पार्कर सोलर सौर यान सूर्याच्या कक्षेत शिरताना -फोटो- नासा
नासा संस्था - 10 डिसेंबर
नासाने ऑगस्ट 20018 मध्ये सूर्यावर पाठवलेले पार्कर सोलर प्रोब हे सौरयान नोव्हेंबरमध्ये सूर्याच्या कक्षेत शिरून यशस्वीपणे कार्यरत झाले होते ह्या सौरयानाने सूर्याच्या दिशेने अंतराळ प्रवासादरम्यानच कार्यरत होऊन वाटेतच महत्वपूर्ण माहिती पाठवली होती सूर्याच्या जवळ पोहोचताच यानावर बसवलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने आकाशातील सौरयाना भोवतीच्या वातावरणातील प्रकाशकणांचे फोटो पार्करने टिपले होते व त्वरित पृथ्वीवर पाठवले होते ह्या फोटोत सौरमंडळाजवळील तेजपुंज तारकासमूह,गुरु ग्रह आणि milky आकाशगंगेचा प्रकाशमान पट्टा सौर यानाने टिपला होता
आता पार्कर सौरयान सूर्याच्या जवळ पोहोचून गेल्या वर्षभरापासून अविरत यशस्वीपणे कार्य करत आहे पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या कक्षेत शिरून सूर्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी सूर्याभोवती चोवीस फेऱ्या मारणार आहे आणि नुकतीच ह्या यानाने तिसरी फेरी पूर्ण केली असून सूर्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवली आहे पार्कर सोलर यान सूर्याच्या भूपृष्ठभागावरील माहिती सोबतच तेथील प्रचंड उष्णतेचे आणि सूर्याच्या भोवतीच्या तळपणाऱ्या अत्यंत तेजस्वी प्रभावळीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणार आहे सूर्याच्या भूपृष्ठापेक्षा त्याच्या बाहेरील भागात इतकी प्रचंड उष्णता का आहे? सूर्यावरील उष्ण सौरवादळ आणी त्या मुळे तिथे अविरत उठणारे आगीचे लोट त्यातील विध्युत भारित कण,वायू ह्या बाबतीतला महत्वपूर्ण माहितीपूर्ण डाटा पार्करने गोळा करून पृथ्वीवर पाठवला आहे आणि शास्त्रज्ञानी त्यावर सखोल संशोधन करून माहिती प्रसारित केली आहे
पार्कर सोलर सौरयानाच्या W.I.S.P.R ह्या अत्याधुनिक उपकरणाच्या telescopeने टिपलेला फोटो -फोटो -नासा संस्था
सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा त्याच्या बाहेरील प्रभामंडळात शेकडोपट जास्त उष्णता आहे सूर्याच्या बाहेरील भागातील वातावरणात सतत उष्णतेच्या ज्वाळा फेकल्या जातात त्यातुन सतत ionized गॅस बाहेर पडतात त्या सोबतच तिथे प्रचंड उष्ण वारे वाहतात,वादळे होतात त्यात धूलिकण,वायूंचा समावेश होतो सूर्या भोवतीच्या मॅग्नेटिक फिल्ड मूळे हे धुलीकण आणि वायू सूर्याकडे ओढले जातात आणि अत्यंत वेगाने अविरतपणे विशिष्ट दिशेने हा पेटता धुरळा आणि त्यातील कण गोलाकार फिरत राहतात त्या मुळेच सूर्या बाहेरील आवरण (plasma ) आपल्याला सतत प्रकाशमान दिसते आणि सगळीकडून तो भाग एकसारखा दिसतो ह्या उष्णतेच्या ज्वाळा आणि त्यातून निघणाऱ्या लहरी सागर किंवा नदीच्या लाटेप्रमाणे दिसतात त्यातील कित्येक कण सतत उडत असतात आगीच्या ठिणग्या दूरवर उडतात आणि पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत काही नष्ठ होतात त्या मुळे प्रकाशकिरणे आपल्याला एका सरळ रेषेत दिसतात अशी माहिती पार्कर सौरयानाने पाठवलेल्या डाटा वरून शास्त्रज्ञांनी संशोधित केली आहे
हि माहिती पृथ्वीवरून मिळवणे अशक्य होते त्या साठी सूर्याच्या जवळ जाणे आवश्यक होते सध्या पार्कर यान सूर्यापासून 15 मिलियन मैल लांब आहे आजवर एकही यान सूर्याच्या इतक्या जवळ पोहोचले नव्हते भविष्यात पार्कर सूर्याच्या आणखी जवळ जाईल आणि आणखी वेगाने फेऱ्या मारून सूर्याबद्दलची आपल्याला अज्ञात
असलेली अत्याधुनिक माहिती मिळवेल
पार्कर यानावर चार अत्याधुनिक उपकरणे बसविलेली असून ती व्यवस्थित कार्य करत आहेत सध्या पार्कर सोलर यान सूर्याच्या प्रचंड उष्णतेच्या कक्षेत फिरत आहे सूर्याच्या इतक्या जवळ गेल्यानंतर कोणतेही यान जळून खाक झाले असते पण पार्कर सोलर यानाला बसविलेली Thermal Protection systemह्या यानाचे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करेल नासाच्या वॉशिंग्टन येथील नासाच्या मुख्यालयातील Associate Administrator Thomas Zurbuchen म्हणतात,
"पार्कर सौर यानाने पाठवलेली हि माहिती नवीन आणि आम्हाला आश्चर्यचकित करणारी आहे हि माहिती आजवर मानवाला माहिती नव्हती साठ वर्षानंतर अथक परिश्रम आणि शास्त्रज्ञांच्या चिकाटीमुळे आम्हाला हे यश प्राप्त झाले आहे " अशी अनेक अभूतपूर्व आश्चर्यकारक आजवर मानवाला अज्ञात असलेली माहिती पार्कर सोलर यान सूर्याच्या जवळ जाऊन गोळा करेल त्या मुळे सूर्य सूर्याभोवतीचे फिरणारे ग्रह आणि सूर्याची प्रखर उष्णता पृथ्वीवरील वातावरणावर देखील कशी परिणाम करते ह्याची अद्ययावत माहिती जेव्हा पार्कर सूर्याच्या आणखी जवळ जाईल आणि सूर्यावरील घडामोडींचे सखोल निरीक्षण नोंदवून पृथ्वीवर पाठवेल तेव्हा आपल्याला प्राप्त होईल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत
No comments:
Post a Comment