नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Andreas Mogensen ,Jasmin Moghbeli , Satoshi Furukawa आणि Loral O' Hara नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान ख्रिसमस निमित्य शुभेच्छा देताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था-23 डिसेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर Andreas Mogensen ,Jasmin Moghbeli , Satoshi Furukawa आणि Loral O' Hara नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान ख्रिसमस निमित्य शुभेच्छा देताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था-23 डिसेंबर

नासाच्या मोहीम 70 चे अंतराळवीर कमांडर अंतराळवीर Andreas Mogensen,Jasmin Moghbeli, Loral O'Hara,Nikolai Chub,Konstantin Borisov,Oleg Kononenko,Satoshi Furukawa एकत्रित संवाद साधताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था -14 डिसेंबर
सहा डिसेंबरला अंतराळस्थानकाने 25व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे त्या निमित्ताने नासा संस्थेतील मान्यवरांनी सध्या स्थानकात रहात असलेल्या मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या त्या वेळी त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले तेव्हा त्यांनी अंतराळवीर Frank Rubio ह्यांच्या हातुन हरवलेला टोमॅटो सापडल्याचे सांगितले
अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी तोडलेले पण नंतर सापडलेले व्हेजी चेंबर मधील टोमॅटो -फोटो -नासा संस्थानासाचे अंतराळवीर वेगवेगळ्या मोहिमेअंतर्गत अंतराळस्थानकात रहायला जातात त्यांच्या तेथील वास्तव्यात त्यांना पृथ्वीसारखे ताजे पोषक अन्न आणी भाजी खायला मिळत नाही त्यांना पृथ्वीवरून प्रिझर्व केलेले फ्रोझन अन्न व भाज्या खाव्या लागतात त्यांना ईथल्या सारखे ताजे अन्न व भाज्या खायला मिळाव्यात म्हणून स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे ह्या व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या भाज्या छोटे गहु,चेरी टोमॅटो,मिरचीची रोपे लाऊन ऊगवलेल्या भाज्यांंचा आस्वाद देखील अंतराळवीरांनी घेतला आहे व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीसारखी रोपांना पोषक अशी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे त्यासाठी रंगीत लाईटचा वापर करून ऊजेड,अंधार निर्मिती आणी तापमान नियंत्रण केल्या जाते
अंतराळवीर त्यांच्या संशोधनाच्या कामातून वेळ काढून ह्या व्हेजी चेंबरमधील रोपांची निगा राखतात नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात 371 दिवस वास्तव्य केले होते अंतराळात जास्त दिवस राहिल्यावर मानवी शरीरावर काय विपरीत परिणाम होतो त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेवर शरीरातील सर्व सिस्टीममध्ये काय बदल जाणवतात,पेशींमध्ये काय बदल होतात ह्या विषयीच्या मानवी संशोधनात ते सहभागी झाले होते त्यांच्या स्थानकातील वास्तव्यात त्यांनी ह्या गोष्टीचे निरीक्षण नोंदवून नमुने गोळा केले शीवाय सायंटिफिक प्रयोग व ईतर कामासोबत त्यांनी व्हेजी प्रोजेक्टमध्ये काम केले मार्चमध्ये ते पृथ्वीवर परतले
हरवलेल्या टोमॅटो बाबत सांगताना ते म्हणाले,"हो माझ्या हातून टोमॅटो हरवला होता मी व्हेजी चेंबरमधील टोमॅटोची कापणी करत होतो तेव्हा एक,दोन टोमॅटो जरा जास्त पिकलेले वाटले म्हणून मी ते दोन टोमॅटो प्लास्टिक पिशवीत घातले आणी velcroआणण्यासाठी गेलो टोमॅटोची पीशवी व्यवस्थीत राहील असे मला वाटले पण मी परत आलो तर पिशवी आणी टोमॅटो गायब झाले होते मी खूप वेळ सर्वत्र ते शोधले पण सापडले नाही सगळ्यांंना वाटल की मी ते टोमॅटो खाल्ले मी त्यांना ते हरवल्याचे सांगितले तरीही कोणीही त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते मी टोमॅटो खाल्ले नव्हतेच मग ते सिध्द करण्यासाठी मी जवळपास विस तास वाया घालवले पण टोमॅटो सापडले नाहीत पण मला खात्री होती की कधी ना कधी ती टोमॅटोची पिशवी सापडेल मी पृथ्वीवर परतताना सहकारी अंतराळवीरांना ते शोधण्यास सांगितले होते अखेर मोहीम 70 च्या अंतराळवीरांना ते टोमॅटो सापडल्याचे त्यांनी सांगितले आणी मी ते खाल्ले नव्हते ह्याची त्यांना खात्री पटली !"
