Sunday 7 January 2024

नासाच्या VIPER Moon Rover सोबत नागरिकांना चंद्रावर नाव पाठविण्याची संधी जाहीर

 

   नासाचे VIPER Moon Rover -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -4 जानेवारी

नासा संस्थेने आर्टिमस मोहिमे अंतर्गत चंद्रावर जाणाऱ्या VIPER Moon Rover सोबत हौशी नागरिकांना चंद्रावर नाव पाठविण्याची सुवर्णसंधी जाहीर केली आहे नासाचे VIPER (Volatiles Investigating Polar Exploration Rover) Moon Rover आर्टिमस मोहिमे अंतर्गत चंद्रावर जाणार आहे नासाच्या भविष्यकालीन चांद्रमोहिमेतील अंतराळविरांच्या निवासा दरम्यान आणी आर्टिमस मोहिमेतील अंतराळविरांच्या चंद्रावरील वास्तव्या दरम्यान अंतराळविरांना पृथ्वीसारखे पोषक वातावरण व पाण्याची गरज भासणार आहे त्यासाठी VIPER रोबोटिक मुन रोव्हर मोहिम राबविण्यात येत आहे नासाच्या आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीर ह्या भागात जाणार आहेत

ह्या मोहिमे अंतर्गत VIPER रोबोटिक मुन रोव्हर चंद्राच्या दक्षीण ध्रुवा वरील बर्फाळ भागात जाणार आहे आणी तेथील बर्फ,पाण्याचे प्रवाह आणी बर्फाच्या नमुन्यांचे संशोधन करणार आहे हे बर्फ कसे तयार झाले त्याचे पाणी अंतराळवीरांना पिण्यायोग्य आहे का ? चंद्रावर बर्फ आहे म्हणजे तिथे पुरातन काळी पाणी अस्तित्वात होते मग कालांतराने ते कसे नष्ट झाले ह्या विषयीची संशोधीत माहिती ह्या मोहिमेद्वारे गोळा करण्यात येणार आहे नासाच्या शास्त्रज्ञांनी ह्या आधीच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ़ाचे अस्तित्व असल्याचा शोध लावला होता

नासाच्या Washington Headquarter चे Associate Administrator Nicola Fox म्हणतात,ह्या आधी चंद्रभुमीवरील दक्षीण ध्रुवावरील भागात कोणीही पोहोचले नव्हते पण आम्ही ह्या VIPER मुन रोव्हर मार्फत चंद्रभुमीवरील ह्या अत्यंत कमी प्रकाशमान अशा बर्फाळ प्रतिकूल परिस्थिती असलेल्या खडकाळ भागातील वातावरणाचा आणी ह्या भागातून इतरत्र बर्फ़ाचे पाणी पसरले आहे का ? ह्याचा शोध घेणार आहोत शीवाय ह्या बर्फाचे आणी तेथील खडक,वाळू ,मातीचे नमुने देखील गोळा करणार आहोत 

VIPER मुन रोव्हरचे डिझाईन नासाच्या Johnson Space Center मधील ईंजीनिअर्स,तंत्रज्ञ आणी शास्त्रज्ञांनी मिळुन केले आहे रोव्हर स्वयंचलित असून त्यात अद्ययावत,अत्याधुनिक यंत्रणा,अत्याधुनिक कॅमेरे ,रोबोटिक ड्रीलींग हार्डवेअर व साफ्टवेअर कमांड सिस्टीम बसविण्यात आली आहे  ह्याचा उपयोग जेव्हा रोव्हर बर्फाळ भागातील बर्फाचे नमुने गोळा करण्यासाठी रोबोटिक आर्मच्या सहाय्याने बर्फाचे ड्रिलिंग करेल तेव्हा कुठे आणी कीती अंतरावर ड्रील करायचे व केव्हा आणी कुठे थांबायचे ह्याचे कमांड साफ्टवेअर मार्फत रोव्हरला प्राप्त होतील चंद्रावरील दक्षिणेकडील ह्या भागात अंधार आहे आणी तेथील जमीन खडकाळ आहे त्यामुळे चंद्रभुमीवर मार्गक्रमण करताना अडथळे आल्यास  मध्येच खड्डा आल्यास रोव्हरला बसविलेल्या स्वयंचलित स्टिअरींगच्या मदतीने रोव्हर आजुबाजुला गोलाकार आणी समोर किंवा मागे वळुन दिशा बदलेल रोव्हरच्या समोरच्या भागात गाडी सारखा हेडलाईटही बसविण्यात आला असून अंधारात प्रकाशासाठी हेडलाईटचा उपयोग होईल परग्रहावर जाणाऱा हेडलाईट असणारा हा पहिलाच रोव्हर आहे 

VIPER मुन रोव्हरची हि मोहीम 100 दिवसांची आहे त्या दरम्यान चांद्रभूमीवर फिरून रोव्हर तेथील वातावरणाचे संशोधित नमुने,बर्फ़ाचे नमुने आणि अंतराळवीरांच्या भविष्यकालीन निवासासाठी उपयुक्त वातावरण असलेली जागा व पाण्याचे स्रोत शोधेल व इतर संशोधित माहिती गोळा करेल रोव्हरवर बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेवर रोव्हर कार्यरत होईल त्यासाठी त्यात 100 दिवस पुरेल ईतक्या ऊर्जेचा साठा केलेला असल्यामुळे ह्या ऊर्जेचा वापर रोव्हरला जपून करावा लागेल कारण तेथे सुर्यप्रकाश अत्यंत कमी प्रमाणात पडत असल्याने ऊर्जा निर्मितीत अडथळा येईल VIPER मुन रोव्हरचा प्रवास चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील अत्यंत कठीण भागात,आणी आव्हानात्मक परीस्थितीत होणार असल्याने लोकांची नावे देखील VIPER मुन रोव्हर सोबत हा आव्हानात्मक,रोमांचक चंद्र प्रवास करतील जिथे आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीर जाणार आहेत आणि चांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवणार आहेत

ह्या आधी नासाच्या मार्स रोव्हर,युरोपा क्लीपर सोबत नावे पाठविण्याची सुवर्णसंधी नासा संस्थेने दिली होती आणि लाखो हौशी नागरिकांनी त्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांची नावे पाठविली आहेत आता VIPER मुन रोव्हर सोबत नावे पाठवून त्यांच्या नावांना अंतराळ प्रवास आणि चंद्र प्रवास करण्याची संधी नासा संस्थेने जाहीर केली आहे Name with VIPER Rover मोहिमे अंतर्गत नागरिकांना नासा संस्थेत 15 मार्च पुर्वी त्यांची नावे नोंदवता येतील निवड झालेल्या नागरिकांना बोर्डिंग पास मिळेल ह्या वर्षाच्या शेवटी VIPER मुन रोव्हर चंद्रावर जाणार आहे 

No comments:

Post a Comment