Tuesday 8 September 2015

नासाच्या खगोल शास्त्रज्ञानी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने टिपली चक्राकार तेजस्वी आकाशगंगा

 The galaxy resembles a giant maelstrom of glowing gas, rippled with dark dust that swirls inwards towards the nucleus.


नासा संस्था - 4 /9/2015

पृथ्वी पासून 35 मिलियन्स प्रकाशवर्षे दूर असलेली आकाशगंगा नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने 
टिपली असून तिच नाव Messier 96 असे आहे 
हि आकाशगंगा प्रथम 1781 साली खगोल शास्त्रज्ञ पियरे मिचेन (Pierre Mechain) ह्यांनी शोधली 
अंतराळातील मिट्ट काळोखात धूळ ,चमकणारे वायू आणि अवकाशातील काही दुर्बल छोटया आकाशगंगांचा समूह आकाशगंगेच्या मध्यभागी( nucleus भोवती) गुरूत्वाकर्षणामुळे ओढल्या गेल्यामुळे ह्या आकाश गंगेला चक्राकार भोवरयाच स्वरूप प्राप्त झाल आहे 
लंब वर्तुळाकार आकारातील हि आकाशगंगा काळ्याकुट्ट अंधारात दुधाळ पार्श्वभूमीवर चमकणाऱ्या तेजस्वी तारकासमूहामुळे आणखीनच प्रकाशमान झालीय तीच हे आकर्षक नेत्रदीपक दृश्य नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी दुर्बिणीच्या सहाय्याने टिपून सर्वांना पाहण्यासाठी प्रकाशित केलय       

No comments:

Post a Comment