Saturday 29 February 2020

Jessica Meir ने साधला विद्यार्थ्यांशी स्थानकातून संवाद


            अंतराळ स्थानकातून विद्यार्थोंशी संवाद साधताना Jessica Meir- फोटो-नासा संस्था

नासा संस्था - 20 Feb.
नुकताच स्थानकातून Michigan येथील East Middle School मधील विद्यार्थ्यांशी Jessica Meir हिने संवाद साधला नोव्हेंबर महिन्यात अंतराळवीरांसाठी कार्गोशिप मधून ओव्हन पाठविण्यात आला होता त्या ओव्हनचा स्थानकात कसा उपयोग होतोय,तिथे बनवलेल्या Cookies आणि Chocolate Chips मध्ये ईथल्या पेक्षा वेगळा फरक जाणवला का? ह्या विषयी जाणून घेण्याची विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे त्यांना इतर प्रश्नही विचारायचे आहेत असे तिथल्या Teacher Christopher Dan ह्यांनी सांगितले आणि संवाद साधण्यासाठी वेळ दिल्याबद्दल Jessica चे आभार मानून प्रश्नांना सुरवात केली
- अंतराळवीर स्थानकात कुकीज कसे बेक करतात ?
Jessica -  हे पहा ! माझ्या डोक्यावरील स्थानकाच्या  भागातील रॅक मध्ये ओव्हन फिट केलेला आहे हा नवीन
Zero G Oven  स्थानकाच्या US Lab मध्ये बसविण्यात आलाय आम्हाला कार्गोशिप मधून आलेल्या खाण्याच्या प्रिझर्व्ह फूड पॅकेट सोबत कुकीज Dough असलेल आणि चारी बाजूला अल्युमिनियमच्या पट्ट्या बसविलेले पॅकेट पाठवण्यात आलय ते पॅकेट ओव्हन मध्ये फिट करून आम्ही बेक करू शकतो
Rachel Castle -स्थानकात  बेक झाल्यानंतर कुकीज कसे दिसतात ?
Jessica - खरतर  मी स्वत: कुकीज बेक केले नाहीत पण अंतराळवीर Luca Parmintano ह्यांनी बेक केल्या होत्या आधी सांगिल्याप्रमाणे त्यांनी पॅकेट ओव्हन मध्ये बसवून कुकीज बेक केल्या त्या तयार झाल्यावर तिथे जशा दिसतात तशाच दिसल्या थोढ्याशा फुगीर आणि डार्क कलरच्या आपण घरी बनवतो किंवा बाजारातून आणतो अगदी तशाच!
Arianna - ओव्हनमध्ये पहिल्यांदा बेक करण्यासाठी कुकीज योग्य होते का ? तुमचा अनुभव काय होता  ?
Jessica - 👌हो नक्कीच ! स्थानकाच्या मध्यवर्ती भागात US Lab मध्ये ओव्हन फिट केला आहे आम्ही सतत इथून येजा करत असतो त्यामुळे कुकीज तयार झाल्यावर त्याचा वास आम्हाला आला पृथ्वीवर बाहेरून आत आल कि बेकिंग चा वास येतो तसच घरी बनवलेल्या ताज्या कुकीज खायला सगळ्यांनाच आवडतात इथे तर जास्तच कुकीजचा खमंग वास आला कि पटकन दुधाचा ग्लास घेऊन सोबत कुकीजचा आस्वाद घ्यावा असं आम्हाला झाल
 Lenise - स्थानकात कुकीज बनवताना घरच्यासारखा अनुभव आला का ?
Jessica - मला बेक करायला खूप आवडत मी पृथ्वीवर असताना नेहमी कुकीज muffins बनवते आणि माझ्या ऑफिस मधल्या मित्रांना देते त्या मुळे इथे कुकीज बेक होताना जो वास आला तेव्हा निश्चितच मला घरी असल्यासारख वाटल मला लहानपण आठवल माझी आई उत्कृष्ठ Chef आणी baker आहे ती जेव्हा बेक करायची तेव्हा असा वास यायचा
Steve - स्थानकातील वास्तव्यात सगळ्यात जास्त कशाची आठवण येते काय मिस करता ?
