Friday, 19 April 2019

नासाचे माजी अंतराळवीर Scott Kelly ह्यांच्या twins study चे संशोधन पूर्ण अंतराळात जनुकीय बदल झाल्याचा निष्कर्ष जाहीर


Former astronauts Scott Kelly and Mark Kelly
    नासाचे माजी अंतराळवीरव जुळे भाऊ Mark Kelly व अंतराळवीर Scott Kelly एकत्र -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -11 एप्रिल
अंतराळवीर जेव्हा अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये राहून संशोधन करतात तेव्हा त्यांच्या शारीरिक आणि  मानसिक परिस्थितीत काय बदल होतात त्यांचे शरीर तेथील विपरीत परिस्थितीला कसा प्रतिसाद देते ह्यावर शास्त्रज्ञ सतत संशोधन करत असतात अंतराळवीर तीन महिने किंवा सहा महिने स्थानकात राहून पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांच्यातील बदल शास्त्रज्ञ जाणून घेतात पण ह्या पेक्षा जास्त काळ अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत राहिल्यावर त्या वातावरणात तग धरून राहताना प्रतिकार करण्याची शक्ती शरीरात कशी निर्माण होते त्या वेळेसच्या तेथील वातावरणाचा शरीरावर विशेषतः पेशीवर कसा परिणाम होतो त्यांच्या संरचनेत काय बदल होतात जेनेटिक बदल होतात का ? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत
म्हणूनच ह्या प्रयोगासाठी अंतराळस्थानकात एक वर्ष वास्तव्य केलेले अंतराळवीर Scott Kelly ह्यांची निवड करण्यात आली होती कारण Scott Kelly हे जुळे आहेत त्यांचा जुळा भाऊ Mark Kelly ह्यांना देखील ह्या संशोधनात सहभागी करण्यात आले होते
दोघांची शारीरिक रचना सारखी असल्याने Scott Kelly अंतराळात असताना त्यांच्यात आणि Mark Kelly ह्याच्या पृथ्वीवरील वास्तव्यात त्यांच्या शरीरात काय बदल होतात ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले त्या साठी स्थानकातील वास्तव्यादरम्यान काही मेडिकल सॅम्पल्स गोळा केले गेले,डोळे,हाडातील बदलांचे तसेच रक्तातील बदलांचे निरीक्षण नोंदवल्या गेले आणि पृथ्वीवर परतल्यावर ह्या नमुन्यांचे संशोधन करण्यात आले आता त्याचा संशोधित निष्कर्ष नासा संस्थेने जाहीर केला आहे
अंतराळवीर Scott Kelly तीन वर्षांपूर्वी 27 मार्च 2015ला स्थानकात राहायला गेले आणि मार्च 2016 मध्ये पृथ्वीवर परतले त्यांनी 340 दिवस म्हणजे जवळपास वर्षभर अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये वास्तव्य केले होते
त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशीतील Genes मधील Chromosomes मध्ये तेथील वातावरणाचा परिणाम झाला आणि त्यांच्या संरचनेत बदल झाल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे
Scott Kelly ह्यांच्या शरीरातील काही पांढऱ्या पेशीतील  Genes मधील chromosomesचा आकार लांबला होता तर काही chromosomes break होऊन damage झाले होते हे बदल W.B.C मधल्याGenesमधील chromosomes च्या शेवटच्या टोकाला असलेल्या Telomere मध्ये झाले होते पण पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांचा आकार सहा महिन्यात पुन्हा पूर्ववत झाला पण त्यांचा भाऊ Mark Kelly ह्यांच्या शरीरातील पेशीत मात्र काहीच बदल जाणवला नाही त्या मुळे अंतराळात मानवी शरीरातील पेशीमध्ये बदल होतात असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती काढला आहे W.B.C. मधील Genes मधील Telomere मध्ये जर काही कारणाने Chromosomes मध्ये बदल झाला किंवा Chromosomes break झाले तर त्यांना पुन्हा जोडण्याची क्षमता असते हा भाग तुटला तरीही त्याचे भाग पेशीत सुरक्षित राहतात आणि पुन्हा एकत्र येऊन जोडले जातात पण काही Genes मात्र पुन्हा पूर्वस्थितीत आले नाहीत त्यांचे प्रमाण अत्यल्प असले तरी शास्त्रज्ञांना चिंतीत करणारे आहे
अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील रेडिएशन चाही शरीरातील प्रतिकार शक्तीवर परिणाम झाला त्यांचे वजन कमी झाले त्यांच्या शरीरातील रक्तात vitamins ची कमतरता जाणवली विशेषतः B vitamin ,हाडांमध्ये ठिसूळता जाणवली व्यायामाअभावी आणि सतत तरंगत्या अवस्थेत राहिल्यामुळे अंतराळवीरांना हि समस्या जाणवते त्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो काही दिवस ते चालणेही विसरतात
 Scott Kelly ह्यांच्यात झालेले काही अनुवांशिक बदल व स्मृतीसंबंधित झालेले बदल मात्र पूर्ववत झाले नाहीत हीच गोष्ट शास्त्रज्ञांना चिंतीत करणारी आहे कारण ह्या संशोधनाचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळ मोहिमांसाठी विशेषतः मंगळमोहिमेसाठी आणि तिथल्या दीर्घ काळाच्या अंतराळ निवासासाठी होणार आहे आणि आता तो सुरक्षित होईल कि नाही ? ह्याचा विचार शास्त्रज्ञ करत असले तरीही लवकरच ह्या समस्येवर ताबा मिळवता येईल अशी आशा त्यांना वाटतेय
Scott Kelly ह्याची प्रतिकार क्षमता मात्र पूर्ववत झाली आहे त्यांच्या शरीरात काही  हानिकारक बॅक्टेरियांचाही प्रवेश झाला होता ह्या संशोधनासाठी दहा शास्त्रज्ञांच्या टीमची निवड करण्यात आली होती आणि 27 महिन्यांच्या काळातील माहिती  गोळा करून त्यावर संशोधन करण्यात आले शास्त्रज्ञांच्या मते हा निष्कर्ष इंटरेस्टिंग,आश्चर्यकारक आणि आशादायक आहे
55 वर्षीय Scott Kelly हे अमेरिकन नौसेनेत कॅप्टन होते ते आणि त्यांचे जुळे भाऊ Mark Kelly ह्या दोघांची 1995साली नासा संस्थेत निवड झाली त्या नंतर ते अंतराळवीर झाले नासाच्या अंतराळ मोहीम 43-44 व 45-46ह्या अंतराळ मोहिमेअंतर्गत ते स्थानकात राहायला गेले आणि एक वर्षांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतले आणि त्यांनी रिटार्डमेंट घेऊन संशोधनाचे काम सुरु ठेवले
त्यांच्या वीस वर्षांच्या अंतराळ कारकिर्दीत ते चार वेळा स्थानकात राहायला गेले व त्या दरम्यान त्यांनी 520दिवस स्थानकात वास्तव्य केले एक वर्षांच्या सलग स्थानकातील वास्तव्यादरम्यान ते म्हणाले होते कि",ती माझ्यासाठी सुवर्णसंधी होती! सुंदर पर्वणी होती!रोजचा दिवस म्हणजे एक नव आव्हान होत नेव्हीतल्या आणि नासातल्या अनुभवाचा मला फायदा झाला एक वर्ष राहण्याच अतुलनीय व अलौकिक काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि आमची बौद्धिक क्षमता आणि पात्रता सिद्ध करण्याची सुद्धा ! हे संशोधन आता आगामी मंगळ मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल!"


