
नासाच्या Perseverance मंगळ यानाने गोळा केलेल्या मंगळावरील खडकांच्या नमुन्याच्या कुपी -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 7 जानेवारी
नासा संस्थेच्या Perseverance आणि Curiosity मंगळयानाने यानातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मंगळभूमीवरील आणि भूगर्भातील खडक,माती मिनरल्सचे नमुने गोळा करून त्यांचे नमुने Perseverance यानातील कंटेनर मध्ये व्यवस्थित ठेवण्याचे काम यशस्वी केले आहे यानाला बसविण्यात आलेल्या रोबोटिक आर्म आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने खडकाचे नमुने शोधून रोबोटिक आर्मच्या साहाय्याने जमीन खणून रोबोटिक हॅमरने खडकांचा चुरा करून तो चुरा,माती,वाळू आणि इतर वस्तू यानातील टिटॅनियमच्या कुपीत भरून ठेवण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे आता ह्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर आणण्यासाठी नासा संस्थेने दोन नवीन पर्यायी मार्गाचा विचार केला असून हे नमुने पृथ्वीवर कमी वेळेत आणि कमी खर्चात पोहोचण्यासाठी नवीन संशोधित संकल्पनेची निवड करण्यात आली आहे
ह्या नव्या संशोधित संकल्पनेनुसार एकाच मार्गाने हे नमुने आणण्याचा विचार करण्यात आला आहे मंगळ ग्रहावरून पहिल्यांदाच हे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार असून ह्या नमुन्यांच्या संशोधनानंतर मंगळावरील मानवाला अज्ञात असलेली माहिती आणि पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाची शक्यता ह्या विषयी माहिती मिळेल 2026 मध्ये ह्या नव्या मार्गाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल
नासा संस्थेचे Administrator Bill Nelson म्हणतात,"नासा संस्थेने निवड केलेल्या ह्या दोन नव्या पर्यायी विकसित संकल्पनेचा वापर केल्यामुळे मंगळावरील खडकांच्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर आणण्याचा मार्ग निश्चित होईल शिवाय पैसे आणि वेळही वाचेल हे नमुने पृथ्वीवर आणल्यावर शास्त्रज्ञांना ब्रह्मांड आपली ग्रहमाला आणि मंगळग्रहाची निर्मिती ह्या विषयी संशोधन करताना विचाराची नवी दिशा मिळेल नासाच्या मंगळ मोहिमेतील टीम प्रमूख Maria Zuber ह्यांच्या नेतृत्वात सुरु असलेले हे नाविन्यपूर्ण काम प्रशंसनीय आहे !'
2024 च्या सप्टेंबर मध्ये नासा संस्थेतील शास्त्रज्ञांच्या टीमने मंगळावरील खडकांच्या नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर आणण्यासाठी 11 संकल्पित पर्यायांची निवड केली आणि त्यातून सखोल निरीक्षणाअंती कमी खर्चिक आणि कमी वेळेत नमुन्यांच्या कुपी पृथ्वीवर पोहोचणाऱ्या संकल्पित मार्गाच्या अंतिम निवड करण्यात आली
नासाच्या Science Mission Directorate- Nicky Fox म्हणतात," नासाचे मंगळयान मंगळावरील विपरीत परिस्थितीत तेथील नमुने गोळा करण्याचे कठीण काम यशस्वीपणे पार पाडत आहेत आणि आम्ही ते पृथ्वीवर लवकर आणण्याच्या प्रयत्नात आहोत ज्यामुळे पृथ्वीवरील अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने ते संशोधित करता येतील ह्या संशोधनामुळे मंगळावरील भौगोलिक,जिऑलॉजिकल आणि सजीवाच्या अस्तित्वाबद्दल मानवाला अज्ञात असलेली माहिती मिळेलच शिवाय आपल्या सौरमालेच्या निर्मिती वर प्रकाश पडेल कदाचित आपल्या पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण होण्याआधी मंगळावर सजीव सृष्टीचे अस्तित्व होते का? ह्या विषयी देखील माहिती मिळेल आणि भविष्यकालीन मानवसहित मंगळमोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळावरील वास्तव्यासाठी संशोधनासाठी हि माहिती उपयुक्त ठरेल
