Monday 29 January 2024

मंगळावरील आकाशातील 72 व्या यशस्वी ऊड्डाणानंतर Ingenuity मंगळयानाचे काम थांबले

NASA’s Ingenuity Mars Helicopter is seen Aug. 2, 2023, in an enhanced-color image captured by the Mastcam-Z instrument aboard the agency’s Perseverance Mars rover.

नासा संस्था -25 जानेवारी

नासाच्या Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचलेल्या आणी तेथील आकाशात पहिली भरारी मारुन परग्रहावर ऊड्डाण करणारे पहिले हेलिकॉप्टर अशी ऐतिहासिक नोंद करणाऱ्या Ingenuity मंगळयानाचे ऊड्डाण आता थांबले आहे 

18 जानेवारीला Ingenuity मंगळयानाने मंगळावरील आकाशात 72 वे यशस्वी ऊड्डाण करून तेथील भागातील व वातावरणातील महत्वपुर्ण संशोधीत माहिती गोळा केली पण  ऊड्डाणानंतर परतताना मंगळभुमीवर ऊतरताना Ingenuity हेलिकॉप्टर क्षतीग्रस्त झाले त्याचे  Rotor Blade डॅमेज झाले त्या मुळे आता Ingenuity मंगळावरील आकाशात ऊड्डाण करु शकणार नाही 

Ingenuity Spots the Shadow of Its Damaged Rotor Blade

 Ingenuity हेलिकॉप्टरने घेतलेल्या फोटोत 72 व्या ऊड्डाणानंतर मंगळभुमीवर ऊतरताना Damage झालेल्या Rotor Blade ची सावली दिसत आहे- फोटो -नासा संस्था 

नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात, "Ingenuity हेलिकॉप्टर बनवताना शास्त्रज्ञांना ह्या हेलिकॉप्टर कडुन मंगळा्रील आकाशात महिनाभरात फक्त पाच ऊड्डाणे अपेक्षित होती पण ह्या हेलिकॉप्टरने एकामागून एक अशी यशस्वी ऊड्डाणे करीत शास्त्रज्ञांना आश्चर्यचकीत केले आणी तेथील आकाशात यशस्वी 72 ऊड्डाणे करून मंगळा्रील अत्यंत महत्वपुर्ण संशोधीत माहिती फोटो आणी व्हिडीओ पाठऊन नासा संस्थेला मोलाची मदत केली आता त्याचे काम थांबले आहे Ingenuity चे काम वैशिष्ट्यपूर्ण होते त्याने अपेक्षेपेक्षा 14 पट जास्त ऊंचीवर, दोन तासांपेक्षा जास्तवेळ वेगाने यशस्वी ऊड्डाणे करून आम्हाला प्रेरीत केले आहे मंगळावरील वातावरण अत्यंत क्षीण आहे अशा वातावरणात तेथील आकाशात उड्डाण करणे सोपे नाही पण ईतक्या छोट्या आणी कमी वजनाच्या Ingenuity हेलिकॉप्टरने अशक्य ते शक्य करून दाखविले राईट बंधुंनी जसे पृथ्वीवरील आकाशात पहिले विमान ऊड्डाण करून अशक्य ते शक्य केले तसेच नासाचे हे परग्रहावर ऊडणारे पहिले हेलिकॉप्टर आहे त्याच्या यशस्वी ऊड्डाणानंतर भविष्यकालीन सौरमालेतील दुरवरच्या अंतराळ मोहिमेत असेच छोटे सुरक्षित हेलिकॉप्टर पाठविण्यास Ingenuity ने आम्हाला प्रेरित केले आहे !"

Ingenuity हेलिकॉप्टर बनविणाऱ्या टिममधील सर्वांना ह्या हेलिकॉप्टरचे काम थांबल्यामुळे वाईट वाटले ह्या टिममधील प्रमुख JPL Director,Laurie Leshin" म्हणतात, Ingenuityची नाविन्यपूर्ण निर्मिती आमच्या ह्दयस्थानी आहे हे डासाच्या आकाराचे छोटे  स्वयंचलित हेलिकॉप्टर बनविताना ह्या टिममधील ईंजीनिअर्स,शास्त्रज्ञ,तंत्रज्ञांंनी अथक प्रयत्न आणी मेहनत केली होती  Ingenuity ने मंगळावरील आकाशात अशक्यतेची हद्द पार करुन 72 वेळा यशस्वी ऊंच भरारी मारत आमच्या श्रमाचे चीज केले त्याच्या सततच्या यशस्वी ऊड्डाणाने आम्ही प्रेरित होत गेलो Ingenuity चा कार्यकाळ त्याच्या यशस्वी ऊड्डाणानंतर वाढविण्यात आला होता आमच्या अपेक्षेपेक्षा तेहतीस पट जास्तकाळ  मंगळावरील 1000 मंगळदिवस Ingenuity  मंगळावर यशस्वीपणे कार्यरत राहिले आमच्या टिममधील सर्वांच्या असामान्य कर्तृत्वाचा त्यांंनी केलेल्या नाविन्यपूर्ण Ingenuity च्या निर्मितीचा अभिमान वाटतो आता त्यांच्या नवीन संशोधीत अद्ययावत नवनिर्मितीची आम्हाला ऊत्सुकता आहे  

18 फेब्रुवारी 2021 ला Perseverance यानासोबत Ingenuity हेलिकॉप्टर मंगळावर पोहोचले आणी 19 फेब्रुवारीला.मंगळावरील आकाशात पहिल्यांंदा ऊडाले तेव्हा आम्ही सारेच खूप आनंदित झालो होतो आम्हाला त्याच्या रोजच्या संपर्काची सवय झाली आहे आता त्याचे काम थांबले तरीही आम्हाला त्याला Good By करावस वाटत नाही त्याने आम्हाला प्रेरित केल,यशस्वी केल आमच्या टिमला एकत्र आणल त्यामुळे आम्ही त्याला Thanks Ingenuity ! असे म्हणणार आहोत! अशी प्रतिक्रिया टिममधील सर्वांनी व्यक्त केली आहे 

No comments:

Post a Comment