Thursday 25 January 2024

Axiom-3 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचले

     The SpaceX Falcon 9 rocket carrying four Axiom Mission 3 astronauts aboard the Dragon Freedom spacecraft launches from the Kennedy Space Center. Credit: NASA/Chris Swanson 

नासाच्या Kennedy Space Center मधील उड्डाण स्थळावरून  Space X Crew Dragon Freedom Axiom 3 मोहिमेतील अंतराळवीरांसह स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावताना -फोटो नासा संस्था 

नासा संस्था -20 जानेवारी

नासा,Axiom Space आणी Space X ह्यांच्या Axiom -3 व्यावसायिक अंतराळ मोहिमे अंतर्गत Alegria चे अंतराळवीर Michael Lopez इटालीचे अंतराळवीर Walter Villadei तुर्कीचे अंतराळवीर Alper Gezeravci आणि स्वीडनचे (ESA)चे अंतराळवीर Marcus Wandt हे चारजण अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचले अचानक आलेल्या समस्येमुळे  नियोजित तारखे ऐवजी एक दिवस उशिराने  18 जानेवारीला हे अंतराळवीर स्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center मधील 39 A ह्या उड्डाण स्थळावरून 4.49p.m.ला Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने Space X चे Freedom Dragon ह्या चारही अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणि दीड दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर 20 जानेवारीला 7.13a.m.ला स्थानकात पोहोचले ह्या अंतराळवीरांनी अंतराळ प्रवासा दरम्यान नासा ,Space X आणि Axiom संस्थेशी लाईव्ह संवाद साधून त्यांचा अनुभव शेअर केला 

कमांडर -Michael Lopez -"आता आम्ही अंतराळातील100 की.मी.अंतर पार केले आहे मी दुसऱ्यांदा Dragon मधून हा अंतराळ प्रवास करत आहे ह्या आधी मी Axiom -1 मोहिमेत अंतराळ प्रवास केला होता मी सहाव्यांदा स्थानकात जात आहे Space shuttle आधी तीनदा आणि नासाच्या मोहिमेत एकदा पण तरीही मी दरवेळी अंतराळ प्रवास नव्याने अनुभवतो आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित सुरु आहे दुसऱ्यांदा Dragon मधून प्रवास करताना थोडेसे Vibrations आणी वेगामुळे थ्रिल अनुभवतोय हे Spaceship बनविणाऱ्याच मला विशेष कौतुक वाटतय त्यांनी अंतराळवीरांच्या सोयीचा विचार करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत स्मूथ ड्रायविंग मुळे अंतराळवीरांचा अंतराळ प्रवास आरामदायी आणि सुरक्षित होतो नासाच्या ह्या मोहिमेमुळे खाजगी अंतराळवीरांना अंतराळ प्रवास करण्याची स्थानकात जाण्या,येण्याची संधी मिळाली आहे!"

अंतराळवीर Walter -"पृथ्वीच्या वर अंतराळात प्रवास करण्याची संधी नासाच्या खाजगी व्यावसायिक अंतराळ मोहिमेमुळे मिळालीय त्या मुळे तिन्ही सहभागी संस्थांचे आभार Freedom Dragon आरामदायी आहे त्यातून अंतराळ प्रवास करण्याचा अनुभव fantastic आहे पृथ्वीच्या कक्षेतुन झीरो ग्रॅव्हीटीत शिरतानाचा व पहिल्या स्टेज मधून दुसऱ्या स्टेज मध्ये जातानाचा अनुभव आश्चर्यकारक होता आता पर्यंतचा प्रवास आनंददायी सुंदर आहे आता स्थानक येण्याची वाट पहातोय स्थानकातील अंतराळवीरांना भेटण्यासाठी ऊत्सुक आहे!"

अंतराळवीर Marcus- "खरोखरच Sensational, Acceleration,Speed मी expect केल त्यापेक्षा जास्त आनंददायी, fantastic ride आहे मायक्रो ग्रव्हिटीत शिरतानाचा अनुभव मजेशीर आहे आपण जीथे आहोत ज्या कंडीशन मध्ये आहोत तिथून ह्या वातावरणात तरंगत आहोत हा अनुभव आश्चर्यकारक आहे मला माझ्या स्वीडन आणी युरोप देशाच प्रातिनिधित्व करण्याचा बहुमान मिळालाय ह्या Dragon मधून माझ्या सहकारी अंतराळविरांसोबत अंतराळप्रवास करण्याचा अनुभव खूप Exciting आहे!"

अंतराळवीर Alper - "ह्या अंतराळ प्रवासाची सुरुवात खूप ग्रेट आहे मी पाहिलेल अंतराळ प्रवासाच स्वप्न प्रत्यक्षात ऊतरलय मी ईथल्या मायक्रोग्रव्हिटीत पंखाशिवाय अंतराळात तंरगण्याचा मजेशीर अनुभव घेतोय ज्यांनी ह्या मोहिमेसाठी प्रयत्न केले त्या टिमचे,संस्थेतील सर्वांचे आभार ज्याच्यामुळे मी हा क्षण अनुभवतोय माझ्या देशाचेही आभार त्यांच्यामुळे मला हि संधी मिळाली पहिला तुर्कीश अंतराळप्रवासी,अंतराळवीर होण्याचा सन्मान मिळाला आतापर्यंत 100k.m.चा अंतराळप्रवास पुर्ण झालाय अजून एक,दिड दिवस बाकी आहे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी आता Dragon बाहेर अंधार आहे Freedom Dragon स्पेसीयस,आरायदायी आणी अद्ययावत यंत्रणेने स्वयंचलित बनविले आहे आमच्या सोबत पाचवा क्रुमेंबरही आहे Ziro g indicator Gigi Gigi Builda Bear सुद्धा आमच्यासोबत ईथे तरंगत आहे!"

अंतराळवीर स्थानकाजवळ पोहोचताच स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणी Dragon ह्याच्यातील Hatching, Docking  प्रक्रिया पार पडली त्यानंतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या रहात असलेल्या मोहीम 70 च्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले काही वेळाने ह्या अंतराळविरांचा Welcome ceremony पार पडला नासा,Axiom, Space X संस्थेने लाईव्ह संवाद साधत त्यांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल अभिनंदन करत त्यांचे स्थानकात स्वागत केले 

No comments:

Post a Comment