Axiom -3 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर Michael Lopez,अंतराळवीर Walter Villadei,अंतराळवीर Alper Geezeravci आणि अंतराळवीर Marcus Wandt- फोटो -नासा संस्था
नासा संस्था -11 जानेवारी
नासा ,Axiom Space आणी Space X ह्यांच्या Axiom -3 अंतराळ मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर दोन आठवड्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत Alegria चे अंतराळवीर Michael Lopez इटालीचे अंतराळवीर Walter Villadei तुर्कीचे अंतराळवीर Alper Gezeravci आणि स्वीडनचे (ESA)चे अंतराळवीर Marcus Wandt हे चारजण अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत अंतराळवीर Michael Lopez हे ह्या मोहिमेतील कमांडर पद सांभाळणार असून Walter Villadei हे पायलट पद सांभाळतील अंतराळवीर Alper Gezeravci मिशन स्पेशालिस्ट पद आणी Marcus Wandt Project Astronaut असतील
बुधवारी 17 जानेवारीला नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center मधील 39 A ह्या उड्डाण स्थळावरून 5.11p.m.ला Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने Space X-Crew Dragon ह्या चारही अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावेल आणि दीड दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर 19 जानेवारीला 5.15 a.m.ला स्थानकाच्या जवळ पोहोचेल सात वाजता Space X Crew Dragon आणि स्थानकातील Hatching, Docking प्रक्रिया पार पडेल त्या नंतर चारही अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील स्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील
स्थानकातील दोन आठवड्यांच्या वास्तव्यात हे अंतराळवीर तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होतील ह्या अंतराळवीरांचे पृथ्वीवरून स्थानकाच्या दिशेने उड्डाण, Hatching ,Docking स्थानकातील प्रवेश आणि Welcome Ceremony चे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment