
\Blue Origin-8 मार्च
Blue origin च्या New Shepard अंतराळयानातुन मोहीम 30 चे अंतराळयात्री अंतराळ पर्यटन करून पलतल्यानंतर आता Blue Origin co.ने मोहीम 31मधील सहा अंतराळप्रवाशांची घोषणा केली असून विशेष म्हणजे ह्या सर्व कर्तुत्ववान महिला आहेत
ह्या मोहिमेत Aisha Bove,Amada Nguyen,Gayle King,Katy Perry,Kerianne Flynn आणी Lauren Sanchez ह्या अंतराळप्रवाशी महिलांचा समावेश आहे ह्या सर्व महिला कर्तबगार आहेत आणी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात सन्मान प्राप्त केला आहे ह्या महिला टिमचे नेतृत्व Lauren ह्यांच्या कडे सोपविण्यात आले आहे पृथ्वीबद्दलच्या त्यांच्या दृष्टीकोनाला आव्हान देणाऱ्या,भावी पीढीला सक्षम करणाऱ्या त्यांच्या कथा शेअर करणाऱ्या आणी युवा पीढीला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना नेतृत्व करण्याचा बहुमान देण्यात आला आहे
Aisha Bove - Rocket Scientist, Entrepreneur & Global Stem Advocate -सध्या नासा संस्थेत कार्यरत आहेत आणी Stem Board Engineer फर्मच्या CEO आहेत अल्पावधीत विस्तारलेल्या आणि आर्थिक दृष्टया नावारूपाला आलेल्या ह्या फर्मला अमेरिकेतील पहिल्या पाच हजार नामांकित कंपन्यांच्या यादीत दोनदा स्थान मिळाले आहे त्या LINGO cdtech co.च्या संस्थापकही आहेत त्यांच्या संस्थेत गरजु हुशार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते बहामियन वंशाच्या Aisha ह्यांना अंतराळविश्वाचे लहानपणापासूनच आकर्षण आहे त्यांचा कॉलेज ते अंतराळापर्यंतचा प्रवास जगभरातील युवा पीढीला त्यांचे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल
Amanda Nguyen - Bioastronautics Research Scientist आहेत त्यांनी Harward center Astrophysics MIT NASA & International Institute of Astronautical Sciences येथे संशोधन केले नासाच्या Kepler Exoplanet Mission ह्या नासाच्या शेवटच्या STS-135 शटल मोहिमेतही त्यांनी काम केले आहे त्यांनी अनेक शोषित अत्याचार ग्रस्त महिलांना न्याय मिळवून दिला म्हणून त्यांना Time तर्फे Woman Of the Year पुरस्काराने गौरविण्यात आले शिवाय त्यांचे नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकन झाले होते ह्या अंतराळ पर्यटनानंतर व्हिएतनाम आणी आग्नेय आशीयाई देशातील अंतराळ प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरतील त्यांच्या ह्या टिममधील सहभागामुळे व्हिएटनाम आणी युनायटेड स्टेटस मध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील
Gayle King -ह्या पुरस्कारप्राप्त पत्रकार ,CBS Morning च्या Co Host,Oprah Daily editor आणी Siris -XM radio वरील Gale king in the house कार्यक्रमाच्या Host आहेत गेल्या दशकभरात त्यांची ओळख एक संवेदनशील प्रतिभावंत धाडसी पत्रकार,उत्कृष्ट संभाषण कौशल्य असलेली मुलाखतकार अशी आहे ह्या दहा पहिल्या कर्तृत्वान महिला फ्लाईट टीममध्ये सहभागी झाल्यामुळे त्या त्यांच्या Comfart Zone मधून बाहेर पडण्यासाठी उत्सुक आहेत
Katy Perry -115 बिलियन पेक्षाही जास्त विक्री होणाऱ्या संगीत कलाकारांपैकी सर्वाधिक मागणी असलेल्या महिला जागतिक पॉप सुपरस्टार आणी युनिसेफच्या सदिच्छादूत आहेत,मुलांच्या आरोग्य ,समानता,शिक्षण आणि संरक्षणासाठी काम करणाऱ्या त्या परोपकारी कार्यकर्ता आहेत त्यांचे स्वतःचे Firework foundation आहे त्याद्वारे त्या गरजू उदयोन्मुख युवा पिढीला प्रोत्साहित करतात ह्या महिला टीममध्ये सहभाग मिळाल्यामुळे सन्माना बरोबरच त्यांचे हे अंतराळ पर्यटन त्यांच्या मुलीला आणि अंतराळ प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना त्यांचे स्वप्न कृतीत आणण्यासाठी प्रोत्साहित करेल असे त्या म्हणतात
kerianne Flynn -फॅशन आणि मानव संसाधन क्षेत्रात त्यांनी यशस्वी कारकीर्द केली आहे त्या Allen Stevenson School (High line &Hudson River Park) Board मध्ये दहा वर्षांपासून कार्यरत आहेत शिवाय त्या कथाकथना द्वारे महिला समुपदेशन करतात हॉलिवूड मधील महिलांचा शोध घेणाऱ्या ऐतिहासिक पुस्तक लेखिका This Changes Everything (2018) ह्या विचार प्रवर्तक चित्रपटाच्या निर्मात्या आहेत Lili Ledbetter ह्या शोषित महिलांच्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या महिला वकिलाच्या सन्मानार्थ हा चित्रपट आहे त्यांना साहसाचे आणि अंतराळ विश्वाचे आकर्षण आहे त्यांना आशा आहे कि ,त्यांचे हे अंतराळ उड्डाण त्यांचा मुलगा Dex आणि युवा पिढीला त्यांचे द्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करेल
Lauren -Emmy Award Winning Journalist,New Yark Times च्या लेखिका,पायलट,Bezos Earth Fund च्या उपाध्यक्षा आहेत 2016 मध्ये त्यांना Helicopter Pilot परवाना मिळाला त्यांनी Black Ops Aviation ची स्थापना केली त्या स्वत: च्या मालकीची हवाई चित्रपटआणि निर्मिती संस्था स्थापित करणाऱ्या पहिल्या महिला आहेत 2024 New Yark Times मध्ये त्यांचे सर्वाधिक विक्री होणारे मुलांचे The Fly Who Fly To Space पुस्तक प्रकाशित झाले 2024 मध्ये त्यांना उत्कृष्ट Helicopter विमान चालक व्यावसायिक म्हणून Elling Halvorson Vertical Hall Of Fame Award ने सन्मानित केले आहे त्यांचे ह्या पर्यटनाद्वारे भावी पिढीला प्रोत्साहित करण्याचे द्येय आहे
ह्या सर्व महिला अंतराळ प्रवाशांची अंतराळ पर्यटनाची तारीख निश्चित झाली नाही मात्र नावे घोषित झाली आहेत
No comments:
Post a Comment