यानाची स्थिती,दिशा आणि अंतराळातील झिरो ग्रॅविटीतील उंचीची माहिती मिळते
नासाचे अंतराळवीर आणि आर्टीमस मोहिमेतील कमांडर Rid Wiseman म्हणतात," ह्या ZGI स्पर्धेतील अंतिम निवड झालेल्या स्पर्धकाने तयार केलेला नाविन्यपूर्ण ZGI आमच्या सोबत Orion अंतराळ यानातुन अंतराळ प्रवास करेल चंद्रभूमीवर जाईल आणी आम्हाला अंतराळातील Zero g वातावरणात पोहोचल्याचे संकेत देईल आम्ही चौघे अंतराळवीर चंद्राभोवती फिरताना आमच्या सोबत असेल,आम्हाला पृथ्वी पासून दूर परग्रहावर असल्याची जाणीव करून देईल आणि पृथ्वीवासीयांची आठवण देईल ह्या प्रतिकात्मक ZGI ची रचना तुमच्या पैकीच कोणीतरी एकाने केलेली असेल नासाने जगभरातील सर्जनशील नागरिकांना दिलेली अमुल्य सुवर्ण संधी दुसरी कोणती असु शकते ?"
ह्या आधीच्या आर्टीमस I मानव विरहित मोहिमेत Orion अंतराळयानासोबत Snoopy Doll ZGI चंद्रावर पाठवण्यात आली होती आणि त्याही आधी नासाच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात जाताना ZGI सोबत नेले होते अंतराळवीर Reid Wiseman ह्यांनी सोयूझ अंतराळयानातून जिराफाच्या स्वरूपातील ZGI सोबत नेला होता त्यांच्या आईने तो त्यांच्या मुलीला आणि मुलींनी त्यांना अंतराळस्थानकात नेण्यासाठी दिला होता आणि अंतराळ प्रवासात आणि स्थानकातील वातावरणात हा जिराफ कसा प्रतिसाद देतो हे पाहण्यासाठी त्या उत्सुक होत्या अंतराळवीर Christina Koch ह्यांनी देखील नासाच्या अंतराळ मोहिमेत स्थानकात जाताना त्यांच्या टीम मधील मित्रांची आठवण म्हणून Boll च्या आकारातील ZGI सोबत नेला होता काही अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मुलांनी देखील वेगवेगळ्या खेळणीच्या स्वरूपातील ZGI स्वतः तयार केले होते
आर्टीमस मोहिमेतील ह्या स्पर्धेतील ZGI हा कमी वजनाचा छोट्या आकाराचा आणी नासा संस्थेने ठरवून दिलेल्या वस्तू पासून बनविलेला,अग्नी रोधक,अंतराळात नेण्यासाठी सोयीचा भरीव व नाविन्यपूर्ण असावा शिवाय हा ZGI अंतराळ स्थानकात वरच्या बाजूला लवचिक धाग्याने लटकवता येण्याजोगा Strechable असणे आवश्यक आहे
ही स्पर्धा वेगवेगळ्या गटात घेण्यात येणार असुन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांमधुन 25अंतीम स्पर्धकांची निवड करण्यात येणारआहे ह्या 25 निवडक स्पर्धकांमधून नासा संस्थेतील मान्यवर आणी आर्टिमस ll मोहिमेतील अंतराळवीर अंतिम स्पर्धकाची निवड करतील आकर्षक नाविन्यपूर्ण रचनेला प्राधान्य देण्यात येईल ह्या स्पर्धेत सहभागी निवडक स्पर्धकांना नासा संस्थेतर्फे बक्षिस देण्यात येणार आहे सर्जनशील नागरिकांच्या नाविन्यपूर्ण आणि नासाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या भरीव हलक्या वजनाच्या छोट्या आकर्षक रूपातील ZGI ची निवड केली जाईल
आर्टीमस II मोहिमेत नासाचे अंतराळवीर Reid Wiseman,Victor Glover,Christina Koch आणि कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Hansen चंद्रावर जाणार आहेत तेथील भूमीवर पाऊल ठेवून चंद्रभूमी आणि तेथील वातावरणाची संशोधित माहिती गोळा करणार आहेत ह्या अंतराळवीरांसोबत आर्टीमस मोहिमेतील Orion अंतराळयान,Space Launch System Rockets आणि इतर अत्याधुनिक उपकरणांची चाचणी घेण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment