Vice President Mike Pence व Jim Bridenstine अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधताना फोटो-नासा संस्था
नासा संस्था -7 मार्च
नासाचे प्रमुख Jim Bridenstine आणि Vice President Mike Pence ह्यांनी सहा मार्चला स्थानकातील अंतराळवीर David Saint आणि Anne McClain ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला
ह्या संवादादरम्यान त्यांनी अमेरिकन मेड पहिल्या Space X Dragonच्या स्थानकातील आगमन बद्दल आणि त्याच्या कार्यक्षमतेबद्दल अनेक बाबींची माहिती जाणून घेतली आणि Space X Dragon चे अंतराळ स्थानकात व्यवस्थित डॉकिंग करून चाचणी यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
Pence म्हणाले,"अमेरिकेने हे पहिले Space X Crew Dragon बनवून अंतराळविश्वात मोलाची कामगिरी केली आहे भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठीचे हे ऐतिहासिक पाऊल अत्यंत उपयुक्त ठरेल ह्या पुढच्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी हे यश मैलाचा दगड ठरेल ह्यात शंका नाही!
हे अंतराळ यान बनवणारे Engineers ,तंत्रज्ञ शास्त्रज्ञ आणि पार्टनर्स हे सारेच ह्या यशामुळे अभिनंदनास पात्र आहेत,ह्या पुढे अमेरिकन अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकेने बनवलेल्या अंतराळ यानातून अंतराळात भरारी मारतील ह्यात शंका नाही "!
Jim Bridenstine ह्यांनी देखील अशीच प्रतिक्रिया व्यक्त करत हे यश निश्चितच स्पृहणीय असल्याचे सांगितले
आणि अंतराळवीरांशी Mike Pence ह्यांना संवाद साधायचा आहे असे सांगत अंतराळवीरांचा त्यांच्याशी लाईव्ह संपर्क साधून दिला.
अंतराळवीर David Saint आणि Anne McClain स्थानकातून Mike Pence ह्यांच्याशी संवाद साधताना
-फोटो नासा संस्था
Mike Pence ह्यांनी अंतराळ वीरांचे पुन्हा एकदा अभिनंदन करत त्यांना काही प्रश्न विचारले
तुम्ही ह्या मोहिमेत सहभागी आहात तुम्हाला ह्या बद्दल काय वाटते ?
तुम्ही ह्या Space X अंतराळयानात जाऊन पाहिले तेव्हा कसे वाटले ?
काही त्रुटी जाणवल्या का ? काही सुधारणा आवश्यक आहेत का ?
आता अंतराळवीर ह्यातून सुरक्षितपणे अंतराळ प्रवास करू शकतील का ?
काही अडचणी उद्भवतील का ? यानात अस्वस्थता जाणवली का ?
ह्या प्रश्नांना उत्तरे देताना
Anne McClain - म्हणाली कि,आम्ही तिघांनीही ह्या अंतराळ यानाचे स्थानकात व्यवस्थित डॉकिंग केले तेव्हा काहीही अडचण आली नाही,अस्वस्थता जाणवली नाही ! हे यान अत्यंत कुशलतेने बनवलेले असल्याने त्यात काहीही त्रुटी जाणवल्या नाहीत अंतराळवीर ह्या यानातून सुरक्षित प्रवास करू शकतील ह्यात पृथ्वीवरून आलेला Ripley हा डमी तर मला खूप आवडला तो उत्कृष्ठतेचा उत्तम नमुना आहे म्हणून हा डमी बनवणाऱ्या तंत्रज्ञाचे मला विशेष कौतुक करावेसे वाटतेय त्याला मानवा प्रमाणे बसवलेल्या सेन्सर्स मुळे अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटीचा मानवी आरोग्यावर होणारे परिणाम गोळा करताना अचूकता येईल हे अंतराळ यान बनवणारी कंपनी त्यातील सहभागी चमू खरोखरच अभिनंदनास पात्र ठरतात अमेरिकेच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण खूप मोलाचा आणि आनंददायी आहे! अमेरिकेसाठी गौरवास्पद आहे! ह्याचा उपयोग आगामी अंतराळ मोहिमांना होईल आम्हाला ह्या Space X Dragon ची चाचणी करायला मिळाली हे आमचे भाग्य आहे त्या मुळे आम्हाला हि संधी दिल्याबद्दल आम्ही नासा संस्थेचे आभारी आहोत असही तिने म्हटले
Mike pence ह्यांनी Anne ला तू महिला Astronaut आहेस,तुझ्या Space Walkची तयारी झाली का ? आता सध्या काय संशोधन करत आहेस ? असे विचारले तेव्हा
Anne म्हणाली - हो ! आता येणाऱ्या Space Walk ची आम्ही तयारी करतोय,Space Suite रेडी आहे असे सांगून तिने तिथे सुरु असलेल्या संशोधनाबद्दल त्यांना आवश्यक माहिती दिली
Mike Pence -ह्यांनी David Saint ह्यांच्याशीही संवाद साधत
तुम्हाला Space X Dragon कसे वाटले ? तुम्हीही Space X यानात जाऊन पाहिलेत ना ! असे विचारले
David Saint -म्हणाले ,खूपच छान ! आणि अमेरिकन अंतराळवीरांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे Space X Dragon आहे मलाही ह्या Space X बनवणाऱ्या साऱ्यांचे अभिनंदन करावेसे वाटतेय आमच्या प्रमाणेच आमच्या नंतरच्या भावी अंतराळवीरांना ह्या यानाचा नक्कीच फायदा होईल
शिवाय नासा संस्थेतील इतर देशातील अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठीही हे अंतराळ यान अत्यंत मोलाचे आणि उपयुक्त ठरेल
त्या नंतर Mike Pence ह्यांनी दोघांनीही त्यांचा अमूल्य वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानले आणि तुम्ही अंतराळवीर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झिरो ग्रॅव्हिटीत मानवी आरोग्यासाठी उपयुक्त संशोधन करता म्हणून त्यांचे विशेष आभार मानून अभिनंदन केले आणि त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या शिवाय तब्येतीची काळजी घेण्याची सूचनाही दिली
दरम्यान शुक्रवारी 2.31 a.m.(EST) वाजता Space X Dragon स्थानकातील मुक्काम आटोपून पृथ्वीच्या दिशेने अंतराळात झेपावेल आणि पृथ्वीवर 8.45 a.m.(EST)वाजता पोहोचेल आणि Atlantic महासागरावर पोहोचताच अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने सुमुद्रात उतरवले जाईल
अंतराळवीरांनी अंतराळ यान पृथ्वीवर पाठवण्यासाठीची तयारी पूर्ण केली असून लवकरच हे यान पृथ्वीवर सुखरूप परतेल ह्या ऐतिहासिक क्षणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V. वरून करण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment