नासाच्या HERA मोहिमेतील धाडसी प्रतीनिधी Kamak Eladi,Susan Hilbig, Abhishek Bhagat आणी Carli Domenico शास्त्रज्ञ निर्मित क्रुत्रीम मंगळभुमीत प्रवेश करण्याआधी -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -27 जानेवारी
नासाच्या भविष्य कालीन मंगळ मोहिमेत अंतराळवीर मंगळावर जाणार आहेत तिथे मानवी वास्तव्यासाठी पृथ्वी सारखे पोषक वातावरण व ठिकाणाचा शोध घेऊन मंगळावरील संशोधित माहिती मिळवणार आहेत ह्या मोहिमेची पूर्वतयारी सध्या नासा संस्थेतील शास्त्रज्ञ करीत आहेत त्या साठी नासाच्या J.PL संस्थेतील शास्त्रज्ञांनी संस्थेतील मोकळ्या जागेत मंगळासारखे वातावरण असलेली क्रुत्रीम मंगळभूमी निर्मित केली आहे मंगळ मोहिमेतील अंतराळविरांची मोहीम सुरक्षित होण्यासाठी आणी मंगळावरील वातावरणाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधीत करण्यासाठी HERA मोहीम राबविण्यात येत आहे ह्या आधी CHEPEA मोहीमे अंतर्गत चार धाडसी नागरिक ह्या शास्त्रज्ञ निर्मित प्रुथ्वीवरील क्रुत्रीम मंगळ भुमीत एक वर्षासाठी रहायला गेले आहेत आता नासाच्या HERA मोहिमेतील चार धाडसी प्रतिनिधी 26 जानेवारीला नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भूमीत राहायला गेले आहेत ह्या मोहिमे अंतर्गत अभिषेक भगत, Carli Domenico, Kamak Ebadi आणी Susan Hilbig ह्या चौघांना 26 जानेवारीला ह्या क्रुत्रीम मंगळभुमीत प्रवेश केल्यानंतर बंदिस्त करण्यात आले असून 45 दिवसानंतर हे चौघे बाहेर येतील
अभिषेक भगत भारतीय आहेत त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीतुन BE (Electrical) केले असून त्यांनी ME Electrical -California ME(Computer Science)-Verginia Masters in Space System -Florida मध्ये केले आहे आणी ते US Army मध्ये Research Engineer पदी कार्यरत आहेत Carli Domenico -San Antonio Texas येथील आहेत त्या Neuro Scientists आहेत Kamak Ebadi नासाच्या California मधील JPL संस्थेत Robotic Technologists आहेत ते नासाच्या मंगळ मोहिमेतील Perseverance Space Flight Operation टिममध्ये,Mars Sample return mission मध्ये तसेच Artemis Programm मध्ये सहभागी आहेत Susan Hilbig North California मधील Durham येथील आहेत त्या Duke University Emergency Department मध्ये Physician Assistant पदी कार्यरत आहेत
मंगळमोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी मंगळासारख्या वातावरणात राहिल्यावर मानवी शारीरावर काय विपरीत परिणाम होतो ह्या विपरीत अवस्थेत मानवी शरीर त्याला कसे सामोरे जाते त्यांच्यात काय मानसिक बदल होतात ह्या विषयीचे संशोधन करण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे हे चार धाडसी नागरिक मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचे प्रातिनिधित्व करणार आहेत हे धाडसी प्रतीनिधी आता 45 दिवस ह्या भुमीत वास्तव्य करणार असून तेथील संशोधनात सहभागी होणार आहेत
मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रुथ्वी पासुन हजारो मैल दुर अंतरावर अंतराळप्रवास करणार आहेत तेव्हा त्यांना पृथ्वीवरील लोकांशी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधता येणार नाही म्हणून त्यांना सगळ्यांपासून दुर ह्या भुमीत बंदिस्त करण्यात आले आहे हे अंतराळवीर त्या काळात ह्या क्रुत्रीम मंगळभुमीतुन बाहेर पडु शकणार नाहीत त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा बाहेरच्या कोणाशीही संपर्क साधु शकणार नाहीत फक्त नासा संस्थेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात असतील
हे अंतराळवीर मंगळावर जाण्यासाठी अंतराळप्रवास करतील तेव्हा काही कारणाने पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क साधण्यास वेळ झाला किंवा संपर्क यंत्रणा बंद पडली किंवा अचानक काही समस्या उद्भवल्यास यानात बिघाड झाल्यास त्या वर कुशलतेने मात करून परिस्थतीवर नियंत्रण मिळवुन पुढे मार्गक्रमण करता यावे म्हणून ह्या अंतराळविरांना आपदकालीन Operation, Maintainance Training देण्यात येणार आहे हे चार नवीन प्रतिनिधी तेथे Human health Studies वर सुरू असलेल्या वेगवेगळ्या अठरा संशोधनात सहभागी होणार आहेत ह्या पृथ्वीवरील क्रुत्रीम मंगळभुमीतील बंदिस्त वातावरणात राहिल्यावर मानवी आरोग्यावर शारीरिक मानसिक व मानवी प्रतिकार शक्तीमधे काय बदल जाणवतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधीत माहिती गोळा करणार आहेत
नासा संस्थेतील जगभरातील सात देशातील शास्त्रज्ञ ह्या प्रतिनिधीच्या संपर्कात असतील आणी त्यांना संशोधनादरम्यान मार्गदर्शन करतील ह्या चौघा प्रतिनिधीचा हा 2024 मधला पहिला ग्रुप असुन ह्या पुढील संशोधनासाठी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रतिनिधीचा समावेश असेल हे चौघे प्रतिनिधी 11 मार्चला नासाच्या ह्या क्रुत्रीम मंगळभुमीतुन बाहेर पडतील
No comments:
Post a Comment