Saturday, 28 December 2019

यवतमाळात ढगाळ वातावरणातही दिसले सूर्यग्रहण क्षणभर सूर्य चंद्रकोरीसारखा भासला

      यवतमाळात ग्रहणकाळात चंद्रकोरीसारखा भासणारा ग्रहणग्रस्त सूर्य -फोटो -पूजा दुद्दलवार BE(soft)BMC(UT)

यवतमाळ -26 डिसेंबर
गुरुवारी देशभरात आणि परदेशातही काही ठिकाणी ह्या वर्षीचे अखेरचे सूर्यग्रहण दिसले ह्या वर्षीच्या सूर्य ग्रहणाला विशेष महत्व असल्याचे जाणकारांचे मत होते 1723 साली झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळेस ग्रहांची जी स्थिती होती ती 296 वर्षानंतर पुन्हा एकदा आकाशात ह्या वेळेस पाहायला मिळाली तर काहींच्या मते 58 वर्षानंतर अशी ग्रहांची स्थिती आकाशात निर्माण झाली त्या मुळे खगोल शास्त्रज्ञ,अभ्यासक,परदेशी आणि आपल्या देशातील हौशी नागरिक हे ग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होते ह्या वेळेसचे सूर्य ग्रहण जरी मोठे असले तरी देशातील सर्वच भागातून ते पूर्ण दिसणार नव्हते फक्त केरळ,तामिळनाडूत ते पूर्ण कंकणाकृती दिसणार होते महाराष्ट्र विदर्भ आणि इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार होते
सध्याचे युग वैज्ञानिक जागृतीचे असल्यामुळे ग्रहण पाहण्यासाठी खगोल शास्त्रज्ञांसोबतच हौशी खगोल प्रेमी नागरिकांनी जय्यत तयारी केली असतानाच पावसाने अवकाळी हजेरी लावल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला पुण्यात ग्रहणकाळात काही खाऊ नये हा गैरसमज दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ग्रहण पाहण्यासाठी मोकळ्या मैदानात जमलेल्या लोकांच्या चहा आणि पाण्याची सोय करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न केला बेंगलोर मध्येही काही विद्यार्थ्यांनी ग्रहणकाळात ब्रेकफास्ट करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न केला
यवतमाळातही सकाळी अचानक अवकाळी पावसाला सुरवात झाली पाऊस थोडा वेळ बरसून बंद झाला तरीही ढगाळ वातावरणात सूर्य दिसेनासा झाल्याने ग्रहण दिसेल कि नाही अशी आशंका होती पण अशा ढगाळ वातावरणातही सूर्य उगवला सकाळी आठ साडेआठला ग्रहण सुरु झाले आणि साडेनऊ नंतर वातावरण ढगाळ असूनही मधून अधून ढगांच्या आढ ग्रहणग्रस्थ सूर्यदर्शन होऊ लागले
ग्रहण काळातील सूर्याच्या ह्या विलोभनीय क्षणाचा हा व्हिडिओ -व्हिडीओ -पूजा दुद्दलवार BE(soft)BMC(UT)
अर्धा पाऊणतास ढगाआढून दिसणारा  ग्रहणग्रस्थ सूर्य क्षणभर चंद्रकोरीच्या आकाराचा भासत होता सूर्य आणि पृथ्वी मध्ये आलेल्या चंद्राने सूर्यावर पाडलेल्या सावलीमुळे हा चंद्र कि सूर्य असा संभ्रम निर्माण होत होता अकरा नंतर ग्रहण सुटायला सुरवात झाल्याने काळवंडलेला सूर्य प्रकाशमान व्हायला सुरवात झाली
           ग्रहणग्रस्त सूर्य कि चंद्र असा संभ्रम निर्माण करणारे दृष्य -फोटो -पूजा दुद्दलवार BE(soft)BMC(UT)
महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे पूर्ण खग्रास सूर्यग्रहण दिसले नाही पण केरळ तामिळनाडूत मात्र खग्रास कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले चंद्र ग्रहण काळात पृथ्वीपासून दूर असल्यामुळे त्याची प्रतिमा आपल्याला लहान आकाराची दिसते आणि चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू न शकल्याने सूर्याची धगधगती प्रकाशमान प्रभावळ तशीच राहते त्या मुळे आपल्याला तो भाग चमकदार कंकणाकृती किंवा अंगठीसारखा भासतो  दुबईतही कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले
ह्या वर्षी सतत मधून अधून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सूर्य ग्रहण दिसले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दिल्लीतील सूर्यग्रहण पहाता आले नाही त्या मुळे त्यांनी हे सूर्यग्रहण लाईव्ह टेलिकास्ट वर पाहिले आणि ते पाहतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला

Thursday, 26 December 2019

अंतराळवीरांनी दिल्या स्थानकातून पृथ्वीवासीयांना नाताळच्या शुभेच्छा

अंतराळवीर अंतराळस्थानकातून संवाद साधताना नाताळ साजरा करण्याच्या तयारीचे सामान दाखवताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -23 डिसेंबर
24 डिसेंबरला सर्व देशात नाताळचा सण उत्साहात साजरा झाला ह्या सणासाठी सुट्टीत सारेजण आपआपल्या गावी येतात आणि कुटुंबियांसोबत क्रिसमस साजरा करतात पण पृथ्वीपासून दूर अंतराळातील फिरत्या अंतराळ स्थानकातील  झिरो ग्रॅविटीत राहणाऱ्या अंतराळवीरांना असे करता येत नाही पण तरीही वेळोवेळी त्यांच्या संशोधनाच्या कामातून सुट्टी घेत अंतराळवीर स्थानकातील झिरो ग्रॅविटीत तिथे असलेल्या सामानाचा आणि पदार्थांचा उपयोग करून सण साजरा करतात
नासाच्या अंतराळ मोहीम 61च्या अंतराळवीरांनी क्रिसमस आधी नासा संस्थेमार्फत पृथ्वीवासीयांशी लाईव्ह संवाद साधत स्थानकात यंदाचा क्रिसमस उत्साहात साजरा करणार असल्याचे सांगीतले आणि सगळ्यांना क्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या
नासाच्या अंतराळमोहीम 61चे सहा अंतराळवीर सध्या अंतराळस्थानकात राहात आहेत आणि विविध विषयांवर सायंटिफिक संशोधन करत करत आहेत नासाच्या मोहीम 61 चे अंतराळवीर Luca Parmintano,Christina Koch,Andrew Morgan आणि Jessica Meir ह्यांनी लाईव्ह संवाद साधत सगळ्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आणि नाताळच्या त्यांच्या आठवणी शेअर केल्या
Christina Koch ने सांगितल, तिला हा सण आवडतो ह्या निमित्याने रोजच्या व्यस्त दिनचर्येतून मोकळा वेळ काढून सगळे कुटुंबीय आणि मित्र एकत्रित निवांतपणे एकमेकांशी संवाद साधतात आणि पार्टीचा आनंद घेत ह्या सणाचा आनंद लुटतात त्या मुळे अशा सणांच्या मानवी जीवनातील महत्वाची जाणीव होते
Andrew Morgan ह्यांनी सांगितल ,मी ह्या वर्षी माझ्या कुटुंबियांपासून दूर असल्याने त्यांची उणीव  निश्चितच जाणवतेय माझे कुटुंबीय एकत्रित येऊन हा सण उत्साहात साजरा करतीलच मी पण तिथल्यासारखाच माझ्या ह्या नव्या परिवारासोबत नाताळ साजरा करणार आहे घरी आम्ही घराला रोषणाई करतो दिव्यांनी मेणबत्यांनी सजवतो पण इथे मेणबत्ती लावता येत नाही आम्ही इथे मंद प्रकाशात Christmas Movies पहाणार आहोत
आणि नाताळचे स्वागत करणार आहोत
Luca Parmintano ह्यांनीही त्यांची आठवण सांगितली हा सण कुटुंबियांसोबत साजरा होत असला तरीही मी त्यांच्या पासून दूर आहे विशेष म्हणजे ह्या वर्षी ह्या स्पेशल फॅमिली सोबत हा सण साजरा करणार असल्याने मी आनंदित आहे उत्साहित आहे जगात असे कितीतरी जण आहेत जे कामानिमित्य नोकरी निमित्य आपल्या कुटुंबियांपासून दूर आहेत देशाच्या सुरक्षितते साठी धोकादायक स्थितीत आपले कर्तव्य बजावत आहेत आपल्याला त्यांची सतत जाणीव ठेवायला हवी त्या साऱ्यांना माझ्यातर्फे "नाताळच्या शुभेच्छा ! " मी सदैव त्यांचा ऋणी राहीन आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करेन
Jessica Meir नेही नाताळच्या आठवणी सांगितल्या ती म्हणाली,मी लहान असताना दोन सण साजरे करायचे
Christmas आणि Hanukkah
तुम्हा सर्वांना"नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! आणी तुम्हाला,तुमच्या कुटुंबियांना आनंद आणि सुख मिळो हि सदिच्छा "!
आम्ही सर्वजण उत्साहात नाताळ साजरा करणार आहोत आम्हाला पृथ्वीवरून stockings,Santa hatsआणि सोबत hot apple cider,hot coco, smoked salmon आणि fruit cake हे पदार्थ आले आहेत आम्ही त्याचा उपयोग सजावटीसाठी करणार आहोत लाल रंगांच्या पायमोज्यांनी सजावट करणार आहोत पायमोज्यात हे पदार्थ भरणार आहोत आणि सर्वजण मिळून पार्टी करणार आहोत
सगळ्यांनीच शेवटी पृथ्वीवासीयांना त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना पुन्हा नाताळच्या शुभेच्छा दिल्या

