Tuesday 26 November 2019

आता चंद्र आणि मंगळावरही पिकवता येणार भाजी आणि धान्य शास्त्रज्ञांचे नवे संशोधन


       चंद्र आणि मंगळावरील वातावरणासारखे कृत्रिम वातावरण व माती तयार करून शास्त्रज्ञांनी  लॅब मध्ये    पिकवलेल्या भाज्या आणि धान्य

नासा संस्था -(J.P.L)
अंतराळ स्थानकातील अंतराळ विरांना ताजी भाजी खाता यावी म्हणून स्थानकात राबविण्यात आलेला व्हेजी प्रोजेक्ट यशस्वी झालाय अंतराळवीरांनी नुकतीच स्थानकातील झिरो ग्रव्हिटीतील फिरत्या प्रयोग शाळेतील व्हेजी चेंबर मधील Mizzuna Mustard green भाजीचा आस्वाद घेतला तर ईकडे पृथ्वीवर शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये मंगळ व चंद्रा सारखी कृत्रिम वातावरण व मातीची निर्मिती करून त्यात दहा प्रकारच्या भाज्या व धान्याची रोपे लावली
Netherlands येथील University &Research सेंटर मधील शास्त्रज्ञांनी मंगळ आणि चंद्रावरील पृष्ठभागावरील जमिनीसारखी माती तयार केली दोन्ही ग्रहावर ह्या आधी गेलेल्या अंतराळयानाने गोळा केलेल्या माहितीचा आणि नमुन्यांचा त्यांनी ह्या संशोधनासाठी उपयोग केला त्यांनी ह्या साठी नैसर्गिक कारणाने झीज व धूप झालेल्या खडकांचा चुरा झालेली खडबडीत माती घेतली त्या मध्ये मंगळावर आढळलेल्या इतर मिनरल्स आणि घटकांचा समावेश करून उपजाऊ माती तयार केली त्या मध्ये अंतराळवीरांचे ऑरगॅनिक मटेरियल मिसळुन कंपोस्ट खत तयार केले लॅब मध्ये तयार केलेल्या मंगळ आणि चंद्रासारख्या वातावरण निर्मित कृत्रिम बागेत ह्या मातीचे मिश्रण वापरून त्यांनी दहा प्रकारच्या भाज्या आणि धान्याची लागवड केली आणि विशेष म्हणजे काही दिवसातच त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले
शास्त्रज्ञांनी लावलेल्या कृत्रिम बागेत Rocket lettuces,Tomato ,Radish ,Rye,Quinoa,,Chives ,Pea आणि Leek ह्या भाज्या आणि धान्य उगवले पण पालकाची भाजी मात्र चांगली ऊगवली नाही ह्या ताज्या टवटवीत हलीम टोमॅटो,मुळा,मोहरी,वटाणे ह्या भाज्या आणि धान्य पाहून शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत ह्या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ Wieger Wamelink म्हणतात," कि,ह्या कृत्रिम मंगळावरील मातीसारख्या खडबडीत मातीत जेव्हा लाल रंगांचे टोमॅटो उगवले तेव्हा आम्ही आनंदित तर झालो आहोतच पण आता आमचा उत्साह वाढला आहे"!
आता पुन्हा आम्ही जास्ती भाज्यांच्या बिया आणि धान्यांची लागवड करणार आहोत आगामी मंगळ,चंद्र आणि परग्रहावरील नियोजित दूरवरच्या अंतराळ मोहीमांतील अंतराळवीरांना ह्या संशोधनाचा निश्चितच उपयोग होईल सध्या स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांना ताजी भाजी,फळे आणि अन्न पिकवता व खाता येत नाही त्यांना पृथ्वीवरील प्रोसेस केलेल्या प्रीझर्व अन्नावर अवलंबून राहावे लागते पण भविष्यात त्यांना लागणारे अन्न ,भाजीपाला आणि फळे पिकवता व खाता येतील शिवाय भविष्यात मंगळ,चंद्र व परग्रहावर मानवी वस्त्या वसल्या तर तिथे आता अशी शेती करून त्यांना लागणारे अन्नधान्य व भाजीपाला पिकवता येईल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत
शिवाय चंद्रावरील मातीपेक्षा मंगळावरील माती जास्त ऊपजाऊ असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे त्यामुळे भविष्यात मंगळावर शेती करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे  

No comments:

Post a Comment