Jessica -मला हा प्रश्न खूपवेळा विचारला गेलाय आणि मी सांगितलय कि मी काहीच मिस करत नाही कारण इथे येऊन राहण वेगवेगळे प्रयोग करण हे माझ स्वप्न होत आणि सुदैवाने ते पूर्ण झालय हे सार अकल्पित आहे इथून पृथ्वीच जिवंत रूप न्याहाळण आकाशातील ग्रहतारे जवळून पाहण सतत तरंगत  राहून अत्याधुनिक संशोधन करतानाचा अनुभव रोमांचक आहे जे केवळ स्वप्नात किंवा कल्पनेत मी पाहू शकले असते ते मी प्रत्यक्षात पाहतेय अनुभवतेय हे सार अचंबित करणार अदभूत वास्तव आहे हे मला तिथे नसत मिळाल मला hiking तसच skiing खूप आवडत तिथे आता बर्फ पडत असेल मला परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत राहायला आवडत पण आता जरी हे शक्य नसल तरी तिथे आल्यावर मला हे सार पुन्हा मिळेलच पण इथले जे नवीन अविस्मरणीय अनुभव मला पुन्हा मिळतीलच अस नाही इथला मी Christina सोबत केलेला स्पेसवॉकचा अनुभव जसा नाविन्यपूर्ण होता ऐतिहासिक होता तसाच इथला झिरोग्रॅविटीतल्या संशोधनाचाही म्हणूनच मी काहीच मिस करत नाही
Taylor - स्थानकातील बेकिंग सारख्या सुविधांमुळे स्पेस ट्रॅव्हल किती सुसह्य होईल ?
Jessica - हो नक्कीच ! मी स्थानकात सात महिन्यांपासून वास्तव्य करतेय अंतराळवीर Andrew Morgan नऊ महिन्यांपासून इथे राहात आहेत Christina तर वर्षभर इथे राहून गेली आणि स्थानकात दीर्घकाळ राहताना मानसिक स्वास्थ निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक असते आणि बेकिंगमुळे आम्हाला घरच्यासारख फीलिंग आल शिवाय आगामी दूरवरच्या चांद्र किंवा मंगळ मोहिमेत अंतराळवीरांना पृथ्वीवरून येणाऱ्या अन्नावर अवलंबून न राहता स्वत: स्थानकात ते बनवता आल तर निश्चितच फायदा होईल म्हणूनच इथे Veggie project राबवल्या जातोय तिथल्यासारखी वातावरण निर्मिती करून भाज्या फळे,फुले आणि धान्य पिकविल्या जातेय आणि त्यात यशही मिळालय मी आले तेव्हा दोन प्रकारचे Lettuce लावले Mizuna Lettuce खूप चविष्ठ असतात मला Lettuce आणि salad खायला खूप आवडत इथे आम्ही दोन वेगवेगळ्या wavelength च्या lights मध्ये त्या वाढवून त्यांच्यावर संशोधन केले शिवाय आम्हाला त्यांचा जेवणात आस्वादही घेता आला इथे पृथ्वीसारखी आजूबाजूला निसर्ग नाही वातावरणही नाही त्या मुळे स्थानकातील कृत्रिम बागेत भाज्या वाढवताना त्यांची निगा राखताना त्यांची वाढ होताना पाहताना आणि त्यांचा स्पर्श अनुभवताना मानसिक शांती मिळते आणि आगामी दीर्घकाळच्या अंतराळ मोहिमांमध्ये हे आवश्यक आहे
Elena -तुम्ही स्पेसस्टेशन मध्ये कसे आलात आणि किती काळ तेथे राहात आहात ?
Jessica - आम्ही कझाकस्थानातील बैकोनूर Cosmodrome येथून सोयूझ यान आणि रॉकेट मधून सहा तासांच्या अंतराळ प्रवासानंतर अंतराळस्थानकात पोहोचलो  माझी अंतराळवीर होण्यासाठी निवड झाल्यावर मी अंतराळ वीरांसाठी आवश्यक ट्रेनिंग घेण्यासाठी Star city मधील Gogarian Cosmonauts training Center मध्ये बरीच वर्ष अत्यंत कठीणआणि कठोर ट्रेनिंग घेतल तिथला माझ्या रशियन सहकाऱ्यासोबत मी घेतलेला सोयूझ यानातील Copilot चा अनुभव  माझ्यासाठी अविस्मरणीय आहे मी मागच्या सात महिन्यांपासून इथे राहतेय मला परतण्याची घाई नाही कारण इथे मी अत्याधुनिक नाविन्यपूर्ण आणी मानवी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन करतेय इथला स्पेसवॉकचा अनुभव थरारक होता म्हणून इथून पृथ्वीवर परतताना मला वाईट वाटेल आणि इथल आयुष्य मी मिस करेन
Solan - स्थानकातून पृथ्वीवरील तुमच्या परिवारासोबत तुम्ही संवाद कसा साधता ?
 पृथ्वीवरील नासा संस्थेतील टीम आमचा आमच्या परिवारांसोबत संपर्क करून देते आणि आमच्या मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यक असत कुकीज,lettuce खाणे जस आवश्यक आहे तसच परिवारासोबत बोलणही  मित्रमैत्रिणींसोबत संवाद साधल्यावर आमच मन ताजतवान होत उत्साह वाढतो आम्ही Skype किंवा Face time वरून Video Call करू शकतो दर आठवड्याला Video Conference द्वारे आम्ही आमच्या घरच्यांशी बोलतो सण ,वाढदिवस किंवा विशिष्ट प्रसंगी आम्हाला video chat साठी जास्त वेळ मिळतो
Taylor -लहानपणापासूनच तुम्ही अंतराळवीर होणार अस ठरवल होत का ? आणि अंतराळवीर नसता झाला तर काय केल असत ?
Jessica - हो ! लहानपणापासूनच मी अंतराळवीर होणार असं मनाशी पक्क ठरवल होत का कोण जाणे पण मला Exploration बद्दल आकर्षण होत निसर्ग निर्माण कसा झाला असावा ह्याच कुतूहल होत मला Biology खूप आवडत त्या मुळे आपल्या आसपासचा  निसर्ग आणि प्राण्याबद्दल एकूणच सृष्ठीतील जैववैविध्या बद्दल जाणून घ्यायच औसुक्य होत मी सायंटिस्ट आहे मी Physiologist पण आहे मी इथे येण्याआधी विपरीत परिस्थितीतील प्राण्यांच्या physiology वर संशोधन करत होते विशेतः खोल पाण्यातील Seal,Emperor Penguins बद्दल तसेच Antartic आणि उंच पर्वतावतील प्राण्यांविषयी सखोल अभ्यास करत होते समुद्राच्या तळाशी किंवा उंच पर्वता वरील वातावरणात oxygenचे प्रमाण अत्यंत कमी असत अशा वेळेस बर्फाच्छादीत पर्वतावरील Penguins किंवा Seal माशाला श्वास घ्यायला त्रास होत नाही का ? हे मला जाणून घ्यायच होत मी केलेल्या सखोल अभ्यासानंतर माझ्या लक्षात आल की,Elephant Penguins विपरीत परिस्थितीत तीस मिनिटे साठवलेल्या श्वासावर जगू शकतो तर Seal मासा दोन तासापर्यंत साठवलेला श्वास वापरू शकतो हे प्राणी इतका वेळ Oxygen कसा साठवून ठेवू   शकतात त्यावर मी संशोधन करत होते
Emily -सामान्य लोक अंतराळात कधी जाऊ शकतील ?
