अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर अंतराळवीर नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था-9 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे अंतराळवीर Chris Cassidy रशियन अंतराळवीर Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner काल अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले आहेत अमेरिकेत सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालल्याने परिस्थिती गंभीर आहे तरीही अमेरिकेने ह्या अंतराळवीरांची नियोजित अंतराळ मोहीम रद्द केली नव्हती सोयूझ MS-16 हे यान कझाकस्थानातील बैकोनूर कॉस्मोड्रोम वरून सकाळी 4.05 वाजता अंतराळवीरांना घेऊन अंतराळस्थानकाकडे झेपावले आणि सहा तासांच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळ स्थानकाजवळ पोहोचले त्यानंतर यानाने अंतराळस्थानकाभोवती चार फेऱ्या मारल्या सोयूझ यान 10.13a.m ला अंतराळस्थानकाच्या Poisk Service Module जवळ पोहोचताच सर्व ठीकठाक असल्याची खात्री करून सोयूझ यानाची hatching प्रक्रिया पार पडली आणी सोयूझ स्थानकाशी जोडले गेले त्यानंतर स्थानकाचे दार उघडल्या गेले
आधी रशियन अंतराळ वीर Ivan Vagner ह्यांनी स्थानकात प्रवेश केला नंतर Chris Cassidy आणि शेवटी Anatoly ह्यांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकात सध्या राहत असलेल्या Jessica Meir ,Andrew Morgan आणी Skripochka ह्या तिघांनी त्यांचे हसतमुखांनी स्वागत केले अंतराळस्थानकात पोहोचल्यानंतर ह्या सहाही अंतराळवीराशी पृथ्वीवरील अमेरिका आणि रशियाच्या नासा संस्थेतील अधिकाऱ्यांनी लाईव्ह संपर्क साधला रशियातील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्थानकात सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनानंदन केले आणि Congratulations ! Have a Good day ! अशा शुभेच्छा दिल्या Chris Cassidy आणि Anatoly ह्यांना तुमचे तिसऱ्यांदा स्थानकातील नव्या घरी स्वागत तर Ivan Vagner ह्यांचे पहिल्यांदाच स्थानकातील आगमनासाठी विशेष स्वागत आणि अभिनंदन करून स्थानक आणि तेथील सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे सांगितले तेथील सहा साडेसहा महिन्यांचा वास्तव्याचा तुमचा काळ सुखात जावो अशी सदिच्छाही व्यक्त केली त्या नंतर अमेरिकेतील नासा संस्थेतील अधिकाऱ्यांनीही तिघांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले Chris Cassidy ह्यांनी आमचा ट्रेनिंग आणि launching पर्यंतचा काळ खूप छान गेल्याचे सांगितले आणि त्यांचे आभार मानले
ह्या वेळेसची हि मोहीम यशस्वीपणे पार पडेल का अशी शंका होती त्यातून अंतराळवीरांना Quarantine केले होते अमेरिकेत सध्या कोरोना मुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे अशा विपरीत परिस्थितीवर मात करून तुम्ही तुमची हि मोहीम निर्विघ्न पणे पार पाडलीत त्या मूळे तुमचे विशेष अभिनंदन ! तुम्हाला सोडायला कॉस्मोड्रोम वर तुमचे कुटुंबीय कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे येऊ शकले नसले तरीही ते ह्या तुमच्या स्थानकातील प्रवेशाचा प्रसंग पाहात आहेत आणि तुम्ही सुरक्षित पोहोचल्याचे पाहून आनंदित झाले आहेत लवकरच आम्ही तुमचा त्यांच्याशी संवाद घडवू असेही ह्या अधिकाऱ्यांनी अंतराळवीरांना सांगितले
कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिका आणि रशियात लोकडाऊन सुरु आहे त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमा लॉक केल्या आहेत त्यामुळे ह्या तीनही अंतराळवीरांचे कुटुंबीय त्यांना सोडायला येऊ शकले नाहीत एरव्ही अंतराळ वीरांचे नातेवाईक,कुटुंबीय आणि मित्र त्यांना सोडायला कॉस्मोड्रोम वर येऊ शकतात
No comments:
Post a Comment