Friday, 20 December 2019

नासाच्या पार्कर सौर यानाने पाठवली महत्वपूर्ण माहिती तीन परिक्रमा पूर्ण

illustration of Parker Solar Probe
                           पार्कर सोलर सौर यान सूर्याच्या कक्षेत शिरताना -फोटो- नासा

नासा संस्था - 10 डिसेंबर
नासाने ऑगस्ट 20018 मध्ये सूर्यावर पाठवलेले पार्कर सोलर प्रोब हे सौरयान नोव्हेंबरमध्ये सूर्याच्या कक्षेत शिरून यशस्वीपणे कार्यरत झाले होते ह्या सौरयानाने सूर्याच्या दिशेने अंतराळ प्रवासादरम्यानच कार्यरत होऊन वाटेतच महत्वपूर्ण माहिती पाठवली होती सूर्याच्या जवळ पोहोचताच यानावर बसवलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने आकाशातील सौरयाना भोवतीच्या वातावरणातील प्रकाशकणांचे फोटो पार्करने टिपले होते व त्वरित पृथ्वीवर पाठवले होते ह्या फोटोत सौरमंडळाजवळील तेजपुंज तारकासमूह,गुरु ग्रह आणि milky आकाशगंगेचा प्रकाशमान पट्टा सौर यानाने टिपला होता
आता पार्कर सौरयान सूर्याच्या जवळ पोहोचून गेल्या वर्षभरापासून अविरत यशस्वीपणे कार्य करत आहे पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेत शिरून सूर्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी सूर्याभोवती चोवीस फेऱ्या मारणार आहे आणि नुकतीच ह्या यानाने तिसरी फेरी पूर्ण केली असून सूर्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवली आहे पार्कर सोलर यान सूर्याच्या भूपृष्ठभागावरील माहिती सोबतच तेथील प्रचंड उष्णतेचे आणि सूर्याच्या भोवतीच्या तळपणाऱ्या अत्यंत तेजस्वी प्रभावळीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणार आहे सूर्याच्या भूपृष्ठापेक्षा त्याच्या बाहेरील भागात इतकी प्रचंड उष्णता का आहे? सूर्यावरील उष्ण सौरवादळ आणी त्या मुळे तिथे अविरत उठणारे आगीचे लोट त्यातील विध्युत भारित कण,वायू ह्या बाबतीतला महत्वपूर्ण माहितीपूर्ण डाटा पार्करने गोळा करून पृथ्वीवर पाठवला आहे आणि शास्त्रज्ञानी त्यावर सखोल संशोधन करून माहिती प्रसारित केली आहे
            A black and white image with a background of stars and bright ray-like structures extending from the left side of the frame.
पार्कर सोलर सौरयानाच्या W.I.S.P.R ह्या अत्याधुनिक उपकरणाच्या telescopeने टिपलेला फोटो -फोटो -नासा संस्था
सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा त्याच्या बाहेरील प्रभामंडळात शेकडोपट जास्त उष्णता आहे सूर्याच्या बाहेरील भागातील वातावरणात सतत उष्णतेच्या ज्वाळा फेकल्या जातात त्यातुन सतत ionized गॅस बाहेर पडतात त्या सोबतच तिथे प्रचंड उष्ण वारे वाहतात,वादळे होतात त्यात धूलिकण,वायूंचा समावेश होतो सूर्या भोवतीच्या मॅग्नेटिक फिल्ड मूळे हे धुलीकण आणि वायू सूर्याकडे ओढले जातात आणि अत्यंत वेगाने अविरतपणे विशिष्ट दिशेने हा पेटता  धुरळा आणि त्यातील कण गोलाकार फिरत राहतात त्या मुळेच सूर्या बाहेरील आवरण (plasma ) आपल्याला सतत प्रकाशमान दिसते आणि सगळीकडून तो भाग एकसारखा दिसतो ह्या उष्णतेच्या ज्वाळा आणि त्यातून निघणाऱ्या लहरी सागर किंवा नदीच्या लाटेप्रमाणे  दिसतात त्यातील कित्येक कण सतत उडत असतात आगीच्या ठिणग्या दूरवर उडतात आणि पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत काही नष्ठ होतात त्या मुळे प्रकाशकिरणे आपल्याला एका सरळ रेषेत दिसतात अशी माहिती पार्कर सौरयानाने पाठवलेल्या डाटा वरून शास्त्रज्ञांनी संशोधित केली आहे
हि माहिती पृथ्वीवरून मिळवणे अशक्य होते त्या साठी सूर्याच्या जवळ जाणे आवश्यक होते सध्या पार्कर यान सूर्यापासून 15 मिलियन मैल लांब आहे आजवर एकही यान सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचले नव्हते भविष्यात पार्कर सूर्याच्या आणखी जवळ जाईल आणि आणखी वेगाने फेऱ्या मारून सूर्याबद्दलची आपल्याला अज्ञात
असलेली अत्याधुनिक माहिती मिळवेल
पार्कर यानावर चार अत्याधुनिक उपकरणे बसविलेली असून ती व्यवस्थित कार्य करत आहेत सध्या पार्कर सोलर यान सूर्याच्या प्रचंड उष्णतेच्या कक्षेत फिरत आहे सूर्याच्या इतक्या जवळ गेल्यानंतर कोणतेही यान जळून खाक झाले असते पण पार्कर सोलर यानाला बसविलेली Thermal Protection systemह्या यानाचे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करेल नासाच्या वॉशिंग्टन येथील नासाच्या मुख्यालयातील Associate  Administrator Thomas Zurbuchen म्हणतात,
"पार्कर सौर यानाने पाठवलेली हि माहिती नवीन आणि आम्हाला आश्चर्यचकित करणारी आहे हि माहिती आजवर मानवाला माहिती नव्हती  साठ वर्षानंतर अथक परिश्रम आणि शास्त्रज्ञांच्या चिकाटीमुळे आम्हाला हे यश प्राप्त झाले आहे " अशी अनेक अभूतपूर्व आश्चर्यकारक आजवर मानवाला अज्ञात असलेली माहिती पार्कर सोलर यान सूर्याच्या जवळ जाऊन गोळा करेल त्या मुळे सूर्य सूर्याभोवतीचे फिरणारे ग्रह आणि सूर्याची प्रखर उष्णता पृथ्वीवरील वातावरणावर देखील कशी परिणाम करते ह्याची अद्ययावत माहिती जेव्हा पार्कर सूर्याच्या आणखी जवळ जाईल आणि सूर्यावरील घडामोडींचे सखोल निरीक्षण नोंदवून पृथ्वीवर पाठवेल तेव्हा आपल्याला प्राप्त होईल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत

Saturday, 30 November 2019

स्थानकातील अंतराळवीरांनी दिल्या Thanks Giving Day च्या शुभेच्छा


               अंतराळवीर स्थानकातुन Thanks Giving Day च्या शुभेच्छा देताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था -28 Nov .
अमेरिका व युरोप मध्ये दरवर्षी 28 नोव्हेंबरला Thanks Giving Day साजरा केल्या जातो वर्षभरात ज्यांनी,ज्यांनी  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केली त्यांच्या कष्ठाची,प्रेमाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा  दिवस साजरा केल्या जातो
ह्या दिवशी विशेष feast चे आयोजन करण्यात येते कुटुंबातील सर्वजण,आप्तस्वकीय आणि मित्रपरिवारांना आमंत्रित करून एकत्रित पार्टी केल्या जाते ह्या पार्टीत गोड आणि स्वादिष्ट पदार्थासोबतच ह्या पार्टीचे वैशिष्ठ असलेल्या टर्की पक्षाच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो
अमेरिकेपासून हजारो मैल पृथ्वीपासून दूर अंतराळातील अंतराळस्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांना मात्र ह्या पार्टीत सहभागी होता येत नाही पण हे अंतराळवीर Thanks Giving Day अंतराळस्थानकात साजरा करतात ह्या वर्षीही त्यांनी अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर संवाद साधून पृथ्वीवासीयांना Thanks Giving Day च्या शुभेच्छा दिल्या
अंतराळ स्थानकातून सध्या तिथे राहात असलेल्या Jessica Meir,Christina Koch आणि Andrew Morgan ह्यांनी स्थानकातून संवाद साधला तीनही अंतराळवीर म्हणतात ह्या वर्षी Thanks Giving Day त्यांच्या साठी विशेष आहे आहे कारण हे अंतराळवीर पृथ्वी पासून दूर अंतराळात झिरो ग्रॅविटीत रहात आहेत त्या मुळे हा दिवस ते वैश्विक परिवारासोबत साजरा करत आहेत त्यांच्याशी प्रेमाचे संबंध वृद्धिगत करण्याची अमूल्य सुवर्णसंधी त्यांना मिळाली आहे त्यांच्या साठी हा दिवस Thanks Giving नसून Friends Giving Day आहे
नुकत्याच स्थानकात आलेल्या कार्गो शिप मधून त्यांना ह्या पार्टी साठी विशेष पदार्थ पाठवण्यात आले आहेत त्यात पार्टीचे वैशिष्ट असलेल्या टर्कीचे Turkey in Pouch,Jellied Cranberry Sauce ,Green beans,Potato,Smoked Turkeyवै अनेक पदार्थांचे पाउच आहेत ह्या तिघांनी स्थानकातून ते सर्वांना दाखवले
Jessica म्हणाली माझी फॅमिली मूळची अमेरिकेच्या बाहेरची पण नंतर अमेरिकेत स्थायिक झाली आम्ही सारी भावंड  हा दिवस दरवर्षी साजरा करतो पण जेव्हा आमच्या  पहिल्या पिढीने हा दिवस साजरा केला तेव्हा ते अमेरिकेत नवीन होते त्यांना ह्या दिवसा बद्दल विशेष माहिती नव्हती आणी वेळही खूप कमी होता तरीही तो उत्साहात साजरा केल्या गेला तेव्हा पासून तो आजतागायत सुरु आहे  मी ह्या वर्षी स्थानकात हा दिवस साजरा करतेय  माझ्या कुटुंबातील सर्वांना Smoked Turkey खूप आवडते मलाही आवडते आम्ही टर्की मध्ये ड्रेसींग Stuff करणार आहोत म्हणजे ते घरच्यासारखे टेस्टी होईल आमच्या कडे Macaroni आणि चीझ आहे त्यात थोडे पाणी घालून चीझी मॅक्रोनी तयार होईल शिवाय cornbread dressing ही आहे ह्याचा उपयोग टेस्टी टर्की साठी होईल आमच्या साठी काही गोड पदार्थही पृथ्वीवरून आलेत आम्ही Cookies Candied Yam, Cranberry आणि Apple Dessert चा वापर करून Pumpkin Pie बनवणार आहोत ते कस जमत ते तुम्हाला आम्ही नक्की सांगू
Christina Koch जवळपास वर्षभरापासून स्थानकात राहतेय रशियात हा दिवस साजरा होत नसला तरीही स्थानकातील रशियन अंतराळवीर Aleksander Skvortsov ,Oleg Skripochkaआणि इटालियन अंतराळवीर Luca Permintano हे देखील Thanks Giving Day च्या पार्टीत सहभागी होतील
शेवटी ह्या तिघा अंतराळवीरांनी सर्वांना 
                    "Happy Thanks Giving Day" अशा शुभेच्छा दिल्या

Tuesday, 26 November 2019

आता चंद्र आणि मंगळावरही पिकवता येणार भाजी आणि धान्य शास्त्रज्ञांचे नवे संशोधन


       चंद्र आणि मंगळावरील वातावरणासारखे कृत्रिम वातावरण व माती तयार करून शास्त्रज्ञांनी  लॅब मध्ये    पिकवलेल्या भाज्या आणि धान्य

नासा संस्था -(J.P.L)
अंतराळ स्थानकातील अंतराळ विरांना ताजी भाजी खाता यावी म्हणून स्थानकात राबविण्यात आलेला व्हेजी प्रोजेक्ट यशस्वी झालाय अंतराळवीरांनी नुकतीच स्थानकातील झिरो ग्रव्हिटीतील फिरत्या प्रयोग शाळेतील व्हेजी चेंबर मधील Mizzuna Mustard green भाजीचा आस्वाद घेतला तर ईकडे पृथ्वीवर शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये मंगळ व चंद्रा सारखी कृत्रिम वातावरण व मातीची निर्मिती करून त्यात दहा प्रकारच्या भाज्या व धान्याची रोपे लावली
Netherlands येथील University &Research सेंटर मधील शास्त्रज्ञांनी मंगळ आणि चंद्रावरील पृष्ठभागावरील जमिनीसारखी माती तयार केली दोन्ही ग्रहावर ह्या आधी गेलेल्या अंतराळयानाने गोळा केलेल्या माहितीचा आणि नमुन्यांचा त्यांनी ह्या संशोधनासाठी उपयोग केला त्यांनी ह्या साठी नैसर्गिक कारणाने झीज व धूप झालेल्या खडकांचा चुरा झालेली खडबडीत माती घेतली त्या मध्ये मंगळावर आढळलेल्या इतर मिनरल्स आणि घटकांचा समावेश करून उपजाऊ माती तयार केली त्या मध्ये अंतराळवीरांचे ऑरगॅनिक मटेरियल मिसळुन कंपोस्ट खत तयार केले लॅब मध्ये तयार केलेल्या मंगळ आणि चंद्रासारख्या वातावरण निर्मित कृत्रिम बागेत ह्या मातीचे मिश्रण वापरून त्यांनी दहा प्रकारच्या भाज्या आणि धान्याची लागवड केली आणि विशेष म्हणजे काही दिवसातच त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले
शास्त्रज्ञांनी लावलेल्या कृत्रिम बागेत Rocket lettuces,Tomato ,Radish ,Rye,Quinoa,,Chives ,Pea आणि Leek ह्या भाज्या आणि धान्य उगवले पण पालकाची भाजी मात्र चांगली ऊगवली नाही ह्या ताज्या टवटवीत हलीम टोमॅटो,मुळा,मोहरी,वटाणे ह्या भाज्या आणि धान्य पाहून शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत ह्या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ Wieger Wamelink म्हणतात," कि,ह्या कृत्रिम मंगळावरील मातीसारख्या खडबडीत मातीत जेव्हा लाल रंगांचे टोमॅटो उगवले तेव्हा आम्ही आनंदित तर झालो आहोतच पण आता आमचा उत्साह वाढला आहे"!
आता पुन्हा आम्ही जास्ती भाज्यांच्या बिया आणि धान्यांची लागवड करणार आहोत आगामी मंगळ,चंद्र आणि परग्रहावरील नियोजित दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना ह्या संशोधनाचा निश्चितच उपयोग होईल सध्या स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांना ताजी भाजी,फळे आणि अन्न पिकवता व खाता येत नाही त्यांना पृथ्वीवरील प्रोसेस केलेल्या प्रीझर्व अन्नावर अवलंबून राहावे लागते पण भविष्यात त्यांना लागणारे अन्न ,भाजीपाला आणि फळे पिकवता व खाता येतील शिवाय भविष्यात मंगळ,चंद्र व परग्रहावर मानवी वस्त्या वसल्या तर तिथे आता अशी शेती करून त्यांना लागणारे अन्नधान्य व भाजीपाला पिकवता येईल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत
शिवाय चंद्रावरील मातीपेक्षा मंगळावरील माती जास्त ऊपजाऊ असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे त्यामुळे भविष्यात मंगळावर शेती करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे  