मोहीम 70 ची अंतराळवीर Jasmin Moghbeli हिने नासा संस्थेतील मान्यवरांशी लाईव्ह संवाद साधताना टोमॅटो सापडल्याचे सांगितले,"आम्हाला व्हेजी चेंबरमध्ये प्लॅस्टिक पीशवीत ते सापडले आमचा सहकारी Good Friend Frank आता पृथ्वीवर परतले आहेत त्यांनी ते टोमॅटो खूप शोधले होते आणी खरेच हरवले होते त्यानीं ते खाल्ले नव्हते हे आता सिद्ध झाले आहे !"
Frank Rubio ह्यांनी VEG-03 प्रोजेक्ट अंतर्गत ह्या चेरी टोमॅटोची लागवड केली होती ह्या X-ROOT प्रोजेक्ट मध्ये Hydroponic,Aeroponic टेक्निकचा वापर करून माती किंवा ईतर आवश्यक गोष्टी न वापरता हि रोपे ऊगवण्यात आली रोपामधील पोषकद्रव्ये वाढविण्यासाठी आणि अंतराळवीरांना आवश्यक व्हिटॅमिन्स मिळावेत म्हणून हा प्रोजेक्ट राबविण्यात आला ह्याचा ऊपयोग दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठीही होणार आहे
ह्या सापडलेल्या टोमॅटोत आठ महिन्यानंतरही विशेष फरक पडला नाही ते थोडेसे फिकट रंगाचे चपटे आणी वाळले आहेत त्यावर बुरशीही आली नाही आता हे टोमॅटो पृथ्वीवर परत आणले जाणार नाहीत तिथेच व्हेजी चेंबरमध्ये पुन्हा लागवडीसाठी वापरले जातील आणी अंतराळातील झीरो ग्र्ँव्हिटीतील वातावरणात टोमॅटोमधील जिन्स नवीन टोमॅटोमध्ये कसे ऊतरतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधन केल्या जाईल

अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील फिरते अंतराळस्थानक -फोटो नासा संस्था
नासा संस्था- 8 डिसेंबर
नासा संस्थेतील पाच देशांनी मिळुन निर्माण झालेल्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील फिरत्या अंतराळस्थानकाने आता पंचविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे सहा डिसेंबरला नासा संस्थेतर्फे स्थानकाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला नासाचे Associate Administrator Robert Cabana आणी Space Station Program Manager Joel Montalbano ह्यांनी सध्या अंतराळस्थानकात रहात असलेल्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधुन त्यांना स्थानकाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ 25 नोव्हेंबर 1998 ला झाला पण 6 डिसेंबरला अंतराळात फिरणाऱ्या Zarya Module ला पहिल्यांंदा Unity Module जोडण्यात आले म्हणून सहा डिसेंबरला स्थानकाचा वर्धापन दिन साजरा केल्या जातो अमेरिका आणी रशिया ह्या दोन देशांनी मिळुन हे दोन Module एकत्र जोडले होते आता त्या भागात अंतराळस्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर एकत्र जेवण करतात
अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा शुभारंभ करून हे दोन भाग एकमेकांना जोडण्याची मोहीम आखण्यात आली तेव्हा ह्या मोहिमेचे कमांडर Robert Cabana होते त्यांच्याच देखरेखीखाली हे भाग जोडण्यात आले आणी त्यांनीच पहिल्यांंदा स्थानकात प्रवेश केला स्थानकात प्रवेश करणारे ते पहिले अमेरिकन अंतराळवीर आहेत स्थानकाच्या वर्धापनदिनी अंतराळवीरांसोबत लाईव्ह संवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली ते म्हणतात,"खरोखरच त्या वेळेस हे साहसी,थरारक काम मी केलय ह्यावर आता माझा विश्वास बसत नाही तुम्ही जिथे सध्या राहात आहात संशोधन करत आहात त्याचे श्रेय आम्हाला आहे तुम्ही तिथे वास्तव्य करून पृथ्वी संरक्षणासाठी आणी पृथ्वीवासीयांसाठी ऊपयुक्त संशोधन करत आहात ह्याचा ऊपयोग भावी पीढीसाठी आणी दुरवरच्या अंतराळ मोहीमेतील अंतराळवीरांसाठी होणार आहे
अंतराळातील ह्या फिरत्या वास्तुचा आकार गोलाकार आणी अमेरिकेतील फुटबॉल फिल्ड एव्हढा आहे ह्या अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटितील फिरत्या स्थानकात सहा क्वार्टर आणी दोन बाथरूम आहेत शीवाय व्यायामासाठी जीम आणी ईतर सायंटिफिक प्रयोग,संशोधन करण्यासाठी भरपूर जागा आहे अंतराळवीरांसाठी ताजी भाजी आणी अन्न पिकवण्यासाठी ह्या स्थानकात पृथ्वीसारखे कृत्रीम वातावरण असलेले व्हेजी चेंबर देखील आहे नवनवीन व्हेजी प्रोजेक्ट द्वारे अंतराळवीरांनी त्यात भाजी ऊगवण्यात यश मिळवले आहे आणी ताज्या भाज्यांचा आस्वाद देखील घेतला आहे
अंतराळस्थानकाची निर्मिती जरी 1998 साली झाली असली तरी कित्येक वर्षांपासून अंतराळातील फिरत्या स्थानकाची अभीनव कल्पना मांडली गेली होती सोळाव्या शतकातच पहिल्यांदा Astronomer Johannes ह्यांंना अशी कल्पना सुचली अंतराळात फिरणाऱ्या अशा स्थानकात अंतराळात फिरता आणी रहाता देखील येईल एक दिवस ते शक्य होईल आणी मानव अंतराळात प्रवास करेल असे त्यांनी म्हटले होते त्या नंतर 1860 मध्ये Edward Everett Hale ह्यांंनी Brick Moon ह्या त्यांच्या लेखात अंतराळातील स्थानकाची कल्पना मांडली त्यांनी म्हटले होते पृथ्वीच्या वर अंतराळात फिरणारे मानव निर्मित घर असेल आणी त्यात मानवी वास्तव्य असेल हे अंतराळातील घर पृथ्वीवासीयांसाठी नवी दिशा देणारे ठरेल रशियन Theoretician Konstantin Tsiolkovsky ह्यांनी देखील अशाच अंतराळातील घराची कल्पना मांडली त्यात सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाश निर्माण करता येईल आणी पृथ्वी सारखे वातावरण निर्माण करून आतमध्ये भाजी आणी धान्य पिकवता येईल असा विचार त्यांनी मांडला पुढे 1928 मध्ये पहिल्यांंदा Herman Noordung ह्यांनी अंतराळातील चाकाच्या आकाराच्या कृत्रीम ग्रॅव्हिटि असलेल्या अंतराळातील घराच्या बांधणीचे डिझाईन केले त्या नंतर 1952 मध्ये Willy Ley ह्यांनी देखील अशा अंतराळातील घराची कल्पना मांडली त्या आधी 1950 मध्ये US government मध्ये अशा अंतराळातील फिरत्या घराच्या निर्मितीबाबत चर्चा झाली अखेर 1960 मध्ये नासाच्या Huston येथील J.PL संस्थेत गरजेतून ह्या अंतराळस्थानकाच्या निर्मितीचा विचार करण्यात आला आणी नासाने Space Station निर्मितीचे पेटंट मिळवत Skylab च्या निर्मितीचा शुभारंभ केला
