Thursday, 25 September 2025

नासाच्या पार्कर सोलर प्रोब सौर यानाची सूर्याच्या अंतर्गत भागातील 25 वी परिक्रमा यशस्वी

  NASA's Parker Solar Probe -- with its heat shield facing forward and twin solar panels partially extended -- flies through particles in space.

 नासाचे पार्कर सोलर प्रोब सौर यान सूर्याच्या अंतर्गत करोना भागातून भ्रमण करताना -फोटो -नासा संस्था 

 

 नासा संस्था - 25 सप्टेंबर 

नासाच्या पार्कर सोलर प्रोबने18 सप्टेंबरला सूर्याच्या अंतर्गत भागात शिरून 3.8 मिलीयन मैल अंतरावरून अत्यंत जवळून 25 वी फेरी पुर्ण केली नासाच्या Maryland येथील APL संस्थेतील ( Johns Hopkins Applied Phy.) मधील शास्त्रज्ञांनी  प्रसारित केलेल्या माहिती नुसार पार्कर सोलर प्रोब सौरयान सूर्याभोवती भ्रमण करून सूर्याच्या अंतर्गत कक्षेतून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले असुन हे सौरयान नियमित भ्रमण करत आहे नासाच्या सौर मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या नियोजना नुसार 2026 पर्यंत पार्कर सौरयान सूर्याच्या कक्षेत भ्रमण करून सखोल निरीक्षण करेल आणी संशोधित माहिती मिळवेल पार्कर सौरयानाने पाठवलेल्या Becon tone वरून हि माहिती शास्त्रज्ञांना मिळाली 

पार्करसौरयान सुर्याच्या कक्षेत शिरले आणी यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली तेव्हा यानावर पृथ्वी वरील संस्थेचे नियंत्रण नव्हते पार्कर सौरयानाने त्याच्या ह्या आधीच्या वेगाच्या रेकॉर्डशी बरोबरी साधत ताशी 430,000 मैल प्रति तास वेगाने करोना भागाच्या अत्यंत जवळुन भ्रमण केले ह्या आधी 24 डिसेंबर 2024,22 मार्च 2025आणि 19 जून 2025 मध्ये देखील पार्कर सौरयान सूर्याच्या अंतर्गत भागातून अत्यंत जवळून भ्रमण करून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते 

पार्कर सौरयानाचा हा भ्रमणकाळ10 सप्टेंबरला सुरु झाला आणि 20 सप्टेंबरला संपला पार्कर सौरयानातील चार अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणाद्वारे सूर्याच्या करोना भागातील निरीक्षण आणी संशोधीत सायंटिफिक माहिती गोळा करण्यात आली सध्या सुरू असलेल्या सुर्याच्या अकरा वर्षाच्या चक्राच्या अंतिम टप्प्यात सुर्य अत्यंत Active Phase मध्ये असताना ह्या काळातील सोलर घडामोडी सौर ऊर्जा सौरवारे सौरवादळांची तिव्रता मोजण्यात आली  सूर्याच्या अंतर्गत भागातील व आसपासच्या वातावरणातील निरीक्षण नोंदवून संशोधित माहिती गोळा करण्यात येत आहे सध्या सूर्याच्या अंतर्गत भागातून अत्यंत शक्तिशाली आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत पार्कर सौरयानाच्या सूर्याच्या अंतर्गत भागातील चवथ्या वेगवान भ्रमणामुळे आणखी संशोधित माहिती मिळेल 

23 सप्टेंबर नंतर पार्कर सौरयान सूर्याच्या करोना भागातील सौरवारे,सौर घडामोडी सौर वादळाची तीव्रता सूर्याच्या अंतर्गत भागातील उष्ण ज्वाळांचे उत्सर्जन ह्या बाबतीत नोंदवलेले निरीक्षण आणि गोळा केलेली संशोधित माहिती पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना पाठवेल  

सुर्याच्या ह्या अंतर्गत घडामोडी दरम्यान अंतराळात प्रचंड वेगाने बाहेर पडणारे आगीचे लोट, सौर वारे धूळ आणि हानिकारक कॉस्मिक किरणे ह्यांचा हानिकारक प्रभाव पृथ्वीवर ,अंतराळस्थानकात रहाणाऱ्या अंतराळवीरांवर पृथ्वीवरील Satellites Powergrid आणी Air travel करणाऱ्यांवर पडतो त्या मुळे हि अत्याधुनिक संशोधीत माहिती अंतराळ विश्वातील भविष्य कालीन दुरवरच्या चंद्र आणी मंगळ मोहिमे साठी ऊपयुक्त ठरणार आहे 

विषेश म्हणजे सुर्याच्या अंतर्गत अत्यंत ऊष्ण असलेल्या करोना  भागातून फेरी मारुन देखील पार्कर यान सुरक्षित बाहेर पडले ह्या सौरयानाला सुर्याच्या तीव्र ऊष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून यानाच्या Shield मध्ये Innovative Carbon Foam चा वापर करून Thermat Protection System बसविण्यात आली होती त्या मुळे पार्कर यान 1.600 ते 1700 f. (870 ते 930 c.) पर्यंत ऊष्णतेतही सुरक्षित राहुन सूर्याच्या अंतर्गत भागातून बाहेर पडू शकते 

ह्या यानाची निर्मिती सूर्याचा आकार,सौरवारे,सौरवादळ,सौरज्वाळा ,सूर्याभोवतीचा करोना ह्याचा शोध लावणाऱ्या शिकागो युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ Eugene Parker जिवंत असताना त्यांच्या संकल्पनेतून झाली त्यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या ह्या सौर मोहिमेतील सौरयानाला त्यांच्या सन्मानार्थ पार्कर नाव देण्यात आले त्यांचा फोटो देखील ह्या सौर याना सोबत पाठवण्यात आला पण 2022 मध्ये त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला नासाच्या Living With Star प्रोग्राम द्वारे पार्कर सोलर प्रोबची निर्मिती केल्या गेली  

 

Thursday, 18 September 2025

नासाच्या Perseverance मंगळयानाने शोधलेल्या खडकात आढळले मंगळावरील सजीवसृष्ठीला पृष्ठी देणारे पुरावे

 Perseverance finds a rock with 'Leopard Spots'

Perseverance मंगळ यानाने शोधलेल्या मंगळावरील Jezero Crater भागातील आटलेल्या Cheyava Falls मधील खडकातील ठिपक्यांच्या खुणा- फोटो -नासा संस्था 

नासा संस्था 18 सप्टेंबर 

नासाचे Perseverance मंगळयान गेल्या चार वर्षांपासून मंगळभुमीवर कार्यरत आहे मंगळभुमीवरील पुरातनकालीन सजीवसृष्टिच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे,आटलेले पाण्याचे स्त्रोत आणी भविष्यकालीन मानवासहित मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यायोग्य तेथील पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा शोध घेत आहे शिवाय मंगळावरील भुगर्भातील आणी भुमीवरील उत्खनन करून खडक,माती,वाळू यांचे नमुने गोळा करत आहे  Perseverance यानासोबत मंगळावर गेलेले Ingenuity Mars हेलिकॉप्टर मंगळावरील आकाशातील यशस्वी 72 उड्डाणानंतर दुर्घटनाग्रस्त झाले तोपर्यत दोघांनी मिळून मंगळावरील अत्यंत महत्वपूर्ण संशोधित माहिती गोळा केली होती 

सध्या Persevrance यान मंगळावरील Jezero Crater ह्या भागातील आटलेल्या नदीपात्रातील पुरातन कालीन सजीव सृष्टीला पुष्टी देणारे खडकांचे नमुने गोळा करत आहे Jezero Crater च्या पायथ्याशी दक्षिण आणी पश्चिमेकडील 73 एकर जागेत व्यापलेल्या ह्या पाठारी भागातील खडकांची रचना पुरातन कालीन आहे त्यामुळे नासाच्या मंगळ मोहिमेतील टिममधील शास्त्रज्ञांना येथील खडकांचे नमुने गोळा करून संशोधीत माहिती मिळवण्याची ईच्छा होती ह्या भागातील Cheyava Falls ह्या भागातील Sapphire Canyon ह्या खडकाच्या नव्या नमुन्यामध्ये शास्त्रज्ञांना अशा पुरातन कालीन सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचे अंश मिळाले आहेत नासाने प्रसिद्ध केलेल्या Nature Jiournal मध्ये हि माहिती प्रसारित करण्यात आली आहे   

ह्या अत्यंत महत्वपूर्ण नवीन संशोधनामुळे ह्या शक्यतेला पुष्टी मिळेल असे नासाचे Adminisrator Sean Duffy म्हणतात ,"ह्या खडकातील बिबट्याच्या शरीरावरील ठिबक्यांच्या स्वरूपातील मोठ्या आणि काही अत्यंत सूक्ष्म खुणा त्या काळी अस्तित्वात असलेल्या सूक्ष्मजीवांच्या चयापचय प्रक्रियेनंतर उत्सर्जित झालेल्या रासायनिक पदार्थांच्या अवशेषाच्या असू शकतात पण आताच ह्यावर निश्चिती देता येत नाही त्यासाठी ह्या खडकावर सखोल संशोधन होणे आवश्यक आहे राष्ट्राध्यक्ष  Donald Tramp ह्यांच्या कार्यकाळात ह्या मोहिमेची सुरवात झाली आणि आता पुरातनकाळी मंगळावर सजीवसृष्टी अस्तित्वात होती हे सिद्ध होण्याच्या अंतिम टप्प्यावर हि मोहीम पोहोचली आहे !"

Perseverance मंगळयान Jezero Crater ह्या भागातील पुरातन कालीन आटलेल्या Cheyava Falls ह्या भागात जुलै  2024 मध्ये पोहोचले Bright Angel ह्या मंगळावरील उत्तर दक्षिणे कडील भागात आढळलेल्या 400 मीटर रुंदीच्या पुरातनकाळी वाहणाऱ्या पण कालांतराने आटलेल्या नदीपात्रातील खडकांच्या नमुन्यात असे अवशेष आढळले ह्या भागात केलेल्या उत्खननात सुरवातीलाच घेतलेल्या खडकांच्या नमुन्यात चिकणमातीचे अंश सापडले होते चिकणमाती तयार होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते मंगळावर प्राचीन काळात पडलेल्या पावसाच्या पाण्यात वाहून आलेला गाळ माती आणि वाळू ह्या पासून हे खडक निर्माण झाले असावेत किंवा कदाचित तेथे पुरातन काळी अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या प्रवाहातील गाळामुळेही तयार झाले असावेत त्या मुळे मंगळावर पुरातन काळी पाण्याचे अस्तित्व असल्याचे संकेत मिळतात आणि पाणी असेल तर तेथील वातावरण सजीव सृष्ठीला पोषक असेल आणि तेथे सजीवांचे अस्तित्वही असेल म्हणूनच इथे आणखी उत्खनन केल्यास आणि त्यातील खडकात चिकणमातीचे अंश असल्यास ह्या मताला पृष्ठी मिळेल असे शास्त्रज्ञाचे मत होते 

पृथ्वीवरील चिकणमातीत सजीवांच्या निर्मितीला आवश्यक असलेले ऑरगॅनिक घटक असतात आणि चिकणमातीयुक्त खडकात पुरातन जीवाष्म सुरक्षित राहतात ह्या भागातील ह्या खडकांच्या सखोल संशोधनानंतर त्या मधील खनिज आणि पाण्याचे अंश सापडलॆ तर मंगळावर प्राचीन काळी सजीव सृष्ठी अस्तित्वात होती आणि कालांतराने ती नष्ठ होत गेली हे सिद्ध होईल असे शास्त्रज्ञांचे मत आहे हे खडक मंगळग्रहावरील उत्क्रांतीच्या काळात तयार झाले असतील मागच्या वर्षी घेतलेल्या Cheyava Falls ह्या भागातील खडकात ऑरगॅनिक कार्बन,सल्फर ऑक्सिडाइज्ड लोह व फॉस्फरसचे अस्तित्व आहे त्यामुळे हे रासायनिक घटक त्या पुरातनकालीन सूक्ष्मजीवांच्या चयापचय प्रक्रियेतून उत्सर्जित झाले असावेत असे शास्त्रज्ञाचे मत आहे 

2021 पासून  मंगळावर कार्यरत असलेल्या Perseverance मंगळयानाने आतापर्यंत  मंगळावरील 30 खडकांचे नमुने गोळा केले आहेत हा संशोधित 27 व्या खडकाचा नवा नमुना आहे ह्या खडकांच्या रचना पाहून त्यांची निर्मिती खूप प्राचीन काळी Jezezero Crater च्याही आधीच्या काळात झाली असावी त्या काळी तेथे कदाचित सजीवांचे अस्तित्वही असेल 

Saturday, 13 September 2025

नासाच्या Artemis II मोहिमेतील अंतराळविरांसोबत चंद्रावर नाव पाठविण्याची नागरिकांना सुवर्णसंधी

 

 

नासा संस्था- 13 सप्टेंबर

नासा संस्था नेहमीच नवनवीन ऊपक्रम राबवून नागरिकांना अंतराळ मोहिमेत सहभागी होण्याची संधी जाहीर करत असते जगभरातील हौशी नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो नासाच्या आर्टिमस मोहिमेत देखील अमेरिकन नागरिकांसोबत आता आपल्या भारतासह अनेक देशही सहभागी झाले आहेत ह्या आधी मानव रहित आर्टिमस I मोहिम यशस्वी झाल्यानंतर आता आर्टिमस II मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत आणी पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा चंद्र भुमीवर पाऊल ठेऊन  तेथे काही काळ फिरून तेथील भुमीवरील,भुगर्भातील आणी वातावरणातील  संशोधीत माहिती मिळवणार आहेत आणि भविष्यकालीन चंद्र मोहिमेतील अंतराळवीरांना राहण्यासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा शोध घेणार आहेत

नासाच्या अभिनव ऊपक्रमा अंतर्गत हौशी नागरिकांना ह्या आर्टीमस मोहिमेत सहभागी होता येणार आहे त्या साठी नासाने नागरिकांना त्यांची नावे चंद्रावर पाठविण्याची सुवर्ण संधी जाहीर केली आहे नासाच्या आर्टिमस II मोहिमेतील अंतराळवीर Reid Wiseman,Victor Glover, Christina Koch आणी  कॅनडियन अंतराळवीर Jeremy Hansen ह्यांच्या सोबत Orion अंतराळयानातुन चंद्रावर जाणार आहेत त्यांच्या सोबत हि नावे चंद्रावर पाठविण्यात येणार आहेत

आर्टिमस II मोहिम मानवांना पुन्हा चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी आणी भविष्य कालीन मंगळमोहिमे साठीची पुर्व तयारी आहे दुरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळविरांच्या सुरक्षित अंतराळप्रवास आणी परग्रहावरील निवासासाठी हे महत्वाचे चाचणी ऊड्डाण आहे जगभरातील नागरिकांना अंतराळ मोहिमात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी नासाने हि संधी जाहीर केली आहे असे नासाच्या Washington येथील संस्थेच्या Associate Administrator Lori Glaze म्हणतात 

Send your name with Artemis II मोहिमेत सहभागी होण्यासाठी 21जानेवारी पुर्वी नागरिकांना त्यांची नावे नासा संस्थेकडे पाठवता येतील  निवडक नावे  नखाच्या आकाराच्या microchip वर कोरुन नंतर SD Card वर लोड केली जातील आणी Orion अंतराळयानासोबत चंद्रावर पाठविल्या जातील ह्या मोहिमेत सहभागी नागरिकांना बोर्डिंग पास दिल्या जाईल हि नावे अंतराळविरांसोबत अंतराळप्रवास करतील यानासोबत चंद्रावर पोहोचतील आणि चंद्र भ्रमण करतील आणी  अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर परततील हि मोहिम दहा दिवसांची आहे एप्रिल 2026 मध्ये अंतराळवीर चंद्र मोहिमेवर जातील हि पहिली मानवासहित चंद्र मोहीम असेल ह्या मोहिमेनंतर नासा संस्था भविष्यकालीन मंगळमोहिमेत अंतराळवीरांना मंगळावर पाठवणार आहे त्या साठी ह्या मोहिमेतील संशोधित माहिती उपयुक्त ठरणार आहे 

ह्या आधी अंतराळविश्वातील अनेक ग्रहावर नागरिकांची नावे पाठविण्यात आली होती मंगळ मोहिमेतील वेगवेगळ्या मंगळयानासोबत गुरु ग्रहावर Europa  Cliper सोबत,आर्टीमस I मोहिमेतील अंतराळयानासोबत लाखो लोकांनी त्यांची नावे पाठविली होती आपल्या सौरमालेत किंवा ब्रह्मांडातील आपल्याला अज्ञात असलेल्या आपल्यासारख्या सजीव सृष्टीचा शोध घेण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी नासा संस्थेतर्फे हि मोहीम राबविण्यात येते


Tuesday, 9 September 2025

नासाच्या CHAPEA मोहिमेअंतर्गत शास्त्रज्ञ निर्मित पृथ्वीवरील कृत्रिम मंगळभूमीत चार धाडसी नागरिकांचा दुसरा ग्रुप एक वर्ष राहायला जाणार

 

 नासाच्या JPL Space Center मधील शास्त्रज्ञांनी तयार केलेली पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ भूमी -(Mars Dune Alpha)-फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 9 सप्टेंबर

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमे अंतर्गत नासाच्या J.PL संस्थेत मध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम मंगळसृष्टी निर्माण केली आहे नासाचे मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी आणि तिथे भविष्यकालीन मानवी वसाहत निर्माण करण्याआधी मंगळा सारखे वातावरण आणि भूमी असलेल्या ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळसृष्टीत राहिल्यावर मानवी शरीरावर व आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ह्या प्रयोगशील उपक्रमात सहभागी होऊन ह्या कृत्रिम मंगळ सृष्टीत एक वर्ष राहण्यासाठी धाडसी नागरिकांना नासा संस्थेने संधी उपलब्ध केली होती ह्या अभिनव उपक्रमा अंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन गृप तयार करण्यात आले होते त्या पैकी चार जणांचा पहिल्या ग्रुप मधील चार प्रतिनिधी ह्या पृथ्वीवरील शास्त्रज्ञ निर्मित (Mars Dune Alpha )कृत्रिम मंगळ सृष्टीत एक वर्ष राहून आले आता ह्या मोहिमेतील दुसऱ्या ग्रुप मधील चार जण ह्या मंगळ सृष्टीत राहायला जाणार आहेत 

भविष्यकालीन अंतराळवीरांचे प्रातिनिधीत्व करणाऱ्या धाडसी नागरिकांच्या ह्या दुसऱ्या ग्रुप मध्ये Ross Elder,Ellen Ellis,Matthew Montgomery आणि James Spicer ह्यांचा समावेश आहे Ross कमांडर, Ellen मेडिकल आँफिसर, Matthew सायन्स आँफिसर आणी James Flight engineer आहेत ह्या मोहीमेतील Alternate प्रतिनिधी Emily  Phillipsपायलट आणी Laura Marie कमर्शियल एअर लाईन पायलट आहेत

 19 ऑक्टोबरला हे चौघे Mars Dune Alpha मध्ये राहायला जाणार आहेत हे चौघे अंतराळवीरांचे प्रातिनिधीत्व करत असल्याने त्यांना ह्या भूमीत 378 दिवस अंतराळवीरांसारखे राहावे लागेल 31ऑक्टोबर 2026 ला ह्या भूमीतून ते परततील तो पर्यंत त्यांना बाहेरच्या जगाशी किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करता येणार नाही ते ह्या भूमीत बंधिस्त असतील फक्त नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील शास्त्रज्ञ त्यांच्या संपर्कात असतील  

नासाच्या CHAPEA मोहिमे अंतर्गत Mars Dune Alpha मध्ये राहायला जाणाऱ्या दुसऱ्या ग्रुप मधील भविष्यकालीन अंतराळवीरांचे प्रतिनिधी Ross Elder Ellen Ellis ,Matthew Montgomery आणि James Spicer

शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या 3D Printed 1700 sq ft जागेतील Mars Dune Alpha ह्या कृत्रिम मंगळसृष्टीत  CHAPEA मोहिमे अंतर्गत अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी माहिती संशोधित करण्यात येत आहे भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांना अंतराळ प्रवासा दरम्यान काही समस्या आल्यास अचानक यानातील उपकरणात यांत्रीक बिघाड झाल्यास आणि पृथ्वीशी संपर्क होऊ न शकल्यास ह्या आव्हानात्मक समस्येवर मात करून पुढील मार्गक्रमण करण्यासाठीचे ट्रेनिंग देण्यात येत आहे 

नासाची आर्टेमिस मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील भूमीवर वास्तव्य करताना शारीरिक व इतर अडचणींवर मात करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे असे नासाच्या Johnson Space Center मधील ह्या मोहिमेच्या प्रमुख शास्त्रज्ञ Sara Whiting म्हणतात हे अंतराळवीरांचे प्रतिनिधी ह्या कृत्रिम मंगळभूमीत संशोधना सोबतच Simulated Mars Walk भाजीपाला लागवड,बागकाम,रोबोटिक ऑपरेशन्स शिवाय मंगळ आणि भविष्यकालीन अंतराळमोहिमेसाठी डिझाईन केलेल्या तंत्रज्ञानाची  संशोधनात्मक चाचणी घेतील त्यामध्ये विशेषतः पिण्यायोग्य पाण्याचे डिस्पेन्सर आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि शारीरिक दुष्परिणामावर मात करण्यासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल

ह्या कृत्रिम मंगळभूमीत आणि अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांनी गोळा केलेल्या संशोधनात्मक माहितीमुळे आम्हाला मंगळावरील मर्यादित साधने,निर्बंध आणि अंतराळवीरांच्या दिर्धकालीन निवासा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या त्यांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि कार्यक्षमता तपासता येईल असे CHAPEA मोहिमेचे Principal Investigater -Grace Douglas म्हणतात आणि हि माहिती भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षित अंतराळ प्रवास आणि  यशस्वी मोहीम नियोजनासाठी होईल ह्या मोहिमेतील हा दुसरा टप्पा आहे ह्या आधी पहिल्या ग्रुप मधील चार जण 6 जुलै 2024 मध्ये ह्या कृत्रिम मंगळ भूमीत एक वर्ष राहण्यासाठी गेले आणि एक वर्षांनी हि मोहीम यशस्वी करून परतले होते 


Friday, 29 August 2025

नासाच्या आर्टीमस II मोहिमेतील नाविन्यपूर्ण ZGI डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांची निवड जाहीर

 Artemis II crew members shown inside the Neil Armstrong Operations and Checkout Building at NASA’s Kennedy Space Center.

