Monday 8 January 2024

आदित्य L1 सौरयानाचा L1 पांईटमध्ये यशस्वी प्रवेश

   Image

 इसरो संस्था -6 जानेवारी 

भारतीय अंतराळ संस्था इसरोने सूर्याच्या दिशेने पाठवलेल्या आदित्य L1 सौरयानाने  सूर्याच्या  Halo -Orbit मध्ये यशस्वीपणे प्रवेश केला आहे शनिवारी सहा जानेवारीला दुपारी चार वाजता आदित्य L1 सौरयान सूर्य आणी पृथ्वी मधल्या निर्वात पोकळीत म्हणजेच L1 पॉईंट मध्ये प्रवेशले L1पॉईंट मध्ये शिरण्याआधी आदित्य सौर यानाने वेगावर नियंत्रण मिळवत यानाचे इंजिन प्रज्वलीत केले आणी सुरक्षितपणे आत प्रवेश केला Halo पॉईंट पृथ्वी पासून 15 लाख कि.मी अंतरावर आहे

आदित्य L1 सौरयान इसरोच्या श्री हरीकोटा येथून दोन सप्टेंबरला अंतराळात सूर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले आणि  चार महिन्यांनी सुर्याच्या Lagrange point ( पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण संपून सुर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा आरंभ जेथे होतो तो L1 point ) जवळील Halo Orbit मध्ये स्थिरावले ह्या भागातून परीभ्रमण करताना सूर्याच्या ग्रहण काळात देखील संशोधन करताना आदित्य L1 सौरयानास अडथळा येणार नाही आदीत्य L1 सौरयानातील अद्ययावत यंत्रणा आणी सात पेलोडच्या साहाय्याने आदित्य सौरयान सूर्यावरील संशोधन करणार आहे सौरयानातील सातपैकी चार पेलोडच्या यंत्रणे मार्फत सूर्याभोवतीचे तेजपुंज प्रभामंडळ त्यातून अखंडीत बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळाचे लोट,बाहेर पडणारा प्रकाश आणी प्रकाश किरणांचे निरीक्षण नोंदवून त्याबद्दलची संशोधित माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल सूर्याचा करोना हा भाग सूर्याच्या पृष्ठभागापासून वेगळा का आहे इथे सतत बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळा व त्यातून बाहेर पडणाऱ्या अखंडीत प्रकाशलाटा कशा तयार होतात त्यांचा प्रवाहित होण्याचा वेग आणी तापमान किती असते त्यातून ऊत्सर्जित होणारी अपायकारक कीरणे ,वायू आणी त्याचा आसपासच्या भागावर होणारा परिणाम ह्याचे संशोधन आदित्य L1 सौरयानातील ह्या यंत्रणे मार्फत केले जाईल

आदित्य L1 सौरयानातील ऊर्वरीत तीन पेलोडच्या यंत्रणेद्वारे सुर्याच्या पृष्ठभागातील प्रचंड ऊष्णता,तेथे तयार होणाऱ्या ऊष्णतेच्या सौरलाटा आगीचे लोट,सौरवादळ ह्याचे निरीक्षण नोंदवले जाईल ह्या भागातील चुंबकीय क्षेत्र आणी त्या भागात सतत घुमसणारी प्रचंड आग त्यातून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा,बाहेर पडणारी विद्युत भारीत किरणे ,विद्युत भारीत कण,धुळीचे प्रचंड लोट त्यातून बाहेर पडणारे अपायकारक वायू कसे तयार होतात त्यांचा  वेग,ऊष्णतामान,तापमान कीती असते त्यांची निर्मिती प्रकीया कशी असते आणी त्याचा आसपासच्या वातावरणावर होणाऱ्या परीणामाचे निरीक्षण नोंदवून त्यावरील संशोधीत माहिती गोळा केल्या जाईल

No comments:

Post a Comment