नासाचे पहिले अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon अंतराळयानाच्या लाँचिंगच्या वेळेस जमलेले नागरिक
फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 4 मार्च
नासा संस्थेचे पहिल्या अमेरिकन बनावटीच्या Space X Dragon ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी बनवलेल्या अंतराळयानाची उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे
अमेरिकेच्या पहिल्या Crew Program अंतर्गत मानव विरहित Space X Crew Dragon अंतराळयान स्थानकाकडे शनिवारी रवाना झाले नासाच्या अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनडी स्पेस सेन्टर येथून शनिवारी 2.49a.m.(EST) वाजता Space X Dragon स्थानकाकडे झेपावले आणि रविवारी सकाळी स्थानकात पोहोचले
अंतराळस्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर David Saint, Anne McClain आणि Oleg Konenonko ह्या तीन अंतराळवीरांनी ह्या यानाची स्थानकाशी यशस्वी जोडणी केली
Space X अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचताच स्थानकाची खिडकी उघडून रोबोटिक आर्मच्या साहाय्याने यान स्थानकाशी जोडण्यात आले त्या नंतर दोन तासांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून अंतराळवीरांनी अंतराळ सूट व ऑक्सिजन मास्क घालून स्पेस X मध्ये प्रवेश केला त्या नंतर यानाची अंतर्गत सुरक्षा व इतर बाबींची पाहणी करून यानातील हवेचे नमुने गोळा केले शिवाय यानातून आलेल्या 400 पाऊंड वजनाचे अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल्या सामानाचे पार्सलही काढले काम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी मास्क काढले त्या नंतर त्यांनी नासा संस्थेशी संपर्क साधून आवश्यक माहिती दिली
अंतराळस्थानकातील अंतराळवीर Space X Dragon च्या डॉकिंगची सोया करताना -फोटो-नासा संस्था
ह्या यानाच्या प्रथम व्यावसायिक उड्डाणाआधी यानाच्या कार्यक्षमतेची चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वी ठरली हे उड्डाण चाचणी घेण्यासाठी करण्यात आल्याने Space X मध्ये अंतराळवीरांऐवजी डमीला पाठवण्यात आले 1979साली हॉलिवूड फिल्मच्या एलियन नावावरून ह्या डमीचे नाव रिपले असे ठेवण्यात आले
ह्या डमीला मानवा प्रमाणे सेन्सर बसवण्यात आल्यामुळे मानवाला अंतराळ सैर करताना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल ह्याची माहिती मिळेल
हे यान पाच दिवस अंतराळस्थानकात राहून शुक्रवारी पृथ्वीवर परतेल त्या दरम्यान ह्या यानामार्फत तिथली माहिती गोळा केल्या जाईल Space X ह्या अंतराळयानाचे डिझाईन अंतराळस्थानकात 210 दिवस राहता येईल असे केले आहे परंतु हि फक्त व्यावसायिक चाचणी असल्याने हे यान फक्त पाचच दिवस स्थानकात राहील
लवकरच उन्हाळ्यात ह्या यानातून अंतराळवीर स्थानकाकडे उड्डाण करतील त्या साठी अंतराळवीर आणि वैमानिकांची निवडही निश्चित झाली आहे
2011नंतर प्रथमच पहिले अमेरिकन बनावटीचे व्यावसायिक अंतराळयान अमेरिकेहून अंतराळस्थानकाकडे यशवीपणे झेपावले 2011मध्ये अमेरिकेने स्पेस शटल मोहीम बंद केली होती त्या मुळे नासाचे अंतराळवीर रशियाच्या भूमीवरून सोयूझ अंतराळयानातून अंतराळप्रवास करत होते
आता ह्या नव्या Space X Dragon मोहिमेमुळे अमेरिकन अंतराळवीर अमेरिकेच्या भूमीवरून अवकाशात यशस्वी झेप घेतील आणि नव्या युगातील अंतराळमोहिमेत अमेरिकेला प्रभुत्व मिळेल आता अमेरिका स्वयंपूर्ण झाला आहे असे नासा प्रमुख Jim Bridenstine म्हणाले
Boeing CST-100 Star line Space Xआणि Crew program ह्या दोन कंपन्यांनी मिळून ह्या यानाची निर्मीती केली आहे भविष्यात इतर देशातील अंतराळवीरांना अंतराळ प्रवासासाठी ह्या यानाचा व्यावसायिक उपयोग करण्यात येणार आहे शिवाय भविष्यात सामान्य हौशी नागरिकांनाही ह्या अंतराळयानातून अंतराळ सैर करता येणा
No comments:
Post a Comment