त्या नंतर 1998 च्या डिसेंबरमध्ये अंतराळ स्थानकाचा शुभारंभ झाला आणी त्याचा हळूहळू विस्तार होत गेला सध्या नासा संस्थेत कॅनडा,युरोप,जपान,रशिया आणी अमेरिकेचा सहभाग आहे आजवर 21 देशातील 273 अंतराळवीर स्थानकात वास्तव्य करून आले आहेत तीथे सतत शेकडो विषयांवर सायंटिफिक संशोधन सुरू असते वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर वेगवेगळ्या मोहीमे अंतर्गत स्थानकात जा,ये करतात, संशोधन करतात तीथुन लाईव्ह संवाद साधतात अंतराळस्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक करतात त्यात महिला अंतराळवीरही मागे नाहीत स्थानकातील वास्तव्या दरम्यान येणारे सण साजरे करतात,पार्टी करतात
अंतराळवीर जेव्हा स्थानकात पोहोचतात तेव्हा अंतराळस्थानक पाहून अंचबीत होतात अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीतील निर्मित झालेल्या अंतराळवीरांना प्रेरित करणाऱ्या मानवाच्या ह्या असामान्य कर्तृत्वाचे,कुशलतेचे ते कौतुक करतात जेव्हा त्यांना त्यांचा अविस्मरणीय क्षण कोणता हे विचारले जाते तेव्हा अंतराळातून दिसणारे पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य आणी स्थानकातील प्रवेशाचा क्षण असे ऊद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडतात ते नासा संस्था आणी स्थानक निर्माण करणाऱ्या अभियंता,ईंजीनिअर,शास्त्रज्ञ,तंत्रज्ञांचे आभार मानतात खरोखरच पृथ्वीवरून प्रुथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहाता येत नाही त्यासाठी अंतराळात जावे लागते म्हणूनच तिला अलौकिक म्हटले जात
नासाच्या CHAPEA-1 मोहिमेतील सहभागी धाडसी नागरिक Thanks giving day निमित्त भाजीचे डेकोरेशन करुन शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 9 ऑक्टोबर
नासाच्या CHAPEA मोहिमे अंतर्गत पृथ्वीवरील कृत्रिम मंगळभूमीत एक वर्षाच्या वास्तव्यासाठी गेलेल्या आणी भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रातिनिधित्व करणाऱ्या चार धाडसी नागरिकांनी ह्या कृत्रिम मंगळ निवासातील नुकतेच 150 दिवस पूर्ण केले आहेत
25 जूनला ह्या मोहिमेतील पहिल्या ग्रुप मधील कमांडर Kelly Haston
-(Research Scientist), Flight Engineer- Ross Brockwell-, Medical
Officer -Nanthan Jones आणी Microbiologist -Anca Selariu हे चार धाडसी
निवडक उमेदवार एक वर्षाच्या वास्तव्यासाठी ह्या पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ
सृष्टीत राहायला गेले होते नासाच्या CHAPEA मिशन अंतर्गत शास्त्रज्ञ
निर्मित कृत्रीम मंगळभुमी मध्ये रहायला गेलेल्या पहिल्या ग्रुप मधील चार
ऊमेदवारांनी ह्या भूमीतील वास्तव्याचे 150 दिवस पुर्ण केले आहेत नुकताच
त्यांनी ह्या कृत्रीम मंगळभुमीत Thanks giving day देखील साजरा केला त्या
साठी सर्वांनी एकत्र जेवण केले त्यांनी तीथे ऊपलब्ध असलेल्या हिरव्या
भाज्या,टोमॅटो आणी रंगीत सिमला मिरचीचा ऊपयोग करून डेकोरेशन केले आणी
सर्वांना डेकोरेशन मधून Happy Thanks Giving Day निमित्त शुभेच्छा दिल्या
ह्या शुभेच्छा त्यांनी सोशल मीडिया वरून शेअर केल्या आहेत
नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL lab मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळ भूमी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळभूमीत राहिल्यावर मानवी शरीरावर,आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन ग्रुप तयार करण्यात आले होते

नासाच्या अंतराळ मोहीम 70चे अंतराळवीर Andreas Mogensen ,Loral ,Jasmin आणी जपानी अंतराळवीर Satoshi अंतराळ स्थानकातून Thanks Giving Day निमित्त लाईव्ह संवाद साधून पृथ्वीवासियांना शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -24 नोव्हेंबर
अमेरिकेत दरवर्षी 24 नोव्हेंबरला Thanks Giving Day उत्साहात साजरा केल्या जातो अमेरिकन नागरिक त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक आणि मित्रांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात सर्वजण एकत्र येऊन पार्टीचे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असलेल्या मेजवानीचा आस्वाद घेतात पृथ्वीपासून दूर अंतराळ स्थानकात तरंगत्या अवस्थेत राहणाऱ्या अंतराळवीरांना मात्र कुटुंबियांसोबत हा डे साजरा करता येत नाही पण अंतराळ स्थानकातील अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीर मित्रांसोबत हा दिवस साजरा करतात आणि पार्टी करून त्यांच्या जवळ असलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतात आणि नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधून पृथ्वीवरील कुटुंबियांशी संवाद साधतात आणि Thanks giving Day च्या शुभेच्छा देतात
नासाच्या अंतराळ मोहीम 70 चे अंतराळवीर सध्या स्थानकात वास्तव्य करत आहेत नासाचे अंतराळवीर Jasmin Moghbeli,,Loral O'Hara,युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen आणी जपानचे अंतराळवीर Satoshi Farucawa ह्यांनी स्थानकात Thanks giving day साजरा केला आणी नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत जगभरातील पृथ्वीवासियांना Thanks giving day च्या शुभेच्छा दिल्या
सुरवातीला अंतराळवीर Andreas ह्यांनी सर्वांची ओळख करून देत आम्ही चौघेजण आज ईथे स्थानकात Thanks giving day साजरा करणार असल्याचे सांगितले ते म्हणाले,आज हा दिवस आम्ही स्थानकात साजरा करत आहोत आज पृथ्वीवर सर्वजण हा दिवस त्यांच्या कुटुंबीयांसोबत मित्रांसोबत साजरा करत असतील आमच्या कुटुंबीयांना,मित्रांना तर आम्ही शुभेच्छा देणार आहोतच पण नासा संस्थेमुळे आम्ही ईथे स्थानकात पोहोचलो ईथे वास्तव्य करण्याची संधी मिळाली तसेच जगभरातील लोकांना शुभेच्छा देण्याचीही ईथुन आम्ही त्या सर्वांशी नासा संस्थेमार्फत संपर्क साधु शकत आहोत ह्या संधीचा फायदा घेत आम्ही सर्व पृथ्वीवासियांना शुभेच्छा देत आहोत ,"Happy Thanksgiving Day "!
Jasmin Moghbeli -ह्या वर्षी आम्ही स्थानकात आहोत आणी आम्हाला खूप गोष्टींबद्दल Thanks म्हणायचे आहे सर्वात आधी ईथुन स्थानकातुन पृथ्वीच अलौकिक सौंदर्य पहाण्याची अमुल्य संधी मिळाल्या बद्दल! ह्या जगात पृथ्वी एकमेव आहे जीथे सजीव सृष्ठीआणी मानव आहे म्हणूनच तीचे संरक्षण करणे आवश्यक आहे ते ईथे आल्यावर कळते आमच्या आधी ईथे सर्व देशातील अनेक अंतराळवीर राहून गेले आहेत त्यांनी त्यावेळी ईथे स्थानकातच Thanks giving Day साजरा केला त्याचे आम्हाला स्मरण होत आहे त्या वेळी त्यांना तीथे पृथ्वीवर त्यांच्या कुटुंबीयांसोबत,मित्रांसोबत हा दिवस साजरा करता आला नव्हता पण आता ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत हा दिवस साजरा करत असतील त्या सर्वांना आमच्या कुटुंबीयासोबत मित्रांसोबत " Happy Thanks giving Day !
Loral O Hara - आज आम्ही स्थानकात Thanks giving दिवस साजरा करत आहोत आम्ही आज एकत्र डिनर करणार आहोत त्या साठी आम्ही काही पदार्थ व स्वीट आणलय आमच्याकडे Roast Turkey, Cranberry Souce,Butternut squash आहे आणी माझे फेवरीट Corn ,finish Cran Apple dessert आहे आज आम्ही ह्या सर्व पदार्थांचा एकत्र आस्वाद घेणार आहोत सर्वांना "Happy Thanksgiving Day "!
Satoshi -आम्ही ईथे स्थानकात राहून हा दिवस साजरा करु शकतो आणी पृथ्वीवासियांसाठी ऊपयुक्त सायंटिफिक प्रयोगही करू शकतो हे सिध्द करणार आहोत भविष्य कालीन दुरवरच्या मंगळ व चंद्र मोहीमेतील अंतराळविरांसाठी त्यांच्या तेथील त्यांच्या वास्तव्यासाठीची पुर्व तयारी आम्ही करत आहोत तुम्हा सर्वांना "Happy Thanks giving Day"!

Curiosity मंगळ यानातील अत्याधुनिक यंत्रणा आणि High Resolution Mast Cam च्या साहाय्याने काढलेला फोटो (3DAnimation)-फोटो -नासा संस्था
नासा संस्था -7 नोव्हेंबर
नासाच्या Curiosity मंगळयानाने मंगळावरील 4000 दिवस पुर्ण केले आहेत 5 ऑगस्ट 2012 मध्ये मंगळावरील Gale Crater वर पोहोचलेल्या Curiosity मंगळयानाने ह्या चार हजार दिवसात मंगळावरील अत्यंत महत्त्व पुर्ण संशोधीत सायंटिफिक माहिती गोळा करून त्याचे फोटो व व्हिडीओ पृथ्वीवर पाठवले आहेत आणी अजूनही यशस्वीपणे कार्यरत आहे मंगळावरील Gale Crater ह्या भागात चाक रोऊन मंगळयानाने संशोधनाचा शुभारंभ केला आणी यानातील अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने आसपासच्या भागात फिरून तेथील वातावरण व मंगळावरील करोडो वर्षांपुर्वीच्या सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या गोष्टींंचा शोध घेण्यास सुरवात केली आणि हि मोहीम यशस्वी केली
Curiosity मंगळ यानाने मंगळावरील प्राचीनकाळच्या अस्तित्वात असलेल्या पण आता आटलेल्या पाण्याचे स्रोत शोधले तेथील आटलेल्या नदीचे पात्र,दऱ्या,खोऱ्यातील व जमिनीवरील खडक,माती,वाळू आणी खनिजे शोधले आणि त्याचे नमुने गोळा करून ते यानातील कंटेनरमध्ये भरण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले सध्या Curiosity यान मंगळावरील Sequoia या भागात कार्यरत आहे आणी तेथील खडकांचे नमुने गोळा करत आहे Curiosity यानाने नुकताच तेथील खडकाचा 39 वा नवा नमुना कंटेनरमध्ये भरला आहे यानातील अत्याधुनिक High Resolution Mast Camera व रोबोटिक आर्मच्या सहाय्याने तेथील जमीन खोदून खडक फोडून त्याचा चुरा करून तो कंटेनरमध्ये भरला आहे आणी त्याचे रंगीत फोटो व व्हिडीओ पृथ्वीवर पाठवले आहेत

Curiosity मंगळ यानाने मंगळावरील Gale Crater वरील Sequoia ह्या भागातील खडकांचे नमुने घेण्यासाठी रोबोटिक आर्मच्या साहाय्याने ड्रिल केलेला भाग -फोटो -नासा संस्था (JPLLab)
ह्या नमुन्यांचे सखोल संशोधन शास्त्रज्ञ करणार आहेत मंगळावर पुरातन काळी सजीव सृष्ठीच्या अस्तित्वासाठी पोषक वातावरण होते का ? आणी असल्यास कालांतराने ते कसे नष्ट झाले हे शोधण्यासाठी Curiosity यान संशोधीत माहिती गोळा करत आहे ह्या मंगळयानाने Mount Sharp ह्या भागातील पाण्याच्या आटलेल्या नदीपात्राजवळील डोंगरकड्याच्या भागातील खडकांच्या थरातील खडकांचे नमुने गोळा केले त्यासाठी हे मंगळयान तीन मैल उंच डोंगर कड्यावर चढले आणि खाली आले
ह्या भागातील मागच्या वर्षी गोळा केलेल्या खडकांच्या नमुन्याचे शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन केले तेव्हा त्यामध्ये मिनरल्स खनिज व सल्फेट विपुल प्रमाणात सापडले आहे आणी ह्या गोष्टी सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत शास्त्रज्ञांच्या मते ह्या गोष्टी सजीव सृष्ठीच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहेत आणि त्यांच्या पुरातन काळच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या आहेत त्या मुळे शास्त्रज्ञ आता मंगळावरील पुरातन काळी अस्तित्वात असलेले पाणी व सजीव सृष्ठीचे अस्तित्व कसे विकसित होत गेले आणी कसे नष्ट झाले ह्याचा शोध घेत आहेत
मंगळावरील पाण्याच्या आटलेल्या नदीपात्राजवळील भागातील खडकांच्या नमुन्यात आढळलेल्या सल्फेट मूळे करोडो वर्षांपुर्वी मंगळावर खाऱ्या पाण्याचे अस्तित्व असावे आणी कालांतराने मंगळावरील वातावरणात झालेल्या नैसर्गिक व भुगर्भातील घडामोडींंमुळे अती पाऊस,पुर,भुकंप,ज्वालामुखीचा ऊद्रेक ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरण बिघडत गेले आणी प्रचंड ऊष्णतेमुळे पाणी ऊकळुन त्याचे वाफेत रूपांतर होऊन नष्ट झाले असावे पण त्यातील काही थेंब खडकात वाळलेल्या स्वरूपात राहिले असावे असे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात आता नवीन नमुन्यांचे सखोल संशोधन केल्यानंतर त्यांच्या ह्या मताला दुजोरा मिळेल
Curiosity यानाने मंगळावरील कमी प्रकाश अती थंडी आणी वादळा सारख्या संकटांवर मात करून हि संशोधित माहिती गोळा केली आहे 2012 मध्ये मंगळावर झालेल्या धुलीवादळात Curiosity अडकले होते यानावर,यानातील पंख्यावर सौरपॅनलवर धुळ जमल्यामुळे काही काळ यंत्रणेवर परिणाम झाला होता यानाचा वेग मंदावला होता तेथील अंधुक प्रकाशात अत्यंत थंडीत देखील Curiosityत्या भागात 20 मैल अंतरापर्यंत चालून गेले होते त्यामुळे ते आता अधिक मजबूत झाले असे शास्त्रज्ञ म्हणतात

नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O'Hara स्थानकाच्या कामासाठी स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -1 नोव्हेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 70 ची महिला अंतराळवीर Jasmin Moghbeli आणी Loral O' Hara ह्या दोघींनी 1 नोव्हेंबरला स्थानकाच्या कामासाठी स्पेसवॉक केला ह्या स्पेसवॉकसाठी ह्या दोघींनी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली होती स्पेसवॉक साठी लागणारा स्पेससूट चेक करून चार्ज करून ठेवला स्पेसवॉकसाठी लागणारा टूल बॉक्स आणी त्यातील कॅमेरे आणि इतर सामान चेक केले ह्या स्पेसवॉक साठी Jasmin Moghbeli ने लाल रंगाच्या रेषा असलेला ड्रेस परिधान केला होता आणी Loral O' Hara ने परिधान केलेला स्पेससूट रेषा विरहित होता एक तारखेला बुधवारी सकाळी 8.05 मिनिटाला ह्या दोघी स्पेसवॉक साठी स्थानकाच्या Quest Airlock ह्या भागातून स्थानकाबाहेर पडल्या आणि सहा तास बेचाळीस मिनिटांनी स्पेसवॉक संपवून स्थानकात परतल्या

अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि Loral O'Hara स्पेसवॉक साठीचा स्पेससूट घालून चेक करताना -फोटो नासा संस्था
सहा तास बेचाळीस मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोघीनी स्थानकाच्या पोर्ट ह्या भागातील सौर पॅनल मधील नूतनीकरणाचे काम केले ह्या भागातील सौर पॅनल वरील Solar Alpha Rotary joint असलेल्या भागातील बारा Trundle बेअरिंग्स पैकी एक बेअरिंग बदलला स्थानकाच्या पॉवर सिस्टिम मधील हा भाग सतत फिरत असतो आणि सूर्याचा मागोवा घेत सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा मिळवून साठवून ठेवण्याचे काम करतो ह्या ऊर्जेचा उपयोग स्थानकासाठी वीज निर्मिती आणि सिस्टिम्स साठी होतो स्थानकाला लागणारा प्रकाश आणि स्थानकातील सायंटिफिक प्रयोग व इतर कामासाठी ह्या सौर ऊर्जेचा वापर होतो हा बेअरिंग बदलल्यामुळे आता Solar Array व्यवस्थित काम करीत असून स्थानकातील ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढली आहे
ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोघीनी पुढच्या स्पेसवॉकची तयारी देखील करून ठेवली त्यांनी ह्या भागातील Handling bar fixture काढून ठेवला पुढील स्पेसवॉक मध्ये Solar Array वर केबल फिक्स करण्यासाठी व बाहेरील भागातील कॅमेऱ्यांसाठी ह्या कामाचा उपयोग होईल ह्या स्पेसवॉक मध्ये Radio Frequency Group हा Communication electronics box काढून ठेवायचा होता पण वेळ अपुरा पडल्यामुळे आणि स्पेसवॉक दरम्यान एक टूल बॉक्स हरवल्या मुळे हे काम लांबले नासा संस्थेतील प्रमुखांनी स्थानकाच्या बाहेरील कॅमेऱ्याच्या साहाय्याने टूल बॉक्स शोधला पण तिथे जाऊन टूल बॉक्स परत आणणे वेळेत शक्य नसल्यामुळे हे काम पूर्ण झाले नाही
अंतराळवीर Jasmin Moghbeli आणि अंतराळवीर Loral O' Hara ह्यांचा हा पहिलाच स्पेसवॉक होता आणि फक्त महिलांनी केलेला चवथा स्पेसवॉक होता स्थानकाच्या कामासाठी केलेला हा ह्या वर्षातला बारावा स्पेसवॉक होता