            स्थानकातील veggie चेंबर मध्ये Scott Kelly ह्यांनी देखभाल करून उगवलेले लेट्युसचे फुल

त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांनी तिथल्या veggie प्रोजेक्ट मध्ये उत्साहाने सहभाग नोंदवून तिथल्या चेंबर मध्ये लेट्युस आणि झिनियाची फुले उगवून दाखवली आणि त्याचे फोटोही तात्काळ पृथ्वीवर पाठवले त्यांच्या खेळकर आणि मिस्कील स्वभावामुळे निर्माण झालेले आनंदी क्षण टिपून त्यांनी चाहत्यांशी शेअर केले त्यांनी जवळपास 700 फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते 
            अंतराळात Space Walk करताना सेल्फी काढताना अंतराळवीर  Scott केली

शिवाय स्थानकाच्या दुरुस्तीसाठी तीन वेळा स्पेसवॉकही केला आणि एकदा तीन तास सोळा मिनिटांचा स्पेसवॉक करून रेकॉर्ड करत त्यांचा सेल्फीही पृथ्वीवर पाठवला होता
(Scott Kelly संबंधित बातम्या ह्याच ब्लॉगवर वाचा )

Wednesday, 3 April 2019

स्पेससूटच्या साईज प्रॉब्लेम मुळे ऐतिहासिक महिला स्पेसवॉक रद्द पण 29 मार्चचा स्पेस वॉक संपन्न

Spacewalker Nick Hague
               Christina Koch आणि Nick Hague Space Walk करताना -फोटो-नासा संस्था

नासा संस्था -30 मार्च
अमेरिकेत सध्या Women History Month सुरु आहे आणि हीच संधी साधत नासा संस्थेने 29 मार्चला पहिला  only Women Astronaut Space Walk आयोजित केला आणि त्या साठी आवश्यक ती तयारीही करण्यात आली होती पण ऐनवेळी स्पेससूटच्या साईज प्रॉब्लेम मुळे हा स्पेसवॉक रद्द करावा लागला
पण अंतराळ मोहीम 59चे Flight Engineers Nick Hague आणि Christina Koch ह्या दोघांनी 29 मार्चचा स्पेसवॉक नियोजित वेळेत पूर्ण केला

NASA astronauts Christina Koch and Nick Hague
 Christina Koch Nick Hague स्पेस सूट घालून स्पेसवॉक कॅमेऱ्याची पाहणी करताना -फोटो-नासा संस्था

सध्या अंतराळस्थानकात Anne McClain आणि Christina Koch ह्या दोन महिला Astronauts वास्तव्य करत आहेत त्या मुळेच नासा संस्थेने Women History Month आणि स्थानकातील दोन महिला Astronautsच एकत्रित वास्तव्य हि सुवर्ण संधी साधून पहिला महिला Astronauts Space Walk करण्याचे ठरविले होते विशेष म्हणजे ह्या पहिल्या ऐतिहासिक स्पेसवॉक चे नियंत्रण नासाच्या पृथ्वीवरील संस्थेतून महिला वैज्ञानिकांच्या हाती सोपवण्यात येणार होते पण ऐनवेळी स्पेससूटची समस्या उदभवली आणि हा ऐतिहासिक स्पेसवॉक रद्द करावा लागला
Anne आणि Christina ह्या दोघीही ह्या स्पेसवॉकची आतुरतेने वाट पाहात होते तसेच हा ऐतिहासिक स्पेसवॉक पाहण्यासाठी जगभरातील हौशी नागरिक,वैज्ञानिक आणि महिलाही उत्सुक होत्या पण त्यांचा अपेक्षाभंग झाला
Anne McClain हा स्पेसवॉक रद्द होण्याचे कारण सांगताना म्हणाली कि आम्ही दोघीही हा स्पेसवॉक करण्यासाठी उत्सुक होतो त्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहात होतो परंतु स्पेससूटचा साईज प्रॉब्लेम झाला आम्हा दोघीनांही एकच सूट फिट बसत होता आणि स्पेससूट फिट बसणे अत्यंत आवश्यक असते अंतराळात स्पेसवॉक करताना अंतराळवीरांच्या संरक्षणासाठी हा स्पेससूट तयार करण्यात येतो तो थोडाही अनफिट झाला गॅप राहिली तर अंतराळवीरांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो आमच्या दोघींचेही एकच माप असल्याने मी हा स्पेससूट Christinaला देण्याचे ठरविले कारण नुकताच मी स्पेसवॉक केला आहे आणि 8 एप्रिलच्या तिसऱ्या स्पेसवॉक मध्ये मी सहभागी होणार आहे पण  Christinaचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक आहे त्या मुळे मी तिला प्राधान्य देण्याचे ठरविले हा ऐतिहासिक Women  स्पेसवॉक रद्द झाल्याने आमचाही विरस झाला आहे पण भविष्यात पुन्हा आम्हाला अशी संधी मिळू शकते
दरम्यान 29 मार्चला ठरलेल्या वेळी नासाच्या अंतराळ मोहीम 59चे Flight Engineer Nick Hague आणि Christina Koch ह्या दोघांनी स्थानकाच्या तांत्रिक कामासाठीचा स्पेसवॉक यशस्वी पार पाडला
सहा तास पंचेचाळीस मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी तीन जुन्या Nickel Hydrogen Batteriesबदलून त्या जागी Lithium ion Batteries बसविल्या मागच्या वेळेस स्थानकाच्या एक भागातील सौर पॅनल वरील बॅटरीज बदलण्यात आल्या होत्या तर आता दुसऱ्या सौर पॅनल वरील बॅटरीज बदलण्यात आल्या
शिवाय मागच्या वेळेस बसविण्यात आलेली एक नवी Lithium Ion बॅटरी काढून पुन्हा त्या जागी जुनी बॅटरी बसविण्यात आली कारण ती व्यवस्थित चार्ज झालेली नसल्याने अपेक्षित फायदा होत नव्हता
ह्या शिवाय ह्या दोघांनी इतरही तांत्रिक कामे पूर्ण केली त्यांनी आगामी 8एप्रिलच्या स्पेसवॉकसाठी आवश्यक तयारीही केली हा स्पेसवॉक स्थानकाच्या मागील भागातील उर्वरित बॅटरी बदलण्यासाठी आणि केबल फिटिंगसाठी करण्यात येणार आहे ह्या भागाचे नाव Truss असे असून हा स्थानकाचा महत्वाचा भाग आहे
Nick Hague ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता तर Christina हिचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता आता अंतराळात स्पेसवॉक करणारी ती 14वी महिला Astronaut ठरली असून स्थानकाच्या कामासाठी केलेला हा 215वा स्पेसवॉक होता

Nick Hague ह्यांनी आपल्या चाहत्यांशी twitter वरून स्पेसवॉकचा अनुभव शेअर केला आहे, "ते म्हणतात  
 स्पेसवॉकचा अनुभव अविस्मरणीय होता त्या वेळेस पृथ्वी सारख्या सुंदर ग्रहावर अंतराळात स्थानकाबाहेर लटकलेल्या अवस्थेत स्पेसवॉक करताना मी भारावून गेलो होतो ह्या दोघींबरोबर स्पेसवॉक करण खरोखरच स्पेशल अनुभव होता कारण आधी आम्ही मित्र होतो नंतर क्लासमेट आणि आता crew mates आहोत !"


 

Sunday, 24 March 2019

अंतराळवीर Nick Hague आणि Anne McClain ह्यांचा Space Walk यशस्वी

Spacewalkers Nick Hague and Anne McClain
 अंतराळवीर Nick Hague आणि Anne McClain अंतराळात Space Walk करताना फोटो -नासा संस्था

नासा संस्था -22 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीम 59 चे flight Engineers Nick Hague आणि Anne McClain ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला Space Walk सुरळीतपणे पार पडला
22मार्चला सकाळी 8.01a,m.ला दोन्हीही अंतराळवीरांनी Space Walk ला सुरवात केली आणि दुपारी 2.40 p.m.ला सर्व काम पूर्ण करून त्यांनी Space Walk संपवला विशेष म्हणजे ह्या स्पेसवॉकचे नेहमीप्रमाणेच नासा T.V. वरून लाईव्ह प्रसारण करण्यात आले होतेच शिवाय स्पेसवॉक पाहणाऱ्या नागरिकांना लाईव्ह चॅट ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि प्रश्न विचारण्याची आणि कमेंट्स करण्याची मुभाही त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
सहा तास 39मिनिटांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीरांनी अनेक कामे पूर्ण केली त्यांनी प्रथम अंतराळस्थानकाबाहेरील कचरा साफ केला नंतर त्यांनी अंतराळस्थानकाच्या बाहेरील भागातील solar Arrays  वरील जुन्या बॅटरिज बदलून नव्या बॅटरिज बसवल्या जुन्या बॅटरिज Nickel hydrogen च्या होत्या तर नवीन बॅटरिज Lithium -ion च्या आहेत ह्या बॅटरिज जास्त पॉवरफुल व कमी वजनाच्या आहेत शिवाय त्यांचा आकार लहान असल्याने त्या कमी जागा व्यापतात त्या मुळे जागेची बचत होते
ह्या बॅटरीज अंतराळस्थानकाला बसवलेल्या सौर उर्जेवर चार्जित व कार्यान्वित होतात जेव्हा सूर्य प्रकाश नसतो तेव्हा अंधारात अंतराळस्थानक प्रकाशमान करण्यासाठी ह्या बॅटरीजचा उपयोग केल्या जातो
प्रथमच स्थानकाबाहेरील बारा Nickel बॅटरीजच्या जागी सहा Lithium बॅटरीज बसविण्यात आल्या त्यातील तीन बॅटरीजच्या केबल कनेक्शन साठी adapter plate बसवण्यात आल्या
सप्टेंबर मध्ये स्थानकात आलेल्या जापनीज कार्गोशिप मधून ह्या बॅटरीज स्थानकात पाठवण्यात आल्या होत्या
 ह्या सर्व कामासाठी रोबोटिक आर्म आणि रोबोटिक कॅमेऱ्याचा उपयोग करण्यात आला
अंतराळवीरांनी Solar Arrays वरच्या ब्लॅंकेट बॉक्सच्या केबल ओढून बाँक्स पुन्हा व्यवस्थित फिट केला शिवाय स्थानकाबाहेरील थर्मल कव्हरचे फोटो काढले हे थर्मल कव्हर स्पेसवॉक दरम्यान उघडल्या व झाकले जाते
अंतराळ स्थानकाच्या दुरुस्तीसाठी अंतराळवीरांनी केलेला हा 214वा स्पेसवॉक होता Anne McClain आणि Nick Hague ह्या दोघांचाही हा पहिलाच स्पेसवॉक होता ह्या स्पेसवॉक साठी Anne हिने घातलेल्या स्पेससूट वर लाल रंगाच्या strips होत्या तर Nick Hague ह्यांच्या सूटवर मात्र strips नव्हत्या
आता 29 मार्चला अंतराळ स्थानकाच्या देखभालीसाठी पुन्हा स्पेसवॉक केल्या जाईल आणि विशेष म्हणजे हा स्पेसवॉक Anne McClain व Kristina Koch ह्या दोन महिला Astronauts मिळून करणार आहेत आणि अमेरिकेतील इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला एकत्रित हा अंतराळ स्पेसवॉक करणार असल्याने हा स्पेसवॉक ऐतिहासिक ठरणार आहे

Friday, 15 March 2019

अंतराळवीर Nick Hague,Christina Kochआणी Alexey Ovichinin हे तीनही अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले

 Expedition 59 Welcome Ceremony
 अंतराळ स्थानकात Anne McClain ,Oleg Konoenko आणि David Saint नवे अंतराळवीर Nick Hague ,Christina Koch आणि Alexey Ovichinin ह्यांच्या सोबत फोटो -नासा संस्था
 
नासा संस्था -15 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीम 59 चे अंतराळवीर Nick Hague अंतराळवीरांगना Christina Koch आणि अंतराळवीर Alexey Ovichinin 14 मार्चला अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले आहेत
कझाकस्थानातील बैकोनूर येथील  Cosmodrome वरून  Soyuz MS-12 ह्या अंतराळयानातून दुपारी 3.14मिनिटाला त्यांनी अंतराळस्थानकाकडे प्रयाण केले उड्डाणानंतर त्यांच्या सोयूझ यानाने पृथ्वीभोवती चार परिक्रमा पूर्ण केल्या आणि सहा तासांनी 9.01 वाजता यान अंतराळ स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचले
स्थानकातील Anne McClain ,David Saint आणि Oleg Kononenko ह्या तीन अंतराळवीरांनी स्थानकाचे hatch उघडून ह्या नव्या तीन अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले 11.10 वाजता अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला Christina Koch हिने प्रथम अंतराळस्थानकात प्रवेश केला नंतर Nick आणि Alexey ह्यांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकातील अंतराळवीरांनी त्यांचे हसत स्वागत केले
नव्या तीन अंतराळवीरांच्या आगमनानंतर आता अंतराळस्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून हे सहाहीजण मिळून एकत्रित तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील
हे अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करतील अंतराळवीरNick Hague ,Christina Koch आणि Anne McClain अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी ह्या महिन्यात Space Walk करतील
मार्च मध्ये 22आणि 29 तारखेला आणि एप्रिलच्या 8 तारखेला हे Space Walk केल्या जातील 29 मार्चच्या Space Walk मध्ये Anne McClain आणि Christina Koch ह्या दोन अंतराळवीरांगना  सहभागी होतील त्या मुळे महिला Space Walker च्या इतिहासात प्रथमच दोन महिलांनी एकत्रित केलेला हा पहिला Space Walk असेल
अंतराळवीर David Saint ,Anne McClain आणि Oleg Kononenko हे तीनही अंतराळवीर जूनपर्यंत स्थानकात वास्तव्य करतील 
अंतराळवीर Nick Hague ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे ह्या आधी Oct मध्ये अंतराळ स्थानकाकडे जाताना त्यांच्या अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्यांना अर्ध्यातूनच  पृथ्वीवर परतावे लागले होते
अंतराळवीर Ovichinin ह्यांची ही तिसरी अंतराळवारी आहे तर Christina Koch मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेली आहे
ह्या तिघांची 2013 मध्ये नासा संस्थेत निवड झाली होती अंतराळ स्थानकात राहायला जाण्याआधीचे आवश्यक  ट्रेनिंग त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे

Friday, 8 March 2019

Mike Pence ह्यांनी अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून Space X Dragon च्या यशस्वीतेसाठी केले अभिनंदन


Vice President Mike Pence and NASA Administrator Jim Bridenstine
Vice President Mike Pence व  Jim Bridenstine अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधताना फोटो-नासा संस्था

नासा संस्था -7 मार्च
नासाचे प्रमुख Jim Bridenstine आणि Vice President Mike Pence ह्यांनी सहा मार्चला स्थानकातील अंतराळवीर David Saint आणि Anne McClain ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला
ह्या संवादादरम्यान त्यांनी अमेरिकन मेड पहिल्या Space X Dragonच्या स्थानकातील आगमन बद्दल आणि त्याच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक बाबींची माहिती जाणून घेतली आणि Space X Dragon चे अंतराळ स्थानकात व्यवस्थित डॉकिंग करून चाचणी यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
Pence म्हणाले,"अमेरिकेने हे पहिले Space X Crew Dragon बनवून अंतराळविश्वात मोलाची कामगिरी केली आहे भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठीचे हे ऐतिहासिक पाऊल अत्यंत उपयुक्त ठरेल ह्या पुढच्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी हे यश मैलाचा दगड ठरेल ह्यात शंका नाही!
हे अंतराळ यान बनवणारे Engineers ,तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आणि पार्टनर्स हे सारेच ह्या यशामुळे अभिनंदनास पात्र आहेत,ह्या पुढे अमेरिकन अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकेने बनवलेल्या अंतराळ यानातून अंतराळात भरारी मारतील ह्यात शंका नाही "!
Jim Bridenstine ह्यांनी देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त करत हे यश निश्चितच स्पृहणीय असल्याचे सांगितले
आणि अंतराळवीरांशी Mike Pence ह्यांना संवाद साधायचा आहे असे सांगत अंतराळवीरांचा त्यांच्याशी लाईव्ह संपर्क साधून दिला.

अंतराळवीर David Saint आणि Anne McClain स्थानकातून Mike Pence ह्यांच्याशी संवाद साधताना
-फोटो नासा संस्था

 Mike Pence ह्यांनी अंतराळ वीरांचे पुन्हा एकदा अभिनंदन करत त्यांना काही प्रश्न विचारले
तुम्ही ह्या मोहिमेत सहभागी आहात तुम्हाला ह्या बद्दल काय वाटते ?
तुम्ही ह्या Space X अंतराळयानात जाऊन पाहिले तेव्हा कसे वाटले ?
काही त्रुटी जाणवल्या का ? काही सुधारणा आवश्यक आहेत का ?
आता अंतराळवीर ह्यातून सुरक्षितपणे अंतराळ प्रवास करू शकतील का ?
काही अडचणी उद्भवतील का ? यानात अस्वस्थता जाणवली का ?
ह्या प्रश्नांना उत्तरे देताना
 Anne McClain - म्हणाली कि,आम्ही तिघांनीही ह्या अंतराळ यानाचे स्थानकात व्यवस्थित डॉकिंग केले तेव्हा काहीही अडचण आली नाही,अस्वस्थता जाणवली नाही ! हे यान अत्यंत कुशलतेने बनवलेले असल्याने त्यात काहीही त्रुटी जाणवल्या नाहीत अंतराळवीर ह्या यानातून सुरक्षित प्रवास करू शकतील ह्यात पृथ्वीवरून आलेला Ripley हा डमी तर मला खूप आवडला तो उत्कृष्ठतेचा उत्तम नमुना आहे म्हणून हा डमी बनवणाऱ्या तंत्रज्ञाचे मला विशेष कौतुक करावेसे वाटतेय त्याला मानवा प्रमाणे बसवलेल्या सेन्सर्स मुळे अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटीचा मानवी आरोग्यावर होणारे परिणाम गोळा करताना अचूकता येईल हे अंतराळ यान बनवणारी कंपनी त्यातील सहभागी चमू खरोखरच अभिनंदनास पात्र ठरतात अमेरिकेच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण खूप मोलाचा आणि आनंददायी आहे! अमेरिकेसाठी गौरवास्पद आहे! ह्याचा उपयोग आगामी अंतराळ मोहिमांना होईल आम्हाला ह्या Space X Dragon ची चाचणी करायला मिळाली हे आमचे भाग्य आहे त्या मुळे आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आम्ही नासा संस्थेचे आभारी आहोत असही तिने म्हटले
Mike pence ह्यांनी Anne ला तू महिला Astronaut आहेस,तुझ्या Space Walkची तयारी झाली का ? आता सध्या काय संशोधन करत आहेस ? असे विचारले तेव्हा
Anne म्हणाली - हो ! आता येणाऱ्या Space Walk ची आम्ही तयारी करतोय,Space Suite रेडी आहे असे सांगून तिने तिथे सुरु असलेल्या संशोधनाबद्दल त्यांना आवश्यक माहिती दिली
Mike Pence -ह्यांनी  David Saint ह्यांच्याशीही संवाद साधत
तुम्हाला Space X Dragon कसे वाटले ? तुम्हीही Space X  यानात जाऊन पाहिलेत ना ! असे विचारले
David Saint -म्हणाले ,खूपच छान ! आणि अमेरिकन अंतराळवीरांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे Space X Dragon आहे मलाही ह्या Space X  बनवणाऱ्या साऱ्यांचे अभिनंदन करावेसे वाटतेय आमच्या प्रमाणेच आमच्या नंतरच्या भावी अंतराळवीरांना ह्या यानाचा नक्कीच फायदा होईल
शिवाय नासा संस्थेतील इतर देशातील अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठीही हे अंतराळ यान अत्यंत मोलाचे आणि उपयुक्त ठरेल
त्या नंतर Mike Pence ह्यांनी दोघांनीही त्यांचा अमूल्य वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार  मानले आणि  तुम्ही अंतराळवीर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झिरो ग्रॅव्हिटीत मानवी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन करता म्हणून त्यांचे विशेष आभार मानून अभिनंदन केले आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या शिवाय तब्येतीची काळजी घेण्याची सूचनाही दिली
दरम्यान शुक्रवारी 2.31 a.m.(EST) वाजता Space X Dragon स्थानकातील मुक्काम आटोपून पृथ्वीच्या दिशेने अंतराळात झेपावेल आणि पृथ्वीवर 8.45 a.m.(EST)वाजता पोहोचेल आणि Atlantic महासागरावर पोहोचताच अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुमुद्रात उतरवले जाईल
अंतराळवीरांनी अंतराळ यान पृथ्वीवर पाठवण्यासाठीची तयारी पूर्ण केली असून लवकरच हे यान पृथ्वीवर सुखरूप परतेल ह्या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे

नासाच्या पहिल्या कमर्शियल Crew Space Craft ची चाचणी यशस्वी

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/screen_shot_2019-03-02_at_3.04.41_am.png
नासाचे पहिले अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon अंतराळयानाच्या लाँचिंगच्या वेळेस जमलेले नागरिक
फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 4 मार्च
नासा संस्थेचे पहिल्या अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी बनवलेल्या अंतराळयानाची उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे
अमेरिकेच्या पहिल्या Crew Program अंतर्गत मानव विरहित Space X Crew Dragon अंतराळयान स्थानकाकडे शनिवारी रवाना झाले नासाच्या अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेन्टर येथून शनिवारी 2.49a.m.(EST) वाजता Space X Dragon स्थानकाकडे झेपावले आणि रविवारी सकाळी स्थानकात पोहोचले
अंतराळस्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर David Saint, Anne McClain आणि Oleg Konenonko ह्या तीन अंतराळवीरांनी ह्या यानाची स्थानकाशी यशस्वी जोडणी केली
Space X अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचताच स्थानकाची खिडकी उघडून रोबोटिक आर्मच्या साहाय्याने यान स्थानकाशी जोडण्यात आले त्या नंतर दोन तासांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अंतराळवीरांनी अंतराळ सूट व ऑक्सिजन मास्क घालून स्पेस X मध्ये प्रवेश केला त्या नंतर यानाची अंतर्गत सुरक्षा व इतर बाबींची पाहणी करून यानातील हवेचे नमुने गोळा केले शिवाय यानातून आलेल्या 400 पाऊंड वजनाचे अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल्या सामानाचे पार्सलही काढले काम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी मास्क काढले त्या नंतर त्यांनी नासा संस्थेशी संपर्क साधून आवश्यक माहिती दिली
Expedition 58 welcomes Crew Dragon
अंतराळस्थानकातील अंतराळवीर Space X Dragon च्या डॉकिंगची सोया करताना -फोटो-नासा संस्था

ह्या यानाच्या प्रथम व्यावसायिक उड्डाणाआधी यानाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली हे उड्डाण चाचणी घेण्यासाठी करण्यात आल्याने Space X मध्ये अंतराळवीरांऐवजी डमीला पाठवण्यात आले 1979साली हॉलिवूड फिल्मच्या एलियन नावावरून ह्या डमीचे नाव रिपले असे ठेवण्यात आले
ह्या डमीला मानवा प्रमाणे सेन्सर बसवण्यात आल्यामुळे मानवाला अंतराळ सैर करताना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल ह्याची माहिती मिळेल
हे यान पाच दिवस अंतराळस्थानकात राहून शुक्रवारी पृथ्वीवर परतेल त्या दरम्यान ह्या यानामार्फत तिथली माहिती गोळा केल्या जाईल Space X ह्या अंतराळयानाचे डिझाईन अंतराळस्थानकात 210 दिवस राहता येईल असे केले आहे परंतु हि फक्त व्यावसायिक चाचणी असल्याने हे यान फक्त पाचच दिवस स्थानकात राहील
लवकरच उन्हाळ्यात ह्या यानातून अंतराळवीर स्थानकाकडे उड्डाण करतील त्या साठी अंतराळवीर आणि वैमानिकांची निवडही निश्चित झाली आहे
2011नंतर प्रथमच पहिले अमेरिकन बनावटीचे व्यावसायिक अंतराळयान अमेरिकेहून अंतराळस्थानकाकडे यशवीपणे झेपावले 2011मध्ये अमेरिकेने स्पेस शटल मोहीम बंद केली होती त्या मुळे नासाचे अंतराळवीर रशियाच्या भूमीवरून सोयूझ अंतराळयानातून अंतराळप्रवास करत होते
आता ह्या नव्या Space X Dragon मोहिमेमुळे अमेरिकन अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अवकाशात यशस्वी झेप घेतील आणि नव्या युगातील अंतराळमोहिमेत अमेरिकेला प्रभुत्व मिळेल आता अमेरिका स्वयंपूर्ण झाला आहे असे नासा प्रमुख Jim Bridenstine म्हणाले
Boeing CST-100 Star line Space Xआणि Crew program ह्या दोन कंपन्यांनी मिळून ह्या यानाची निर्मीती केली आहे भविष्यात इतर देशातील अंतराळवीरांना अंतराळ प्रवासासाठी ह्या यानाचा व्यावसायिक उपयोग करण्यात   येणार आहे शिवाय भविष्यात सामान्य हौशी नागरिकांनाही ह्या अंतराळयानातून अंतराळ सैर करता येणा 


Wednesday, 20 February 2019

Anne McClain म्हणते माझ स्वप्न सत्यात उतरल !

https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/m19-009.png
नासाच्या अंतराळमोहीम 58 ची महिला Astronaut Anne McClain स्थानकाच्या Cupola Module मध्ये
फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 17 Feb.
नासाच्या  अंतराळ मोहीम 58 अंतर्गत सध्या अंतराळस्थानकात राहात असलेली महिला Astronaut Anne McClain हिने नुकताच स्थानकातून पृथ्वीवर लाईव्ह संवाद साधला Washington D.C. येथील Georgetown Day  School मधील छोट्या मुलांशीआणि फ्लोरिडा मधील विद्यार्थ्यांशी तिने नुकताच संवाद साधला आणि त्यांच्या कुतूहल मिश्रीत प्रश्नांना कधी प्रात्यक्षित करून दाखवत तर कधी त्या मागच सायंटिफिक कारण समजावुन सांगत दिलखुलासपणे उत्तरे दिली  ह्या महिन्यात तिच्या संशोधनाच्या कामातून मिळालेल्या रिकाम्या वेळात बऱ्याचदा तिने वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला आणि अंतराळवीरांच्या स्थानकातील वास्तव्यासंदर्भात माहिती दिली त्याचाच हा वृत्तांत

           फ्लोरिडा मधील विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधताना Anne McClain -फोटो -नासा संस्था

What do you eat in space ? and just what does one do all day in space ?
तुला लहानपणापासूनच astronaut व्हायच होत का ?
तुझ्या आवडीच फूड कोणत ? तुम्ही काय आणि कस खाता?
तुम्ही कसे झोपता ? चालता ? तुम्हाला वेळ कशी कळते ?
 या सारख्या अनेक प्रश्नांना तिने दिलेली उत्तरे
Anne -McClain म्हणते
-हो! मी लहानपणी जेव्हा तुमच्या वयाची होते आणि माझा शाळेतला पहिला दिवस होता तेव्हाच मी सांगून टाकल होत कि मला Astronaut व्हायचय !
त्या वेळेस त्यांना एक प्रोजेक्ट होता तेव्हा तिने एक पुस्तक लिहल होत Flying to Space On the Soyuz Vehicle ते तीच स्वप्न होत आणि आज ती स्थानकातून रोज पृथ्वीला फेऱ्या मारते आणि स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये तरंगत्या अवस्थेत राहतेय
ती म्हणते लहानपणी पाहिलेल स्वप्न कधी कधी प्रत्यक्षात उतरत हे मी माझ्या अनुभवावरून सांगतेय
जेव्हा खरोखरच प्रथमच मी अंतराळयानातून अंतराळ प्रवासाला निघाले आणि मागे वळून पृथ्वीकडे शेवटच पाहिल तेव्हा मला जाणवल आज मी आणि माझ स्वप्न यात कोणीही नाही!
त्या वेळेसच्या क्षणाच वर्णन शब्दातीत आहे! तो अभुतपुर्व अलौकिक अनुभव शब्दात व्यक्त करण अवघड आहे !
McClain आता 39 वर्षांची आहे आणि लहानपणी पाहिलेल्या स्वप्नांचा अनुभव ती प्रत्यक्षात घेतेय हे खरंच अविश्वसनीय आहेआणि आनंददायीही
अंतराळस्थानकातून दररोज ती पृथ्वीभोवती सोळा वेळा फेऱ्या मारते आणि दर पंचेचाळीस मिनिटांनी ती सूर्याला उगवताना आणि मावळताना पाहते त्यांचा दिवस 45मिनिटांचा असतो 
स्थानकाच्या खिडकीतून चंद्राकडे पाहण तिला जास्त आवडत चंद्र उगवताना आणि मावळताना पाहताना ती आश्चर्यचकित होते कारण  चंद्राच उगवण,मावळण इतक फास्ट असत अगदी उडी मारल्यागत चंद्र कधी क्षितीजाच्या वर तर कधी खाली असतो तर कधी क्षितिजावर दिसतो हे पाहण फार गमतीशीर असत
अंतराळस्थानकात अंतराळवीर तरंगत्या अवस्थेत कसे वावरतात,फिरताना शरीर स्थानकाच्या भिंतीवर धडकून इजा होऊ नये म्हणून कशी काळजी घेतात छताला कसे पकडतात मागे पुढे जाताना काय ट्रिक करतात उलट्या अवस्थेतही ते कसे बोलू चालू शकतात व्यायाम कसे करतात वस्तू कशा पकडतात कसे खातात पाणी कसे पितात हे तिने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवल
अंतराळ स्थानकात पाकिटबंद प्रिझर्व केलेल अन्न मिळत अन्नाचे दोन प्रकारचे पाउच असतात एक shelf  stabilized  असत ते उघडून चमच्याने काढून डायरेक्ट खाता येत तर दुसर पाउच ड्राय अन्नाच असत ते उघडून त्यात स्पेस स्टेशन मधल पाणी मिसळून पातळ करून खाता येत आम्हाला कार्गोशिप मधून अन्नाची पाकीट येतात शेकडो प्रकारचे अन्न पदार्थ अंतराळवीरांसाठी आलटून पालटून पाठवले जातात त्यांच्या चवीत आवश्यक बदल करून ते टेस्टी बनवले जातात त्या मुळे एकाच प्रकारचे अन्न खाण्याचा कंटाळा अंतराळवीरांना येत नाही
Anne ला Chicken with peanut sauce,Chicken आणि Mushroom soup ,turkey tetrazzmi हे पदार्थ विशेष आवडतात
Anne म्हणते अंतराळवीर स्लीपिंग बॅग मध्ये झोपतात आणि बॅग स्थानकाच्या भिंतीला attach करतात नाहीतर ते तरंगत राहतील आणि झोपेत कोठेही धडकून त्यांना इजा होईल पण त्यांचे हात मात्र बाहेर तरंगत असतात ते खूप फनी दिसत जिथल्या भागात स्पेस सटेशन असत तिथली वेळ त्यांच्या घड्याळात दिसते अंधार उजेड पाहून रात्र दिवस समजतो आम्ही दिवसभरात सहा सात तास झोप घेतो पृथ्वीपेक्षा जरा कमी वेळ पण सकाळी आम्ही पुन्हा फ्रेश होऊन कामाला सुरवात करतो
आपण इतके दिवस पृथ्वीवर चालत असतो आणि अचानक एक दिवस अंतराळात तरंगत असतो हे खरंच स्वप्नवत असत रोज आजूबाजूच्या ताऱ्यांच्या सोबतीने तरंगत्या अवस्थेत दिवस घालवतानाचा अनुभव विलक्षण असतो रोजचा नवा दिवस माझ्यासाठी Good Day असतो सुंदर असतो
पृथ्वीवरून हजारो शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आमच्या सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्न करत असतात आवश्यक त्या सूचना देत असतात आम्ही नासा संस्थेत वेगवेगळ्या देशांच्या अंतराळवीरांसोबत काम करतो त्या सर्व देशांचे झेंडे स्थानकात मागे लावलेले आहेत हे तिने दाखवले आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही सुटी घेतो तेव्हा आवडीची कामे करतो स्पेस स्टेशन मधल्या veggie चेंबर मधल्या झाडांची भाजीची निगा राखतो कधी कधी आवडीचे सिनेमे पाहतो आमच्या घरच्यांशी मित्रांशी संवाद साधतो
तू ह्या मुलांना काय संदेश देशील असं विचारल असता ती म्हणाली
ती तिच्या तरुण फॅन्सला,विध्यार्थ्यांना सांगते कि, तुम्ही आवश्य स्वप्न पहा आपल ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा ते सत्यात उतरण्यासाठी आवश्यक ते कष्ठ करा मध्येच सोडून न देता सतत त्या दिशेने प्रयत्न करत राहा तेव्हाच ते प्रत्यक्षात येईल
Anne नेहमीच सोशल मीडिया वरून तिच्या चाहत्यांशी संपर्क साधते आणि तिथल्या कामाची लेटेस्ट माहिती शेअर करते नुकतीच तिने अंतराळस्थानकातून कार्गोशिप पृथ्वीकडे परततानाचा व्हिडीओ शेअर केला ती म्हणते मी तुम्हाला इथे घेऊन येऊ शकत नाही पण इथल दृश्य दाखवू शकते शक्य झाल तर तेही करेन
Anne McClain ने Astronaut होण्यासाठी अत्यंत कठीण परिश्रम ,कठोर ट्रेनिंग घेतल आणि लहानपणीच स्वप्न पूर्ण केल अर्थात आपल्याला ते सोप वाटत असल तरीही पृथ्वीपासून दूर माणसांपासून दूर तरंगत्या अवस्थेत राहून संशोधन करण खूपच कठीण असत सध्या अंतराळस्थानकातील अंतराळवीर पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठी आवश्यक संशोधन करत आहेत विविध रोगांवर सध्या उपलब्ध नसलेले अत्याधुनिक औषधे ते संशोधित करत आहेत जे पृथ्वीवर संशोधित करण शक्य नाही .