Thursday, 21 November 2019

अपोलो 17 चांद्र मोहिमेतील मातीच्या नमुन्यांचे 47 वर्ष्यांनी होणार संशोधन

Apollo Astronaut Gene Cernan collecting sample 73002 during Apollo 17.
नासाच्या अपोलो 17 अंतराळ मोहिमेचे अंतराळवीर Gene Cernan चांद्रभूमीवरील माती गोळा करताना
 फोटो -नासा संस्था
 नासा संस्था -15nov.
अनादी काळा पासून शास्त्रज्ञ अंतराळातील आपल्या सौरमालेतील व सौरमालेबाहेरील ग्रह व तेथील वातावरण आणि सजीव सृष्टीचे अस्तित्व शोधत आहेत आणि त्याला यशही मिळत आहे आता तर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणी ऊपकरणाचा वापर करून शास्त्रज्ञांनी आपल्या सौरमाले बाहेरील पृथ्वीसारखे वातावरण असलेल्या ग्रहांचाही शोध लावलाय शिवाय आपल्या सौरमाले सारख्या अनेक सौरमाला ह्या ब्रम्हांडात अस्तित्वात असल्याची शक्यता वर्तवली आहे आपल्या भारत देशाने पण यशस्वी मंगळ मोहिमेनंतर चंद्रावरही नुकतेच चांद्रयान पाठवले होते  विक्रम Lander चंद्रावर पोहचुन भरकटले तरीही 0rbiter मात्र यशस्वी पणे चंद्राभोवती फिरून अत्याधुनिक माहिती व फोटो पृथ्वीवर पाठवत आहे
अमेरीकाही पुन्हा चांद्रमोहिम राबवणार असुन ह्या वेळेस तीन अंतराळवीरांमध्ये एका महिला अंतराळ विरांगनेचाही समावेश असणार आहे  सध्या ह्या अंतराळ मोहिमेची  जोरदार तयारी सुरु आहे त्यासाठी वेगळा तिथल्या वातावरणात वापरण्यायोग्य स्पेस सुटही तयार करण्यात आला आहे ह्याच आगामी 2024 च्या आर्टिमस चांद्रमोहिमेसाठी आता शास्त्रज्ञ अपोलो मोहिमेतील मातीचे samples संशीधीत करणार आहेत
  अपोलो 17 ह्या अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेत 1972 साली डिसेंबरमध्ये नासाचे तीन अंतराळवीर  युजीन सरनन,ह्यरीसन स्मिथ आणी रोनाल्ड इवंस चंद्रावर पोहोचले होते त्या पैकी सरनन आणी स्मिथ यांनी यानातुन ऊतरून चांद्रभुमीवर पाऊल ठेवले आणी तिथली माती आणी दगडाचे नमुने गोळा करुन प्रुथ्वीवर संशोधनासाठी आणले होते त्यांनी  386 gm माती ट्युबमध्ये भरून प्रुथ्वीवर आणली होती आणी नासा संस्थेतील लॅब मध्ये ती आजवर सुरक्षित ठेवण्यात आली होती

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/two_samples_togehter_slide_w_credits.jpg
     अंतराळवीरांनी 47 वर्षांपूर्वी चंद्राच्या भूमीवरील गोळा केलल्या ट्यूब मधील मातीचे सॅम्पल्स
 फोटो -नासा संस्था 
आता चार नोव्हेंबरला त्यातील दोन ट्युब ऊघडण्यात आल्या Washington येथील नासाचे प्रमुख शास्त्रज्ञ Dr. Sarah Noble म्हणतात की,सध्या काही ट्युब संशोधनासाठी ऊघडण्यात येतील तर काही तशाच ठेवण्यात येतील ह्या आधी आजच्या ईतके प्रगत तत्रंज्ञान विकसित झाले नव्हते त्यामुळे त्या ऊघडल्या गेल्या नव्हत्या आणी त्याचे संशोधन करण्याचा विचारही केला नव्हता अजूनही  भविष्यात नवीन प्रगत अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित होईल तेव्हा ऊरलेल्या samples चे सखोल संशोधन करता येईल आणि नवी उपयुक्त माहिती मिळेल ह्या संशोधनाचा ऊपयोग आगामी आर्टिमस चांद्रमोहिमेतील अंतराळ विरांना होईल
अंतराळवीरांनी  चंद्रावरील Lara crater ह्या भागातील माती दोन फुट लांब tube मध्ये pack करून आणली होती  Tube मध्ये ड्राय नायट्रोजनचा वापर करून ह्या मातीच्या नमुन्यांचे खराब होण्यापासून संरक्षण करण्यात आले होते  मुळेच 47 वर्षांनंतरही हि माती सुरक्षित राहिली आता त्यातील 73001आणी 73002 ह्या दोन tubes ऊघडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आधी पाच नोव्हेंबरला 73002 हि tube उघडण्यात आली दुसरी tube जानेवारी महिन्यात उघडली जाईल हि tube उघडण्याआधी त्याचा X ray घेतला गेला आणि शास्त्रज्ञांनी ह्या मातीच्या नमुन्याची High resolution3 D  इमेज मिळवण्यासाठी Tomography (X.C.T) चा उपयोग केला

Tuesday, 5 November 2019

स्थानकात उगवलेल्या Mizzuna Mustard Green भाजीची अंतराळवीर Andrew आणि Jessica ह्यांनी केली तोडणी


NASA astronaut Andrew Morgan waters plants on the station
अंतराळवीर Andrew Morgan व्हेजी चेम्बर मधील भाजीच्या रोपाला पाणी घालताना -फोटो- नासा संस्था

नासा संस्था -30 आक्टोबर
नासाच्या अंतराळमोहीम 61चे अंतराळवीर Andrew Morgan आणि Jessica Meir ह्यांनी नुकतीच स्थानकातील व्हेजी चेंबर मध्ये वाढवलेल्या Mizzuna Mustard Green ह्या भाजीची कापणी केल

astronaut Jessica Meir harvests leaves              Jessica Meir अंतराळस्थानकातील व्हेजी चेम्बरमधील Mizzuna Mustard Green हि भाजी तोडताना
 फोटो- नासा संस्था
अंतराळ मोहीम 61च्या अंतराळवीरांनी Veg-04B ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकातील व्हेजी चेंबर मध्ये पृथ्वीवरून स्थानकात आलेल्या भाजी,धान्य व फुलांच्या रोपांची लागवड केली होती अंतराळवीर त्यांच्या संशोधनाच्या कामातून मिळालेल्या फावल्या वेळात ह्या रोपांची देखभाल करतात त्यांना पाणी,खत घालणे वाढलेल्या रोपांचे कटिंग करणे ह्या सारखी कामे करतातच शिवाय ह्या रोपांना पृथ्वीवरील वातावरणासारखे हवामान आणि प्रकाशव्यवस्था मिळावी म्हणून तापमान मेंटेनन्स मध्ये आवश्यक बदल करतात आणि रोपांची सुकू नये म्हणून विशेष काळजी घेतात

नासाची महिला अंतराळवीर Jessica Meir व्हेजी चेंबर मधील भाजीच्या रोपाला पाणी घालताना -फोटो- नासा संस्था  
 त्यांच्या ह्या प्रयत्नांना यशही मिळते बऱ्याच वर्षांपासून स्थानकात हा व्हेजी प्रोजेक्ट राबवण्यात येतोय अंतराळवीरांना पृथ्वीवरच्या सारखी ताज़ी फळ,भाजी आणि धान्य अंतराळस्थानकात मिळत नाही तिथल्या झिरो ग्रॅविटीत त्यांना पृथ्वीवरून आलेल्या प्रिझर्व्ह व प्रोसेस केलेल्या अन्न व भाजीवर अवलंबून राहावे लागते त्यांना स्थानकातच उगवलेली ताजी भाजी व अन्न पिकवून खाता यावे म्हणून हा प्रोजेक्ट राबविल्या जातोय ह्या आधीही स्थानकात फुले भाजी ,कोबी व गहूची लागवड केल्या गेली आणि अंतराळवीरांनी त्यांची योग्य देखभाल करून त्यांचा आस्वादही घेतला आहे
ह्या व्हेजी चेंबर मध्ये पृथ्वीसारखे वातावरण,प्रकाश आणि अंधार निर्माण व्हावा म्हणून रंगीत लाईट्स आणि तापमान निर्माण करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे तेथे तयार करण्यात आलेल्या उशी वाफ्यात वेगवेगळी रोपे लावली जातात पृथ्वीवरील वातावरणात वाढणारी रोपे आणि स्थानकातल्या झिरो ग्रॅव्हीटीत वाढणारी रोपे ह्यांच्यातील बदलांचे निरीक्षण नोंदवून ह्यावर सखोल संशोधन करण्यात येत आहे
नुकतीच स्थानकात उगवलेली Mizzuna Mustard ह्या जातीची हिरवी ताजी भाजी अंतराळवीर Andrew Morgan आणि Jessica Meir  ह्यांनी तोडली त्यातील थोडी भाजी पृथ्वीवरील संशोधनासाठी नमुन्याखातर ठेवली आणि उरलेल्या ताज्या हिरव्या भाजीचा ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या जेवणात आस्वाद घेतला ह्या भाजीचा उपयोग सलाद सारखा केल्या जातो ह्या दोघांनीही ह्या भाजीची विशेष देखभाल केली होती
ह्या व्हेजी प्रोजेक्टचा उपयोग भविष्यातील दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना होईल त्यांना स्थानकात अन्न व भाजी उगवण्यासाठी आणि स्वत: पिकवलेले ताजे अन्न खाण्यासाठी होईल