Monday, 27 January 2025

नासाच्या Innovative Technology Concepts स्पर्धेतील विजेते घोषित

 A collage of artist concepts highlighting the novel approaches proposed by the 2025 NIAC awardees for possible future missions.

नासाच्या Innovative Technology Concepts स्पर्धेतील 2025 च्या विजेत्यांनी संकल्पित केलेल्या कल्पनेचे चित्रकारांनी साकारलेले कोलाज -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था- 27 जानेवारी

नासा संस्था नेहमीच भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील संशोधनासाठी आणी अंतराळवीरांच्या परग्रहावरील सुरक्षीत वास्तव्यासाठी नवनवीन अभियान राबवते शास्त्रज्ञ आणी सर्जनशील नागरिकांना सहभागी होण्यासाठी स्पर्धा जाहीर करते 2025 च्या अभियाना अंतर्गत NIAC द्वारा जाहीर केलेल्या ह्या वर्षीच्या स्पर्धेतील 15 विजेत्यांची नावे नासाने नुकतीच घोषित केली आहेत अमेरिकेतील सर्व राज्यातील संस्था आणी कंपनीतील सहभागी स्पर्धेकामधुन आलेल्या अद्ययावत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या स्पर्धेकांची निवड करण्यात आली आहे 

नासा संस्थेच्या N.I.AC (NASA Innovative Advance Concept) ह्या मोहिमे अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येतो नासा संस्था भविष्यकालीन अंतराळ मोहिमेसाठी,अंतराळविश्वातील व्यावसायिक वाढीसाठीआणि एरोस्पेस मोहीम सक्षम करण्यासाठी अशा अवकाश तंत्रज्ञानांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक मदत करते 2025 च्या ह्या निवडक संशोधकांना नासा संस्थेतर्फे $ 2.628 M चे एकत्रित आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे

Washington येथील नासा संस्थेतील Space Technology विभागाचे Associate Administrator -Glayton Turner म्हणतात,"हे संशोधीत तंत्रज्ञान भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल आजवर मानवाला अज्ञात असलेल्या ब्रह्मांडा विषयी,आपल्या सौरमाले विषयीची माहिती संशोधित करण्यास मदत होईल विशेषतः अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत संशोधन करताना शिवाय आपल्या पृथ्वी संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल " ह्या आधीच्या निवडक संशोधकांच्या ह्या नाविन्यपूर्ण संकल्पना आज सत्यात उतरल्या आहेत परग्रहावरील समुद्रात पोहणारा छोटा रोबोट असो किंवा परग्रहावर भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना तेथील वास्तव्यासाठी बुरशीपासून घर बांधणी असो त्या आता शक्य झाल्या आहेत !'

ह्या नव्या निवडक संशोधित तंत्रज्ञान अविष्कारामध्ये सूर्याचा सौरमालेवर होणारा प्रभाव शोधण्यासाठी,चंद्रावर भविष्यकालीन अंतराळवीरांच्या वास्तव्यासाठी काचेचे घर बनविण्याची अभिनव कल्पना आणि शनीच्या बर्फ़ाळ चंद्रावरील संशोधनासाठी अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्याच्या संकल्पनेचा समावेश आहे 

Helicity Space LLC Pasadena California  येथील RyanWeed ह्यांनी संशोधित केलेल्या संकल्पनेत अंतराळयानाचा समुह कल्पित केला आहे जो Compact & Scalable Fusion Propulsion system चा वापर करून हेलिओस्पियर आणि त्याही पलीकडे जलद आणि बहुदिशेने कार्यरत राहू शकतो आणि सूर्याचा सौरमालेतील ग्रहताऱ्यांशी असलेला प्रभाव संशोधित करू शकतो हि संशोधित माहिती भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरेल 

California येथील Martin Bermudez Skyeports ह्यांनी चंद्रावरील कमी गुरुत्वाकर्षणात भविष्यकालीन मानवी वास्तव्यासाठी चंद्रभूमीवरील काचेचा वापर करून शेलच्या आकाराचे घर बांधण्याची संकल्पना मांडली आहे त्या साठी चंद्रभूमीवरील आणि भूगर्भातील काचेचा समावेश असलेल्या खडक व इतर मिनरल्सचा शोध घेऊन त्यावर तेथेच प्रक्रिया करून काच निर्मिती करण्याची संकल्पना संशोधित केली आहे 

Urbana येथील Justin Yim ह्यांनी LEAP नावाचा खोल समुद्रात बुडी मारणारा रोबोट तयार केला आहे जो शनीचा बर्फ़ाळ चंद्र Enceladus येथील गरम पाण्याच्या झऱ्याखाली अस्तित्वात असलेल्या खोलवर समुद्राच्या तळाशी अनेक वेळा बुडी मारून तेथील खडक आणि इतर गोष्टीचे नमुने गोळा करेल आणि पुन्हा वर येऊन तेथील आकाशातील विमानात ठेवेल विमानातील अद्ययावत यंत्रणेच्या साहाय्याने तेथेच त्या संशोधित नमुन्यांच्या सूक्ष्म कणांचे संशोधन करण्यात येईल 

ह्या सर्व  निवडक संकल्पना सध्या प्राथमिक स्वरूपात आहेत त्यावर नासा संस्थेतील शास्त्रज्ञांच्या टीमच्या सहकार्याने सखोल संशोधन करण्यात येईल त्या नंतर नासा संस्थेतील तज्ञांच्या अंतिम संशोधनानंतर सर्व बाबीची पूर्तता तपासण्यात येईल आणि मान्यता मिळेल

नासा संस्थेच्या ह्या N.I.AC उपक्रमा अंतर्गत अशा बुद्धिमान संशोधकांना आर्थिक साहाय्य केले जाते आणि आवश्यक ती टेक्निकल मदतही दिल्या जाते त्या मुळेच आता स्वप्नवत अशक्य वाटणाऱ्या ह्या संकल्पना संशोधित होतील आणि सत्यात उतरतील ह्या उपक्रमा अंतर्गत संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या साहित्यात सेन्सर्स,उपकरणे उत्पादन तंत्र,ऊर्जा प्रणाली व इतर आवश्यक गोष्टींचा समावेश आहे 


Saturday, 18 January 2025

अंतराळस्थानकाच्या कामासाठी अंतराळवीर Sunta Williams आणी Nick Hague ह्यांचा Space Walk संपन्न

  Astronaut Suni Williams is pictured during a spacewalk outside the space station where she replaced a rate gyro assembly that helps maintain the orientation of the orbital outpost on Jan. 16, 2025.

 नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Nick Hague अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागात Space Walk  करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 16 जानेवारी

अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी अंतराळवीर Sunita Williams आणी Nick Hugue ह्यांनी Space Walk पुर्ण केला हे दोन्हीही अंतराळवीर 16 जानेवारीला सकाळी 8.01मिनिटाला स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडले आणी दुपारी 2.01मिनिटाला स्पेसवॉक संपवून स्थानकात परतले

आदल्या दिवशीच ह्या दोन्ही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉकची तयारी करुन ठेवली होती त्यांनी त्यांचे स्पेससुट चेक करून चार्ज केले आणी स्पेसवॉकसाठी लागणारा टुलबॉक्स,कॅमेरे तयार ठेवले शिवाय या दोघांनी त्यांचे हेल्थ चेकअपही केले 

ह्या सहा तासांच्या स्पेसवॉक दरम्यान ह्या अंतराळविरांनी स्थानकाच्या बाहेरील भागातील Rate gyro assembly आणी NICER X-ray Telescope च्या दुरुस्तीचे आणि खराब झालेला पार्ट काढून नवीन पार्ट बसविण्याचे काम केले NICER Telescope मधील reflecter light filters मधील खराब झालेल्या भागात पॅचेस बसवुन दुरुस्ती केली आणी International docking adaptors च्या एका भागातील Reflector device बदलले आणि इतर कामे पूर्ण केली 

अंतराळवीर Sunita ह्यांच्या अंतराळ करिअर मधील त्यांनी केलेला हा आठवा स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी परीधान केलेला स्पेससुट रेशा विरहित होता तर Nick Hague ह्यांनी परीधान केलेल्या स्पेससुटवर लाल रंगाच्या रेशा होत्या त्यांच्या अंतराळ करिअर मधला त्यांनी केलेला आजवरचा हा चौथा स्पेसवॉक होता आणि अंतराळस्थानकाच्या कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 273 वा स्पेसवॉक होता

Friday, 17 January 2025

नासाच्या आर्टिमस मोहीमे अंतर्गत व्यावसायिक Blue Ghost Lunar lander अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह चंद्राकडे मार्गस्थ

 Creating a golden streak in the night sky, a SpaceX Falcon 9 rocket carrying Firefly Aerospace’s Blue Ghost Mission One lander soars upward after liftoff from Launch Complex 39A at NASA’s Kennedy Space Center in Florida on Wednesday, Jan. 15, 2025 as part of NASA’s CLPS (Commercial Lunar Payload Services) initiative. The Blue Ghost lander will carry 10 NASA science and technology instruments to the lunar surface to further understand the Moon and help prepare for future human missions.

  Firefly Blue Ghost lunar lander नासाच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावले तो क्षण -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था- 15 जानेवारी

नासाची बंद पडलेली चांद्रमोहिम पन्नास वर्षांनी पुन्हा सुरु झाल्यानंतर आर्टिमस मोहीमेची जय्यत तयारी सुरू आहे विषेश म्हणजे ह्या मोहीमेत आता अनेक देशही सामिल झाले आहेत ह्या मोहीमेच्या यशस्वीतेसाठी आणी ह्या मोहिमेतील अंतराळविरांच्या सुरक्षिततेसाठी नासा संस्था वेगवेगळे ऊपक्रम राबवत असते नासा संस्थेने ह्या मोहिमेत व्यावसायिक संस्थाना देखील सहभागी होऊन lunar lander तयार करण्याची संधी दिली होती 

ह्याच मोहीमेतील सहभागी Firefly संस्थेने बनविलेले Blue Ghost lunar lander नासाच्या चंद्र भुमीवरील संशोधीत माहिती गोळा करण्यासाठी बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक सायंटिफिक ऊपकरणासह चंद्राकडे मार्गस्थ झाले आहे 15 जानेवारीला नासाच्या Florida येथील Kennedy Space center मधील 39A ह्या ऊड्डाण स्थळावरुन 1.11 मिनिटाला Firefly चे Blue Ghost चांद्रयान चंद्रावर जाण्यासाठी Space X Falcon -9 रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात झेपावले ह्या अंतराळयाना सोबत नासाने अत्याधुनिक यंत्रणेने युक्त दहा सायन्स आणि टेकनॉलॉजी उपकरणे चंद्रावर पाठविली आहेत 2 मार्चला हे यान चंद्रावर पोहोचेल

Blue Ghost चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर नासाच्या Deputy Administrator Pam Melroy ह्यांनी आनंद व्यक्त केला त्या म्हणतात ," आर्टीमस मोहिमेअंतर्गत अंतराळविश्वातील मानवाला अज्ञात असलेल्या गोष्टींचा व घडामोडींचा शोध घेण्यासाठी नासाने राबविलेली हि  धाडसी मोहीम आर्टीमस आणि दूरवरच्या मंगळ मोहिमेतील  अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरेल अंतराळविश्वाच्या मोठ्या Blue प्रिंटवर उमटलेले नासाचे हे छोटे ऐतिहासिक पाऊल अंतराळवीरांना चंद्रभूमीवर वास्तव्य करून संशोधन करताना सुरक्षितपणे यशाच्या शाश्वत वाटेवर नेईल त्यासाठी Firefly आणि Space X संस्थेचे अभिनंदन !"

एकदा का Blue Ghost यान चंद्रावर पोहोचले कि त्यातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल आणि ह्या यानातील सायंटिफिक उपकरणे आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी घेतल्या जाईल यानातील रोबोटिक आर्म,हॅमर आणि इतर उपकरणाद्वारे चंद्रभूमीवरील आणि भूगर्भातील जमिनीची उत्खनन क्षमता उत्खनना नंतरची तेथील खडक,माती,वाळू ,मिनरल्स आणि इतर गोष्टीचे नमुने घेऊन ते व्यवस्थित गोळा करण्याची क्षमता चेक केल्या जाईल चंद्रावरील वातावरणातील संशोधित माहिती, जागतिक Navigation Satellite system ,Radiation Tolerant Computing क्षमता चेक केल्या जाईल नविन तंत्रज्ञान वापरून चंद्रावरील चिकट धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपकरणाची कार्य क्षमता तपासण्यात येईल हि धूळ झटकण्यासाठी आणि अंतराळयान व अंतराळवीरांच्या स्पेससूटचे ह्या धुळीपासून संरक्षण करण्यासाठीच्या ह्या नवीन यंत्रणेची यशस्वीता चेक करण्यात येईल ह्या संशोधित माहितीमुळे अंतराळातील हानिकारक कॉस्मिक किरणे आणि इतर वायूपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यास मदत होईल 

नासाच्या वॉशिंग्टन येथील Science mission च्या Associate Administrator -Nicola Fox म्हणतात ,"नासा संस्था नव्या उपक्रमाद्वारे अंतराळविश्वातील संशोधित माहिती मिळवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते अर्टीमस मोहिमेद्वारे पुन्हा एकदा चंद्रभूमीवर मानवी पाऊल पडणार आहे आम्ही आधीच्या Apollo मोहिमेतून बरेच धडे घेतले आहेत त्या मुळे आधीच्या त्रुटींवर मात करून आर्टीमस मोहिमेतील अंतराळयानात अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला आहे आणि मुख्य म्हणजे ह्या मोहिमेतील अंतराळयान आणि अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे आम्ही आता Blue Ghost मोहिमेद्वारे चंद्रावरील संशोधित माहिती पृथ्वीवर येण्याची आतुरतेने वाट पहात आहोत!"

ह्या मोहिमेद्वारे चंद्रावरील वातावरण,उत्क्रांती,तेथील पुरातन सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे पाण्याचे अस्तित्व,पुरातनकाळी अस्तित्वात असलेले आटलेले पाण्याचे श्रोत ह्याविषीयी संशोधित माहिती गोळा केल्या जाईल आणि भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रावर वास्तव्य करून संशोधन करण्यासाठी पृथ्वीसारखे पोषक वातावरण असलेल्या सुरक्षित जागेचा शोध घेण्यात येईल

Blue Ghost अंतराळयान चंद्रभूमीवर उतरण्याआधी चार दिवस चंद्राच्या कक्षेत भ्रमण करेल त्या नंतर चंद्राच्या ईशान्य भागातील भूकंपप्रवण क्षेत्रातील Mare Crisium ह्या भागात उतरेल व तेथील संशोधित माहिती गोळा करण्यास सुरवात करेल 

Saturday, 11 January 2025

नासा संस्थेने Perseverance मंगळयानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर आणण्यासाठी दोन विकसित संकल्पनेची निवड केली

 

 This photomontage shows each of the sample tubes shortly after they were deposited onto the surface by NASA’s Perseverance Mars rover, as viewed by the WATSON (Wide Angle Topographic Sensor for Operations and eNgineering) camera on the end of the rover’s 7-foot-long (2-meter-long) robotic arm. Shown, from left, are “Malay,” “Mageik,” “Crosswind Lake,” “Roubion,” “Coulettes,” “Montdenier,” “Bearwallow,” “Skyland,” “Atsah,” and “Amalik.” Deposited from Dec. 21, 2022, to Jan. 28, 2023, these samples make up the sample depot Perseverance built at “Three Forks,” a location within Mars’ Jezero Crater.

 

नासाच्या Perseverance मंगळ यानाने गोळा केलेल्या  मंगळावरील खडकांच्या नमुन्याच्या कुपी -फोटो -नासा संस्था

 

नासा संस्था - 7 जानेवारी

नासा संस्थेच्या Perseverance आणि Curiosity मंगळयानाने  यानातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मंगळभूमीवरील  आणि भूगर्भातील खडक,माती मिनरल्सचे नमुने गोळा करून त्यांचे नमुने Perseverance यानातील कंटेनर मध्ये व्यवस्थित ठेवण्याचे काम यशस्वी केले आहे यानाला बसविण्यात आलेल्या रोबोटिक आर्म आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने खडकाचे नमुने शोधून रोबोटिक आर्मच्या साहाय्याने जमीन खणून रोबोटिक हॅमरने खडकांचा चुरा करून तो चुरा,माती,वाळू आणि इतर वस्तू यानातील टिटॅनियमच्या कुपीत भरून ठेवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे आता ह्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर आणण्यासाठी नासा संस्थेने दोन नवीन पर्यायी मार्गाचा विचार केला असून हे नमुने पृथ्वीवर कमी वेळेत आणि कमी खर्चात पोहोचण्यासाठी नवीन संशोधित संकल्पनेची निवड करण्यात आली आहे 

ह्या नव्या संशोधित संकल्पनेनुसार एकाच मार्गाने हे नमुने आणण्याचा विचार करण्यात आला आहे मंगळ ग्रहावरून पहिल्यांदाच हे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार असून ह्या नमुन्यांच्या संशोधनानंतर मंगळावरील मानवाला अज्ञात असलेली माहिती आणि पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाची शक्यता ह्या विषयी माहिती मिळेल 2026 मध्ये ह्या नव्या मार्गाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल 

नासा संस्थेचे Administrator Bill Nelson म्हणतात,"नासा संस्थेने निवड केलेल्या ह्या दोन नव्या पर्यायी विकसित संकल्पनेचा वापर केल्यामुळे मंगळावरील खडकांच्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर आणण्याचा मार्ग निश्चित होईल शिवाय पैसे आणि वेळही वाचेल हे नमुने पृथ्वीवर आणल्यावर शास्त्रज्ञांना ब्रह्मांड आपली ग्रहमाला आणि मंगळग्रहाची निर्मिती ह्या विषयी संशोधन करताना विचाराची नवी दिशा मिळेल नासाच्या मंगळ मोहिमेतील टीम प्रमूख Maria Zuber ह्यांच्या नेतृत्वात सुरु असलेले हे नाविन्यपूर्ण काम प्रशंसनीय आहे !'

2024 च्या सप्टेंबर मध्ये नासा संस्थेतील शास्त्रज्ञांच्या टीमने मंगळावरील खडकांच्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर आणण्यासाठी 11 संकल्पित पर्यायांची निवड केली आणि त्यातून सखोल निरीक्षणाअंती कमी खर्चिक आणि कमी वेळेत नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचणाऱ्या संकल्पित मार्गाच्या अंतिम निवड करण्यात आली 

नासाच्या Science Mission Directorate- Nicky Fox  म्हणतात," नासाचे मंगळयान मंगळावरील विपरीत परिस्थितीत तेथील नमुने गोळा करण्याचे कठीण काम यशस्वीपणे पार पाडत आहेत आणि आम्ही ते पृथ्वीवर लवकर आणण्याच्या प्रयत्नात आहोत ज्यामुळे पृथ्वीवरील अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने ते संशोधित करता येतील ह्या संशोधनामुळे मंगळावरील भौगोलिक,जिऑलॉजिकल आणि सजीवाच्या अस्तित्वाबद्दल मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळेलच शिवाय आपल्या सौरमालेच्या निर्मिती वर प्रकाश पडेल कदाचित आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण होण्याआधी मंगळावर सजीव सृष्टीचे अस्तित्व होते का? ह्या विषयी देखील माहिती मिळेल आणि भविष्यकालीन मानवसहित मंगळमोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळावरील वास्तव्यासाठी संशोधनासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल 

ह्या दोन नव्या संशोधित संकल्पनेनुसार मंगळभूमीवर Payload Platform उतरवण्यासाठी दोन वेगळ्या पर्यायी माध्यमाचा विचार केल्या जाईल पूर्वीच्या संकल्पनेनुसार Flown Entry,Descent and Landing Systemचा आधी विचार केल्या जाईल  संकल्पित Sky Crane Method चा उपयोग केल्या जाईल 

दुसऱ्या पर्यायात व्यावसायिक संकल्पनेचा वापर केल्या जाईल मंगळ भूमीच्या पृष्ठभागावर Lander Payload वितरित करण्यासाठी व्यावसायिक क्षमता विकसित केल्या जाईल दोन्ही संकल्पनेत Mars Ascent Vehicle च्या छोट्या आवृत्तीचा वापर केल्या जाईल Solar Panels ऐवजी  Radioisotope power systemचा वापर केल्या जाईल त्या मुळे मंगळावरील धुली वादळात यानाला ऊर्जा व प्रकाश मिळेल आणि मंगळावरील धुलीवादळात काही समस्या उद्भवणार नाही Orbital sample कंटेनर सिस्टिम द्वारे Perseverance यानाने गोळा केलेल्या 30 नमुन्यांच्या कुपी आधी कंटेनर मध्ये न ठेवता त्या डायरेक्ट Orbital कंटेनर मध्ये ठेवल्या जातील त्या मुळे ग्रहावर उडणारी धूळ व नमुने इतरत्र पडणार नाहीत

आधीच्या संकल्पनेनुसार  मंगळ मोहिमेतील टीममधील शास्त्रज्ञांनी अद्ययावत यंत्रणेने बनविलेल्या दोन हेलिकॉप्टर द्वारे हे नमुने पृथ्वीवर आणल्या जातील Sample Retrieval Lander आणि दोन Helicopters मुळे यानाला नमुने गोळा करण्यासाठी आता Fetch रोव्हर किंवा त्याच्याशी संलग्न अशा दुसऱ्या Lander ची आवश्यकता भासणार नाही ह्या नवीन Sample Retrieval Lander सोबत पाठविण्यात येणारे हेलिकॉप्टर बनविताना आधीच्या Ingenuity हेलिकॉप्टरचे डिझाईन वापरून त्यातील त्रुटी कमी करून काही सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्या मुळे हे काम कमी त्रासाचे आणि सोपे होईल आता ह्या हेलिकॉप्टर मध्येच नमुने गोळा करण्याची क्षमता निर्माण केली असल्यामुळे हे काम आता हेलिकॉप्टर द्वारे केले जाईल Earth Return Orbiter आणि Sample Retrieval Lander मंगळग्रहावर पाठविण्यात येणार असून 2033 मध्ये ते तेथील खडकांचे व इतर नमुने घेऊन पृथ्वीवर परतेल आगामी काळात Earth Return Orbiter आणि हेलिकॉप्टर्स पृथ्वीवरून मंगळ आणि पुन्हा पृथ्वी असा ऐतिहासिक अंतराळ प्रवास सुरु करेल आणि Sample Transfer Arm द्वारे रोबोटिकली नमुन्यांच्या कुपी Orbiting Sample Container मध्ये भरेल

या मोहिमेअंतर्गत प्रथमच परग्रहावर रॉकेट ऊड्डाण मोहिम राबविण्यात येईल MAV ह्या कार्याचा शुभारंभ करेल MAV मंगळग्रहावरील Jezero Crater ह्या भागात ऊतरेल आणी Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी कंटेनरमध्ये भरून पुन्हा तेथून ऊड्डान करून पृथ्वीवर पोहोचेल Jezero Crater चा हा भाग भविष्यकालीन मंगळ मोहिमेसाठी Launch Platform म्हणून वापरला जाईल MAV मध्ये Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी व्यवस्थित भरल्या गेल्या नंतरच Lockheed Rocket तिथून पृथ्वीकडे येण्यासाठी उड्डाण करेल प्रथमच परग्रहावर Rocket मंगळ ग्रहांवरचे वातावरण भेदून पृथ्वीवर परतण्यासाठी उड्डाण करताना पेट घेईल पण MAV साठी पृथ्वीवरून मंगळावर उड्डाण कारण्या एव्हडे मंगळावरून पृथ्वीकडे उड्डाण करणे सोपे नसेल कारण तेथील वातावरण वेगळे आहे आणि MAV हे छोटे आणि वजनाने हलके असल्याने हि प्रक्रिया पार पाडताना काही अडथळे येण्याची शक्यता आहे म्हणूनच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता त्यात निर्माण केली गेली आहे 

पण हे काम खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळे मंगळावरील Perseverance मंगळयानाने गोळा केलेल्या खडक व इतर गोष्टीच्या नमुन्याच्या कुपी पृथ्वीवर आणण्यासाठी टीममधील शास्त्रज्ञांनी नवीन विकसित संकल्पित मार्ग संशोधित केल्यामुळे कमी वेळात आणि खर्चात हे नमुने पृथ्वीवर पोहोचतील


Tuesday, 31 December 2024

नासाच्या Parker Solar Probe अंतराळयानाचा सूर्याच्या अंतर्गत भागात ऐतिहासिक प्रवेश

 

 Illustration of Parker Solar Probe facing the Sun 

 नासाचे पार्कर सोलर प्रोब सौर यान सूर्याच्या कक्षेत शिरताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -27 डिसेंबर

आकाशातील तळपत्या तेजोमय सुर्याच्या ऊगवण्याने सृष्टीतील चराचरातील चेतना जागृत होते सर्वत्र प्रकाश पसरतो पण सूर्याच्या प्रखर उष्णतेने सृष्ठी होरपळते प्रखर उष्णतेच्या तेजाने तळपणाऱ्या सूर्याकडे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही आपले डोळे दिपतात आपली पृथ्वी सूर्यापासून करोडो मैल दूर असून आपली हि अवस्था होते मग सूर्याच्या जवळ किती तीव्र उष्णता असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो अशा वेळेस एखादे अंतराळयान सूर्याच्या जवळच नाही तर त्याच्या तळपत्या तेजोवलयात शिरून प्रत्यक्ष सूर्याला स्पर्शून आल ह्या वर सहजासहजी विश्वास बसणार नाही पण आजच्या बुद्धिमान शास्त्रज्ञाच्या प्रगत यांत्रिक युगात हे शक्य झालय नासाच्या पार्कर सोलर प्रोबने हे काम केलय पार्कर सौर यानाने सूर्याच्या करोना ह्या भागात म्हणजेच तेजोवलयात प्रवेश केला आणि तोही एकदाच नाही तर तीनदा आणि तेथील विध्युत भारित कणांचे सॅम्पल्स देखील गोळा केले आहेत पार्कर सौरयान मिशनचे शास्त्रज्ञ,टीममधील इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञ ह्यांच्यामुळे हे ऐतिहासिक यश प्राप्त झाले

आता 24 डिसेंबरला पुन्हा Parker Solar probeने सूर्याच्या कक्षेत अत्यंत जवळ पोहोचून वेगाने फेरी मारण्याची ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आणि पार्कर सोलर प्रोबने त्याचा सूर्याच्या कक्षेत अत्यंत वेगाने फेरी मारण्याचा जुना विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे 24 डिसेंबरला पार्कर प्रोबने सूर्याच्या कक्षेत अत्यंत जवळून ताशी 430,000 मैल वेगाने फेरी मारत ऐतिहासिक नोंद केली आजवरच्या ईतिहासात पहिल्यांंदाच अशी घटना घडली आहे आजवर एकही सौरयान सुर्याच्या ईतक्या जवळ गेले नव्हते 26 डिसेंबरला नासा संस्थेला मिळालेल्या Beacon toneच्या संदेशानुसार पार्कर सोलर प्रोबने सुरक्षितपणे सूर्याभोवती अत्यंत वेगाने फेरी मारली आणि अजूनही सूर्याभोवती फेरी मारत आहे इतक्या उष्ण तापमानात जवळून फेरी मारल्यानंतरही हे सौर यान हि मोहीम यशस्वी करत सुरक्षित राहिल्याने शास्त्रज्ञांचे मत बदलण्यास मदत मिळाली आहे शास्त्रज्ञ 1958 सालापासून सूर्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आता इतक्या वर्षांनी हा ऐतिहासिक क्षण आला आहे असे पार्कर सौर यान मोहिमेतील सिस्टिम इंजिनीअर म्हणतात 

नासा संस्थेतील Associate Administrator -(Science Mission Directorate)  Nicky FOX म्हणतात ," पार्कर सौर यानाची सूर्याच्या कक्षेत शिरून इतक्या जवळून फेरी मारण्याची हि पहिलीच ऐतिहासिक घटना आहे त्या मुळे आता शास्त्रज्ञांना सोलर सिस्टिमचा सखोल अभ्यास करता येईल सूर्याचा सौरमंडळ आणि अंतराळावर पडणारा प्रभाव शिवाय सूर्याकडून सजीव सृष्टीला दररोज मिळणारी ऊर्जा ह्या बाबतीत संशोधन करता येईल आपल्या सौरमाले बाहेर आपल्या पृथ्वीसारखे सजीव सृष्टीचे अस्तित्व आहे का? हेही शोधता येईल पार्कर सौर यान 2018 मध्ये सुर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले तेव्हा पासून शात्रज्ञ  गेली सात वर्षे  ह्या क्षणाची वाट पाहात होते !"

2018 साली पार्कर सोलर सौर यान सूर्याच्या दिशेने मार्गस्थ झाले होते सूर्याच्या कक्षेत शिरण्याआधी पार्कर सौरयानाने शुक्राभोवती सात फेऱ्या मारल्या होत्या आणि सातव्या फेरीत शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करीत सूर्याचा कक्षेत प्रवेश केला होता सूर्याभोवतीची कक्षा अंडाकृती आकाराची असल्यामुळे पार्कर सौर यान यानातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेने दर तीन महिन्यांनी सुरक्षित अंतर ठेवून भ्रमण दिशा बदलत सूर्याच्या उष्णतेपासून यान सुरक्षित ठेवतो तेथील प्रचंड ऊष्णतेमुळे आणि रेडिएशन मुळे सर्व क्षणात जळून खाक होईल पण पार्कर यानाची निर्मिती करताना त्यात थर्मल प्रोटेक्शन सिस्टिम बसविण्यात आल्यामुळे यान सूर्याच्या कक्षेत आतपर्यंत पोहोचले आणि सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी ठरले 

पार्कर सौर यानाचे प्रोजेक्ट सायंटिस्ट Nour Rawafi म्हणतात ,"पार्कर सौर यानाने सूर्याच्या अंतर्गत भागात पोहोचून अत्यंत उष्ण भागात भ्रमण करीत यान सुरक्षित ठेऊन हि मोहिम शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा जास्त यशस्वी केली आहे सूर्याच्या करोना भागात 1 मिलियन डिग्री फॅरनहिट इतकी उष्णता असते अशा वातावरणात यानाला इजा पोहोचु नये म्हणून यानाच्या वरच्या भागात कार्बन फोमची शिल्ड बसविण्यात आली आहे त्या मुळे यान सूर्याची 2,600 डिग्री फॅरनहिट उष्णता सहन करू शकेल अशा वातावरणात स्टील देखील वितळेल पण हि शिल्ड आगीपासून यानाचे संरक्षण करेल !" 

ह्या आधी पार्कर यानाने सुर्याभोवतीचे वातावरण व सौरवादळ ह्या मधील सिमारेषा भेदत सूर्याच्या कक्षेत प्रवेश केला त्यावेळी यान सुर्याच्या मध्यापासून 3.83 मिलीयन मैल अंतरावर पोहचले होते चार पाच तासाच्या काळात यानाने तिनदा करोना कक्षेत प्रवेश केला आणी यानात बसविलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने तेथील विध्युत भारीत पार्टिकलस पण गोळा केले होते  

पार्कर यानाने 2019 मध्ये पाठविलेल्या माहितीमुळे सुर्याभोवतीचे तेजोवलय अशाच सौरवादळामुळे तयार होते आणी त्याचा आकार Zig -Zag आहे हे कळाले त्याला Switchbacks म्हणतात आणी हा भाग सुर्याच्या अत्यंत जवळ आहे पण हे कोठे आणी कसे तयार होतात ह्या बाबतीत डिटेल माहिती मिळाली नव्हती पण पार्कर यान करोना भागात शिरल्याने आणि त्याने सॅम्पल्स आणि फोटो घेतल्यामुळे सखोल संशोधनानंतर ह्या संबंधित माहिती प्राप्त झाली होती 

सुर्य पृथ्वीसारखा Solid नाही तेथे जमीन नाही तो प्रचंड धगधगता आगीचा गोळा आहे तेथे प्रचंड ऊष्णतेमुळे सतत आगीच्या धगधगत्या ज्वाळा बाहेर पडतात आणी त्यातून प्रचंड वेगाने बाहेर पडणारे वायू,धुळ,विद्युतभारीत कण ह्यामुळे तेथे सतत सौरवादळ होते आणी तेथे असलेल्या मॅग्नेटिक फिल्ड आणी ग्रॅव्हिटीमुळे हा आगीचा डोंब गोळ्याच्या कींवा बॉलच्या आकारात बांधला जातो ह्या विद्युतभारीत कणांनी सुर्याच्या आतील भागातील Plasma तयार होतो तेथील मँग्नेटिक फिल्ड मुळे तो तेथेच फिरत रहातो पण जेव्हा आगीचा प्रचंड दाब येतो तेव्हा हे पार्टिकल अत्यंत वेगाने बाहेर फेकले जातात आणि तेथे फिरत राहतात अशी संशोधित माहिती व फोटो पार्कर सौर यानाने आतापर्यंत गोळा केली होती आता  सूर्याच्या अत्यंत उष्ण अंतर्गत भागातील यशस्वी फेरीमुळे शास्त्रज्ञांना आता करोना भागातील अंतर्गत उष्णतेचे मोजमाप तिथून उत्सर्जित होणारी किरणे आगीच्या ज्वाळा आणि इलेक्ट्रिकल ,मॅग्नेटिक भारित सौरकण ,सौरवादळाची संशोधित सखोल माहिती मिळेल 

Saturday, 28 December 2024

अंतराळवीरांनी लाइव्ह संवादादरम्यान स्थानकातून पृथ्वीवासियांना दिल्या ख्रिसमस निमित्य शुभेच्छा

 NASA astronauts Don Pettit and Suni Williams pose for a fun holiday season portrait while speaking on a ham radio inside the Columbus laboratory module.

अंतराळवीर Sunita Wlliams आणि Butch Wilmore नासा संस्थेशी लाईव्ह संवादा दरम्यान पृथ्वीवासीयांना शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -24 डिसेंबर

25 डिसेंबरला जगभरात सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जातो सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत,मित्रांसोबत एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करतात पृथ्वीपासून दूर अंतराळातील फिरत्या अंतराळ स्थानकात वास्तव्य करणारे अंतराळवीर मात्र आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करू शकत नाहीत पण स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत हे अंतराळवीर स्थानकातील सहकारी अंतराळवीरांसोबत एकत्र येऊन हा सण साजरा करतात अंतराळ स्थानकातील मोकळ्या जागेत तिथे ऊपलब्ध असलेल्या साधनांनी सजावट करतात ख्रिसमस साठी खास वेषभूषा करतात आणी पृथ्वीवरुन ख्रिसमस निमित्य आलेल्या पदार्थांचा एकत्रित आस्वाद घेऊन आनंदाने हा सण साजरा करतात

ह्या वर्षी देखील अंतराळस्थानकात वास्तव्यास असलेले नासाचे अंतराळवीर Sunita Williams ,Nick Hague,Butch Wilmore,आणी अंतराळवीर Don Pettit ह्यांनी ख्रिसमस सण साजरा केला त्यांनी त्यांची ह्या आठवड्यातील कामे लवकर आटोपून ख्रिसमस साठी वेळ काढला स्थानकातील मोकळ्या जागेत सजावट करून ख्रिसमस निमित्त खास वेषभूषा करून हा सण आनंदाने साजरा केला आणी नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादा दरम्यान त्यांचे कुटुंबीय, मित्र आणी पृथ्वीवासियांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा दिल्या

Sunita- अंतराळस्थानकात तुम्हा सर्वांचे स्वागत आम्ही ईथे अंतराळस्थानकातील सात अंतराळवीर मिळुन ख्रिसमस साजरा करणार आहोत आपण पृथ्वीवर आपल्या कुटुंबीयांसोबत एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतो तसेच ईथे आम्ही स्थानकातील Space Family सोबत हा सण साजरा करतोय मला ख्रिसमस साजरा करायला आवडतो त्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र जमतात, सणासाठी तयार होतात  घराची सजावट करतात वेगवेगळे पदार्थ करतात आम्ही पण थोडी फार सजावट करून तयारी केलीय

Nick- ख्रिसमसचा काळ सुट्टीचा असतो त्यावेळी दरवर्षी  ख्रिसमसला मी माझ्या कुटुंबियासोबत,मित्रांसोबत ह्या सुट्टीचा आनंद घेतो एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतो पण ह्या वर्षी मी त्यांच्या पासून दुर ईथे अंतराळातील फिरत्या स्थानकातील घरात वास्तव्य करतोय म्हणून ईथुन तुम्हा सर्वांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा देतोय हि सुट्टी तुम्हाला आनंदात जावो ! मला हेही सांगायचे आहे की,आम्ही एकटेच कुटुंबियांपासुन दुर रहाणारे नाही तर नासा संस्थेतील आमच्या टिममधील सर्व जगभरातील आम्हाला रोज मार्गदर्शन करणारे लोक आहेत जे सणाच्या वेळी पण कुटुंबाबियांपासून दुर राहून हि मोहीम यशस्वी करण्यासाठी सतत कार्यरत राहतात  त्या सर्वांचे आभार नासा संस्थेतील टिममधील सर्वांना  Merry Christmas !

Don- आणी ख्रिसमस म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी पण !आमच्या साठी पण पृथ्वीवरुन वेगवेगळ्या  पदार्थांचे पॅकेटस आले आहेत आणी आम्ही आता त्याचा आस्वाद घेणार आहोत  Merry Christmas !

Butch- ख्रिसमस म्हणजे प्रभु येशुचा जन्मोत्सव ! तुम्हा सर्वांना Merry Christmas !

Saturday, 21 December 2024

अंतराळ स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील तांत्रिक कामासाठी अंंतराळविरांचा Space walk संपन्न

 Cosmonaut Alexey Ovchinin conducts a spacewalk 260 miles above the Earth's surface and removes science hardware attached to the space station's Poisk module. Credit: NASA+

रशियन अंतराळवीर Alexey Ovichinin आणि अंतराळवीर Ivan Vagner स्थानकाच्या Poisk Module मधील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था -19 डिसेंबर 

रशियन अंतराळवीर Alexey Ovichinin आणी अंतराळवीर Ivan Vagner ह्यांनी स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील तांत्रिक कामासाठी Space Walk केला 19 डिसेंबरला सकाळी  साडेदहा वाजता हा स्पेसवॉक सुरु झाला आणि सात तास सातरा मिनिटांनी संध्याकाळी साडे पाच वाजता संपला

ह्या दोन्हीही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक साठीची तयारी आधीच करून ठेवली होती त्यांनी Space Walk साठी लागणाऱ्या स्पेससुटचे लिकेज चेक करून तो चार्ज करून ठेवला व्हिडीओ कॅमेरे चेक केले आणी ईतर आवश्यक टेकनिकल सामान देखील चेक केले आणि ते स्पेससुट मध्ये भरून स्पेससूट तयार ठेवला 19 डिसेंबर ला सकाळी साडेदहा वाजता हे दोन्ही अंतराळवीर स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडले आणि संध्याकाळी साडेपाच वाजता स्पेसवॉक संपवून स्थानकात परतले 

स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Poisk Module मधील तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी हा स्पेसवॉक केला ह्या सात तास सतरा मिनिटांच्या स्पेसवॉक दरम्यान ह्या अंतराळवीरांनी ह्या भागातील Celestial X -ray source आणि Electrial  Connector patch panels वर देखरेख करण्यासाठी डिझाईन केलेले नवीन Experiment पॅकेज Install केले आणि ह्या भागातील काम झालेल्या प्रयोगाचे अनेक निरुपयोगी साहित्य काढून टाकले  ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या अंतराळवीरांना स्थानकाच्या Nouka Multipurpose Lab Module मध्ये बसविण्यात आलेला Robotic Arm काढून युरोपियन सेगमेंट मधील Control panel वर फिक्स करावयाचा होता पण वेळेअभावी ते काम अपूर्ण राहिले ह्या अंतराळवीरांना ह्या स्पेसवॉक साठी अंतराळवीर Alexsander Gorbunov ह्यांनी स्थानकातून मदत केली

ह्या स्पेसवॉक साठी अंतराळवीर Ovichinin ह्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला Orlan स्पेससूट परिधान केला होता त्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता अंतराळवीर Vagner ह्यांचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी ह्या स्पेसवॉक साठी निळ्या रंगांच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता  

स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी केलेला हा 63 वा स्पेसवॉक होता आणि स्थानकाच्या कामासाठी अंतराळवीरांनी केलेला आजवरचा हा 272 वा स्पेसवॉक होता