यवतमाळात ग्रहणकाळात चंद्रकोरीसारखा भासणारा ग्रहणग्रस्त सूर्य -फोटो -पूजा दुद्दलवार BE(soft)BMC(UT)
यवतमाळ -26 डिसेंबर
गुरुवारी देशभरात आणि परदेशातही काही ठिकाणी ह्या वर्षीचे अखेरचे सूर्यग्रहण दिसले ह्या वर्षीच्या सूर्य ग्रहणाला विशेष महत्व असल्याचे जाणकारांचे मत होते 1723 साली झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळेस ग्रहांची जी स्थिती होती ती 296 वर्षानंतर पुन्हा एकदा आकाशात ह्या वेळेस पाहायला मिळाली तर काहींच्या मते 58 वर्षानंतर अशी ग्रहांची स्थिती आकाशात निर्माण झाली त्या मुळे खगोल शास्त्रज्ञ,अभ्यासक,परदेशी आणि आपल्या देशातील हौशी नागरिक हे ग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होते ह्या वेळेसचे सूर्य ग्रहण जरी मोठे असले तरी देशातील सर्वच भागातून ते पूर्ण दिसणार नव्हते फक्त केरळ,तामिळनाडूत ते पूर्ण कंकणाकृती दिसणार होते महाराष्ट्र विदर्भ आणि इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार होते
सध्याचे युग वैज्ञानिक जागृतीचे असल्यामुळे ग्रहण पाहण्यासाठी खगोल शास्त्रज्ञांसोबतच हौशी खगोल प्रेमी नागरिकांनी जय्यत तयारी केली असतानाच पावसाने अवकाळी हजेरी लावल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला पुण्यात ग्रहणकाळात काही खाऊ नये हा गैरसमज दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ग्रहण पाहण्यासाठी मोकळ्या मैदानात जमलेल्या लोकांच्या चहा आणि पाण्याची सोय करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न केला बेंगलोर मध्येही काही विद्यार्थ्यांनी ग्रहणकाळात ब्रेकफास्ट करून अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न केला
यवतमाळातही सकाळी अचानक अवकाळी पावसाला सुरवात झाली पाऊस थोडा वेळ बरसून बंद झाला तरीही ढगाळ वातावरणात सूर्य दिसेनासा झाल्याने ग्रहण दिसेल कि नाही अशी आशंका होती पण अशा ढगाळ वातावरणातही सूर्य उगवला सकाळी आठ साडेआठला ग्रहण सुरु झाले आणि साडेनऊ नंतर वातावरण ढगाळ असूनही मधून अधून ढगांच्या आढ ग्रहणग्रस्थ सूर्यदर्शन होऊ लागले
ग्रहण काळातील सूर्याच्या ह्या विलोभनीय क्षणाचा हा व्हिडिओ -व्हिडीओ -पूजा दुद्दलवार BE(soft)BMC(UT)
अर्धा पाऊणतास ढगाआढून दिसणारा ग्रहणग्रस्थ सूर्य क्षणभर चंद्रकोरीच्या आकाराचा भासत होता सूर्य आणि पृथ्वी मध्ये आलेल्या चंद्राने सूर्यावर पाडलेल्या सावलीमुळे हा चंद्र कि सूर्य असा संभ्रम निर्माण होत होता अकरा नंतर ग्रहण सुटायला सुरवात झाल्याने काळवंडलेला सूर्य प्रकाशमान व्हायला सुरवात झाली
ग्रहणग्रस्त सूर्य कि चंद्र असा संभ्रम निर्माण करणारे दृष्य -फोटो -पूजा दुद्दलवार BE(soft)BMC(UT)
महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे पूर्ण खग्रास सूर्यग्रहण दिसले नाही पण केरळ तामिळनाडूत मात्र खग्रास कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले चंद्र ग्रहण काळात पृथ्वीपासून दूर असल्यामुळे त्याची प्रतिमा आपल्याला लहान आकाराची दिसते आणि चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू न शकल्याने सूर्याची धगधगती प्रकाशमान प्रभावळ तशीच राहते त्या मुळे आपल्याला तो भाग चमकदार कंकणाकृती किंवा अंगठीसारखा भासतो दुबईतही कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले
ह्या वर्षी सतत मधून अधून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सूर्य ग्रहण दिसले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दिल्लीतील सूर्यग्रहण पहाता आले नाही त्या मुळे त्यांनी हे सूर्यग्रहण लाईव्ह टेलिकास्ट वर पाहिले आणि ते पाहतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला

No comments:
Post a Comment