. यवतमाळात सद्या डासांचा त्रास वाढला असून यवतमाळकरांना सतत डास पिटाळून लावणारया ऑल ऑउट ,मच्छर अगरबत्ती या सारख्या साधनांचा वापर करावा लागतो मध्यंतरी डासांचा त्रास होऊ नये म्हणून फवारणी यंत्र ( fogging machine )आणले गेले काही दिवस नियमित फवारणी करण्यात आली पण नंतर ते यंत्र व फवारणी दोन्हीही दिसेनासे झाले.
सद्या सर्वत्र डासांमुळे उदभवणारया मलेरिया व डेंग्यू ह्या रोगाची साथ आहे डासांमुळे हत्तीरोगहि होऊ शकतो यवतमाळ जिल्ह्यात मागे हत्तीरोगाचे रुग्ण आढळले होते पण तरीही नगरपरिषदेकडून डास निर्मूलनाचे उपाय केल्या जात नाहीत. वाढलेले गाजर गवतही नियमित काढले जात नाही सतत तक्रार केल्यावर कधीतरी गवत काढून रस्त्यावरच टाकले जाते घंटागाडीत फक्त घरातीलच कचरा गोळा केल्या जातो रस्त्यावरचा कचरा तसाच पडून राहतो त्या मुळेही डास वाढतात शिवाय ह्या गवताची काहीजणांना allergy होते.
डासांची उत्पत्ती उघडया नाल्यामुळेही होते.नालीत उडून आलेल्या कचरयामुळे किंवा काही नागरिकांनी टाकलेल्या कचरयामुळे नाल्या तुंबतात आणि त्या भरून वाहू लागतात त्याच घाण पाण्यात रोगजंतू व डासांची पैदास होते ह्या नाल्या नियमित साफ केल्या जात नाहीत नगरसेवक व नगरपरिषद ह्या कडे दुर्लक्ष करतात नागरिक तक्रार करतात त्याहीकडे ते दुर्लक्ष करतात त्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते
उघडया नाल्या म्हणजे डासांच्या उत्पत्तीला निमंत्रण
कधी,कधी नाली भरल्याने हे घाणपाणी रस्त्यावरून वहात नागरिकांच्या घरातही शिरते. शिवाय ह्या नाल्यात डूकरेही शिरतात आणि घाणीत भर टाकतात म्हणूनच नगराध्यक्षांनी ह्या कडे लक्ष देऊन कडक कारवाई करणे आवश्यक आहे शिवाय जे नगरसेवक कामे करत नाहीत त्यांच्यावरही कडक कारवाई करणे आवश्यक आहे नाली साफ केल्यानंतर काही कर्मचारी काढलेला कचरा तिथेच टाकून निघून जातात त्यामुळे सुद्धा डासांचे प्रमाण वाढते त्या मुळे तो कचरा लगेचच उचलून गाडीत टाकण्यास बाध्य करावे.
अंडर ग्राउंड नाल्यांची आवश्यकता
बरयाच वर्षापासून यवतमाळकर नाली अंडरग्राउंड करा अशी मागणी करत आहेत आणि ती मागणी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे त्या मुळे डासांचा त्रास कमी होईल शिवाय दोन्ही बाजूच्या उघडया नाल्यांमुळे रस्त्याची रुंदी कमी होते व रहदारीस अडथळा होतो तो होणार नाही. पण अंडरग्राउंड नाल्यांना प्राधान्य न देता नको तिथे खर्च केल्या जातोय सद्या नाली शेजारी वृक्षारोपण केल्या जातेय त्या मुळे आधीच कमी असलेली रस्त्यांची रुंदी अजून कमी होईल झाडे लावणे आवश्यक आहेच पण जिथे आवश्यकता आहे तिथे ती लावावीत रस्त्याच्या दुतर्फा गावाबाहेर जिथे वृक्षतोड झाली आहे तिथे ती अवश्य लावावीत शिवाय गरीब वस्तीतही लावावीत उगाच नको तिथे जास्तीचा निधी वापरण्यापेक्षा गरीब वस्तीत स्वच्छता गृहे बांधावीत. रस्त्यावरील खड्डे हि देखील ज्वलंत समस्या आहे त्या मुळे रस्ता दुरुस्तीसाठी निधी वापरावा व त्याचा विनियोग योग्य ठिकाणी होतोय कि नाही ह्या वर लक्ष ठेवावे कारण रस्ता दुरुस्त झाला कि थोड्याच दिवसात पुन्हा रस्ता पूर्व पदावर येतो आणि आधी नाल्या बंद कराव्यात म्हणजे डासांचा त्रास तर कमी होईलच शिवाय यवतमाळ स्वछ व सुंदर दिसेल.
fogging मशीनने फवारणी करणे आवश्यक
बंद पडलेली fogging मशीनची फवारणी देखील पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे व डासांच्या प्रश्नाकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे कारण नुकतीच दिग्रसमध्ये डेंगू मुळे एका नागरिकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली
लोकांनो जागृत व्हा
फक्त निवडून येण्यापुरते आम्ही हे करू ते करू म्हणून आश्वासने देऊन निवडून आलेल्या व कामाकडे व नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणारयांना नगर सेवकांना लोकांनी परत बोलवावे नगर परिषदेची निवडणूक आधी दरवर्षी व्हायची त्या मुळे लोकांना दरवर्षी नवीन नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून देता येत होते.आता पुन्हा दरवर्षी निवडणूक घ्यावी कारण एकदा निवडून आले कि पाच वर्षापर्यंत नगरसेवक निश्चिंत होतात त्यांना लोकांच्या समस्येशी काही देणे घेणे नसते.म्हणूनच लोकांनीच त्यांना काम करण्यास बाध्य करावे नाहीतर त्यांचा राजीनामा मागावा त्या साठी लोकांनी जागृत होणे आवश्यक आहे त्या मुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल

No comments:
Post a Comment