Monday, 17 March 2025

नासाच्या Space X -Crew -10 मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात पोहोचले

  

 नासाच्या Space X Crew Dragon -10 मोहिमेतील अंतराळवीरांसह Endurance अंतराळयान अंतराळात झेपावताना -फोटो -नासा -संस्था

नासा संस्था -15 मार्च -

नासा आणि Space X Crew -10 मोहिमेतील नासाच्या अंतराळवीर Anne McClain अंतराळवीर Nicole Ayers जपानचे अंतराळवीर Takuya Onishi आणि रशियन अंतराळवीर Kirill Peskov हे चारही अंतराळवीर स्थानकात सुखरूप पोहोचले आहेत ह्या आधी प्रतिकुल हवामानामुळे ह्या अंतराळवीरांचे स्थानकात जाणे लांबले होते अखेर हवामान उड्डाणासाठी अनुकूल झाल्यामुळे Space X Crew Dragon Endurance ह्या अंतराळवीरांसह स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले  

नासाच्या Kennedy Space Center Florida मधील 39-A ह्या उड्डाणस्थळावरून Falcon -9 रॉकेटच्या साहाय्याने Space X Crew Dragon ह्या अंतराळवीरांसह अंतराळात झेपावले उड्डाणाआधी ह्या अंतराळवीरांची उड्डाणपूर्व प्रक्रिया पार पडली त्यांचे हेल्थ चेकअप,स्पेससूट फिटिंग चेकअप,स्पेस सूट लिकेज आणि इतर आवश्यक चेकअप करण्यात आले  त्या नंतर हे चारही अंतराळवीर उड्डाणस्थळाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप द्यायला त्यांचे कुटुंबीय,मित्र आणि नासा संस्थेतील प्रमुख हजर होते त्या सर्वांनी त्यांच्याशी काही क्षण संवाद साधला आणि त्यांना सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या 

Space X Crew Dragon आणि Falcon -9 रॉकेटचेही अंतिम चेकअप करण्यात आले हवेचे प्रेशर,लिकेज चेक केल्यानंतर हे चारही अंतराळवीर Space X Crew Dragon मध्ये आसनस्थ झाले सीट चेकअप नंतर आणि सर्व व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर रॉकेट प्रज्वलित झाले आणि अंतराळात झेपावले काही क्षणातच रॉकेट व्यवस्थित कार्यरत झाले आणी काही वेळात Dragon रॉकेट पासून वेगळे होण्यात यशस्वी होऊन स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले त्या नंतर Falcon -9 रॉकेटचा पुन्हा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला काही वेळातच रॉकेट पुन्हा उड्डाणस्थळी पृथ्वीवर खाली उतरले तेव्हा ह्या अंतराळयानाचा उड्डाण सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला 

 

   The crew of NASA’s SpaceX Crew-10 mission to the International Space Station poses for a photo during their Crew Equipment Interface Test at NASA’s Kennedy Space Center in Florida. The goal of the training is to rehearse launch day activities and get a close look at the spacecraft that will take them to the International Space Station.

 

नासाच्या Space X Crew Dragon मोहीम 10 चे चार अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था

अंतराळ प्रवासात अंतराळवीर नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात होते संस्था प्रमुखांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या अंतराळप्रवासा दरम्यानच्या भावना व्यक्त करण्यास सांगितले तेव्हा सर्वांनीच नासा,JAXA ,ROSCOSMOS आणि Space X संस्थेचे त्यांना हि अनमोल संधी दिल्याबद्दल आभार मानले त्यांच्या मुळेच आम्ही स्थानकात जाऊ शकतो तेथे वास्तव्य करणार आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

रविवारी 16 मार्चला 12.04 a.m.ला Space X Crew Dragon स्थानकाच्या Hormony Module जवळ पोहोचले  आणि 1.45a.m.ला स्थानक आणि Dragon ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ह्या अंतराळवीरांनी एकामागून एक स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकात सध्या वास्तव्यास असलेल्या सर्व अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले अंतराळवीर सुनीता विल्यम्स ह्यांनी नेहमीप्रमाणे ह्या अंतराळवीरांचे नाचत जोशात स्वागत केले काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा स्थानकातील Welcome Ceremony पार पडला तेव्हा नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादा दरम्यान पुन्हा एकदा ह्या अंतराळवीरांनी नासा आणि इतर संस्थेचे आभार मानले आणि त्यांच्या कुटुंबियांचे मित्रांचे त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल धैर्याबद्दल आभार मानत आम्ही सुखरूप पोहोचल्याचे सांगितले नासामधील त्यांच्या टीमचेही त्यांनी दिलेल्या ट्रेनींग बद्दल आभार मानले 

 The four SpaceX Crew-10 members and the seven Expedition 72 crew members join eahc other for a welcoming ceremony shortly after the SpaceX Dragon crew spacecraft docked and the hatches opened.

Space X -Crew -10 मोहिमेतील नासाचे अंतराळवीर Anne mcClain,Nichole Ayers,जपानी अंतराळवीर Takuya Onishi आणि रशियन अंतराळवीर kirill Peskov स्थानकातील सर्व अंतराळवीरांसोबत Welcome Ceremony दरम्यान -फोटो नासा संस्था

 हे चारही अंतराळवीर प्रोफेशनल पायलट असल्याने हि मोहीम वैशिष्ट्यपुर्ण होती ह्या मोहिमेच्या कमांडर Anne दुसऱ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेल्या आहेत ह्या आधी 2018 मध्ये नासाच्या अंतराळ मोहीमेत त्या 58-59च्या Flight Engineer होत्या आणि  Soyuz MS -11मधून स्थानकात वास्तव्यास गेल्या होत्या त्यांनी 204 दिवस स्थानकात वास्तव्य केले आणि त्या दरम्यान त्यांनी स्थानकाच्या कामासाठी दोनवेळा स्पेसवॉक केला होता त्यांनी वेगवेगळ्या वीस SpaceCraft मधून उड्डाण केले आहे स्थानकात  दूसऱ्यांदा प्रवेश करताना इतक्या अंतराळवीरांना एकत्र पाहून आनंद झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली जपानी अंतराळवीर Takuya Onishi ह्यांनी देखील दुसऱ्यांदा स्थानकात प्रवेश केल्याचा आनंद झाल्याचे सांगितले नासाची अंतराळवीर Nicole आणि रशियन अंतराळवीर Kirill ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असल्यामुळे तो आनंद अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले

हे चारही अंतराळवीर आता अंतराळ मोहीम 72-73 मधील अंतराळवीरांसोबत स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील सध्या अंतराळस्थानकातील अंतराळवीरांची संख्या 11 झाली असून 17 मार्चला Space X-9 अंतराळ मोहिमेतील दोन अंतराळवीर Nick Hague ,रशियन अंतराळवीर Aleksandr Gorbunov सोबत अंतराळवीर सुनीता विल्ल्यम्स आणि Butch Wilmore पृथ्वीवर परततील

No comments:

Post a Comment