ह्या दोन नव्या संशोधित संकल्पनेनुसार मंगळभूमीवर Payload Platform उतरवण्यासाठी दोन वेगळ्या पर्यायी माध्यमाचा विचार केल्या जाईल पूर्वीच्या संकल्पनेनुसार Flown Entry,Descent and Landing Systemचा आधी विचार केल्या जाईल संकल्पित Sky Crane Method चा उपयोग केल्या जाईल
दुसऱ्या पर्यायात व्यावसायिक संकल्पनेचा वापर केल्या जाईल मंगळ भूमीच्या पृष्ठभागावर Lander Payload वितरित करण्यासाठी व्यावसायिक क्षमता विकसित केल्या जाईल दोन्ही संकल्पनेत Mars Ascent Vehicle च्या छोट्या आवृत्तीचा वापर केल्या जाईल Solar Panels ऐवजी Radioisotope power systemचा वापर केल्या जाईल त्या मुळे मंगळावरील धुली वादळात यानाला ऊर्जा व प्रकाश मिळेल आणि मंगळावरील धुलीवादळात काही समस्या उद्भवणार नाही Orbital sample कंटेनर सिस्टिम द्वारे Perseverance यानाने गोळा केलेल्या 30 नमुन्यांच्या कुपी आधी कंटेनर मध्ये न ठेवता त्या डायरेक्ट Orbital कंटेनर मध्ये ठेवल्या जातील त्या मुळे ग्रहावर उडणारी धूळ व नमुने इतरत्र पडणार नाहीत
आधीच्या संकल्पनेनुसार मंगळ मोहिमेतील टीममधील शास्त्रज्ञांनी अद्ययावत यंत्रणेने बनविलेल्या दोन हेलिकॉप्टर द्वारे हे नमुने पृथ्वीवर आणल्या जातील Sample Retrieval Lander आणि दोन
Helicopters मुळे
यानाला नमुने गोळा करण्यासाठी आता Fetch रोव्हर किंवा त्याच्याशी संलग्न
अशा दुसऱ्या Lander ची आवश्यकता भासणार नाही ह्या नवीन Sample Retrieval
Lander सोबत पाठविण्यात येणारे हेलिकॉप्टर बनविताना आधीच्या Ingenuity
हेलिकॉप्टरचे डिझाईन वापरून त्यातील त्रुटी कमी करून काही सुधारणा करण्यात
आल्या आहेत ज्या मुळे हे काम कमी त्रासाचे आणि सोपे होईल आता ह्या
हेलिकॉप्टर मध्येच नमुने गोळा करण्याची क्षमता निर्माण केली असल्यामुळे हे
काम आता हेलिकॉप्टर द्वारे केले जाईल Earth
Return Orbiter आणि Sample Retrieval Lander मंगळग्रहावर पाठविण्यात येणार
असून 2033 मध्ये ते तेथील खडकांचे व इतर नमुने घेऊन पृथ्वीवर परतेल आगामी काळात Earth Return Orbiter आणि
हेलिकॉप्टर्स पृथ्वीवरून मंगळ आणि पुन्हा पृथ्वी असा ऐतिहासिक अंतराळ
प्रवास सुरु करेल आणि Sample Transfer Arm द्वारे रोबोटिकली नमुन्यांच्या कुपी Orbiting Sample Container मध्ये भरेल
या मोहिमेअंतर्गत प्रथमच परग्रहावर रॉकेट ऊड्डाण मोहिम राबविण्यात येईल MAV ह्या कार्याचा शुभारंभ करेल MAV मंगळग्रहावरील Jezero Crater ह्या भागात ऊतरेल आणी Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी कंटेनरमध्ये भरून पुन्हा तेथून ऊड्डान करून पृथ्वीवर पोहोचेल Jezero Crater चा हा भाग भविष्यकालीन मंगळ मोहिमेसाठी Launch Platform म्हणून वापरला जाईल MAV मध्ये Perseverance यानाने गोळा केलेल्या नमुन्यांच्या कुपी व्यवस्थित भरल्या गेल्या नंतरच Lockheed Rocket तिथून पृथ्वीकडे येण्यासाठी उड्डाण करेल प्रथमच परग्रहावर Rocket मंगळ ग्रहांवरचे वातावरण भेदून पृथ्वीवर परतण्यासाठी उड्डाण करताना पेट घेईल पण MAV साठी पृथ्वीवरून मंगळावर उड्डाण कारण्या एव्हडे मंगळावरून पृथ्वीकडे उड्डाण करणे सोपे नसेल कारण तेथील वातावरण वेगळे आहे आणि MAV हे छोटे आणि वजनाने हलके असल्याने हि प्रक्रिया पार पाडताना काही अडथळे येण्याची शक्यता आहे म्हणूनच अत्याधुनिक यंत्रणेद्वारे त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता त्यात निर्माण केली गेली आहे
पण हे काम खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळे मंगळावरील Perseverance मंगळयानाने गोळा केलेल्या खडक व इतर गोष्टीच्या नमुन्याच्या कुपी पृथ्वीवर आणण्यासाठी टीममधील शास्त्रज्ञांनी नवीन विकसित संकल्पित मार्ग संशोधित केल्यामुळे कमी वेळात आणि खर्चात हे नमुने पृथ्वीवर पोहोचतील
No comments:
Post a Comment