अंतराळवीर Ivan Vagner , Anatoly Ivanishin आणी Chris Cassidy Launching आधी Soyuz यानासमोर फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 6 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे अंतराळवीर Chris Cassidy,रशियाचे अंतराळवीर Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner गुरुवारी नऊ एप्रिलला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणार आहेत सध्या अमेरिकेत विशेषतः न्यूयार्क मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललाय कोरोनाग्रस्थांची संख्याही वाढतेय ह्या आधीच अमेरिकेत संपूर्ण लॉक डाऊन घोषित करण्यात आलाय फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत अमेरिकेतील गजबजलेले मॉल्स,रस्ते ओस पडले आहेत अमेरिकेतील मोठमोठ्या कंपन्यांनी work at home च्या सूचना दिल्या आहेत अमेरिकेच्या नासा संस्थेनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work At Home च्या सूचना दिल्या आहेत तरीही अमेरिकेतील महत्वाच्या पूर्वनियोजित अंतराळ मोहिमा मात्र सुरूच ठेवण्याचा निर्णय नासाने आणि अमेरिकेचे अध्यक्ष Donald Tramp ह्यांनी ह्या आधीच घेतला होता ह्याच पूर्व नियोजित अंतराळ मोहीमेअंतर्गत नासाच्या अंतराळ मोहीम 63चे तीन अंतराळवीर येत्या नऊ एप्रिलला गुरुवारी अंतराळ स्थानकात साडेसहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी जाणार आहेत
हे तीनही अंतराळवीर कझाकस्थानातील बैकोनूर Cosmodrome वरून Soyuz MS-16 ह्या अंतराळयानातून अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करणार आहेत बैकोनूर येथून Soyuz MS-16 हे अंतराळयान ह्या तीन अंतराळ वीरांना घेऊन 4.05a.m.(स्थानिक वेळ )ला अंतराळात झेपावेल आणी सहा तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर अंतराळ स्थानकाजवळ पोहोचेल त्या नंतर सोयूझ यान चार प्रदक्षिणा पूर्ण करेल हे अंतराळ यान 10.16 a.m.ला स्थानकाच्या Zveda Service Module जवळ पोहोचताच यान स्थानकाशी डॉकिंगने जोडल्या जाईल
त्या नंतर स्थानकाचे दार उघडल्या जाईल आणि अंतराळवीर स्थानकात प्रवेश करतील
सध्या अंतराळ स्थानकात राहात असलेले कमांडर Oleg Skripochka,flight engineer Jessica Meir आणि Andrew Morgan अंतराळ स्थानकात ह्या तिन्ही अंतराळवीरांचे स्वागत करतील यान व स्थानक यांच्यातील Docking आणि Hatching पूर्ण झाल्यानंतर दोन तासांनी सहाही अंतराळवीर एकमेकांचे अभिनंदन करतील
अंतराळवीर Chris Cassidy आणिAnatoly Ivanishin ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे तर Ivan Vagner मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला जाणार आहेत
ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ उड्डाणाचे आणि अंतराळ स्थानकाच्या प्रवेशाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे 17 एप्रिलला अंतराळवीर Oleg Skripochka ,Andrew Morgan आणी Jessica Meir पृथ्वीवर परतणार आहेत
त्यानंतर अंतराळ स्थानकाचा ताबा ह्या तीन अंतराळवीरांकडे सोपवण्यात येईल 15 एप्रिलला Command Change Ceremony पार पडेल आणि Chris Cassidy अंतराळस्थानकाचे कमांडरपद सांभाळतील हे तीन अंतराळवीर अंतराळस्थानकात राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवतील
No comments:
Post a Comment