Sunday, 17 September 2023

नासाची अंतराळवीर Loral O' Hara दोन रशियन अंतराळविरासह स्थानकात पोहोचली

 The Soyuz rocket is launched with Expedition 70 NASA astronaut Loral O'Hara, and Roscosmos cosmonauts Oleg Kononenko and Nikolai Chub, Friday, Sept. 15, 2023, at the Baikonur Cosmodrome in Kazakhstan.

 नासाच्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसह सोयूझ MS-24 अंतराळयान स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावले -फोटो नासा संस्था

 नासा संस्था-16 सप्टेंबर

नासाच्या अंतराळमोहिमे 70 अंतर्गत नासाची अंतराळवीर Loral O'Haraरशियाचे अंतराळवीर Oleg Kononenko आणी Nikolai Chub अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले हे तीनही अंतराळवीर 15 तारखेला रशियाच्या सोयुझ MS-24 अंतराळयानातुन स्थानकात सहा महिने वास्तव्यासाठी गेले आहेत त्यांचे सोयुझ अंतराळयान कझाकस्थानातील बैकोनुर ऊड्डाण स्थळावरून 11.44 a.m.ला स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी तीन तासाच्या अंतराळ प्रवासानंतर 2.55 p.m.ला.स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचले स्थानक आणी सोयुझ यानाची Hatching व Docking प्रक्रिया पार पडल्यानंतर ह्या अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळविरांनी ह्या अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले

  The 10-person Expedition 69 crew is now aboard the space station. Front row from left are, Roscosmos cosmonauts Konstantin Borisov, Nikolai Chub, and Oleg Kononenko, and NASA astronaut Loral O'Hara. In the back are, ESA astronaut Andreas Mogensen, NASA astronaut Frank Rubio, cosmonauts Dmitri Petelin and Sergey Prokopyev, NASA astronaut Jasmin Moghbeli, and JAXA astronaut Satoshi Furukawa. Credit: NASA TV

 नासाच्या अंतराळ मोहीम 69च्या अंतराळवीरांसोबत रशियन अंतराळवीर Nikolai Chub, Oleg Kononeno आणि अंतराळवीर Loral O' Hara स्थानकात पोहोचल्यानंतर Welcome Ceremony दरम्यान -फोटो नासा संस्था

 हे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला तेव्हा स्थानकातील दहाही अंतराळवीर एकत्र जमले होते नासा आणी Roscosmos संस्थेतील प्रमुखांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून त्यांचे स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल अभिनंदन केले आणी त्यांना स्थानकातील वास्तव्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या अंतराळवीर Loral आणि Nikolai ह्यांच्या स्थानकातील प्रथम प्रवेशा बद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले अंतराळवीरांनी देखील त्यांना ह्या मोहिमेत सहभागी करून स्थानकात वास्तव्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले अंतराळवीर Loral म्हणाल्या मला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेतील सर्वांचे आभार त्यामुळेच मला पहिल्यांदाच पृथ्वीचे अद्भुत सौन्दर्य वरून पाहण्याची संधी मीळाली तो क्षण अनमोल आहे !अविस्मरणीय आहे !

हे अंतराळवीर आता अंतराळमोहिम 69 मधील अंतराळविरांसह तेथील संशोधनात सहभागी होतील रशियन अंतराळवीर Kononenko ह्यांची हि पाचवी अंतराळयात्रा आहे ते पाचव्यांदा स्थानकात वास्तव्यासाठी गेले आहेत अंतराळवीर Loral आणी अंतराळवीर Nikolai ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी असुन ते पहिल्यांदाच स्थानकात रहायला गेले आहेत अंतराळवीर Loral सहा महिने स्थानकात राहुन संशोधन करणार आहे पण रशियन अंतराळवीर Oleg आणी Nikolai मात्र एक वर्ष स्थानकात वास्तव्य करणार आहेत 

27 सप्टेंबरला नासाचे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर  Frank Rubio ,रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी अंतराळवीर Dimitri Petelin हे तीन अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत अंतराळवीर Frank Rubio ह्यांनी स्थानकात सलग 371 दिवस रहाण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे हे अंतराळवीर पृथ्वीवर परतेपर्यंत हे दहाही अंतराळवीर स्थानकात एकत्र रहाणार असुन तेथील संशोधनात सहभागी होणार आहेत 

Saturday, 9 September 2023

नासाच्या Space X Crew 6 - मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर परतले

 

 Space X Dragon Endeavour अंतराळवीरांसह Jacksonville येथील Atlantic समुद्राच्या खाडीत उतरताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 4 सप्टेंबर 

नासाच्या Space X Crew -6 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर  Stephen Bowen,Woody Hoburg सौदी अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणी रशियन अंतराळवीर Andry Fedyaev त्यांचे स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतले रविवारी 7.05 a.m.ला Space X Crew Dragon Endeavor ह्या चार अंतराळविरांसह स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघाले आणी 4 तारखेला सोमवारी 12.17 a.m.ला पृथ्वीवर परतले Florida मधील Jacksonville येथील समुद्राच्या खाडीत Endeavor सुरक्षीतपणे खाली ऊतरताच नासाच्या रिकव्हरी टिमने ह्या अंतराळविरांना अंतराळयानातुन बाहेर काढले त्यानंतर त्यांचे प्राथमिक  चेकअप करण्यात आले चेकअप नंतर काही वेळाने हे अंतराळवीर नासाच्या विमानाने नासाच्या Houston Space center कडे रवाना झाले.

NASA's SpaceX Crew-6 are seen inside the SpaceX Dragon Endeavour spacecraft onboard the SpaceX recovery ship.

