Saturday 30 July 2016

अंतराळ वीरांच्या सुरक्षित आरोग्यासाठी नवीन संशोधन संस्था स्थापीत होणार


       नासाची अंतराळवीरांगना Karen Nyberg अंतराळ स्थानकातील fundoscope ने डोळ्याचा फोटो घेताना
                                                                                                                       फोटो -नासा संस्था
नासा संस्था -30 जुलै
अमेरिकेची नासा संस्था व होस्टन मधील कॉलेज ऑफ मेडिसिन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ वीरांना अंतराळ स्थानकात राहताना व अंतराळ प्रवासादरम्यान होणारया शारीरिक समस्येवर व आरोग्यविषयक अडचणींवर उपाय संशोधित करण्यासाठी  एका नवीन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे
नासाच्या ह्यूमन रिसर्च प्रोग्राम अंतर्गत ह्या नवीन Translational Research Institute संस्थेची स्थापना एक ऑकटोबरला होईल
नासाच्या स्पेस लाईफ व फिजिकल सायन्स रिसर्च अँड अप्लिकेशन ह्या संस्थेचे डायरेक्टर   Marshall Porterfied ह्यांच्या मते  मानवाच्या चांद्र मोहिमे अंतर्गत चंद्रावर गेलेल्या पहिल्या चांद्रयानाच्या
चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंगला ह्या वर्षी 47 वर्षे पूर्ण होतील त्या मुळेच ह्या नवीन संशोधन संस्थेची सुरवात करण्यासाठी हा योग उत्तम जुळून आलाय
हि नवीन संशोधन संस्था विज्ञानाच्या विविध शाखेशी संलग्न असून ह्या संस्थेत मूलभूत संशोधनावर भर दिला जाईल विशेषत: अंतराळवीरांच्या आरोग्याला धोकादायक असणारया आजारावर मात करण्यासाठी हे संशोधन करण्यात येईल ह्या संस्थेत Bench to Space Flight ह्या नवीन मॉडेल पद्धतीचा उपयोग केल्या जाईल ह्या नवीन पद्धतीमुळे कमीवेळेत उपयुक्त संशोधन होईल
नासाच्या 2005 च्या अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणाचा परिणाम अंतराळवीरांच्या आरोग्यावर होतो हे संशोधकांच्या निदर्शनास आले वेटलेस अवस्थेत जास्तकाळ अंतराळ निवासात राहिल्यावर अंतराळ वीरांच्या मेंदूवरील प्रेशरचा दबाव व दृष्टिवर परिणाम होतो 
अंतराळवीर जेव्हा पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांना दीर्घ व जवळच्या दृष्ठीदोषाची समस्या उद्भवते ह्या व इतर समस्येवर अत्याधुनिक उपाय शोधण्याचे प्रयत्न तेव्हापासूनच संशोधक करत आहेत
नासाच्या संशोधकांसोबतच इतर संस्थेतील संशोधकांनाही ह्या संस्थेत संशोधन करता येईल
अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीरांना येणारया समस्येवर उपाय शोधण्यासाठी ह्या नवीन संशोधनाचा उपयोग होईलच  शिवाय अंतराळस्थानकातील निवासादरम्यान त्यांना होणारया  विविध आजारावर आधुनिक उपचार करून ह्या त्रासावर व धोकादायक शारीरिक अडचणींवर मात करता येईल
ह्या संशोधनाचा उपयोग मानवाच्या आगामी मंगळ मोहिमेसाठी व ब्रम्हांडातील दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठीही उपयुक्त ठरेल

  

Thursday 28 July 2016

यवतमाळातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे


                            दत्त चौकातील रस्त्यावरील खड्डे

यवतमाळ -28 जुलै
सध्या यवतमाळ मधील कुठल्याही रस्त्यांवर नजर टाकली कि, खड्डेच खड्डे दिसतात विशेष म्हणजे पावसाळ्या पूर्वी उन्हाळ्यात काही ठिकाणचे रस्ते दुरुस्त करण्यात आले होते आणि आता उशिराने सुरु झालेल्या पावसाला दिड महिने होत नाही तोच आणि दुरुस्तीनंतर तीन चार महिन्यातच ह्या रस्त्यांचे मूळ रूप लोकांना दिसू लागलेय
यवतमाळ येथील दारव्हा रोड ते आर्णी रोड ,वडगावरोड ,दत्तचौक ते जाजु चौक , माईंदे चौक ,वीर वामनराव चौक ,दाते कॉलेज रोड ,तिथून पुढे आर्णी नाक्याकडे जाणारा रोड ,भाजी मंडई ,आठवडी बाजार अशा यवतमाळातील असंख्य रस्त्यांची अशीच दुरावस्था झाली आहे
आर्णी रोडवरील रस्त्याचा तर काही ठिकाणी चुराडाच झालाय सर्वच रस्ते उखडले आहेत जागोजागी रस्त्याचा मुरूम बाहेर पडल्यामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत ,स्पीड ब्रेकरही उखडलेल्या अवस्थेत आहेत काही ठिकाणी लोकांनी ह्या खड्ड्यात गिट्टी ,फरशीचे तुकडे भरल्यामुळे रस्त्यांवरून जाणारे नागरिक रिक्षाचालक ,दुचाकीस्वार ,गाडीवाले ह्या साऱयांनाच थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास त्रास होत आहे
भाजी मंडईच्या  रस्त्यांचे खडकाळ रूप


        
दत्त चौकातून दुभाजकाचा भाजी मार्केट कडे जाणारा रस्तादेखील नुकताच दुरुस्त करण्यात आला होता विशेष म्हणजे दुरुस्ती नंतर हा रस्ता त्यात वापरलेल्या मोठ्या दगड गोटयांमुळे खडकाळ झाला होता त्या मुळे तिथून पायी जाणारया नागरिकांना आपला तोल सावरतच जावे लागत होते त्या रस्त्याचे काम अर्धवट सपाटीकरण न करता तसेच ठेवले होते त्या मुळे आपण रस्त्यावरून चालतोय का एखाद्या खेड्यातील खडकाळ पायवाटेवरून अशी शंका  नागरिकांना येत होती आणि आता तर त्या रस्त्यांची दुरावस्था झालीय तिथे मोठमोठे खड्डे पडलेत त्यातून गिट्टी ,दगड बाहेर आलेत त्या मुळे इथे भाजी घेण्यास येणारया लोकांना हा रस्ता धोकादायक ठरतोय
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर पण रस्त्यांची अवस्था दयनीय

यवतमाळ मधील रस्ते दुरुस्तीसाठी शासनातर्फे कोट्यवधीचा निधी मंजूर झाला होता तशा बातम्याही पेपरमधून प्रकाशित झाल्या होत्या तरीही रस्त्यांचे काम अर्धवट ,निकृष्ठ दर्जाचे का झाले ? हा निधी कोठे गायब झाला? ह्याचा शोध संबंधितांनी घेणे आवश्यक आहे रस्त्यांचे काम करणारे अधिकारी ,कर्मचारी ,नगरसेवक व कंत्राटदार ह्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे त्या साठी आता लोकांनीच जागृत होणे आवश्यक आहे कारण लोकांनीच ह्या नेत्यांना .नगरसेवक ,नगराध्यक्षांना निवडून दिले आहे आता पुन्हा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे ह्या निवडणुकी आधीच लोकांनी ह्या सर्वांना रस्ते दुरुस्त करण्यास भाग पाडावे
                                                                                  फोटो -  पुजा दुद्दलवार (BE Soft & BMC )

Monday 25 July 2016

नासाच्या हबल टेलिस्कोपने शोधले सौरमालेबाहेरील ताऱ्याभोवती फिरणारे दोन ग्रह


                        फोटो -नासा संस्था -सूर्यमालेबाहेरील तारा व त्या भोवती फिरणारे दोन ग्रह

नासा संस्था - 24 जुलै

नासाच्या हबल टेलिस्कोपच्या साहाय्याने टिपलेल्या छायाचित्रामुळे खगोल संशोधकांना आपल्या सूर्यमाले बाहेरील दोन पृथ्वी सारख्या वातावरण असण्याची शक्यता असलेल्या नवीन ग्रहांचा शोध लागला आहे
Trappist- 1 b व Trappist- 1 c  असे नाव असलेले हे दोन पृथ्वी सदृश्य भासणारे ग्रह पृथ्वीपासून जवळपास चाळीस प्रकाशवर्ष दूर असून ताऱ्याचे वय अंदाजे पाचशे दशलक्ष असावे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे  हे दोन ग्रह सूर्यमालेबाहेर एका लाल रंगाच्या सूर्यापेक्षा लहान व सूर्यापेक्षा थंड अशा छोटया ताऱया भोवती फिरत आहेत 
ह्या ग्रहांच्या शोध पहिल्यांदा 2015 साली इसाच्या खगोल संशोधकांनी लावला चिली मधल्या La Silla Observatory येथील Belgian Robotic दुर्बिणीच्या साहाय्याने संशोधकांनी केलेल्या निरीक्षणामुळे ह्या ग्रहांचा शोध लागला
Trappist-1 b ह्या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती एक परिक्रमा करण्यास दिड दिवस तर Trappist -1 c ह्या ग्रहाला एक परिक्रमा करण्यास अंदाजे अडीच दिवस लागतो 
चार मेला हे दोन्ही ग्रह त्यांच्या ताऱ्यासमोरून काही मिनिटांच्या फरकांनी परिक्रमा करत असतानाचा क्षण खगोल संशोधकांनी अचूक पकडला कारण असा योग दर दोन वर्षातून एकदाच येतो ह्या ग्रहाच्या वातावरणातुन फिल्टर होऊन आलेल्या प्रकाशाचे त्यांनी मोजमाप केले त्याचे रासायनिक पृथ:करण अजून पूर्ण व्हायचे असले तरीही तिथल्या वातावरणात हायड्रोजनचे प्रभुत्व नसल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केलाय जर वातावरणात हैड्रोजन व हेलियमचे प्रमाण जास्त असले तर जीवसृष्टी अस्तित्वात असू शकत नाही कारण अशा वातावरणात सजीव गुदमरुन मरू शकतात त्या मुळेच तिथे जीवसृष्ठी असावी अशी शक्यता संशोधकांना वाटतेय
ह्या ग्रहांचे त्यांच्या ताऱ्यापासूनचे अंतर पृथ्वीचे सूर्यापासून असलेल्या अंतरापेक्षा वीस ते शंभर पटीने कमी असून तो तारा सूर्या एवढा प्रखर तळपता नाही ह्या ग्रहांवर समशीतोष्ण वातावरण असल्यामुळे Trappist -1c वर खासकरून पाणी असण्याची शक्यता संशोधकांना वाटतेय
संशोधकांच्या एका चमूने Julien de Wit (MIT  Combridge) ह्याच्या नेतृत्वात दुर्बिणीच्या फिल्ड कॅमेरा 3 चा वापर करून ग्रहांच्या वातावरणातुन येणाऱ्या प्रकाश किरणांचे इन्फ्रा रेड लाईट मध्ये निरीक्षण केले या प्रकाशकिरणांचे Spectroscopy द्वारे पृथ:करण करून त्यांनी ग्रहांवरील वातावरणातील रासायनिक घटक शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा  त्यांना त्यात हैड्रोजन व हेलियमचे प्रमाण कमी प्रमाणात असल्याचे आढळले त्यामुळेच त्यांची तिथे जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता बळावली
अर्थात हे सध्याचे प्राथमिक निरीक्षण आहे आगामी काळात ह्या ग्रहांचे सूक्ष्म व सखोल निरीक्षण संशोधक करतील आणि त्या नंतरच ह्या दोन्ही ग्रहांचे पृष्ठभाग खडकाळ आहे का ? तिथे पाणी अस्तित्वात आहे का? तेथील वातावरण सजीवांना जिवंत राहण्यासाठी पोषक आहे का?  पृथ्वी व शुक्राप्रमाणे तेथील वातावरण विरळ आहे का? तिथल्या वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड ,ओझोन ,मिथेन व पाण्याच्या वाफेचे अंश आहेत का?  ह्याचे सखोल संशोधन केल्यानंतरच तिथे जीवसृष्ठी अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतील असे मत संशोधक व्यक्त करतात



Thursday 21 July 2016

नासाचे संशोधक साजरा करताहेत Vikingचा चाळिसावा वाढदिवस

नासाचे  पहिले  Viking यान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लॅन्ड झाले -फोटो नासा संस्था



                        मंगळ ग्रहावरील Viking यान व मंगळाचा पृष्ठभाग -फोटो नासा संस्था 

   नासा संस्था -18 जुलै
अमेरिकेच्या नासा संस्थेने मंगळमोहीमेद्वारे पहिल्यांदा Viking यान मंगळ ग्रहावर पाठवले होते त्या ऐतिहासिक  यशस्वी घटनेला वीस जुलैला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत 

त्याचा आनंद साजरा करण्यासाठी ह्या मंगळमोहिमेशी संबंधीत नासाचे संशोधक 19-20 जुलैला (अमेरिकन तारीख )Viking चा चाळिसावा वाढदिवस साजरा करीत आहेत  ह्या वाढदिवसाच्या आयोजना सोबतच चर्चासत्रही आयोजित केले गेले आहे
अमेरिकेने मंगळाच्या दिशेने सोडलेले Viking यान वीस जुलैला 1976 साली सकाळी  8वाजून 12 मिनिटाला मंगळावर सुखरूप पोहोचले होते  Viking च्या चाळीसाव्या वाढदिवसाच्या ह्या कार्यक्रमात 

ह्या मंगळ मोहिमेशी व आगामी मंगळ मोहिमेशी संबंधीत  नासाचे संशोधक ,तंत्रज्ञ ,अभियंते व इतर मेम्बर्स सहभागी झाले आहेत शिवाय नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजीचे असोसिएट Administrator Steve Jurczyk व मंगळ मोहिमे संबंधित माहितीपर व काल्पनिक मानवी मंगळ निवासावरील  Martian कादंबरीचे लेखक Andy Weir हे देखील सहभागी झाले आहेत ह्या कार्यक्रमात जवळपास वीस वक्त्यांच्या परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे
एकोणीस व वीस जुलैला साजरा होणाऱया ह्या कार्यक्रमात नासाच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे इतिहासकार Roger Launius ह्यांनी नासाच्या ऐतिहासिक Viking मंगळ मोहिमेबद्दल माहिती दिली Martian कादंबरीचे लेखक Andy Weir हे मंगळ ग्रहावरील भावी मानवी निवासाबद्दल बोलले तर नासाचे मुख्य संशोधक Ellen Stofan ह्यांनी  Exploration of Marsबदल माहिती दिली
1976च्या वीस जुलैला  Viking 1  हे यान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हाचे हे छायाचित्र आहे त्याच वर्षी  सप्टेंबर मध्ये Viking 2 हे ऑर्बिटर मंगळ ग्रहाभोवती फेरया मारू लागले ह्या दोन मंगळ मोहिमांमुळे संशोधकांना मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाची रचना ,तिथले खडक तिथे पूर्वी पाणी वाहात असल्याच्या ,डोगर ,दऱ्या ,पाण्याचा आटलेला नदी प्रवाह व तिथल्या गोळा केलेल्या माती व खडकातील मिनरल्स मुळे तिथे पूर्वी असलेल्या सजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडल्या आहेत
आता नासाचे संशोधक मंगळ ग्रहावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहेत 



Wednesday 20 July 2016

नासाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेय अत्याधुनिक 2020 मार्स रोवर

                                                      नवीन 2020 मार्स रोवर             फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 20 जुलै
नासाच्या तंत्रज्ञांनी  2020  सालीच्या मंगळ मोहिमेसाठी अत्यंत कठोर परिश्रम करून व आधुनिक तंत्रज्ञान वापरून  विकसित मार्स रोवर तयार केले आहे व हे मार्स रोवर 2020 सालीच्या उन्हाळ्यात पृथ्वीवरून अंतरिक्ष यानातून मंगळ ग्रहावर पाठवले जाईल व 2021 च्या फेब्रुवारीमध्ये ते मंगळ ग्रहावर पोहोचेल
हे सहाचाकी मार्स रोवर आधीच्या 2012 सालच्या मंगळ मोहिमेतील Curiosity रोवर सारखे दिसत असले तरी त्यात अनेक सुधारणा केल्या आहेत ह्या नवीन 2020 मार्स रोवरचा खर्च व धोका कमी करण्यासाठी त्याचे बाह्यरूप आधीच्या मंगळ मोहिमेतील Curiosity सारखेच ठेवले आहे मात्र आधीच्या मार्स रोवर मध्ये नसलेल्या अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणाचा व सुविधांचा त्यात समावेश केला आहे
हे  मार्स रोवर त्याला असलेल्या आधुनिक रोबोट आर्म,सेन्सर व कॅमेऱ्याच्या साहाय्याने अशा ठिकाणाचा शोध घेईल जिथे आधी जीवसृष्ठी अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतील नवीन Range ट्रिगरमुळे रोवरचा वेग व दिशा ह्यांचे नियंत्रण करता येईल रोवर वरील कॅमेरा व मायक्रोफोनचा संच मंगळावरील पूर्वी न पाहिलेले दृश्य टिपेल व आवाज रेकॉर्ड करेल व पृथ्वीवरील संशोधकांना ऐकवेल 
मंगळावर मानवाला जाण्यासाठी व राहण्यासाठी आवश्यक वातावरण त्या ठिकाणी आहे का ? असल्यास मानवाला आवश्यक असलेले ऑक्सिजनचे योग्य प्रमाण व अस्तित्व तिथे आहे का? असे मानवाला पूरक वातावरणाचे ठिकाण रोवर तिथे शोधेल
तिथल्या वातावरणात पॅराशूट कसे उघडते ते अजूनही कोणी पाहिले नव्हते पण आता ते पाहायला मिळेल मार्स रोवरच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने रोवरचे मंगळाच्या पृष्ठभागावरील लॅण्डिंगचे ठिकाण दिसेल त्या मुळे नकाशाच्या साहाय्याने ते ठिकाण योग्य आहे की नाही हे शास्त्रज्ञांना ठरवता येईल व ते ठिकाण पाहिजे तेव्हा त्यांना बदलताही येईल
मायक्रोफोनमुळे पहिल्यांदाच मंगळावरील आवाज ऐकण्याची सुवर्णसंधी संशोधकांना मिळणार आहे
नासाच्या 2008 च्या Phoenix Mars Lander  ह्या आधीच्या मंगळ मोहिमेतही मायक्रोफोन होते पण त्याचा   प्रत्यक्ष वापर करण्यात आला नव्हता आता नवीन रोवर मधल्या मायक्रोफोनचा मात्र उपयोग होईल असे नासाच्या 2020 मंगळ मोहिमेचे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर Matt Wallase ( JPL ) ह्यांना आशा वाटतेय
ह्या नवीन मार्स रोवर मध्ये ड्रिल मशीन बसवलेली असून त्या द्वारे मंगळावरील पृष्ठभागातील दगड फोडून व माती खणून मिनरल्सचे नमुने गोळा केल्या जातील व अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या सुविधेमुळे तिथल्या दगडाचे छायाचित्र पाहून त्याचा प्रकार ठरवता येईल संशोधकांना आवश्यक असलेल्या प्रकाराचा खडक शोधून त्याचे जवळून निरीक्षण ह्या मुळे करता येणार आहे
रोवरच्या रोबोटिक हाताने हे नमुने गोळा करून तिथे असलेल्या रॅक मधील जवळपास तीस सॅम्पल टयूब मध्ये व्यवस्थित भरून सील केल्या जातील व पृथ्वीवर आणले जातील ह्या नमुन्यावर नासाच्या प्रयोग शाळेत पृथ:करण करून सखोल संशोधन केल्यानंतर संशोधकांना मंगळावर खरेच जीवसृष्ठी अस्तित्वात होती की नव्हती ह्या गोष्ठीचा आणखी सबळ पुरावा मिळेल
एकदा का ह्या मोहिमेला अंतिम मंजुरी मिळाली की,मार्स रोवरची टेक्निकल व प्रोग्रॅमॅटिक review प्रोसेस साठीच्या KDP ह्या कठीण चाचणीचे चार टप्पे यशस्वीपणे पार करावे लागतील ज्यात concept पासून टेस्टिंग पर्यन्तच्या सर्व बाबींचा समावेश असेल
मार्स 2020 मंगळ मोहिमेचे प्रोग्रॅमर व नासाच्या वॉशिंग्टन येथील मुख्यालयाचे Executive GeorgeTahu (JPL) ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार मार्स 2020 रोवरचे  डिझाईन Curiosity सारखेच ठेवून स्पेस हार्डवेअर देखील बरेचसे सारखेच वापरण्यात आले आहेत त्या मुळे रोवरने पहिला व दुसरा टप्पा यशस्वीपणे पार केला असून आता त्याचा तिसरा टप्पाही पार पडला आहे त्या मुळे 2020 मार्स रोवर शेवटच्या चवथ्या व अंतिम चाचणीकडे वाटचाल करत आहे
हि  2020 मार्स रोवर मोहीम नासाच्या मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्रॅमचाच एक भाग आहे सद्या यात दोन अक्टिव्ह रोवर व तीन यानांचा समावेश आहे 2018 मध्येही एक स्थिर लॅण्डर पाठवण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे ह्या मुळे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाखालील अंतर्गत भागाचीही सखोल माहिती मिळेल   
हे संशोधन आगामी मंगळ मोहिमेसाठी महत्वाचा टप्पा ठरेल शिवाय नवीन संशोधित माहिती आगामी मानवाच्या मंगळ यात्रेसाठी व त्याच्या तिथल्या भविष्यातील निवासासाठी मैलाचा दगड ठरेल

Saturday 16 July 2016

रशियन कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळस्थानकात जाणार

 
                                                           फोटो -नासा संस्था
      नासा संस्था -15 जुलै
सोळा जुलैला रशियन Progress 64  हे  कार्गो स्पेस क्राफ्ट कझाकस्थानातील बैकोनूर इथल्या कॉस्मोड्रोमवरून अंतराळस्थानकाकडे झेपावणार आहे
ह्या Progress 64 स्पेस क्राफ्ट मधून अंतराळवीरांना लागणारे तीन टन वजनाचे अन्न ,इंधन व आवश्यक इतर साहित्य पाठवले जाणार आहे हे कार्गो स्पेस क्राफ्ट शनिवारी सोळा जुलैला कझाकस्थान मधल्या बैकोनूर येथून संध्याकाळी 5.41m नीं अंतराळस्थानकाकडे उड्डाण करेल आणि 18 जुलैला अंतराळस्थानकाशी जोडले जाईल तिथे ते साधारण सहा महिने राहील आणि जानेवारीत पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल
ह्या  रशियन Progress 64  कार्गो स्पेस क्राफ्टच्या अंतराळस्थानकाकडे होणारया उड्डाणाचे नासा टी वी वरून लाईव प्रक्षेपण केल्या जाईल 

Saturday 9 July 2016

यवतमाळात आठवडाभरात भरपूर पाऊस पाणी मात्र आठ दिवसातून एकदाच

 यवतमाळ -9 जुलै

पावसाची यवतमाळात आठ दिवस उशिराने पण दमदार सुरवात झाली असून जूनमध्ये सुरू झालेला पाऊस आज नऊ जुलै पर्यंत कधी तुरळक तर कधी जोरदार बरसला गेल्या आठ दिवसापासून तर पावसाची सततधार सुरू आहे गुरुवारी थोडा वेळ उसंत घेतलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळ पासून अखंड बरसणे सुरू केले असून तो दिवसातून दोनदा मुसळधार बरसला आणि ह्या आठवड्यातही अनेकदा पावसाचा जोर वाढला त्या मुळे विदर्भातली आणि यवतमाळ जिल्यातली धरणाची पाणी पातळी वाढली आहे

तरीही पाणी पुरवठा आठवडयातून एकदाच

गेले दीड महिने यवतमाळकर पाणीटंचाईची झळ सोसत असून आता पाऊस भरपूर पडत असताना तरी पाणी टंचाईतून मुक्तता मिळावी अशी रास्त अपेक्षा यवतमाळचे नागरिक व्यक्त करत आहेत ह्या महिन्यात बरेचदा बाहेर धो,धो, पाऊस बरसत असताना घरातील नळाला मात्र पाणी नाही अशी अवस्था होती 
शिवाय पाणीटंचाईने त्रस्त नागरिक पाणी पुरवठा विभागात फोन करतात तेव्हा तो कधीच उचलल्या जात नाही पाणी अनियमित तेही कमी दाबाने येते त्या मुळे पाणी भरण्यात गृहिणींचा दिवसभर वेळ जातो शिवाय आठ दिवस पाणी येणार नसल्यामुळे पाणीसाठा आठ दिवस पुरेल एव्हढा  करावा लागतो उन्हाळ्यात धरणातील अत्यल्प पाणीसाठयामुळे लोकांनी पाणीपुरवठा विभागाला साथ दिली पण आता पाऊस सतत बरसत आहे तेव्हा आता तरी पाणी पुरवठा नियमित व्हावा अशी मागणी यवतमाळकर करत आहेत

निधी  मंजूर पण नियोजनाचा अभाव 

पाणी टंचाईच्या निवारणासाठी शासनाने निधी मंजूर केल्याची बातमी मिळाली असली तरीही अजूनही पाणी टंचाई आहेच!  एका टाकीवरच अनेक विभागात पाणीपुरवठा करण्याचा भार असल्याचे सांगितले जाते मग जास्तीच्या पाणीटाक्या का बांधल्या गेल्या नाहीत ? काही टाक्यांचे बांधकाम अर्धवटच का राहिले? पाणिपुरवठा करणारया पाईपलाईन सतत का फुटतात? आलेला निधी कोठे गायब होतो ? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले असून संबंधितांनी ह्या बाबतीत लोकांच्या प्रश्नांचे निरसन करावे पाणी अजूनही गढुळच येते पाणी गाळून घेतले तरी त्यात माती राहातेच पाण्यातून तुरटी फिरवली की ही माती टाकीच्या तळाशी जमते सध्या पावसाळा सुरू असून असे पाणी निरोगी लोकांच्या आरोग्यालाच अपायकारक असताना ज्यांना विविध आजार आहेत त्यांच्यासाठी असे पाणी पिणे किती घातक ठरू शकते ह्याचा विचार करून पाणी व्यवस्थित शुद्ध होते की नाही हेही संबंधितांनी पाहणे आवश्यक आहे निवडून येण्याआधी दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देणारे नेते अजूनही आठ दिवसांचं पाणी चार दिवसांनी सोडण्यात येणार म्हणून आश्वासन देतात पण आधी म्हटल्या प्रमाणे बाहेर धो,धो, पाऊस आणि घरातल्या नळांना पाणी नाही अशी परिस्थिती  का आहे ? विषेश म्हणजे मुसळधार पाऊस पडत असताना अंगणात बादल्या ठेऊन व पाणीटाक्यांचे झाकण उघडे ठेऊन त्यात जमलेले पाणी घरात वापरून लोक पाणीटंचाईवर मात करत आहेत 
सध्या नागरिक शांत असले तरी ते जागृत झाले की कसा उद्रेक होतो हे नुकतेच यवतमाळकरांनी दाखवून दिले आहे तेव्हा लवकरात लवकर आलेला निधी पाणीटंचाई निवारण्यासाठी वापरून लोकांना नियमित पाणीपुरवठा करावा अशी यवतमाळकरांची रास्त मागणी आहे हि बातमी लिहताना यवतमाळ येथे पाऊस बरसत आहेच 