नासाच्या आर्टीमस II मोहिमेतील अंतराळवीर Jeremy Hansen अंतराळ वीर Victor Glover अंतराळवीर Reid Wiseman आणि अंतराळवीर Christina Koch-नासाच्या Kennedy Space Center -Florida येथे -फोटो -नासा संस्था

 

नासा संस्था - 29 ऑगस्ट

नासाची आर्टिमस II चंद्र मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे लवकरच नासाचे चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत नासा संस्था नेहमीच वेगवेगळे ऊपक्रम राबवून नागरिकांनाही त्यात सहभागी होण्याची संधी देते अशाच अभिनव ऊपक्रमा अंतर्गत नासा संस्थेने सर्जनशील नागरीकांसाठी आर्टिमस मोहीमेतील अंतराळविरांना सोबत नेण्यासाठी नाविन्यपूर्ण Zero g indicator ची प्रतीकात्मक रचना बनविण्याची संधी उपलब्ध केली होती त्याला जगभरातील स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि पन्नास देशातील 2,600 सर्जक नागरिकांनी नाविन्यपूर्ण  ZGI डिझाइन्स पाठविले त्यात शाळकरी मुलांसोबतच वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे नासा संस्थेने आर्टीमस मोहिमेतील ह्या स्पर्धेतील ZGI बनविताना तो कमी वजनाचा छोट्या आकाराचा आणी नासा संस्थेने ठरवून दिलेल्या वस्तू पासून बनविलेला असावा तो अग्नी रोधक,अंतराळात नेण्यासाठी सोयीचा भरीव व नाविन्यपूर्ण आणि आकर्षक असावा शिवाय हा ZGI अंतराळ स्थानकात वरच्या बाजूला लवचिक धाग्याने लटकवता येण्याजोगा Strechable असणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली होती ह्या सर्व बाबीची पूर्तता पडताळून हि निवड नासा संस्थेतील तज्ञांनी केली आहे

आर्टेमिस II मोहिमे अंतर्गत नासाचे अंतराळवीर Reid Wiseman ,Victor Glover,Christina Koch आणि   कॅनडियन अंतराळवीर Jeremy Hanson चंद्रावर जाणार आहेत आणि तेथील भूमीवरील व भूगर्भातील संशोधित माहिती गोळा करणार आहेत हे चार अंतराळवीर आता ह्या पंचवीस ZGI पैकी एकाची निवड त्यांच्यासोबत चंद्रावर नेण्यासाठी करणार आहेत 

आर्टेमिस मोहिमेचे कमांडर Ried Wiseman म्हणतात,हा ZGI आमच्यासाठी स्पेशल आहे अंतराळयान कठीण हार्डवेअर आणि अत्याधुनिक यंत्रणेने भरलेले असते अंतराळयान अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेश करणार असल्याचे संकेत हा इंडिकेटर अंतराळवीरांना देतो त्यामुळे अंतराळवीर स्वत:ला शारीरिक इजा होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतात त्या मुळे अंतराळातील वजनरहित अवस्थेत तो आम्हाला संरक्षक मित्रासारखा वाटतो आम्ही आता जगभरातील सर्जक व्यक्तींनी बनविलेल्या ह्या वैशिष्ठपूर्ण डिझाईन पाहण्यासाठी आणि त्यातून आमच्यासोबत चंद्रावर घेऊन जाण्यायोग्य अंतिम एक ZGI निवडण्यासाठी उत्सुक आहोत

खेळणीच्या किंवा बाहुलीच्या आकारातील छोट्या स्वरूपातील ZGI अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणीय वातावरणातुन पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळातील सुक्ष्म गुरुत्वाकर्षणीय वातावरणात प्रवेश करतात तेव्हा वातावरण बदलाचे संकेत देतात त्यामुळे अंतराळवीर स्वतःला आणि अंतराळयानाला हानी होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकतात अंतराळयान अंतराळात प्रवेशल्यानंतर आठदहा मिनिटातच अंतराळवीर आणि ZGI यांच्या जागेवरून बाहेर ढकलल्या जातात आणि अंतराळात गुरुत्वाकर्षणच नसल्यामुळे सर्वच वस्तू तरंगतात त्यामुळे अंतराळवीर सीटच्या मागेपुढे कोठेही धडकू शकतात त्यांना इजा होण्याची शक्यता असते जेव्हा अंतराळयान रॉकेट पासून वेगळे होते आणि स्वयंचलित यंत्रणेने अंतराळात शिरते तेव्हा अंतराळवीरांना झिरो ग्रॅव्हिटीची जाणीव होते पण ह्या ZGI च्या सूचक संकेता मुळे ते सीटवरून बाहेर पडून स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतात शिवाय  ZGI मुळे अंतराळवीरांना अंतराळातील यानाची स्थिती,दिशा आणि अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील उंचीची माहिती मिळते

नासा संस्थेने प्रथमच आर्टेमिस मोहिमेत नागरिकांना सहभागी होत नाविन्यपूर्ण झिरो ग्रॅव्हिटी इंडिकेटर बनविण्याची संधी दिली होती ह्या निवडक डिझाइन्स नाविन्यपूर्ण आणि संशोधात्मक आहेत काही डिझाइन्स पृथ्वीवरील प्राण्यांच्या स्वरूपातील चंद्राशी संबंधित दृष्टीकोनांचा वापर करून कल्पकतेने बनविल्या आहेत अंतिम निवडक स्पर्धकांमध्ये युनायटेड स्टेटस,कॅनडा,कोलंबिया,फिनलंड, फ्रान्स,जर्मनी जपान,पेरू सिंगापूर आणि वेल्स सह दहा देशातिल नागरिकांचा त्यात समावेश आहे

ह्या आधीच्या आर्टीमस I मानव विरहित मोहिमेत Orion अंतराळयानासोबत Snoopy Doll ZGI चंद्रावर पाठवण्यात आली होती आणि त्याही आधी नासाच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात जाताना ZGI सोबत नेले होते अंतराळवीर Reid Wiseman ह्यांनी सोयूझ अंतराळयानातून जिराफाच्या स्वरूपातील ZGI सोबत नेला होता त्यांच्या आईने तो त्यांच्या मुलीला आणि मुलींनी त्यांना अंतराळस्थानकात नेण्यासाठी दिला होता आणि अंतराळ प्रवासात आणि स्थानकातील वातावरणात हा जिराफ कसा प्रतिसाद देतो हे पाहण्यासाठी त्या उत्सुक होत्या अंतराळवीर Christina Koch ह्यांनी देखील नासाच्या अंतराळ मोहिमेत स्थानकात जाताना त्यांच्या टीम मधील मित्रांची आठवण म्हणून Ball च्या आकारातील ZGI सोबत नेला होता काही अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मुलांनी देखील वेगवेगळ्या खेळणीच्या स्वरूपातील ZGI स्वतः तयार केले होते 

आता ह्या निवडक पंचवीस स्पर्धकातून आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांनी अंतिम स्पर्धकाची निवड करून त्यांच्यासोबत नेण्यासाठी एक ZGI निवडल्यानंतर त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल त्या नंतर नासाच्या Tharmal Blanket Lab मध्ये हा ZGI बनविण्यात येईल आणि अंदाजे दहा दिवसांच्या आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांसोबत तो चंद्रावर प्रवास करेल आणि त्यांच्यासोबत पृथ्वीवर परतेल  

Wednesday, 13 August 2025

नासाच्या Space X Crew -10 मोहिमेतील अंतराळवीर Anne ,Nicole ,Onishi आणि Kirill पृथ्वीवर परतले

  Image shows a spacecraft approaching the Pacific Ocean with four parachutes above

 Space X Crew Dragon अंतराळवीरांसह Pacific महासागराच्या San Diego येथील समुद्राच्या खाडीत उतरताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 9 ऑगस्ट

नासाच्या Space X Crew -10 मोहिमेतील अंतराळवीर Anne  McClain ,NicoleAyers जपानी अंतराळवीर Takuya Onishi आणि रशियन अंतराळवीर Kirill Peskov स्थानकातील 148 दिवसांच्या वास्तव्यानंतर सुखरूप  पृथ्वीवर परतले आहेत हे चारही अंतराळवीर आठ तारखेला  संध्याकाळी 6.15 वाजता (स्थानिक वेळ)  पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि नऊ तारखेला सकाळी 11.33 वाजता (स्थानिक वेळ) पृथ्वीवर पोहोचले ह्या चारही अंतराळवीरांसह Space X Dragon शनिवारी पॅराशूटच्या साहाय्याने अमेरिकेतील  Pacific महासागराच्या San Diego येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले 

हे सर्व अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर Space X ची रिकव्हरी टीम,रिकव्हरी जहाज आणि दोन फास्ट बोटींसह तेथे पोहोचली त्यांनी क्रेनच्या साहाय्याने Dragon ला जहाजापर्यंत आणून सुरक्षितपणे जहाजाच्या डेकवर ठेवले त्या नंतर टीममधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केल्यानंतर टीममधील सदस्यांनी ह्या अंतराळवीरांना उचलून Dragon बाहेर काढले ह्या अंतराळवीरांना पुढील चेकअप साठी रिकव्हरी मेडिकल कॅम्प मध्ये नेण्यात आले त्या नंतर नासाच्या विमानाने त्यांना नासाच्या Huston येथील संस्थेत पोहोचवण्यात आले 

निघण्याआधी स्थानकात ह्या अंतराळवीरांचा नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात Farewell Ceremony आणि Change of Command Ceremony पार पडला तेव्हा अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केल 

  JAXA astronaut Takuya Onishi (right) shakes hands with Roscosmos cosmonaut Sergey Ryzhikov (left) after handing him command of the International Space Station during the Change of Command Ceremony as the rest of the Expedition 73 crew observes.

नासाच्या मोहीम 73 चे अंतराळवीर स्थानकातील Space X -10 मोहिमेतील अंतराळवीरांच्या Farewell आणि Change of Commamd  ceremony दरम्यान -फोटो नासा संस्था

Anne -"आम्ही आता इथले वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतत आहोत ह्या स्थानकात वास्तव्य करून संशोधन करण्याची संधी दिल्याबद्दल दोन्ही संस्थेचे आभारी आहोत आम्ही विचार करत होतो कि पुन्हा आम्हाला इथे एकत्रित येण्याची संधी मिळेल ना मिळेल  पृथ्वीवर कठीण परिस्थिती असताना लोक एकमेकांशी भांडत असताना आपण सर्वजण आनंदाने एकत्रीत वास्तव्य करून संशोधन करत आहोत स्थानकात विविध देशातील अंतराळवीर एकत्रीत वास्तव्य करून पृथ्वीच्या,मानवाच्या विकासासाठी अत्याधुनिक संशोधन करतात शोध लावतात हि खूप वैशिष्टपूर्ण बाब आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून स्थानकात सतत अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांची येजा सुरु असते आम्ही ह्या मोहीमेचा छोटा भाग आहोत चाळीस वर्षांपूर्वी आता सारखीच परिस्थिती असताना काही सर्जनशील वृत्तीच्या शास्त्रज्ञांनी अंतराळातील स्थानकाची कल्पना मांडली तेव्हा अनेकांना हे काम अशक्य वाटल होत पण काही दूरदर्शी व्यक्तींनी त्यावर विश्वास ठेवला आणि सर्वांनी एकत्र येऊन सहभागी देशांच्या सहकार्याने सर्व देशातील शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि इंजिनीअर्सनी मिळून अशक्य वाटणाऱ्या अंतराळातील स्थानकाची निर्मिती केली आम्ही मोहीम 10 मधील अंतराळवीर ह्या सर्वांसोबत गेल्या चार महिन्यांपासून एकत्र रहात आहोत आणि नासा संस्थेतील सर्व देशातील टीम प्रमुख आम्हाला दररोज मार्गदर्शन करत होते आणि हे शक्य करीत होते ह्या मानवतावादी दृष्ठीकोनामुळे एकत्रीत वास्तव्य करून एकमेकांच्या चांगुलपणाच्या साथीने हे संशोधन करता येऊ शकते ह्या वर विश्वास बसू शकला आम्ही अशाच सर्वांचे प्रतिनिधित्व करतो त्या साठी नासा संस्थेतील सहभागी सर्वांचे आमच्या कुटूंबियांचे आणि मित्रांचे आभार त्यांनी प्रेरित केल्यामुळेच आम्ही इथे येऊ शकलो धन्यवाद!"

Nicole - "Anne च्या ह्या सुंदर शब्दाबद्दल आभार ,स्थानकातून पृथ्वीवर परतताना मी भावनावश झालेय आता विचार करताना जाणवत नासा संस्थेने आम्हाला दिलेली हि संधी किती अमूल्य आहे इथल्या अद्भुत वातावरणात प्रवेश करताना वास्तव्य करताना इथून पृथ्वीच अलौकिक सौदर्य पाहतानाचे क्षण अविस्मरणीय आहेत इथे ह्या अंतराळवीरा सोबत वास्तव्य करताना संशोधन करतानाचा काळ हास्यविनोदात खूप मजेत गेला त्या साठी ह्या टीमचे आभार पृथ्वीवर परतल्यानंतर ह्या सर्वांची आठवण येईल मी तिथून स्थानक आता कुठे आहे ते पाहीन नासा संस्थेने दिलेल्या ह्या संधीबद्दल सर्वांचे आभार !"

Kirill -"इथे ह्या सर्वांसोबत वास्तव्य करताना संशोधन करताना दिवस आनंदात गेले त्या बद्दल सर्वांचे आभार नासा संस्थेने आम्हाला इथे येण्याची हे अद्भुत वातावरण अनुभण्याची आणि पृथ्वीसौन्दर्य पाहण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार टीममधील सर्वांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले ह्या अंतराळ मोहिमा अशाच सुरु राहोत हीच सदिच्छा !

Onishi -आज ह्या दोन्ही समारंभात बोलतानाचा आणि ह्या मोहीम 73 मधील अंतराळवीरांना सोडून जातानाचा क्षण सुखदुःखाचा आहे आता घरी परतण्याची वेळ झालीय ह्या वर विश्वास बसत नाहीय ह्या सर्वांसोबतचा काळ आनंदात गेला मला Huston संस्थेतील Flight Director Nicole Maloy ह्यांचे विशेष आभार मानावयाचे आहेत त्यांच्या उत्कृष्ट लीडरशिप बद्दल त्यांनी नियोजनात बदल करून हि मोहीम विकासात्मक,सुविधाजनक आणी यशस्वी केली Nicole तुझ्या उत्साही पॅझिटिव्ह विचारांचा सर्वावर प्रभाव पडला तू इथले वातावरण आनंदी ठेवलेस तुझयासारख्या  चांगल्या खेळकर व्यक्तिमत्वाची इथे खूप गरज असते Johnny तु खूप मेहनती आहेस ह्या आधी मी तुझ्यासारखी व्यक्ती पाहिली नव्हती पुढच्या सेगमेंट साठी तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे मला तुझ्याशी बोलताना आनंदी वाटायच कारण तू हसतमुख असतोस आणि नेहमी विनोद करतोस त्या मुळे तुझ्यासोबतचे लोक आनंदी होतात तुझ्या मित्रत्वाबद्दल आभार ! नासा संस्थेतील सर्वांचे आभार ह्या वेळी Onishi ह्यांनी स्थानकाची सूत्रे Sergey ह्यांच्या हाती सोपविली तेव्हा अंतराळवीरांनी घंटा वाजवून त्यांचे स्वागत केले Sergey ह्या मोहिमेतील नेतृत्वाबद्दल आभार आपण खूप गप्पा मारल्या आणि नेहमी एकमेकांना मदत केली अनेक आव्हानात्मक प्रसंगावर मात केली आता तुम्ही सर्वजण आनंदात संशोधन करा ह्या मोहीम 73 च्या दुसऱ्या भागाचे नेतृत्व मी आता योग्य हाती सोपवत आहे इथे खूप साऱ्या गोष्टी मिळत नाहीत पण अनेक अशा गोष्ठी मिळतात ज्या पृथ्वीवर मिळत नाहीत स्थानकात केल जाणार संशोधन पृथ्वीवर करता येत नाही ते सुरु ठेवा 

Sergey -Thanks ! आपल्या मोहीम 73ची सुरवात अपोलो च्या पन्नासाव्या वर्धापन दिनी झाली आपण सर्वांनी स्थानकात एकत्र तो दिवस साजरा केला अंतराळस्थानकाचाही पंचविसावा वर्धापनदिन साजरा केला पृथ्वीवरील इतिहास पाहिला तर लोक एकमेकांसोबत सहकार्याने राहात नाहीत पण इथे स्थानकात एकिच स्वरूप पाहायला मिळत सर्वजण एकत्रित वास्तव्य करून संशोधन करतात ह्या चार महिन्यांच्या आनंदी वास्तव्याबद्दल आभार आता तुम्ही पृथ्वीवर सुखरूप पोहोचावे हि सदिच्छा! आम्ही नक्कीच हे संशोधन सुरु ठेवू आणि आनंदात हास्यविनोदात वास्तव्य करून हि मोहीम यशस्वी करू ! 