नासाच्या Space X Crew -6 चे अंतराळवीर  Andry Fedyaev,Woody Houburg,Stephen Bowen आणि Sultan Alneyadi पृथ्वीवर परतताना -फोटो नासा संस्था

ह्या अंतराळविरांनी स्थानकात 186 दिवस वास्तव्य केले 2 मार्च 2023 मध्ये हे अंतराळवीर स्थानकात रहायला गेले होते त्या दरम्यान त्यांनी पृथ्वी भोवती 2,976 वेळा फेऱ्या मारल्या आणी 78,875,292 मैलाचा अंतराळप्रवास केला  

अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकात त्यांचा Farewell Ceremony पार पडला स्थानकातील सर्व अंतराळवीर त्या साठी एकत्र जमले नासा संस्थेतील प्रमुखांनी लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षीत परतण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणी सहा महिन्याच्या वास्तव्यात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल आणी ईतर कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले त्या नंतर मोहीम 69 चे स्थानकातील  कमांडर Sergey ह्यांनी अंतराळविरांशी संवाद साधत त्यांना निरोप दिला 

अंतराळवीर Sergey - "आपण सहा महिने एकत्र वास्तव्य केल खूप छान क्षण व्यतीत केले,एकत्र काम केल संशोधन करताना,Space Walk करताना तुम्ही केलेल सहकार्य,मैत्रीपूर्ण व्यवहार ह्या बद्दल Thanks! तुम्ही पृथ्वीवर सुरक्षित पोहोचावे म्हणून शुभेच्छा! माझी अशी ईच्छा आहे की,आम्ही पृथ्वीवर परतल्यावर पुन्हा आपण मित्र म्हणून भेटु जसे आपण स्थानकात भेटलो तसेच आणी आपल्या पृथ्वीवर परतल्याचा आनंद तिथल्या वातावरणात सेलिब्रेट करू. Good Luck !"

Steave -"Thanks Sergey तुम्ही सगळे कर्तृत्ववान आहात,बुद्धीमान आहात,अनुभवी आहात ह्या सहा महिन्यात आम्हाला तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले Sergey,Dimma,Frank तुम्ही योग्य वेळी ईथे ऊपस्थित होतात आम्हाला अनुभव नव्हता त्यामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज होती तुम्ही आमच्यासाठी रोल मॉडेल आहात तुम्ही वेळोवेळी आम्हाला मदत केली आगामी काळात तुम्ही पृथ्वीवर परतल्यानंतर आपण पुन्हा भेटु आणखी सहा महिन्यांंनी एक वर्ष पुर्ण होईल !"

Woody -"खरच ह्या सहा महिन्यात आयुष्यभर पुरेल ईतका अनुभव आम्हाला मिळाला तुमच्या सारख्या कर्तृत्ववान अंतराळवीरांसोबतचा हा काळ खूप लवकर गेला तुमच्या सोबत ह्या झीरो ग्रॅव्हिटीतल्या फिरत्या प्रयोगशाळेत संशोधन करताना एकत्र राहताना खुप मजा आली खूप नवा अनुभव अनुभवायला मिळाला ईथे आपण कामही भरपूर केल ईथे आलेल्या कार्गोशिप,Axiom Crew स्थानकात आल्यावर Hatching,Docking ची व्यवस्था करताना अंतराळवीरांचे स्वागत करतानाचा अनुभव नवा होता स्थानकाच्या कामासाठी केलेल्या तीन Space Walkचा अनुभव थरारक होता आणी आता स्थानक सोडून आम्ही परतणार आहोत Frank,Dimma,Sergey तुमच्या सोबत रहाताना,काम करताना तुम्ही किती ग्रेट आहात हे कळाल तुमचे स्थानकातील वास्तव्य आणखी सहा महिने लांबल तरी तुम्ही ते किती सहजपणे स्विकारलत Gracefully ! Frank ची लिडरशीप अमेझींग होती तुमच कठीण काळातील परिस्थिती हाताळण्याच कौशल्य मला नेहमी लक्षात राहील तुमच्या सोबतचा wonderful time ,Chess Game ,Sergey हि सारी मजा अनुभवायला मिळाली ते क्षण कायम लक्षात राहतील आपण नक्कीच पृथ्वीवर भेटु आणी आता ईथुन परत पृथ्वीवर परतताना 17,500 मैल वेगाने खाली ऊतरत Splash होतानाचा शेवटच्या क्षणाचा अनुभव देखील थरारक असेल !"

Sultan -Thanks Steave ,Woody,Sergey ! तुमच्या लिडरशिपबद्दल Thanks! तुमच्या सोबतचा सहा महिन्यांचा   वास्तव्याचा काळ खूप मजेत गेला,खूपच लवकर संपला अस वाटतय तुम्ही सांगितल त्या प्रमाणे आपण ईथे खूप काम केल सायंटिफिक संशोधन,स्थानकाच्या कामासाठीचा Space Walk सारच अविस्मरणीय ! ईथे आल्यावर जगातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता आल त्यांच्याशी संवाद साधता आला खूप मजा आली ईथल्या वातावरणात वास्तव्य करताना,संशोधन करताना! मी अशा देशातून ईथे आलो ज्या देशाने तीस वर्षांपासून अंतराळमोहिम थांबवली होती स्थानकात रहायला कोणी आले नव्हते पण मी लकी आहे मला ईथे यायला,रहायला,संशोधन करायला मिळाल आपल्या मनात ध्येय असेल ईच्छा असेल तर ती नक्कीच पुर्ण होते त्या साठी अथक प्रयत्न करायला हवे हे आता माझ्या ईथे येण्याने सिध्द झालय आमच्या देशातील भावी पिढीपुढे आता माझ ऊदाहरण असेल आता मी ईथल्या वास्तव्यात रहाण्याचा संशोधन करण्याचा अनुभव शेअर करेन वेळोवेळी स्थानकातून लाईव्ह संवादाद्वारे माझे अनुभव मी शेअर केले आहेतच अजूनही प्रश्नांची ऊत्तरे द्यायला मी तयार आहे माझ्यासाठी हा अनुभव अदभूत आहे Dimma चे मला आभार मानावयाचे आहेत त्याच्या सोबत घालवलेल्या अविस्मरणीय क्षणांसाठी Frank, स्पेशल आभार ! तु ऊत्तम लिडर,असामान्य मित्र आणी होस्ट आहेस ईथल्या वास्तव्यातील क्षण मजेशीर होते मला पुन्हा ईथे यायला मिळाले तर मी नक्की येईन मला पुन्हा ईथला अनुभव घ्यायला आवडेल Space X-7 च्या अंतराळवीरांनो ईथल्या वातावरणात रहाण्याची मजा अनुभवा प्रत्येक क्षणाची मजा घ्या हा अनुभव आयुष्यभराचा आहे Andy,Satoshi तुम्ही दुसऱ्यांंदा ईथे आला आहात पण प्रत्येक वेळी तुम्ही नवा अनुभव शोधाल नवीन ईंटरेस्टिंग काम कराल ईथुन वरून पृथ्वीकडे पहाण्याचा अनुभव अदभूत होता !

Andry - सगळ्यांंनी सांगितले आहेच माझ्याही भावना तशाच आहेत मला ईथे येण्याची ईथे राहून संशोधन करण्याची संधी दिल्याबद्दल नासा संस्थेतील सहभागी सर्व देशातील सर्वांचे आभार आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल,अडचणीच्या वेळी योग्य मार्गदर्शन केल त्या बद्दल आणी माझे कुटुंबीय मित्रांचे देखील आभार त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्या शिवाय इथे येणे शक्य नव्हत

 Sultan,Andry,तुम्ही सर्वांनी छान काम केलय तुम्ही Professionalismचे ऊत्तम ऊदाहरण आहात आणी माणूस म्हणूनही खूप छान आहात तुम्ही ग्रेट आहात हे सहा महिने मजेत गेले आम्हाला तुमची ऊणीव जाणवेल आपण पुन्हा पृथ्वीवर भेटु ! 

त्या नंतर नासा संस्थेतील प्रमुखांनी ह्या अंतराळवीरांना परतण्याआधी पुन्हा शुभेच्छा दिल्या आणि अंतराळवीर परतण्याच्या तयारीला लागले

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टीप -ह्या ब्लॉगमधील काही शब्द हे अंतराळवीरांसाठी वापरले आहेत अंतराळवीर स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत तरंगत्या अवस्थेत राहतात संशोधन करतात त्यांना पृथ्वीवरील मानवासारखे स्थिर उभे राहता येत नाही,खाता पिता झोपता येत नाही तरंगत्या अवस्थेत हे सार करून संशोधन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्या मुळे पृथ्वीवरील माणसे आणि अंतराळवीर ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो माझ्या असे लक्षात आले आहे कि माझ्या ब्लॉगवरील शब्द  सहजतेने इतरत्र विचार न करता वापरे जातात ब्लॉगला Copy Right Act लावलेला आहे त्याची नोंद घ्यावी 

Wednesday, 6 September 2023

भारताचे आदित्य L1 सौरयान सुर्याच्या दिशेने मार्गस्थ

Image

 भारताचे आदित्य L1 सौरयान इसरोच्या श्रीहरीकोटा येथील उड्डाणस्थळावरून अंतराळात झेपावताना फोटो -इसरो संस्था

ईसरो संस्था- 3 सप्टेंबर

भारताचे विक्रम -3 चांद्रयान चंद्रावर यशस्वीपणे कार्यरत झाल्यानंतर आता आठवडाभरातच भारताचे आदित्य L1 सौरयान सुर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे ईसरोच्या श्रीहरी कोटा येथील सतीश धवन अंतराळ संस्थेतील ऊड्डाण स्थळावरून दोन सप्टेंबरला सकाळी 11.55 मिनिटांनी भारताचे आदित्य L1 सौरयान P.S.L.V- C-57 रॉकेटच्या सहाय्याने सुर्याकडे जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 63मिनिटे 20 सेकंदाच्या अंतराळ प्रवासानंतर यान  रॉकेटपासुन वेगळे झाले ह्या मोहीमेचा यशस्वी शुभारंभ झाला तेव्हा ईसरो संस्थेचे अध्यक्ष एस सोमनाथ आणी त्यांची टिम आनंदित झाली सोमनाथ ह्यांनी हि मोहीम यशस्वी झाल्याचे सांगत टिममधील त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांना व्यासपीठावर बोलवले आणी सर्वांचे अभिनंदन केले 

आदित्य L1 सौरयान 127 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर सुर्याजवळ पोहोचेल सध्या आदित्य सौरयान पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत असुन 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करत पृथ्वीच्या पाच स्थरातुन बाहेर पडण्यासाठीच्या पाच प्रक्रिया पार पाडेल आणी शेवटी पृथ्वीच्या शेवटच्या कठीण स्थरातुन बाहेर पडेल आदित्य सौरयान उर्वरित 121 दिवस सुर्याकडे जाण्यासाठी पृथ्वी ते सुर्य ह्या मधील 15 लाख कि.मी.चा अंतराळप्रवास करेल 