Thursday 7 July 2016

नासाच्या तीन अंतराळवीरांची अंतराळस्थानकाकडे यशस्वी झेप

Takuya Onishi (Japan Aerospace)   केट रुबिन्स (नासा )Anatoly Lvanishin  (Roscosmos ) 
अंतराळ प्रवासाला जाताना
                विकसित M S-01 ह्या सोयूझ यानातून अंतराळवीर अंतराळाकडे झेप घेताना

नासा संस्था -7 जुलै
अमेरिका,जपान आणि रशियाच्या तीन अंतराळवीरांना घेऊन नवीन विकसित M S-01 ह्या सोयूझ यानाने बुधवारी सहा जुलैला नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी अंतराळ स्थानकाकडे यशस्वी झेप घेतली आहे सोयूझ यानाने कझाकस्थानातील बैकानूर मधून अंतराळात उड्डाण केले त्याच्या या उड्डाणाच्या ऐतिहासिक क्षणाचे नासा टी वी वरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले
मानवाच्या अफाट कर्तृत्वाने आणि तंत्रज्ञानाच्या आश्चर्यकारक प्रगतीमुळे प्रेक्षकांना घरबसल्या ह्या सोयूझ उड्डाणाचा आणि अंतराळवीरांच्या स्थानकाकडे प्रयाणाचा रोमांचकारी थरार अनुभवता आला
शिवाय अंतराळवीर होण्याआधी व नंतरचे अंतराळवीरांचे अथक परिश्रम व त्यांना द्यावी लागणारी कठोर चाचणी पाहता आली अंतराळातील कठीण परिस्थितीत व प्रतिकूल वातावरणात राहून मानवी आरोग्याशी निगडित पृथ्वीवासीयांसाठी व सृष्टीसाठी उपयुक्त असे संशोधन हे अंतराळवीर कसे करतात हेही जाणुन घेता आले
आता  केट  रुबिन्स (नासा ), Anatoly Lvanishin  (Roscosmos ) व  Takuya Onishi (Japan Aerospace) हे तीन अंतराळवीर दोन दिवसांनी नऊ जुलैला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी स्थानकात पोहोचतील तिथे त्यांचे सुधारित सोयूझ यान स्थानकाच्या Rassvet मोड्युलला जोडले जाईल आणि अडीच वाजता त्यांचा स्थानकात प्रवेश होईल तेव्हा आधीच्या बातमीत दिल्या प्रमाणे नासाचे स्थानकात राहात असलेले तीन अंतराळवीर त्यांचे स्वागत करतील  नंतर सहाहीजण मिळून तिथे सुरू असलेल्या अडीचशेहून अधिक प्रयोगात सहभाग नोंदवतील  Biology, Earth science, Human research,Physical Science आणि  technology ह्या विषयांवर स्थानकात संशोधन सुरू आहे
ह्या मोहीम 48 च्या अंतराळवीरांवर नासाने नवीन संशोधित केलेले International Docking Adapter receive करून ते Install करण्याची जबाबदारी सोपवली आहे हे Adapter आगामी काळात स्थानकात जाणारया स्पेस क्राफ्ट साठी उपयुक्त ठरेल
अंतराळ स्थानकातील मानवी निवासाला आता जवळपास पंधरा वर्षाहून अधिक काळ झाला आहे ह्या काळात संशोकांनी स्थानकात अनेक उपयुक्त संशोधन करण्यात यश मिळवले आहे हे संशोधन पृथ्वीवर करणे अशक्य होते त्यांनी गोळा केलेल्या माहितीचा आणि संशोधनाचा उपयोग आगामी अंतराळ मोहीम विशेषतः मंगळ मोहिमेत मानवी निवासासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल तसेच रोबोटिक एक्सप्लोरेशन साठीही उपयुक्त ठरेल अशी शात्रज्ञाना आशा आहे
सध्या हे तीनही अंतराळवीर सोयुझच्या सुधारित यानाने अंतराळात प्रवास करत असून त्यांनी आतापर्यंत  कित्येक की.मी.चे अंतर पार केले आहे ते जेव्हा स्थानकात पोहोचतील तेव्हा त्या क्षणांचे नऊ जुलैला नासा टीव्ही वरून  लाईव्ह प्रक्षेपण केल्या जाईल
केट रूबिन्स आकटोबर मध्ये व Anatoly  व Takuya  हे दोघे सप्टेंबर मध्ये पृथ्वीवर परततील
फोटो सौजन्य- नासा संस्था 

Wednesday 6 July 2016

नासाचे तीन अंतराळवीर आज अंतराळस्थानकात राहण्यासाठी रवाना होणार

           नासाची अंतराळ वीरांगना  काटे रूबिन्स ,रशियाचे अंतराळवीर Anatoly Lavanishin व जपानचे Takuya                       Onishi  -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 6 जुलै
नासाच्या अंतराळ मोहीम 48-49 चे तीन अंतराळवीर आज अंतराळ स्थानकात राहण्यासाठी रवाना होणार आहेत
नासाची अंतराळ वीरांगना केट रूबिन्स ,रशियाच्या Rosmos चे अंतराळवीर Anatoly Lavanishin आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे Takuya Onishi  हे दोन अंतराळवीर आज कझाकस्थान येथील बैकोनूर येथून संध्याकाळी 9.36 वाजता सोयूझ MS-01ह्या सुधारित अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकाकडे झेप घेतील या यानाच्या सुधारित सिस्टीमच्या दोन दिवसांच्या चाचणी नंतरच ते अंतराळस्थानकात पोहोचतील ह्या दरम्यान सोयूझ पृथ्वीच्या कक्षेत 34 फेऱया मारेल शनिवारी नऊ जुलैला  12.12 मिनिटांनी सोयूझ अंतराळ स्थानकात पोहोचेल दुपारी 2.50 मिनिटाला त्यांचे यान अंतराळस्थानकाला जोडले जाईल अंतराळ स्थानकात सध्या निवास करत असलेले नासाचे अंतराळवीर व मोहीम 48 चे कमांडर जेफ विल्यम्स Rosmos चे फ्लाईट इंजिनीअर Oleg Skripochka आणि Alexey Ovchinin  स्थानकात त्यांच्या स्वागताला हजर असतील हे सहा अंतराळवीर मिळुन अंतराळ स्थानकात सध्या सुरू असलेल्या सायन्स विषयक व इतर बाबींवर सखोल संशोधन करतील
अंतराळ प्रवासाची अशी केली तयारी 
ह्या अंतराळवीरांना ह्या मोहिमेत सहभागी होण्याआधी व आता अंतराळस्थानकात जाण्याआधी आवश्यक असलेल्या शारीरिक व मानसिक चाचणीला सामोरे जावे लागले त्यांची फिटनेस चाचणी घेण्यात आली
त्यांनी काल अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाचा व ज्यूनोच्या गुरुकक्षा प्रवेशाचा आंनद साजरा केला त्यांनी टेबलटेनीसचाही आनंद घेतला नंतर त्यांचे अंतराळवीरांचा पोशाख घालुन चेकिंग करण्यात आले त्यांना एकाग्रतेचे धडे देण्यात आले शिवाय त्यांना यानातील कमी जागेत बसण्याची चाचणी घेण्यात आली त्या साठी त्यांना एका विशिष्ट खुर्चीत बसवण्यात आले ,त्यांना एका फिरत्या खुर्चीवर बसवून ती खुर्ची ठराविक काळ वेगाने फिरवण्यात आली ह्या सर्व चाचणीतून ते फिट असल्याचा निर्वाळा मिळताच ते अंतराळ प्रवासासाठी सज्ज झाले
ह्या तिन्ही अंतराळवीरांनी वृक्षारोपणाचाही आनंद घेतला आणि ह्या नंतर अंतराळस्थानकात येणारया मोहीम 49 च्या अंतराळवीरांसोबत ग्रुप फोटोही काढला
     सोयूझ MS -01 चीही चाचणी 
सोयूझ MS -01 ह्या  सुधारित अंतरिक्ष यानाच्याही जाण्याआधी वेवेगळ्या स्थरावर आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या नंतर हे यान रेल्वेने कझाकस्थानातील बैकोनूर कास्मोड्रोम च्या लाँच पॅड वर पोहोचवण्यात आले त्यांच्या ह्या अंतराळ स्थानकाच्या प्रवासाचे  नासा T.V. वरून प्रक्षेपण केल्या जाईल
रुबिन्स केट विषयी 
रुबिन्स केट हि पहिलीच अंतराळ्वारी  आहे तिची ह्या अंतराळ मोहिमेसाठी 2009 साली निवड झाली होती रुबिन्स अमेरिकेतील कनेक्टिक्युट मधल्या फार्मिंगटन इथे जन्मली आणि कॅलीफोर्नियाच्या नापा मध्ये वाढली सन डियागो युनिव्हरसिटी मधून तिने Bsc molecular boilogy आणि stanford युनिव्हरसिटी मधून कॅन्सर Biology त Phd  केले आहे त्या आधी ती अमेरिकेच्या आर्मी मेडिकल रिसर्च Institute मध्ये कार्यरत होती तिथे तीने  संसर्गजन्य रोगांच्या संदर्भातील  संशोधनात सहभाग नोंदविला देवी रोगाच्या प्रसारावर नियंत्रण व प्रतिबंध ह्या संदर्भातील पहिले मॉडेल विकसित करण्यात तिचा महत्वपूर्ण सहभाग होता चौदा संशोधकांच्या संसर्गजन्य रोग नियंत्रण संशोधन चमूची ती प्रमुख होती त्यांनी सेन्ट्रल आफ्रिका व पश्चिम आफ्रिकेतील इबोला व monkey pox ह्या  संसर्गजन्य रोगाचे जीवाणू आणि त्यांचे अनुवंशिक दुष्परिणाम ह्या बाबतीत महत्वपूर्ण संशोधन केले आहे तिला रशियन म्युजिक ऐकायला आवडते
अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर  हे तिघेही तिथे आधीच वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांसोबत राहतील रुबिन्स अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत कमी गुरुत्वाकर्षाणाचा मानवी आरोग्यावर विशेषत: जीन्स ,हाडांच्या वस्तुमानातील बदल  हृदय ,रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरणातील अवकाशातील वातावरणात होणारे बदल ह्या संदर्भात सखोल संशोधन करणार आहे तसेच भौतिक विज्ञान ,पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान ,तंत्रज्ञान आणि विकास कामे ह्या संदर्भातही हे संशोधक संशोधन करतील अक्टोबर मध्ये तिचा अवकाश स्थानकातील संशोधनात्मक कार्यकाळ पूर्ण करून रुबिन्स तिच्या दोन सहकारी अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर परतेल

Tuesday 5 July 2016

नासाच्या ज्यूनो अंतरिक्ष यानाचा गुरूच्या कक्षेत यशस्वी प्रवेश



        गुरु ग्रहांजवळील ज्यूनो अंतरिक्ष यान  फोटो - नासा संस्था

                    नासाच्या संस्थेतील आनंद व्यक्त करणारे संशोधक - फोटो नासा संस्था

नासा संस्था -5 जुलै
     नासाच्या ज्यूनो अंतरिक्ष यानाने तब्बल पाच वर्षाच्या अंतराळ प्रवासानंतर 
     चार जुलैला अखेर गुरूच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे 
गेल्या पाच वर्षांपासून पृथ्वीवरून गुरु ग्रहाकडे अंतरिक्षात अखंड प्रवास करत असलेल ज्यूनो अंतरिक्ष यान गुरूच्या कक्षेत सुखरूप पोहोचल्याचा संदेश नासा संस्थेतील संशोधकांना प्राप्त होताच त्यांनी आनंदान जल्लोष केला अखेर त्यांच्या पाच वर्षांच्या कठोर परिश्रमाला मिळालेल यश होत ते! गेले पाच वर्ष ते ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते कारण ह्या आधी गुरु ग्रहावर गेलेल ह्या आधीच अंतराळ यान काही तासातच नष्ट झालं होत चार जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्य दीन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना हे संशोधक मात्र नासाच्या लॅब मध्ये बसुन ज्यूनोच गुरु ग्रहावरील कक्षेत शिरण आणि तिथे स्थिराऊन गुरु भोवती भ्रमण करण ह्याच निरीक्षण करत होते
पृथ्वीवर रात्री आठ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ज्यूनोन गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल्याची बातमी मिळताच नासाचे प्रमुख चार्ली बोल्डेन आनंदित होऊन म्हणाले की आजच्या ऐतिहासिक घटनेमुळे अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात आता ज्यूनोच्या गुरु ग्रहाच्या कक्षा प्रवेशाच्या यशाची भर पडलीय त्या मुळे आमचा आनंद द्विगुणित झालाय
नासाचे संशोधक व ज्यूनोचे प्रिन्सिपल इन्वेस्टीगेटर स्कॉट बोल्टन देखील आपला आनंद व्यक्त करताना  म्हणाले आम्ही आज जरी खिडकीही नसलेल्या बंद खोलीत असलो तरी आमचा आनंद शब्दातीत आहे कारण आमच्या साठी नासाच्या संशोधक चमुच हे यश अमूल्य आहे ही त्यांच्या साठी अत्यंत कठीण कामगिरी होती आणि कठोर परिश्रमानंतर त्यांनी ती उत्तम रित्या पार पाडलीय
ज्यूनो गुरूजवळ जाताच त्याचे इंजिन जवळपास पस्तीस मिनिटे पर्यंत जळत होते त्या नंतर हळू हळू प्रचंड उष्णता व वेगामुळे तप्त झालेले त्याचे इंजिन थंड झाले  आणि काही वेळातच त्याने गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला ज्यूनोने गुरूच्या कक्षेत प्रवेश केल्याचा संदेश नासाच्या कॅलिफोर्नियातील पसाडेना येथील जेट प्रपोर्शन लॅब (JPL)  मध्ये आणि कोलेरॅडो येथील ज्यूनो ऑपरेशन सेंटर मध्ये प्राप्त झाला आणि ज्यूनो तिथे व्यवस्थित स्थिर झाल्याची माहिती नासाच्या कॅलिफोर्निया ,Goldstone, Canberra ,Australia येथे नासाच्या डीप स्पेस अँटेना द्वारे प्राप्त झाली तेव्हा पृथ्वीवर रात्रीचे 8.53  मी (PDT) झाले होते
पूर्व नियोजनानुसार ज्यूनो स्थिर असून त्याचे अंतर नियंत्रित व त्याचे स्वतः:भोवतीचे भ्रमण दोन फेऱया वरून पाच फेऱया पर्यंत आल्या आहेत त्याच्या इंजिनाच्या ज्वलन प्रक्रियेला  नियोजित वेळात सुरवात झाली आणि काही वेळातच त्याची सौर प्रणाली कार्यान्वित झाली
 ज्यूनो अंतरिक्ष यानाद्वारे माहिती मिळवण्याचे काम आताच सुरू होणार नाही ते जरी ऑक्टोबर मध्ये सुरू होणार असले तरी पण त्या आधीच आम्ही ही माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करू अशी आशा नासा प्रमुख Bolton व्यक्त करतात
ज्युनो अंतराळ यान गुरूच्या कक्षेत वीस महिने राहील आणि गुरु भोवती फेरया मारेल आजवरच्या मोहिमेतील गुरु ग्रहाभोवती भ्रमण करणारे ज्युनो हे पहिलेच अंतराळ यान आहे गुरूच्या कक्षेतील कार्यकाळात ज्युनो यान गुरु भोवती 37 फेरया पूर्ण करेल ह्या दरम्यान ज्यूनो यांनाद्वारे गुरु ग्रहावर खडडा करून तेथील घन पदार्थाचे अस्तित्व , तिथले वातावरण तेथील शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र ,पाण्याचे अस्तित्व ,अमोनियाचे व इतर घटकाचे प्रमाण ह्या बाबतीत संशोधन केल्या जाईल तसेच गुरु ग्रहाची उत्पत्ती कशी झाली  त्याची रचना , सौरमालेतील त्याचे स्थान ,सौरमालेचा विकास कसा झाला आणि सौर मालेतील इतर मोठया ग्रहांबद्दल उपयुक्त माहिती ह्या मोहिमे मुळे मिळेल तसेच ह्या अंतरीक्ष यान मोहिमेमुळे शास्त्रज्ञांना गुरु ग्रहावरील अनेक गूढ रहस्याची उकल होण्यास मदत मिळेल
सद्या तरी मानवाने आपल्या अचाट बुद्धी कौशल्याच्या जोरावर गुरु ग्रहापर्यंत झेप घेतलीय आणि ती तितकीच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे हे निश्चित