
नासाच्या आर्टीमस मोहिमेतील Firefly Blue Ghost अंतराळयान चंद्रभूमीवर उतरताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -3 मार्च
नासाच्या आर्टिमस मोहीमेतील Firefly कंपनीचे Blue Ghost अंतराळयान रविवारी दोन मार्चला सकाळी 3.34 मिनिटाला चंद्रभुमी वरील ऊत्तर पुर्व भागातील 300 मैल अंतराच्या ज्वालामुखी प्रवण क्षेत्रातील Marecrisium मधील Mons Latreille येथे सुरक्षीतपणे खाली ऊतरले
आर्टीमस मोहीमेतील सहभागी Firefly संस्थेने बनविलेले Blue Ghost Lunar
Lander अत्याधुनिक दहा सायंटिफिक ऊपकरण चाचणीसाठी 15 जानेवारीला
नासाच्या Kennedy Space center Florida येथील ऊड्डाण
स्थळावरुन चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले होते आणि 45 दिवसांच्या ह्या चंद्र मोहिमेतील 15 व्या दिवशी यानाने
पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत सुरक्षित प्रवेश करून हि मोहीम
यशस्वी केली होती
30 जानेवारीला Blue Ghost चांद्रयान चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचताच यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणि यानाने चंद्राच्या कक्षेत डिसेंट प्रवेश केल्यानंतर Blue Ghost यानातील Stereo कॅमेऱ्यांच्या साहाय्याने चंद्रकक्षेत शिरतानाचे फोटो ह्या यानाने पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठविले ह्या यानात सहा Stereo कॅमेरे फिक्स केलेले असून त्यातील चार Short Focal Length कॅमेरे आहेत आणि दोन Long Focal Length कॅमेरे आहेत ह्या फोटो आणि व्हिडिओ मुळे शास्त्रज्ञांना Blue Ghost यानाच्या चंद्रकक्षा प्रवेश प्रक्रियेच्या वेळची आधीची आणि नंतरची तेथील स्थिती तसेच चंद्राच्या आसपासच्या वातावरणातील त्यावेळेस झालेल्या परिणाम बदलाची स्थिती समजण्यास मदत होणार आहे
आता Blue Ghost चांद्रयान चंद्रभूमीवर चंद्रावरील एक दिवस म्हणजे 14 दिवस मुक्काम करेल Blue Ghost यान चंद्रावर पोहोचल्याने आता त्यातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल आणि ह्या यानातील सायंटिफिक उपकरणे आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी घेतल्या जाईल यानातील रोबोटिक आर्म,हॅमर आणि इतर उपकरणाद्वारे चंद्रभूमीवरील आणि भूगर्भातील जमिनीची उत्खनन क्षमता उत्खनना नंतरची तेथील खडक,माती,वाळू ,मिनरल्स आणि इतर गोष्टीचे नमुने घेऊन ते व्यवस्थित गोळा करण्याची क्षमता चेक केल्या जाईल चंद्रावरील वातावरणातील संशोधित माहिती,जागतिक Navigation Satellite system ,Radiation Tolerant Computing क्षमता चेक केल्या जाईल नविन तंत्रज्ञान वापरून चंद्रावरील चिकट धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपकरणाची कार्य क्षमता तपासण्यात येईल हि धूळ झटकण्यासाठी आणि अंतराळयान व अंतराळवीरांच्या स्पेससूटचे ह्या धुळीपासून संरक्षण करण्यासाठीच्या ह्या नवीन यंत्रणेची यशस्वीता चेक करण्यात येईल ह्या संशोधित माहितीमुळे अंतराळातील हानिकारक कॉस्मिक किरणे आणि इतर वायूपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यास मदत होईल
Firefly Blue Ghost ची हि मोहीम यशस्वी झाल्यामुळे नासाचे Acting Administrator Janet Petro ह्यांनी आनंदित प्रतिक्रिया व्यक्त केली," नासा संस्था आणि अमेरिकेतील व्यावसायिक कंपनीच्या साहाय्याने शुभारंभ झालेल्या ह्या मोहिमेच्या यशामुळे अंतराळ विश्वातील भविष्यकालीन अंतराळ मोहीम सुरक्षित होईल आणि ह्या अंतराळयानाने गोळा केलेली संशोधित माहिती आगामी आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीरांसाठी त्यांच्या सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी उपयुक्त ठरेल आधीच्या अपोलो मोहिमेतील त्रुटी दूर करून यानात नवीन technology आणि यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे ह्या यंत्रणेच्या चाचणी यशस्वीतेनंतर यानाची सुरक्षितता दीर्घकालीन वापरण्यासाठीची योग्यता आणि अंतराळवीरांची सुरक्षितता निश्चिती होईल
No comments:
Post a Comment