आदित्य L1 सौरयान चार महिन्यांनी सुर्याजवळ पोहोचेल आणी सुर्याच्या Lagrange point ( पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण संपून सुर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा आरंभ जेथे होतो तो L1 point ) जवळील Halo Orbit मध्ये स्थिरावेल ह्या भागातून परीभ्रमण करताना सूर्याच्या ग्रहण काळात देखील संशोधन करताना आदित्य L1 सौरयानास अडथळा येणार नाही आदीत्य L1 सौरयानातील अद्ययावत यंत्रणा आणी सात पेलोडच्या साहाय्याने आदित्य सौरयान सूर्यावरील संशोधन करणार आहे सौरयानातील सातपैकी चार पेलोडच्या यंत्रणे मार्फत सूर्याभोवतीचे तेजपुंज प्रभामंडळ त्यातून अखंडीत बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळाचे लोट,बाहेर पडणारा प्रकाश आणी प्रकाश किरणांचे निरीक्षण नोंदवून त्याबद्दलची संशोधित माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल सूर्याचा करोना हा भाग सूर्याच्या पृष्ठभागापासून वेगळा का आहे इथे सतत बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळा व त्यातून बाहेर पडणाऱ्या अखंडीत प्रकाशलाटा कशा तयार होतात त्यांचा प्रवाहित होण्याचा वेग आणी तापमान किती असते त्यातून ऊत्सर्जित होणारी अपायकारक कीरणे ,वायू आणी त्याचा आसपासच्या भागावर होणारा परिणाम ह्याचे संशोधन आदित्य L1 सौरयानातील ह्या यंत्रणे मार्फत केले जाईल

आदित्य L1 सौरयानातील ऊर्वरीत तीन पेलोडच्या यंत्रणेद्वारे सुर्याच्या पृष्ठभागातील प्रचंड ऊष्णता,तेथे तयार होणाऱ्या ऊष्णतेच्या सौरलाटा आगीचे लोट,सौरवादळ ह्याचे निरीक्षण नोंदवले जाईल ह्या भागातील चुंबकीय क्षेत्र आणी त्या भागात सतत घुमसणारी प्रचंड आग त्यातून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा,बाहेर पडणारी विद्युत भारीत किरणे ,विद्युत भारीत कण,धुळीचे प्रचंड लोट त्यातून बाहेर पडणारे अपायकारक वायू कसे तयार होतात त्यांचा  वेग,ऊष्णतामान,तापमान कीती असते त्यांची निर्मिती प्रकीया कशी असते आणी त्याचा आसपासच्या वातावरणावर होणाऱ्या परीणामाचे निरीक्षण नोंदवून त्यावरील संशोधीत माहिती गोळा केल्या जाईल

  Image

सध्या आदित्य L1 सौरयानाने पृथ्वीच्या पहिल्या स्थरातून,दुसऱ्या स्थरात प्रवेश केल्याची माहिती ईस्रो संस्थेने ट्विटर वरून प्रकाशित केली आहे 

Saturday, 2 September 2023

चंद्रावर आढळले ऑक्सिजन,सल्फर,आयर्नसह इतर धातूंचे अस्तित्व

Image

   प्रज्ञान रोव्हरने काढलेला विक्रम चांद्रयानाचा  फोटो - फोटो इसरो संस्था

इसरो संस्था - 30 ऑगस्ट

भारताच्या चांद्रमोहिमे अंतर्गत चंद्रावर गेलेले विक्रम चांद्रयान-3 तेथे पोहोचताच कार्यान्वित झाले काही तासांनी प्रज्ञान रोवर देखील यानातुन बाहेर पडले आणी कार्यान्वित झाले विक्रम यानाने त्याचा व्हिडीओ व चंद्रभुमीवरील फोटो पृथ्वीवरील इसरो संस्थेत पाठवले होते आता प्रज्ञान रोवरने देखील विक्रम यानाचा फोटो काढून पृथ्वीवर पाठवला आहे विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवरील,भुगर्भातील आणी तेथील वातावरणाची माहिती प्रज्ञान रोवरच्या सहाय्याने संशोधीत करत आहे

प्रज्ञान रोवर यानातुन बाहेर पडून चंद्रभुमीवर मार्गक्रमण करीत असताना त्याच्या वाटेत मोठा खड्डा आढळला तेव्हा काही वेळ रोवर गोल,गोल फिरले आणी खड्ड्यापासून बचाव करत दुसऱ्या वाटेवर वळले तेव्हाचा व्हिडीओ व फोटो रोवरने ईस्रो संस्थेत पाठवला

 fImage

रोवरला बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक LIBS( Laser -Induced Breakdown Spectroscopy) लेसर ऊपकरणाच्या सहाय्याने रोवरने भुगर्भातील माती व खडकाचे परीक्षण केले तेव्हा अत्यंत महत्त्वपुर्ण माहिती प्राप्त झाली आहे चंद्रावरील भुपृष्ठाखालील माती व खडकात सल्फर,अल्युमिनियम,कॅलशियम,आयर्न,टिटॅनियम व क्रोमियम धातू सापडले असुन आता हायड्रोजनचा शोध घेतल्या जात आहे मानवी आयुष्यासाठी ऑक्सीजन आवश्यक आहे रोवरच्या APXS (Alfa Particle X-ray Spectrometer) ह्या ऊपकरणाद्वारे घेतलेल्या नमुन्यात देखील ह्या धातू व वायूचे अस्तित्व आढळले आहे सिलिकॉन देखील तेथे आढळले आहे 

रोवरच्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे चंद्रावरील व जमिनीखालील तापमानाची नोंद करण्यात आली असून सुर्यापेक्षा शीतल असणाऱ्या चंद्रावरील वातावरण प्रत्यक्षात अत्यंत ऊष्ण आहे ह्या ऊपकरणाने भुगर्भातील कंपने देखील नोंदवली आहेत

विक्रम चांद्रयान आणी प्रज्ञान रोवर चंद्राच्या दक्षिण भागात स्थिरावले आहे हा भाग ईतर भागापेक्षा वेगळा का आहे ह्याचा शोध यानातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे घेतल्या जात आहे तसेच त्या भागात पाण्याचे अस्तित्व आहे का तेथे सजीव सृष्ठिला पोषक वातावरण होते का ?आहे का ? ह्याचाही शोध घेण्यात येणार आहे

Thursday, 31 August 2023

नासाच्या Space X Crew- 7 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचले

  The Crew-7 astronauts walk out of the Neil Armstrong Operations and Checkout Building at NASA's Kennedy Space Center in Florida on Aug 26, 2023.

           नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 28 ऑगस्ट 

नासाच्या Space X Crew -7 अंतराळ मोहिमेतील नासाची अंतराळवीर Jasmin Moghbeli युरोपियन अंतराळवीर Andreas Mogensen जपानचे अंतराळवीर Satoshi Furukawa आणी रशियन अंतराळवीर Konstantin Borisov 27 ऑगस्टला स्थानकात सुखरूप पोहोचले हवामान ऊड्डाणासाठी अनुकूल नसल्याने ह्या अंतराळवीरांचे ऊड्डाण एक दिवस लांबले नासाच्या Florida Space Center येथील 39 A ऊड्डाण स्थळावरून  26 ऑगस्टला  Space X Crew Dragon Endurance ह्या चारही अंतराळविरांसह अंतराळात झेपावले आणी रविवारी 27 ऑगस्टला 10.58 a.m.ला स्थानकात पोहोचले  

  NASA astronaut and Crew-7 Commander, Jasmin Moghbeli, poses for a photo in the first moments the Crew-7 quartet is onboard the International Space Station after hatch opening on August 27, 2023.

    Endurance Dragon Crew -7 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था

जाण्याआधी ह्या अंतराळविरांची ऊड्डाणपुर्व अंतीम चाचणी घेण्यात आली त्यांंचे स्पेससुट फिटिंग चेकअप,लिकेज चेकअप ,हेल्थ चेकअप व ईतर आवश्यक चेकअप नंतर हे अंतराळवीर ऊड्डाण स्थळी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी नासाचे Administrator Bill Nelson आणी ह्या मोहिमेतील प्रमुख हजर होते ह्या अंतराळविरांना निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय देखील  ऊड्डाणस्थळी आले होते पण गेल्या दोन महिन्यापासून हे अंतराळवीर Quarantine मध्ये होते त्यामुळे त्यांना कुटुंबीयांशी लांबुनच संवाद साधावा लागला त्यांच्याशी काही वेळ संवाद साधुन अंतराळवीरांनी सर्वांना Bye करत सर्वांचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या कुटुबीयांनी त्यांना सूरक्षीत अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या अंतराळप्रवासास निघण्यापूर्वी अंतराळविरांनी Endurance Dragon मध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा एकदा सर्व ठिक आहे ना ह्याची खात्री केली आणी ठरलेल्या वेळी Space X Dragon सह अंतराळवीर अंतराळस्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले रविवारी 9.16a.m.ला  Dragon स्थानकाजवळ पोहोचले आणी 10.58 a.m. ला स्थानक आणी Dragon ह्यांच्यातील hatching,docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर अंतराळविरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले त्या नंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला

अंतराळ प्रवासा दरम्यान हे अंतराळवीर नासा संस्थेच्या सतत संपर्कात होते Space X Crew Dragon अत्यंत वेगाने अंतराळात मार्गक्रमण करत नियोजित प्रक्रिया पार पाडत होते अखेर अंतीम प्रक्रिया पार पाडत Dragon rocket पासून वेगळे झाले आणी प्रचंड वेगाने पृथ्वीच्या कक्षेतून झीरो ग्रव्हिटित प्रवेशले तेव्हा नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन Dragon चा अंतराळातील सुरक्षित प्रवेश आणी  स्मूथ ड्रायव्हिंग केल्याबद्दल अंतराळविरांचे अभिनंदन केले आता Dragon मधून तुम्ही चार वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर एकत्र अंतराळ प्रवास करत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे आता खऱ्या अर्थाने Dragon International झाले आहे तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी आणी स्थानकातील प्रवेशासाठी शुभेच्छा !असे म्हणत त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा Dragon मध्ये बसण्यासाठी मोकळी जागा आहे आम्ही देखील आनंदी आहोत आम्हाला नासा आणी आमच्या देशातील सहभागी संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या मुळे आम्ही हा अदभूत प्रवास करतोय हा अभुतपुर्व,अविस्मरणीय क्षण अनुभवतोय आम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या ह्या मोहीमेतील सहभागी सर्वांचेच आभारी आहोत त्यांच्या मुळेच आम्ही सुरक्षित अंतराळप्रवास करत आहोत असे म्हणत त्यांनी अंतराळातून पृथ्वीच अलौकिक सौंदर्य दाखवले 

