Saturday 18 April 2020

नासाचे अंतराळवीर Andrew Morgan Jessica Meir आणि Oleg Skripochka पृथ्वीवर सुखरूप पोहोचले

रशियन अंतराळवीर Skripochaka ,Jessica Meir आणि Andrew Morgan पृथ्यवीवर पोहोचल्यानंतर -फोटो नासा संस्था

नासा संस्था - 17 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 62 चे तीन अंतराळवीर Andrew Morgan ,Jessica Meir आणि रशियन अंतराळवीर Oleg Skripochka शुक्रवारी पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत त्यांचे सोयूझ MS -15 हे अंतराळ यान  कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे 1.16a.m.ला पृथ्वीवर पोहोचले निघण्याआधी अंतराळ स्थानकातील सहाही अंतराळवीरांनी एकमेकांचा निरोप घेतला त्यानंतर सोयूझ यानाची hatching प्रक्रिया पूर्ण झाली यानाची व्यवस्थित चाचणी झाल्यानंतर यान स्थानकापासून वेगळे झाले आणि पृथ्वीच्या दिशेने झेपावले
पृथ्वीवर पोहोचल्यानंतर तीनही अंतराळवीर parachute च्या साहाय्याने पृथ्वीवर उतरले त्या नंतर नासाच्या search & recovery force च्या टीमने त्यांना कॅप्सूल मधून बाहेर काढून उचलून आणले आणि खुर्चीवर बसविले  सुरवातीला  रशियन अंतराळवीर आणी कमांडर Skripochka ,flight engineer Jessica Meir आणि शेवटी flight engineer Andrew Morgan पृथ्वीवर उतरले नासाच्या डॉक्टर्सनी त्यांचे प्राथमिक चेक अप करून त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले आणि त्यांचे सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले
नासाची महिला अंतराळवीर Jessica Meir पृथ्वीवर पोहोचल्यानंतर चेकअप दरम्यान -फोटो नासा संस्था

ह्या तीनही अंतराळवीरांनी पृथ्वीवर पोहोचताच इथल्या मोकळ्या हवेत अनेक महिन्यांनी मोकळा पहिला श्वास  घेतला अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप पोचल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता नासाच्या टीमने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरु असलेल्या Lock Down मुळे मेडिकल टीम व्यतिरिक्त इतरांना अंतराळवीरांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या नासाच्या टीमने अंतराळवीरांच्या आवश्यक तपासणी नंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून तुम्ही ठीक आहात ना ! अशी विचारणा केली तेव्हा अंतराळवीरांनी त्यांना हो ! आम्ही ठीक आहोत असे सांगितले
प्राथमिक तपासणी नंतर ह्या तीनही अंतराळवीरांना पुढील चेकअप साठी रशियन हेलिकॉफ्टरने बैकोनूर येथील recovery staging city मध्ये नेण्यात आले तिथे जाण्याआधी  नॉर्मल झाल्यानंतर अंतराळवीरांनी फोन वरून त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सुखरूप  पृथ्वीवर पोहोचल्याचे सांगितले सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर अंतराळवीर Andrew Morgan आणि Jessica Meir ह्यांना नासाच्या विमानाने अमेरिकेतील Houston येथे पाठविण्यात येईल तर अंतराळवीर Skripochka ह्यांना रशियन विमानाने त्यांच्या Star City ह्या गावी पाठविण्यात येईल
  नासाचे अंतराळवीर Andrew Morgan पृथ्वीवर परतल्यानंतर - फोटो -नासा संस्था

 Jessica Meir आणि Oleg Skripochka हे दोघेही 2019 sep मध्ये अंतराळ स्थानकात राहायला गेले यांनी स्थानकात 205 दिवस वास्तव्य केले Jessica हिची हि पहिलीच अंतराळवारी होती तिने ह्या दरम्यान Christina Koch सोबत पहिला फक्त महिला अंतराळवीरांचा समावेश असलेला ऐतिहासिक स्पेसवॉक केला ह्या दोघीनी तीनवेळा अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी स्पेसवॉक केला Jessica ने ह्या स्थानकातील वास्तव्यात झिरो ग्रॅविटीत मानवी आरोग्यावर विशेषतः Heart tissue कसे कार्य करतात ह्या वर सखोल संशोधन केले ह्या तिघांनीही अंतराळस्थानकात वेगवेगळे सायंटिफिक संशोधन केले त्यांनी अंतराळस्थानकातील वातावरणात पाण्याच्या थेंबाचा आकार कसा तयार होतो,पाण्याचा flow आणि pressure ह्या विषयी संशोधन केले
अंतराळवीर Oleg Skripochka ह्यांची हि तिसरी अंतराळ वारी होती त्यांनी आजवर स्थानकात 536दिवस वास्तव्य केले
Andrew Morgan ह्यांनी अंतराळस्थानकात दीर्घकाळ झिरो ग्रॅविटीत राहिल्यानंतर मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो ह्यावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी स्थानकातील मुक्काम वाढवला Andrew जुलै 2019मध्ये स्थानकात राहायला गेले त्यांनी नऊ महिने स्थानकात राहून संशोधन केले ह्या तिघांनीही स्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांची नोंद ठेवली आणि त्यावर संशोधन केले शिवाय वेळोवेळी त्यांचे Biological सॅम्पल्स घेऊन ते पृथ्वीवर आणले त्यांनी अंतराळवीरांच्या भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमां मधील वास्तव्यात अंतराळ वीरांना ताजे अन्न मिळावे म्हणून स्थानकात सुरु असलेल्या veggie प्रोजेक्ट  मध्ये सहभागी होत भाजी आणि धान्य लागवड यशस्वी केली   

No comments:

Post a Comment