Axiom-3 मोहिमेतील अंतराळवीर नासाच्या अंतराळ मोहीम 70 च्या अंतराळवीरांसोबत Welcome Ceremony दरम्यान लाईव्ह संवाद साधताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था- 21 जानेवारी
Axiom-3मोहिमेतील अंतराळवीर Micheal Lopez ,Walter Villadei ,Alper Gezeravei आणि Marcus Wandt 20 जानेवारीला स्थानकात पोहोचले स्थानकात सध्या वास्तव्य करत असलेल्या अंतराळविरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले नासा,Axiom आणी Space-X संस्थेतील प्रमुखांनी ह्या अंतराळविरांशी लाईव्ह संवाद साधत ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांचे स्थानकात स्वागत केले संस्थेतील प्रमुखांनी त्यांना ह्या मोहिमेतील अंतराळ प्रवासा बद्दल आणि स्थानकात पोहोचल्यानंतर कसे आहात विचारत त्यांचे मनोगत व्यक्त करण्यास सांगितले
आधी नासाच्या अंतराळ मोहीम 70चे कमांडर Andreas Mogensen ह्यांनी ह्या चारही अंतराळविरांचे स्थानकात स्वागत केले
अंतराळवीर Micheal - "हि माझी सहावी अंतराळवारी होती Exiting Flight होती ईथे गेल्या विस वर्षांपासून वेगवेगळ्या देशाचे अंतराळवीर एकत्रीत वास्तव्य करुन अनेक सायंटिफिक संशोधन करतात हि खूप सुंदर गोष्ट आहे स्थानकात पहिल्यांंदाच पाच युरोपियन अंतराळवीर एकत्र आले आहेत अस मला वाटतय आम्ही ईथे सुरक्षित पोहोचलो आहोत हि माझी सहावी अंतराळवारी आहे आणी मी Old झालो नाही अजून काही दिवस मी Dragon मधून प्रवास करू शकतो स्थानकात ये,जा,करु शकतो Space X च ड्रायव्हिंग आणी Operations स्मुथ आहे सुरक्षित आहे Space X चे त्या साठी आभार!"
अंतराळवीर Walter- "मोहीम 70 चे आभार त्यांनी आमचे स्थानकात स्वागत केले त्या बद्दल ईथे सगळ्या देशातील अंतराळविरांना एकत्र पाहून आनंद झाला Italy चे आभार त्यांच्यामुळे मला संधी मिळाली ईथे येण्याची रहाण्याची स्थानक खूप सुंदर बनविले आहे"!
अंतराळवीर Alper-"अंतराळ मोहीम 70 मधील अंतराळविरांचे आभार आमच्या स्वागतासाठी संशोधनातून वेळ काढून दरवाज्याजवळ थांबून छान स्वागत केल्या बद्दल आम्हाला ट्रेनिंग देणाऱ्या टिममधील सर्वांचे,संस्थेचे संस्थेतील सर्वांचे आणी तुर्कीचे विशेष आभार मला हि संधी दिल्याबद्दल!"
अंतराळवीर Marcus -"मी सुद्धा मोहीम 70मधील अंतराळवीरांचा आभारी आहे स्थानकात स्वागत केल्या बद्दल,जस पृथ्वीवर आपण दार ठोठावल की,कुणीतरी दार ऊघडायला येत तसच ईथे अंतराळात दाराजवळ ऊभ राहुन ह्या अंतराळवीरांनी आमच स्वागत केल हे खूप आनंददायी आहे ईथे स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या संस्कृतीतुन एकत्र येऊन ईथे संशोधन करतात हे खूप आश्चर्यकारक आहे "!
सर्वांनीच स्थानक सुंदर बनवीले आहे असे म्हणत ते बनविणाऱ्यांंचे कौतुक केले आणी नासा संस्था ,Axiom आणी Space -X चे आभार मानले त्या नंतर कमांडर Micheal ह्यानी Walter,Alper आणी Marcus ह्यांना अंतराळवीर झाल्याचा नंबर असलेली पीन लावून दिली आणी Axiom मोहिमेतील सहभागी सर्व संस्थेने त्यांना स्थानकातील वास्तव्यासाठी,संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या आता स्थानकात आठ देशातील अकरा अंतराळवीर एकत्रित राहून तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील Axiom मोहिमेतील अंतराळवीर स्थानकातील चौदा दिवसांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर पोहोचतील
ह्या मोहिमेतील अंतराळवीर Marcus Swedish Airforce Specialist आणि Fighter Pilot आहेत त्यांना वीस वर्षांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे ते Chief Test Pilot आणि Project Astronaut (ESA)आहेत ते म्हणतात अंतराळवीर होण्याच माझं स्वप्न होत पण मला संधी मिळेल अस वाटल नव्हत युरोपियन स्पेस एजन्सीने दिलेली Astronaut साठीची जाहिरात माझ्या पत्नीने पाहिली तिने मला प्रेरित केल मी अर्ज केला पण माझी निवड होईल अस वाटल नव्हत पण माझी निवड झाली आणि आता Axiom मोहिमेमुळे हि संधी मिळाली
Axiom -3मोहिमेतील अंतराळवीर Alper हे पहिले अंतराळ प्रवास करणारे तुर्की अंतराळवीर आहेत Alper पाच वर्षाचे असताना ते त्यांच्या आजी सोबत शेतात उभे असताना त्यांनी आकाशात विमान उडताना पाहून आजीला म्हटल होत मला असच विमानाच ड्रायव्हर व्हायचय पुढे त्यांनी त्यांच्या ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न केले एअर फोर्समध्ये Masters Degree मिळवली Commercial Airline कॅप्टन झाले त्यांना पंधरा वर्षांचा विमान उड्डाणाचा अनुभव आहे आकाशात 51000.m.पर्यंत उड्डाण केलय ते म्हणतात ,"पण अंतराळप्रवास माझ्यासाठी स्वप्न होत कारण आमच्या देशातील तरुणांसाठी अंतराळ प्रवासाचे दरवाजे बंद होते मी फक्त फिल्म मध्ये आणि डॉक्युमेंटरी मध्ये पाहून स्वत:ला प्रेरित करत होतो एकदा मध्यरात्री मी Operation Flight वरून परत येत होतो तेव्हा एक बातमी पाहिली आमचे पंतप्रधान Announce करत होते त्यांनी तुर्की नागरिकांना अंतराळ प्रवासास पाठवण्याचा निर्णय घेतलाय त्या क्षणापासून मी अंतराळप्रवासाचा विचार करायला सुरवात केली ते म्हणतात त्या क्षणी आमच्या देशातील तरुणांच्या बालकांच्या स्वप्नातील अंतराळप्रवासाचे दरवाजे उघडले अंतराळातील काळोखाचा पडदा बाजूला झाला मी रीतसर अर्ज केला सिलेक्ट झालो आणि लवकरच मला Axiom मोहिमेत अंतराळ प्रवास करण्याची संधी मिळाली आता मी माझ्या देशातील अंतराळवीर होऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीला सांगू शकतो ध्येय असेल तर काहीही अशक्य नाही "Not to be limit of the Sky but Deep in Space "!
No comments:
Post a Comment