ह्या प्रवासात अंतराळवीर Andreas ह्यांच्या मुलाने दिलेले झीरो ग्रव्हिटी ईंडीकेटर 3 toed Sloth देखील कसे तरंगते ते दाखवले हा Sloth दोन ऐवजी तीन toed  का आहे ह्या बद्दल  विचारले असता Andreas," ह्यांनी सांगितले मागच्या क्रिसमसला सुट्टीत मी माझ्या फॅमिली सोबत Casta Rica येथील समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो तीथे आम्हाला  Sloth दिसला मी पायलट आहे माझ्या फॅमिलीत मला Slowest person म्हणतात त्यामुळे मला तीन toed Sloth ची गरज आहे असे त्यांना वाटते त्यांच्यासाठी ते लकी आहे मला त्यांची आठवण म्हणून त्यांनी हे ईंडीकेटर सोबत दिलय जपानी अंतराळवीर Satoshi Furuawa ह्यांनी देखील अंतराळात  पुन्हा प्रवेश केल्यावर मी देखील आंनदीत झालो आहे असे सांगितले रशियन अंतराळवीर  Borisov म्हणाले मी खूप Excited आहे Thanks ! ह्या.मोहिमेत सहभागी सर्वांचेच आभार त्यांच्यामुळे हे शक्य झाले !  

अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर काही वेळातच ह्या अंतराळविरांचा Welcome Ceremony पार पडला Welcome Ceremony साठी स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्र जमले नासा संस्थेने लाईव्ह संपर्क साधुन ह्या अंतराळविरांचे सुरक्षित अंतराळ प्रवास व स्थानकातील प्रवेशाबद्दल अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणी स्थानकात प्रवेश केल्यानंतरचे त्यांचे मनोगत जाणून घेतले 

सुरवातीला अंतराळवीर  Frank आणी अंतराळवीर Sergey ह्यांनी  ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले '',स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल अंतराळमोहीम 69 तर्फे तुमचे अभिनंदन ! अंतराळवीर Satoshi आणी Andreas तुमचे स्वागत तुम्ही दुसऱ्यांंदा स्थानकात पोहोचला आहात पण अंतराळवीर Jasmine आणी  Konstantin ,तुमच्या स्थानकातील प्रथम प्रवेशाबद्दल स्पेशल अभिनंदन आणी स्वागत ! आता तुम्ही खरोखरच अंतराळवीर झाला आहात हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वपुर्ण क्षण आहे तुमच्या Happy flight आणी भविष्यकालीन स्थानकातील वास्तव्यासाठी आणी संशोधनासाठी शुभेच्छा ! आता आपण एकत्र संशोधन करणार आहोत !"

अंतराळवीर Jasmin -."Thanks ! Sergey आणी  Frank तुम्ही केलेल्या स्वागताबद्दल आपण काही दिवस एकत्र ट्रेनिंग घेतल आहे आताचा क्षण खरोखरच महत्त्वाचा आहे आता आपण एकत्र रहाणार आहोत,संशोधन करणार आहोत आम्ही येथील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्याचा अनुभव घेणार आहोत त्या साठी नासा संस्था,ईसा,Space X JAXA CSA आणी Roscosmos संस्थेतील सर्वांचे आभार त्यांच्यामुळे मी ईथे येऊ शकले हा क्षण अनभवु शकले येणाऱ्या काळात आम्ही निश्चितच चांगली कामगिरी पार पाडु तुमच्यापैकी तीनजण वेगळे आहेत पण मला आशा आहे तुम्ही आम्हाला संशोधनातील परीपूर्ण,ऊपयुक्त गोष्टी शिकवाल ह्या टिममध्ये सहभागी झाल्याचा मला अभिमान वाटतो आहे !"

अंतराळवीर Andreas -"मला सुध्दा Jasmine सारखच फिल होतय ह्या मोहीम 69 मध्ये सहभागी होताना अभिमान वाटतोय हि मोहीम आम्ही नक्की यशस्वी करु आधीच्या ESAच्या अंतराळवीरांनी केलेले अनेक युरोपियन आणी Danish Expt. मी पुढे चालू ठेवेन मला त्यासाठी ESA संस्थेचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या Hard Work बद्दल आणी मला ईथे येण्यासाठी Train  केल्याबद्दल हि मोहीम अभुतपुर्व आहे ईथे स्थानकात पोहोचल्यानंतरचा क्षण अभुतपुर्व आहे,थरारक आहे ईथल्या ब्रिलीयंट इंटर नॅशनल  टिम सोबत रहायला,संशोधन करायला मिळणार ह्याचा आनंद होतोय मी Excited आहे !"

अंतराळवीर  Borisov -"खरच खूप Excited क्षण आहे हा शब्दात व्यक्त करता येत नाही ईथल्या झीरो ग्रॅविटीत ईतक्या सहजतेने तरंगताना ह्या सर्वांना पहाण किती कठोर परिश्रम करावे लागतात त्यासाठी !आणी आता मिही ईथल्या झीरो ग्रव्हिटित तरंगत्या अवस्थेत रहाणार मलाही त्या साठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत खूप कठीण आहे हे ईथल्या ईंटरनॅशनल टिमसोबत एकत्र संशोधन करताना एकी कीती महत्त्वाची आहे ह्याचा प्रत्यय येतोय ह्या ईंटरनॅशनल अंतराळस्थानकात आम्ही बहुतेकजण ईंटरनॅशनल रहिवासी आहोत ईथे पाच देशातील अंतराळवीर वास्तव्य करत आहेत आगामी काळात आम्ही एकत्र काम करणार आहोत नासा,Space X आणी सहभागी सर्व संस्थेचे आभार खरेच ईथले अंतराळवीर वैशिष्ट्यपूर्ण आहेत आता काही महिने आम्ही एकत्र संशोधन करणार आहोत आणी ईथल्या झीरो ग्रव्हिटितील रहाण्याची मजा अनुभवणार आहोत!"

हे चारही अंतराळवीर आता स्थानकात सहा महिने राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होणार आहेत लवकरच  Space X -6 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर पृथ्वीवर परततील तो पर्यंत स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्रित राहून तेथील संशोधनात सहभागी होतील

 

Friday, 25 August 2023

भारताची चांद्रयान -3 मोहिम यशस्वी विक्रम चांद्रयान चंद्रावर प्रज्ञान रोवरसह स्थिरावले

 Image

 भारताच्या चांद्रमोहीम -3 मधील विक्रम चांद्रयान चांद्रभूमीवर सुरक्षितपणे उतरून स्थिरावल्यानंतर -फोटो -इसरो संस्था

ईसरो  संस्था -24 ऑगस्ट 

भारताच्या चांद्रमोहिम -3 अंतर्गत चंद्रावर गेलेले विक्रम चांद्रयान बुधवारी चंद्रावर सूखरूप पोहोचले आणी संद्याकाळी 6 वाजुन 4 मिनिटांनी चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरले विक्रम चांद्रयानाने हि मोहीम यशस्वी करत चंद्राच्या दक्षीण भागात चांद्रयान ऊतरवणारा पहिला देश म्हणून भारताची विक्रमी नोंद केली आहे विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच ईसरोचे अध्यक्ष S Somanath ,चांद्रमोहिम 3 मधील प्रमुख शास्त्रज्ञ आणी सारे कर्मचारी आनंदित झाले विक्रम चांद्रयान चंद्रावर पोहोचताच यानाने पृथ्वीवरील ईस्रो संस्थेशी लाईव्ह संपर्क साधत " I reached my destination and you also !" असे ट्वीट केले चांद्रयान चांद्रभूमीवर स्थिरावताच काही तासानंतर विक्रम चांद्रयानातुन प्रज्ञान रोवर देखील बाहेर पडले आणी कार्यान्वित झाले विक्रम चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत फिरतानाच चंद्रभुमीवरील फोटो व व्हिडीओ काढून पृथ्वीवर पाठवणे सुरू केले होते विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताना ऊतरल्यावर आणी प्रज्ञान रोवर यानातुन बाहेर पडतानाचा व्हिडीओ देखील विक्रम चांद्रयानाने लगेचच पृथ्वीवर पाठवला आहे 

 Image

विक्रम चांद्रयान 14 जुलैला ईस्रोच्या श्रीहरीकोटा येथील ऊड्डाण स्थळावरून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 41 दिवसांनी चंद्रावर पोहोचले ह्या आधीच्या चांद्रमोहिम 2 मधील विक्रम चांद्रयान चंद्रावर ऊतरताना नष्ठ झाले होते आणी दोन दिवस आधीच रशियाचे लुना चांद्रयान देखील चांद्रभूमीवर ऊतरताना नष्ठ झाले त्यामुळे ह्या वेळेस विक्रम चांद्रयान चंद्रावर सुरक्षीतपणे खाली ऊतरेल की नाही ह्या बद्दल ईस्रोचे अध्यक्ष आणी  ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ S.Somanath आणी त्यांची टिम सांशक होती पण अखेर हि मोहीम यशस्वी करत विक्रम चांद्रयान सुरक्षीतपणे चंद्रभुमीवर खाली ऊतरले

 


ईस्रो संस्थेतील शास्त्रज्ञांनी विक्रम चांद्रयान चंद्राच्या कक्षेत शिरताच चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरवण्याची तयारी सुरू केली होती सारी यंत्रणा सज्ज होती चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरण्याआधी चंद्राच्या कक्षेत फिरत होते आणी चंद्रावर ऊतरण्यासाठी योग्य जागेचे निरीक्षण करत होते योग्य जागा सापडताच विक्रम चांद्रयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली चांद्रयानाने चंद्रभुमीवर ऊतरण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवत चंद्रभुमीच्या दिशेने झेप घेतली तेव्हा टिममधील शास्रज्ञ सर्तक झाले त्यांचे लक्ष यानावर केंद्रित झाले जसजसे विक्रम यान खाली खाली येत होते तसतशी शास्त्रज्ञांची ऊत्कंठा वाढत होती यानाने नियोजीत प्रक्रिया पार पाडताच सर्वजण टाळ्या वाजवत आनंद व्यक्त करत होते अखेरची प्रक्रिया पार पाडत यानाने स्थीती बदलली आणी वेग कमी करत उभ्या स्थितीत चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे खाली ऊतरत जमीनीला स्पर्श केला तेव्हा ईस्रो संस्थेत सर्वांनी जल्लोष केला S.Somanath त्यांंचे सहकारी कर्मचारी निश्चिंत झाले त्यांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपुर्तीचा आनंद दिसत होता ईस्रोतील चांद्रमोहिम 3 मधील शास्त्रज्ञ,ईंजीनिअर्स,तत्रंज्ञ,कर्मचारी साऱ्यांंनीच ऊभे राहून टाळ्या वाजवत हा क्षण अनुभवला