Jessica - आम्ही अंतराळवीर असलो तरीही स्वत:ला आम्ही सामान्यच समजतो आम्हिही तुमच्यासारखेच लहान होतो जगाच्या वेगवेगळ्या देशातून इथे आलो ते एका ध्येयातून इच्छा आणी जिद्द असली तर द्येय साध्य होतच त्यासाठी ध्येयाचा पाठपुरावा करत संघर्ष करण आवश्यक असत सध्या पृथ्वीवरील काही कंपनीज एकत्रितपणे सामान्य माणसांना अंतराळ सफर करता यावी म्हणून प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यशही मिळालय नुकतीच  कमर्शियल यानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती पूर्वी अंतराळ प्रवास खर्चिक होता आता जसजस जास्त कंपन्या हि अंतराळ सेवा पुरवतील तसतसा हा अंतराळ प्रवास स्वस्त होईल आणि भविष्यात सामान्य लोक अंतराळ प्रवास करू शकतील
Danny -तुम्ही स्थानकात वापरत असलेल तंत्रज्ञान पृथ्वीवर काम करत तसच स्थानकातही काम करत का ?
Jessica - हो! दोन्हिकडेही सारखच ऊपयुक्त असत पृथ्वीवर आपण वापरत असलेले Video,Camera Microphone ,Satellite,Transformer,Receiver  ह्या गोष्ठी पृथ्वीसारखच ईथेही काम करतात पण ईथल्या मायक्रो ग्रव्हिटीचा परीणाम काही गोष्टी वर होतो पृथ्वीवर Oven मधून गरम हवा वर येते व हवेची सायकल तयार होते पण ईथे स्थानकात ग्रव्हिटी नसल्याने गरम हवा वर येत नाही त्यामुळे तिथल्या सारखा Oven ईथे चालत नाही ईथे Electrical heating चा ऊपयोग केल्या जातो heating मुळे 350 पर्यंत temperature निर्माण होत मग तिथल्या प्रमाणे इथेही बेकींग करता येते
Congressman Dan  -स्थानकातील वास्तव्यामुळे पृथ्वीबद्दलचा  द्रुष्टीकोन बदलला का? आणी अंतराळ संशोधन महत्वाचे का आहे?
Jessica-मोठा पण खुप छान प्रश्न आहे हा! मानवाला नेहमीच नावीन्याची आणी सृष्ठितील गुढ अनाकलनीय गोष्टी बद्दल औसुक्य आहे त्यामुळेच शास्त्रज्ञ हे गूढ उकलण्यासाठी नवनवे शोध लावतात ईथल्या संशोधनाचा वैज्ञानिक प्रगतीसाठी ऊपयोग होतो शिवाय जे संशोधन पृथ्वीवर करता येत नाहीत ते ईथल्या मायक्रो ग्रव्हिटीत करता येतात आणी अनपेक्षितपणे आपल्याला माहिती नसललेले ऊपयुक्त आणि अचंबित करणारे शोध लागतात ते मानवी विकासासाठी,आरोग्यासाठी ऊपयुक्त ठरतात
पृथ्वीबद्दलचा द्रुष्टीकोन अंतराळात आल्यावर निश्चितच बदलतो ईथुन पृथ्वीकडे पहाताना पृथ्वीच अलौकिक सौंदर्य पाहिल्याच स्वर्गीय सुख मिळत तीच महत्त्व जाणवत सद्यातरी ह्या ब्रम्हांडात सजीव सृष्ठि अस्तित्वात असलेली प्रुथ्वी हा एकमेव अद्वितीय निसर्ग सौंदर्याने नटलेला ग्रह आहे ह्याची जाणीव होते आणी आपण नशीब वान आहोत कारण आपण पृथ्वीनीवासी आहोत ह्याची प्रकर्षाने जाणीव होते शिवाय मानवी आयुष्यासाठी पर्यावरण संरक्षणाची किती गरज आहे हे पटत शिवाय ह्या अमर्याद विशाल विश्वाचा आपण कीती लहानसा भाग आहोत हेही जाणवत 

No comments:

Post a Comment