Ingenuity Mars Helicopter मंगळभूमीवरील आकाशात तिसऱ्या उड्डाणादरम्यान -फोटो -नासा संस्था (JP.L lab)
नासा संस्था - 28 एप्रिल
नासाच्या Mars Ingenuity Helicopter ने शनिवारी 25 एप्रिलला मंगळावरील आकाशात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केले मंगळावरील वेळेनुसार दुपारी 12वाजून 33मिनिटाला (पृथ्वीवरील 4.31a.m.EDT,1.31a.m.PDT) Ingenuity Mars Helicopter मंगळावरील आकाशात झेपावले आणि सोळा फूट (पाच मीटर ) उंचीवर पोहोचले ह्या हेलिकॉप्टरने मंगळावरील आकाशातील 164 फूट (50 मीटर ) अंतर पार केले हे अंतर अर्ध्या फुटबॉलच्या ग्राउंड एव्हढे आहे आणी ऊड्डानानंंतर हेलिकॉप्टर दोन मीटर प्रति सेकंद (6.6फूट प्रति सेकंद ) इतक्या वेगाने मंगळभूमीवर उतरले
Ingenuity हेलिकॉप्टरची हि तिसरी flight test शास्त्रज्ञाच्या अपेक्षेनुसार यशस्वी झाली ह्या आधी 19 एप्रिलला यशस्वी चाचणी घेण्यात आली होती सहा वर्षांपूर्वी नासाच्या JP.L. Lab मध्ये ह्या मंगळ मोहिमेतील इंजिनीअर्सनी मंगळावरील वातावरणासारखे कृत्रिम वातावरण निर्मिती करून Ingenuity हेलिकॉप्टरची पहिली यशस्वी चाचणी घेतली होती आता ह्या मोहिमेतील शास्त्रज्ञ Ingenuity च्या चवथ्या उड्डाणाची तयारी करीत आहेत ह्या चवथ्या उड्डाणा नंंतर Ingenuity ज्या ठिकाणाहून आकाशात उड्डाण करेल त्या मंगळभुमीवरील स्थळाला Wright Brothers Field असे नााव देण्यात आले आहे 29 एप्रिलला सकाळी 10.12 मिनिटांनी EDT(7.12 PDT) मंगळावरील वेळेनुसार दुपारी 12.30मिनिटांनी Ingenuity आकाशात उड्डाण करणार आहे
नासाच्या Planetary Science Division Director Lori Glaze ह्या यशाने आनंदित झाल्या आहेत त्या म्हणतात पृथ्वीपासून आणि नासा संस्थेपासून मिलियन मैल अंतरावरील मंगळभूमीवर ह्या हेलिकॉप्टरने सर्व टेक्निकल बॉक्सेस चेक करून यशस्वी उड्डाण केल्यामुळे आता भविष्यकालीन उड्डाण सोपे होईल व मंगळ भूमीवरील उपयुक्त माहिती मिळण्यास मदत होईल
Ingenuity हेलीकॉप्टर तिसऱ्यांदा मंगळभुमीवरील आकाशात यशस्वी ऊड्डान करुन सुरक्षित मंगळभुमीवर ऊतरले तेव्हा आम्हाला भविष्य कालीन मंगळमोहिमेतील ऊड्डाणाच्या यशस्वीतेची खात्री झाली आता आम्ही निश्चिंत झालो आहोत असे ह्या मंगळमोहिमेतील Ingenuity हेलिकॉप्टरचे चिफ ईंजीनीअर Bob Balram म्हणाले आता आम्ही हेलिकॉप्टरचे जास्त वेगाने जास्त ऊंचीवर व दुरवरच्या अंतरावर ऊड्डान घडवू शकतो असा विश्वास आम्हाला वाटतोय
सुरवातीला ह्या मार्स हेलिकॉप्टरने मंगळभुमीवरील आकाशात पाच मिटर ऊंचीचा टप्पा गाठला आता ह्या पुढच्या ऊड्डाणात Ingenuity मंगळावरील आकाशात 84 मिटर ईतक्या ऊंचीवर पोहोचेल म्हणजे साधारण 276 फुट ईतक्या ऊंचीचा टप्पा पार करेल Ingenuity हेलीकॉप्टर जेव्हा ऊंच आकाशात पोहोचुन दुरवरपर्यंत भरारी मारेल तेव्हा हेलिकॉप्टरच्या खालच्या भागातील Navigation कॅमेरे कार्यरत होतील आणी मंगळभुमीवरील दऱ्या,खोरे ,नदी,नाल्यांचे आटलेले स्श्रोत आणि या सारखी ईतर महत्वपूर्ण Geological व Biological माहिती मिळवेल व त्यांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवेल त्यामुळे मंगळावरील जीवाश्म आणी पुरातन अवषेशांचे फोटो मिळतील ह्या जास्त ऊंचीवरील ऊड्डाणा दरम्यान दर चार फुट ऊंचीवरून तेथील फोटो घेतले जातील हे फोटो घेणे हेलिकॉप्टर 133 मिटर ऊंचीवर जाईपर्यंत (436फुट) सुरू राहील सूरवातीला हे फोटो कृष्णधवल स्वरूपात घेतले जातील त्यानंतरची ऊंची गाठताच मात्र हेलिकॉप्टरचे रंगीत कॅमेरे कार्यान्वित होतील आणी हेलिकॉप्टर पुन्हा मंगळभुमीवर उतरेपर्यंत मंगळभुमीवरील रंगीत फोटो घेणे सुरूच राहील
ह्या पुढील ऊड्डाणात Ingenuity स्वतः च त्याने मंगळभुमीवर केलेल्या आधीच्या तीन ऊड्डानाचे रेकॉर्ड ब्रेक करेल त्यासाठी हेलिकॉप्टरचा वेग,ऊंची आणी ऊड्डानाचे अंतर वाढविण्यात येईल आणी चवथे ऊड्डाण यशस्वीपणे पार पडल्याचा संदेश आणी डेटा शास्त्रज्ञांना प्राप्त होताच ह्या मोहिमेच्या इंजिनिर्सच्या टीमद्वारे पाचव्या ऊड्डाणाचे नियोजन केले जाईल
ह्या मोहिमे संर्दभात अधिक माहिती देण्यासाठी व विचार विनिमय करण्यासाठी तिस एप्रिलला नासाच्या JP.L lab मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन काही निवडक पत्रकारांना देखील त्या साठी आमंत्रित करण्यात आले आहे