हि मोहीम यशस्वी होताच ईस्रोचे अध्यक्ष S.Somanath ह्यांनी चांद्रमोहिम यशस्वी झाल्याची अधिकृत घोषणा केली आणी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले," हे यश टिममधील सर्वांचे आहे गेल्या चार वर्षापासून सर्वजण ह्या मोहीमेसाठी रात्रंदिवस काम करत होते दैनंदिन व्यवहार करताना,खाताना,पितानाच नाही तर श्वास घेताना देखील ते हि मोहीम यशस्वी करण्याच्याच विचारात होते त्यांच्या सहकार्यामुळे अथक परीश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे त्यामुळे त्यांचे अभिनंदन ! आधीच्या चांद्रयान 2 मोहिमेतील त्रुटी दुर करून ह्या मोहिमेत काही आवश्यक बदल करण्यात आले होते पण तरीही विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरेपर्यंत आम्ही चिंतीत होतो पण अखेर हि मोहीम यशस्वी झाली आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण अनमोल आहे पंतप्रधान मोदींनी परवानगी देऊन सहकार्य केल्यामुळे हे यश प्राप्त होऊ शकले त्यामुळे त्यांचे आभार 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं अफ्रिकेतील जोहन्सबर्ग येथून लाईव्ह टेलीकास्टद्वारे विक्रम चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरतानाच्या सोहळ्यात  सहभागी झाले होते चांद्रयान चंद्रभुमीवर ऊतरताच त्यांनी भारताचा तिरंगा फडकावत आनंद साजरा केला त्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल ईस्रो संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ, मोहिमेतील सहभागी शास्त्रज्ञ आणी सर्व कर्मचाऱ्यांंचे अभिनंदन केले ते म्हणाले,"आधीच्या मोहिमेतील अपयशाने खचून न जाता शास्त्रज्ञांनी हि मोहीम यशस्वी करुन देशाचे नाव ऊंचावले आहे विक्रम यानाने देशाच्या ईतिहासात विक्रमी नोंद केली आहे भारताने चंद्राच्या दक्षिण भागात यान ऊतरवुन चांद्रमोहिमेतील यशाच्या वाटेवर प्रथम पहिले पाऊल टाकले आहे हे यश शास्त्रज्ञांच्या आणी टिमच्या अपार मेहनतीने प्राप्त झाले आहे त्या साठी ईस्रो संस्थेतील ह्या टिममधील सर्वांचे अभिनंदन!" माझ्यासाठी हा  ऐतिहासिक क्षण अविस्मरणीय आहे!अनमोल आहे! ईस्रो तील ह्या मोहिमेतील सर्वांना पुढील वाटचालीसाठी शूभेच्छा ! देशातील 140 कोटी जनता ह्या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार आहे सर्व जनतेचेही आभार अंतराळविश्वातील भारताचे भविष्यकालीन यश निश्चित आहे लवकरच भारत चंद्रावर गगनयान मोहिमेत मानव पाठवणार आहे मंगळ,शुक्र मोहिमेची तयारी सुरु आहे आजवर अमेरिका ,रशिया आणि चीनने चंद्रावर यान पाठवून चांद्रमोहीम यशस्वी केली होती आता भारतही यशस्वी चौथा देश झाला आहे 

विक्रम चांद्रयान व प्रज्ञान रोवर आता चंद्रभुममीवरील व भुगर्भातील खनिजे,माती,खडकांचे नमुने घेतील चंद्रावरील पुरातन सजीव स्रुष्ठिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे व पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेतील तसेच भविष्यकालीन मानवसहित चांद्रमोहिमेतील अंतराळविरांसाठी रहाण्यायोग्य पोषक वातावरणाचा शोध घेतील तेथील वातावरणाचे निरीक्षण नोंदवून तेथील फोटो व व्हिडिओ प्रुथ्वीवर पाठवतील

Friday, 18 August 2023

नासाच्या Space X Crew-6 मोहिमेतील अंतराळवीर सप्टेंबर मध्ये पृथ्वीवर परतणार

Clockwise from bottom, are NASA astronaut Stephen Bowen; UAE (United Arab Emirates) astronaut Sultan Alneyadi; NASA astronaut Woody Hoburg; and Roscosmos cosmonaut Andrey Fedyaev.
 
नासाच्या Space X Crew -6 चे अंतराळवीर Stephen Bowen ,Sultan Alneyadi ,Woody Hoburg आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev स्थानकातील वास्तव्या दरम्यान -फोटो नासा संस्था
 
नासा संस्था -17 आँगस्ट 
नासा आणी Space X Crew 6 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर त्यांचे स्थानकातील सहा महिन्यांचे वास्तव्य संपवून सप्टेंबरमध्ये पृथ्वीवर परतणार आहेत नासा आणी Space X ह्यांच्या अंतराळ मोहीम Crew -6 अंतर्गत नासाचे अंतराळवीर Stephen Bowen,Woody Hoburg सौदी अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणी रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev हे चार अंतराळवीर तीन मार्च 2023 मध्ये सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते 
स्थानकातील सहा महिन्यांच्या वास्तव्या दरम्यान हे अंतराळवीर तेथे सुरू असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी झाले विशेषतः त्यांनी स्थानकात सुरु असलेल्या Technology demonstrations, Student Robotic Challenges,Plant genetics ह्या विषयीच्या सायंटिफिक प्रयोगातील संशोधनात सहभाग नोंदवला  शीवाय अंतराळ स्थानकातील झीरो ग्रव्हिटितील वास्तव्या दरम्यान मानवी आरोग्यावर काय विपरीत परिणाम होतात ह्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर सखोल संशोधन केले मानवाच्या विकासासाठी ऊपयुक्त आणी पृथ्वी संरक्षणासाठी आवश्यक  संशोधनातही ते सहभागी झाले  
हे अंतराळवीर एक सप्टेंबरला पृथ्वीवर परतणार आहेत Space X Crew Dragon Endeavor ह्या अंतराळवीरांसह Florida येथील समूद्रात ऊतरणार आहे पृथ्वीवर परतण्याआधी हे अंतराळवीर स्थानकातून पत्रकारांसोबत लाईव्ह संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या सहा महिन्यातील वास्तव्याविषयी आणि त्या दरम्यान त्यांनी केलेल्या संशोधना विषयी माहिती देणार आहेत