अंतराळवीर Drew Morgan भावी सैनिकांना स्थानकातुन शपथ देताना फोटो-नासा संस्था
नासा संस्था -
अंतराळवीर Drew Morgan ह्यांनी नुकताच अमेरिकेतील Houston Space Center मध्ये झालेल्या New Army Recruiting Command Ceremony मध्ये लाईव्ह सहभाग नोंदवला आणि स्थानकातून त्यांना देशसेवेची शपथ दिली अंतराळवीर Drew Morgan ह्यांनी US आर्मी मध्ये कर्नल पद भूषविले आहे सध्या ते नासाच्या अंतराळ मोहीम 61 -62चे फ्लाईट इंजिनिअर आहेत
अमेरिकेतील भावी सैनिकांच्या शपथविधीत सहभागी होण्यासाठी वेळ दिल्याबद्दल सुरवातीलाच Brigadier General Patrick Michel ह्यांनी Drew Morgan ह्यांचे आभार मानून संभाषणाला सुरवात केली आम्हाला तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंद होतोय कारण आज पहिल्यांदाच भावी सैनिकांचा Oath Enlistment Ceremony Space मध्ये तुमच्या उपस्थितीत होतेय हा आपल्या देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे कार्यक्रमाला सुरवात कारण्याआधी आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल
Drew Morgan- मी देखील तुमचा आभारी आहे मला हा सन्मान दिल्याबद्दल ! ह्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आभार! नऊ महिन्यांपूर्वी इथे स्थानकात येण्याआधी मी देखील सैनिकच होतो आणि स्पेसमध्ये राहूनही मी देशसेवाच करतोय मी कायम सैनिकच राहीन ! असे सांगून त्यांनी त्यांच्या टी शर्टवरचा आर्मीचा शिक्का दाखवला
अंतराळवीर Drew Morgan त्यांच्या टि शर्टवरील सैनिकाचा शिक्का दाखवताना-फोटो-नासा संस्था
अंतराळस्थानकाला आता वीस वर्षे पूर्ण झाली आहेत सध्या आम्ही तिघे इथे वास्तव्य करतोय आधी नऊ अंतराळवीर होते नंतर आम्ही सहाजण होतो हे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून दूर 250 मैल अंतरावरून ताशी 17000 मैल वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहे दर 90 मिनिटाला आमच स्थानक पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करत आणि आम्ही आता प्रशांत महासागरावरून फिरतोय आपला संवाद संपेल तेव्हा आम्ही US च्या वरून जात असू एक दिवसात आम्ही पृथ्वीभोवती सोळा फेऱ्या मारतो आम्ही इथे अडीचशेच्यावर सायंटिफिक संशोधिक प्रयोग करतोय शिवाय स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आणि देखभालीसाठी Space Walk हि करतो
त्या नंतर Oath ceremony ची सुरवात झाली Drew Morgan म्हणाले मी अठरा वर्षाचा होतो तेव्हा असाच हात वर करून देशसेवेची शपथ घेतली होती आणी आता स्पेसमधुन ह्या शपथविधी समारंभात मी तुुम्हाला शपथ देतोय हा माझ्यासाठीही अविस्मरणीय क्षण आहे कृपया उभे राहून उजवा हात वर करा आणी माझ्या मागोमाग शपथ घ्या! असे साांंगत त्यांनी भावी सैनिकांना देशसेवेची आणी एकनिष्ठतेची शपथ दिली
त्या वेळेस Brigadier Genera Patrick Michael म्हणाले कि,माझ्या तीस वर्षांच्या आर्मीमधील कार्यकाळातील हा अत्यंत अभूतपूर्व आणी ऐतिहासिक क्षण आहे! त्या नंतर त्यांनी अंतराळवीर Drew यांना सांगितले कि काही भावी सैनिकांना त्यांना प्रश्न विचारायचे आहेत तेव्हा Drew ह्यांनी आनंदाने संमती दिली
Amber Cabina - Drew तुम्हाला स्थानकात तुमच्या सोबत एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला न्यायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाला न्याल ?
Drew Morgan - अवघड प्रश्न आहे हा! खरतर आता सध्या मी ज्या अंतराळवीरांसोबत राहतोय ते माझ्यासाठी योग्य आहेत 2013 साली माझी सात अंतराळवीरांसोबत निवड झाली आणि सुदैवाने मला त्यातील तिघांसोबत स्थानकात यायला मिळाल आणि विशेष म्हणजे एका वेळेस आम्ही चौघेही स्थानकात वास्तव्य करून संशोधन करत होतो माझे Classmates खूप छान आहेत त्या मुळे त्यांच्या पैकी कोणासोबतही मला पुन्हा स्थानकात यायला आवडेल
Lindsey Alexander - आर्मी आणि अंतराळवीर होण्यासाठी तुम्ही खूप कठीण आणि कठोर ट्रेनिंग घेतल असेल खूप संघर्षही करावा लागला का ? त्याला तुम्ही कसे सामोरे गेलात आम्हाला तुम्ही काय सल्ला द्याल ?
Drew Morgan - खरच माझा मार्ग सोपा नव्हता खूप कठीण होता तुम्ही Marine,Army,Navy ह्या विभागात कार्यरत होणार आहात जेव्हा तुम्ही Boot Camp मध्ये ट्रेनिंग साठी दाखल व्हाल तेव्हा तिथल्या अत्यंत कठीण आणि कठोर ट्रेनिंग दरम्यान तुमचा धीर सुटेल तुमचे ध्येय डळमळीत होईल तुम्हाला ह्या आर्मी पेक्षाही सोपे कमी त्रासदायक करिअर निवडावे आपण इथे फिट नाही असेही वाटेल पण हा विचार मनात येण म्हणजेच तुम्ही योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहात अस समजा कारण कुठलही ध्येय साध्य करायच तर कठीण संघर्षाला सामोरे जाण त्या साठी अथक परिश्रम करण आवश्यक असत आर्मी किंवा अंतराळवीर होण सोप नसतच पण ध्येय साध्य केल्यानंतरचा आनंद अमूल्य असतो
Ryan Rumple -अंतराळवीर होण्यासाठी कुठल्या Qualification ची आवश्यकता असते?
Drew Morgan - आता ह्या महिन्यातच अंतराळवीरांच्या नवीन Batch ची निवड होणार आहे म्हणूनच आम्ही नुकताच Qualification चा आढावा घेतला अंतराळवीर होण्यासाठी Basic Qualification ची आवश्यकता असते म्हणजे तुम्ही STEM background मध्ये Masters असण आवश्यक आहे सायन्स,Math ,कुठल्याही शाखेतील इंजिनीअर,सायंटिस्ट,डॉक्टर्स ह्यांना प्राधान्य दिल जात नासा संस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची आवश्यकता असते
Cody Colard - तुम्ही करिअर साठी आर्मीचच क्षेत्र का निवडलत ?
Drew Morgan -बहुतेक सगळेच भावी सैनिक कोणाकडून तरी प्रेरणा घेऊन किंवा देशसेवेची भावना घेऊन आर्मीत भरती होतात माझ्या कुटुंबाला आर्मीचा ऎतीहासिक वारसा आहे माझे एक आजोबा नेव्हीत होते तर दुसरे आजोबा आणि चुलत आजोबा सुद्धा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आर्मीत कार्यरत होते माझे वडील Air Force Officer होते ह्या आमच्या घरातील सैन्य परंपरेमुळे माझ्यावर बालपणीच आर्मीचे संस्कार झाले मी संरक्षण दलाच्या प्रत्येक शाखेचे मेरिटस पाहिले त्या मुळे मी प्रभावित होऊन सैन्यदलाकडे आकृष्ट झालो आणि मला सैनिकच व्हायचे हे माझ्या मनावर बिंबल आर्मीच्या करिअर मध्ये खूप वैविध्यपूर्ण आव्हानात्मक काम करायची संधी मिळते हेही मला माझ्या पूर्वजांकडून कळाल इथे संघर्ष आणि परिश्रम करायची तयारी असावी लागते आणि आर्मीत आपल्या कामाप्रती निष्ठा असायला हवी समाधानी असायला हव
Felix Herander - STEM मध्ये इंटरेस्ट असलेल्या Graduates साठी तुम्ही काय सल्ला द्याल ?
Drew Morgan -आपल संरक्षण दल तांत्रिक दृष्ठ्या अत्यंत प्रगत आहे आणि आर्मी मध्ये एक तृतीयांश सैनिक STEM क्षेत्रातील असतात कारण आर्मीला तांत्रिक प्रगती साठी STEM background असलेले ऊमेदवार हवे असतात मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही तुमच्या आवडीच क्षेत्र निवडा आणी STEM मध्ये आवड असेल तर त्या क्षेत्रात जा आणी तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर अवघड विषय आधी शिका शिवाय आर्मी मध्ये
all-rounder ऊमेदवार हवे असतात त्यामुळे Arts,Philosophy,Language ह्या सारख्या शाखेत पारंगत व्हा जितक जास्त ज्ञान मिळवता येईल तितक मिळवा
Matthew Coffey- स्पेसमधल्या वास्तव्यात कशाच आश्चर्य वाटत ?