त्या नंतर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी स्थानका बाहेर पडले


Wednesday, 6 August 2025

Blue Origin NS -34 मोहिमेतील सहा प्रवासी अंतराळ पर्यटनावरून परतले

 

 Blue Origin NS-34  मोहिमेतील अंतराळ पर्यटक Deborah Martorell अंतराळातून परतल्यानंतर -फोटो -Blue Origin

 Blue Origin -3 ऑगस्ट

Blue Origin च्या NS -34 मोहिमेतील सहा अंतराळ प्रवासी तीन ऑगस्टला अंतराळ पर्यटन करून परतले ह्या सहा प्रवाशांमध्ये भारतीय वंशाचे Arvinder Bahal ,Gokhan Erdem ,Deborah Martorell ,Lionel Pitchford ,JD Russelआणि H.E.Justin Sun ह्यांचा समावेश होता

व्यावसायाने रियल इस्टेट गुंतवणूकदार असलेले ऐशी वर्षीय अरविंदर मूळचे आग्र्याचे रहिवासी पण नंतर अमेरिकेत स्थायिक झाले ते खाजगी पायलट आणि हेलिकॉप्टर चालक आहेत ते साहसी आहेत यांनी जगातील अनेक देशांना भेट दिली आहे त्यांनी South Pole ,North Pole ,Mount Everest आणि गिझाच्या पिरॅमिड येथे स्काय डायविंग केले आहे

Gokham -तुर्की उद्योगपती,ऊर्जा,दूरसंचार,बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत ते फोटोग्राफरही  आहेत त्यांना अंतराळाचे आकर्षण आहे त्यांना स्थानकात वास्तव्य करून संशोधन करण्याची आणि दूरवरच्या ग्रहावर जाण्याची इच्छा आहे 

Deborah -Puerto Rican Meteorologist ,Journalist आहेत त्यांना पर्यावरण आणि अंतराळ विश्वातील रिपोर्टींग साठी अमेरिकन मेटेरॉलॉजिकल सोसायटी तर्फे आठवेळा एमी पुरस्कार आणि उत्कृष्ट सायन्स रिपोर्टींग साठी दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे त्यांना अंतराळ विश्वाची आवड असल्यामुळे त्यांनी 2007 मध्ये नासाच्या ZERO-G उड्डाणात भाग घेतला होता त्यांनी प्युर्टोरिकन अंतराळवीर Joe Acaba आणि Marcos Berrios ह्यांचे रिपोर्टींग केले होते शिवाय STS-119 ,Artemis-1आणि प्युर्टोरिकोच्या Nano Satellite प्रक्षेपण मोहिमेचे देखील रिपोर्टींग केले त्या नासाच्या JPLमध्ये कार्यरत आहेत 

Lionel -मुळचे इंग्रज सध्या स्पेन मध्ये शिक्षक,अनुवादक आणि टुरिस्ट गाईड आहेत 1992 मध्ये कुटुंबियांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ काठमांडूत अनाथाश्रमाची स्थापना केली त्यांना अंतराळ उड्डाणाची आवड आहे आणि सामान्य नागरिकाला ते शक्य आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटते 

J D Russel- मालिका उद्योजक,तंत्रज्ञान विषयक व्हेंचर कॅपिटल कंपनी,अल्फा फंड आणि Aerospace Aerospace consulting & solution co.चे संस्थापक त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ Victoria Russel Foundation ची स्थापना त्यांनी ह्या आधी 22 नोव्हेंबर 2024 मध्ये पहिल्यांदा तिकीटाची बोली जिंकून अंतराळ उड्डाण केले होते 

Jastin - Grenedaचे राजदूत आणि Who चे स्थायी सदस्य आहेत Blackchain TRON चे Founder,अलीबाबा Jack Ma चे शिष्य आहेत त्यांच्या उत्कृष्ट लीडरशिप आणि कार्यामुळे त्यांना Forb च्या ग्राहक तंत्रज्ञान विषयक तीस वर्षाखालील तिस कर्तबगार यशस्वी ऊद्योजकांच्या यादित अनेक वेळा स्थान मिळाले त्यांना लहानपणापासूनच अंतराळाचे आकर्षण आणि अंतराळ उड्डाणाची इच्छा आहे 34 वर्षीय Jastin अब्जाधीश आहेत

  

  Blue Origin NS -34 मोहिमेतील अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटनासाठी निघताना -फोटो -Blue Origin

Blue Origin च्या West Texos येथील उड्डाणस्थळावरून New Shepard अंतराळयानातून हे सर्वजण अंतराळ पर्यटनास गेले होते तीन तारखेला सकाळी 7.30 (स्थानिक वेळ) मिनिटाला हे सहाही पर्यटक अंतराळ पर्यटनास निघाले आणि  दहा बारा मिनिटात अंतराळ आणि पृथ्वी ह्यांची सीमारेषा भेदून karman line पर्यंत पोहोचले  अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच त्यांनी अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत तरंगण्याचा अद्भुत अनुभव  घेतला सर्वांनी यानाच्या खिडकीतून  पृथ्वीदर्शन घेतले तेव्हा अमेझिंग !Beautiful Earth ! Oh My God !This is Great ! आपण खरेच अंतराळात पोहोचलो!  अशा  उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या Jastin ह्यांनी त्यांचा लहानपणीचा फोटो दाखवून मॉम Dad मी अंतराळात पोहोचलो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली काही क्षणाचा अद्भुत अनुभव घेऊन सर्वजण पृथ्वीवर परतले तेव्हा सर्वजण निशब्ध आणि आनंदीत झाले होते प्रतिक्रिया व्यक्त करताना Deborah म्हणाल्या मला शब्ध सुचत नाहीत खूप सुंदर अनुभव होता

ह्या सर्वांना Blue Origin तर्फे अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट आणि त्यांची कर्तृत्व वैशिष्ठे कोरलेला patch देण्यात आला 

 ह्या यशस्वी पर्यटनानंतर New Shepard चे वरिष्ठ उपाध्यक्ष Phil Joyce म्हणतात ,ह्या उड्डाणात वेवेगवेग्ळ्या देशांचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर कर्तृत्वान नागरिक सहभागी झाले हा आमचा बहुमान आहे अंतराळातून पृथ्वीदर्शन करताना एकात्मतेचे दर्शन घडते हे पाहून आनंद होतो आता ह्या अनुभवाचा पृथ्वी विकासासाठी कसा उपयोग करतात हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत