अंतराळवीर Chris Cassidy सोयूझ यानातून अंतराळस्थानकाकडे झेपावताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -23 एप्रिल
नुकताच 22 एप्रिलला अमेरिकेत पन्नासावा Earth day साजरा करण्यात आला पण ह्या वर्षी कोरोनाच्या संसर्गा मुळे तो नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करता आला नाही तर साऱ्यांनी तो घरातच साजरा केला आपली पृथ्वी अनमोल आहे आणि सध्या तरी आपल्या पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असणारी दुसरी पृथ्वी किंवा ग्रह ब्रह्मांडात अस्तित्वात नाही त्या मुळेच पृथ्वीवरील पर्यावरण रक्षण करण्याच आवाहन सतत शास्त्रज्ञ आणी जाणकार लोकांना करत असतात
पृथ्वीच सजीवांसाठी आवश्यक असलेल मोल जाणून अमेरिकेचे सिनेटर जेरॉल्ड नेल्सन ह्यांनी पहिल्यांदा 22 एप्रिल 1970 हा दिवस पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले होते त्या वर्षी हवेतील आणि पाण्यातील प्रदूषण ह्या मुळे वातावरण दूषित होऊन पर्यावरणास बाधा निर्माण झाली होती पृथ्वी संरक्षणासाठी प्रदूषण रोखणे आवश्यक होते मणून त्यांनी हा निर्णय घेतला ह्या वर्षी पन्नासावा पृथ्वी दिन होता
आपण राहतो त्या पृथ्वीवरील वातावरण आपल्या अस्तित्वासाठी पोषक आहे पण आपल्याला तिचे मोल कळत नाही पृथ्वीपासून दूर अंतराळातील अंतराळस्थानकात वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांना मात्र तिचे मोल कळते अंतराळवीर जेव्हा पृथ्वीवरून स्थानकात जाण्यासाठी यानातून अंतराळात झेपावतात तेव्हा पृथ्वीकडे पाहताना तिचे विलोभनीय अलौकिक सौन्दर्य पाहून अचंबित होतात ह्या पहिल्या वहिल्या पृथ्वीदर्शनाने ते आनंदित होतात आणि त्यांना पृथ्वीदर्शनाचे हे भाग्य लाभले म्हणून देवाचे नासा संस्थेचे आभार मानतात अर्थात हे भाग्य त्यांना त्यांच्या असामान्य कर्तृत्व आणि धैर्यामुळे मिळत
जेव्हा ते अंतराळस्थानकात प्रवेश करतात तेव्हा तिथल्या झिरो ग्रॅव्हीटीत पृथ्वीच मोल आणखीनच वाढत तिथे गुरुत्वाकर्षणच नसल्याने इथल्यासारखे उभे राहता येत नाही खाण,पिण,झोपण सारच तरंगत राहून कराव लागत तिथे प्रत्येक वस्तू तरंगत असल्यामुळे सुरवातीला त्यांची तारांबळ उडते तरीही नंतर ते तिथल्या विपरीत कठीण वातावरणाशी जुळवून घेतात आणि संशोधन करतात त्यांच्या कामातून मिळालेल्या मोकळ्या वेळात पृथ्वीचे वेगवेगळ्या वातावरणातील फोटो काढतात पर्यावरणातील बदलांची माहिती गोळा करतात आणि त्यावरही संशोधन करतात
सध्या अंतराळ स्थानकात राहात असलेल्या अंतराळवीरांनी पृथ्वीवासियांना यंदाच्या पन्नासाव्या Earth Day निमित्य शुभेच्छा दिल्या आहेत
अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी पृथ्वीवासीयांना शुभेच्छा देतानाच पृथ्वीविषयीच त्यांच मत व्यक्त करून पृथ्वीची काळजी घ्या अस सांगितल "पृथ्वी सुंदर आहे अनमोल आहे आणि माझ्यासाठी स्पेशल आहे
पृथ्वी माझ घर आहे सध्या मी माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत माझ्या ह्या दुसऱ्या अंतराळातील घरी राहतोय इथे सर्व सुरळीत सुरु आहे सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहेत जस आम्ही स्थानकात टेक्निकल,मेकॅनिकल प्रॉब्लेम येऊन स्थानकातील यंत्रणा बिघडू नये म्हणून काळजी घेतो तशी तुम्हीही पृथ्वी संरक्षणाची काळजी घ्या
पृथ्वीच पर्यावरण बिघडू नये म्हणून कार्यरत राहा पर्यावरणाच संतुलन राखा कारण पृथ्वी सारख पोषक वातावरण कुठेच नाही म्हणून ती अनमोल आहे !"
No comments:
Post a Comment