यवतमाळ -24 मार्च
सध्या राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर झाली आहे पण अत्यावश्यक सेवा व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने आणि भाजी मार्केट ह्यांच्यासाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे
यवतमाळातील दुकाने,मार्केट आणि जनजीवन ह्या संचारबंदीच्या काळात ठप्प झाले आहे लोक घरातच राहात आहेत काल गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता एरव्ही भाजीवाल्यांची गर्दी आणी गोंगाटाने गजबजलेला दत्तचौक आणि आसपासच्या परिसरात पोलिसांच्या कडक अंमलबजावणीमुळेआणी संचारबंदी मूळे गरजेच्या वस्तू आणण्यासाठी दोन दिवसानंतर आलेल्या लोकांची तुरळक वर्दळ दिसून आली भाजी मार्केटला सूट दिली असली तरीही अत्यंत कमी भाजीवाले मार्केट मध्ये भाजी विकण्यासाठी आले अर्ध्याहून अधिक भाजीच्या गाड्या मार्केट मध्ये आल्याच नाहीत संत्री आणि इतर फळविक्री करणारे फळवाले नसल्याने लोकांना फळे मिळाली नाहीत
दत्त चौक आणि आसपासच्या परिसराचा आढावा घेणारा हा व्हिडीओ
व्हिडिओ - पूजा दुद्दलवार -BE(soft) BM.C
किराणा दुकान पोलिसांनी केले बंद
यवतमाळ -25 मार्च
आज गुडीपाडवा असल्याने लोकांनी आर्णी रोड वरील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गर्दी केली पण तिथे झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे पोलिसांनी दुकानदाराला दुकान बंद करण्यास भाग पाडले एरव्ही ह्या मॉल मध्ये नेहमीच गर्दी असते आता संचारबंदीचा काळ वाढल्याने आणि गुढी पाडव्यामुळे लोक सामान खरेदीसाठी दुकानात आले पोलिसांनी त्यांना एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले तरीही लोक ऐकत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी दुकानदारास तंबी देत दुकान बंद पाडण्यास भाग पाडले त्या मुळे लोकांना आवश्यक किराणा व इतर वस्तू न घेताच परतावे लागले
आर्णी रोडवरील एका मेडिकल दुकानात लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून बाहेरूनच कोणते औषध पाहिजे हे विचारून औषध व इतर सामान दिल्या जात होते
आर्णी रोडवरील संचारबंदीच्या काळातील आढावा घेणारा गुढी पाडव्याच्या दिवशीचा हा व्हीडीओ
करोना मुळे सक्तीच्या संचारबंदी मुळे लोक नाईलाजाने घरातच राहण पसंत करीत असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे पण जास्त दिवस लोकांना घरात राहण कंटाळवाण होईल त्या मुळे लोकांना संचारबंदीत एखादा फेरफटका आरोग्यासाठी किंवा आवश्यक सामान आणण्यासाठी सूट देण्यात यावी असे नागरिक खाजगीत म्हणत आहेत शिवाय दुकान बंद केल्यास लोकांनी सामान कसे आणावे हा प्रश्न लोकांना पडतोय
No comments:
Post a Comment