Drew Morgan- मला ह्या गोष्टीच आश्चर्य वाटत की जेव्हा तुम्ही आमचे सोशल मिडिया accounts बघता तेव्हा तुम्हाला वाटत की,आम्ही कीती आनंदात मजेत आहोत पण ते काही अंशी खर असत नेहमीच नाही कारण ईथल आयुष्य संघर्षरत आव्हानात्मक आहे क्षणाक्षणाला सजग रहाव लागत प्रचंड ताणयुक्त प्रसंगाला सामोरे जावे लागते अशावेळी आम्हाला आमच्या परीवाराची आठवण येते आणी ईथल्या वास्तव्यात मिलीटरीतल्या नोकरीचा काळ आठवतो कारण तेव्हाही सैनिक परीवारापासुन दुर असतो आणी ईथे तर झीरो ग्रव्हिटीत आम्ही सतत तरंगत्या अवस्थेत असतो पण पृथ्वीवर परतल्यावर पुन्हा त्यांची भेट होणार आहेच
Kaiffyn Ncmullen-तुमच्या करीअरमधला सर्वात धक्कादायक प्रसंग कोणता होता? त्याचा तुमच्या वर काय परीणाम झाला?
Drew Morgan- अलीकडेच अशा प्रसंगाला मला सामोरे जावे लागले मी अंतराळवीराच ट्रेनिंग घेत होतो त्या दरम्यान मला दुखापत झाली आणी मी ट्रेनिंगमधे मागे पडलो मला अर्थातच वाईट वाटल पण मला माझे ट्रेनर Pat Forrester ह्यांनी मला समजावल (जे सध्या Astronaut unit चे प्रमुख आहेत ) तुला आता हा काळ खूप कठीण आणी मोठा वाटला तरी भविष्यात तुला हाच वेळ खूप कमी वाटेल तु फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर त्याची आठवण मला एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जाताना नेहमी होते
Shelby Young- अंतराळ स्थानकातील वास्तव्यात आर्मीच ट्रेनिंग ऊपयोगी पडल का?
Drew Morgan- हो निश्चितच! खूप ऊपयोग झाला! U.S Army center मध्ये सैनीकांना अत्यंत खडतर ट्रेनिंग दिल जात त्यामुळे कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सैनिक सक्षम होतात माझा आर्मी मधल्या करीअरचा जास्तीत जास्त काळ ट्रेनिंग मध्ये गेल्यामुळे माझा आत्मविश्वास दृढ झाला माझ मनोधैर्य वाढल कारण ट्रेनिंग खूप कठीण असत तसच अंतराळवीर होण्यासाठीच पण तीथे आमच्या धैर्याची,सहनशीलतेची परीक्षा होते आणी म्हणूनच ईथल्या विपरीत परीस्थितीत आमच शरीर तग धरू शकत आम्ही तरंगत ईथे राहु शकतो
Breanna Aquilla - तुम्ही आर्मीत होतात मग Astronaut होण्याचा निर्णय कसा घेतला ?
Drew Morgan- खरतर मला सैनिक व्हायच होत म्हणून मी सैनिक झालो नंतर Physician आणी नंतर अंतराळवीर झालो आधी सैनिक होऊन देशसेवा केली मग पेशंटची सेवा आणी आता अंतराळवीर होऊन देशसेवा करतोय
Austin Butz- स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत रहातानाचा अनुभव कसा आहे तीथे कुठले प्रयोग करत आहात
Drew Morgan- मी पहिल्यांदा Parabolic Airoplane मध्ये झिरो ग्रॅव्हिटीचा अनुभव घेतला होता आणि आता जुलैमध्ये Rocket मध्ये बसुन ईथे स्थानकात आलो तेव्हापासून झीरो ग्रव्हिटीत रहातोय सुरवातीला अर्थातच त्रास झाला स्थानकात आल्यावर आधी मला वाटल मी ऊलटा लटकलोय आणी पट्ट्याच्या सहाय्याने ईथे तरंगतोय एकदोन दिवस माझा गोधंळ उडाला मग लक्षात आल आपण वरखाली कसही तरंगु शकतो ईकडे तिकडे तरंगत्या अवस्थेत फिरु शकतो मग मी ते एन्जॉय करायला शिकलो हळूहळू सवय झाली आतातर तरंगण एकदम normal झालय
Bradley Everheart- तुमच्या करीअर दरम्यान नेतृत्व गुणाबाबतच तुमच मत काय ?तुम्ही काय सल्ला द्याल
Drew Morgan- निस्वार्थ सेवा देण आणी दुसऱ्यांनाही पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण हे ह्या करिअर मध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या भावी यशासाठीही !
ह्या कार्यक्रमात Drew Morganह्यांची पत्नी,सहकारी भावी सैनिक त्यांचे कुटुंबीय,आणी अंतराळवीर कर्नल Frank Rubio ऊपस्थीत होते शेवटी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन आणी आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली
No comments:
Post a Comment