Monday 6 April 2020

नासाच्या अंतराळ मोहीम 63चे तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज


 Expedition 63 crewmembers arrive at the Baikonur Cosmodrome
 अंतराळवीर Ivan Vagner,Anatoly Ivanishin आणी Chris Cassidy बैकोनूर येथील Cosmodrome वर पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 2 एप्रिल
अमेरिकेत सध्या कोरोनाच्या संसर्गा मुळे संपूर्ण lock down सुरु आहे आवश्यक सेवा वगळता सर्व  व्यवहार ठप्प आहेत अत्यंत गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे माल्स बंद आहेत अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work At  Home च्या सूचना दिल्या आहेत नासा संस्थेतही सध्या Work At Home सुरु आहे फक्त अत्यंत महत्वाच्या मोहिमेतील कर्मचारी तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नासा संस्थेतील घरी किंवा ऑफिस मध्ये काम करता येत नसल्यामुळे संस्थेत कार्यरत आहेत तरीही नासा संस्थेने अत्यंत महत्वाच्या पूर्व नियोजित अंतराळ मोहिमा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
ह्याच मोहिमे अंतर्गत अंतराळ मोहीम 63चे तीन अंतराळवीर 195 दिवसांच्या अंतराळ स्थानकातील वास्तव्यास जाणार आहेत 26 मार्चलाच त्यांचे ट्रेनिंग संपले आणी लाँचिंगची तयारीही पूर्ण झाली आहे
जाण्या आधी सध्याच्या कोरोना संसर्गाच्या थैमानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ह्या तिनही अंतराळवीरांना दोन आठवडे Quarantine मध्ये ठेवण्यात आले होते पृथ्वीवरील कोरोनाच्या संसर्गापासून त्यांचे रक्षण व्हावे त्यांची तब्येत बिघडू नये आणि त्यांच्या सोबत पृथ्वीवरून कोरोनाचे जंतू अंतराळ स्थानकात जाऊन तिथल्या झिरो ग्रॅविटीतल्या अत्यंत थंड वातावरणात राहत असलेल्या अंतराळवीरांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून हि काळजी घेण्यात आली
अमेरिकन अंतराळवीर Chris Cassidy रशियन अंतराळवीर Anatoly Ivanishin आणि Ivan Vagner ह्यांची उड्डाणाची तयारी पूर्ण झाल्यानंतर ह्या तिघांनीही कझाकस्थानातील बैकोनूर येथील Cosmodrome मधल्या Cosmonaut हॉटेल बाहेरिल ग्राउंड मध्ये पारंपारिक Flag Raising ceremony पार पाडला त्यांनी रशियातील  Gagarin Cosmonaut Training Center स्टार सिटी इथल्या Gagarin Museum ला देखील भेट दिली आणि तेथील  अंतराळात जाणारे पहिले अंतराळवीर युरी गँगरीन ह्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फुले वाहिली 

No comments:

Post a Comment