Perseverance Mars Rover वर बसविलेल्या नखाच्या आकाराच्या chips -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-26 मार्च plate
एकीकडे कोरोना व्हायरसन सगळ्या जगात थैमान घातलेल असताना आणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण जगात lock down जाहीर झाल्यानंतर अमेरिकेतील नासा संस्थेत मात्र आगामी मंगळ मोहीमेची तयारी सुरूच ठेवण्याचा निर्णय अमेरीकेन प्रशासनाने घेतला आहे नासा संस्थेतर्फे उन्हाळ्यात मंगळावर पाठवण्यात येणारा Perseverance Mars Rover 18feb.2021ला मंगळावर उतरणार आहे सध्या अमेरिकेत त्याची जय्यत तयारी सुरु आहे
नासाच्या ह्या मंगळ मोहिमेसाठी Send Your Name To Mars ह्या कॅम्पेन अंतर्गत मंगळावर आपली नावे पाठवण्याची सुवर्णसंधी लोकांना देण्यात आली होती विषेश म्हणजे ह्या मोहिमेला जगभरातुन हौशी आणी इच्छुक 10,932,295 मिलियन्स लोकांनी आपली नावे पाठवून ऊत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता हि नावे नखाच्या आकाराच्या तीन सिलीकॉन Chips वर Electron beam च्या सहाय्याने Stenciled केली गेली असून ह्यातील निवडक नावे Perseverance Mars Rover सोबत मंगळावर पाठवल्या जाणार आहेत ह्या शिवाय ह्या मोहिमे अंतर्गत जाहीर झालेल्या Name The Rover Contest ह्या निबंध स्पर्धेलाही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता त्यातील अंतिम निवडक 155जणांची नावे ही ह्या Chips वर कोरली गेली आहेत

Perseverance Mars Rover च्या क्रॉस बीम वर बसविलेली प्लेट -फोटो -नासा संस्था
ह्या महिन्याच्या सोळा तारखेला हि नावे अल्युमिनियम प्लेटच्या सहाय्याने Perseverance Mars Rover ला जोडण्यात आली हे यान उन्हाळ्यात पृथ्वीवरून मंगळाकडे झेपावल्यानंतर 18 फेब्रुवारी 2021 ला मंगळावरील Jezero Crater ह्या भागात ऊतरेल
पृथ्वीवरील नावाची हि प्लेट मंगळ यानाच्या मागच्या भागातील क्रास बीमच्या मध्यभागी लावण्यात येईल त्यामुळे ती यानावर बसविलेल्या कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसेल शिवाय ह्या क्रॉस बीम मध्ये खास लेजरचा वापर करण्यात आला असून त्या मुळे पृथ्वी व मंगळ एका स्टारने जोडल्या प्रमाणे भासतील Perseverance मार्स रोव्हर मंगळावर आधी गेलेल्या व ऐतिहासिक कामगिरी केलेल्या Pioneer Space Craft आणी Voyagers 1 व 2 ह्या यानाला Tribute देईल कोरोनाच्या संसर्गाचा आणी lock downचा परिणाम नासा संस्थेने ह्या मंगळ मोहिमेवर होऊ न देता काम सुरुच ठेवले असुन 25 मार्चला Rover Atlas V Rocket वर पोहोचवण्याचे काम करण्यात आले Perseverance Mars Rover 2300 पाऊंड(1,043k.g.)वजनाचे असून ते रोबोटिक सायंटिस्ट आहे ह्या यानाद्वारे मंगळभूमीवरील व भुगर्भातील geological माहिती म्हणजेच मातीतील खडक,मिनरल्स केमिकल्सचे नमुने आणि पुरातन सूक्ष्म जीवांचे अवशेष शोधण्याचे काम केले जाईल आणि हे मंगळ यान ते नमुने आणि फोटो पृथ्वीवर पाठवेल त्या नंतर शास्त्रज्ञ ह्या माहितीवर सखोल संशोधन करतील आणी तिथे सजीव सृष्ठी अस्तित्वात होती का ? असल्यास कशी होती हे शोधण्याचा प्रयत्न करतील शिवाय तेथील वातावरण सजीव सृष्टीस पोषक आहे का ?,होते का? त्यात कोणकोणते वायू अस्तित्वात आहेत ,होते ह्याचीही संशोधीत माहीती गोळा करून पृथ्वीवर पाठवणार आहे ह्या संशोधीत माहितीचा ऊपयोग आगामी मानवसहित मंगळ मीशन साठी आणी मंगळावरील मानवी निवासा साठी होणार आहे
ह्या perseverance Mars Rover च्या launching operation testing,robotic arm testing या सारख्या महत्वाच्या आवश्यक बाबीची जय्यत तयारी सध्या नासाच्या Caltech Pasadena येथील J.PL Lab मध्ये व Kennedy Space Center Florida येथे Perseverance Mars Rover launching operation आणी Management टीमचे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ करत आहेत
No comments:
Post a Comment