Friday 15 March 2019

अंतराळवीर Nick Hague,Christina Kochआणी Alexey Ovichinin हे तीनही अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचले

 Expedition 59 Welcome Ceremony
 अंतराळ स्थानकात Anne McClain ,Oleg Konoenko आणि David Saint नवे अंतराळवीर Nick Hague ,Christina Koch आणि Alexey Ovichinin ह्यांच्या सोबत फोटो -नासा संस्था
 
नासा संस्था -15 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीम 59 चे अंतराळवीर Nick Hague अंतराळवीरांगना Christina Koch आणि अंतराळवीर Alexey Ovichinin 14 मार्चला अंतराळस्थानकात सुखरूप पोहोचले आहेत
कझाकस्थानातील बैकोनूर येथील  Cosmodrome वरून  Soyuz MS-12 ह्या अंतराळयानातून दुपारी 3.14मिनिटाला त्यांनी अंतराळस्थानकाकडे प्रयाण केले उड्डाणानंतर त्यांच्या सोयूझ यानाने पृथ्वीभोवती चार परिक्रमा पूर्ण केल्या आणि सहा तासांनी 9.01 वाजता यान अंतराळ स्थानकाच्या Rassvet Module जवळ पोहोचले
स्थानकातील Anne McClain ,David Saint आणि Oleg Kononenko ह्या तीन अंतराळवीरांनी स्थानकाचे hatch उघडून ह्या नव्या तीन अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले 11.10 वाजता अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला Christina Koch हिने प्रथम अंतराळस्थानकात प्रवेश केला नंतर Nick आणि Alexey ह्यांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकातील अंतराळवीरांनी त्यांचे हसत स्वागत केले
नव्या तीन अंतराळवीरांच्या आगमनानंतर आता अंतराळस्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून हे सहाहीजण मिळून एकत्रित तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील
हे अंतराळवीर स्थानकात सहा महिने वास्तव्य करतील अंतराळवीरNick Hague ,Christina Koch आणि Anne McClain अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी ह्या महिन्यात Space Walk करतील
मार्च मध्ये 22आणि 29 तारखेला आणि एप्रिलच्या 8 तारखेला हे Space Walk केल्या जातील 29 मार्चच्या Space Walk मध्ये Anne McClain आणि Christina Koch ह्या दोन अंतराळवीरांगना  सहभागी होतील त्या मुळे महिला Space Walker च्या इतिहासात प्रथमच दोन महिलांनी एकत्रित केलेला हा पहिला Space Walk असेल
अंतराळवीर David Saint ,Anne McClain आणि Oleg Kononenko हे तीनही अंतराळवीर जूनपर्यंत स्थानकात वास्तव्य करतील 
अंतराळवीर Nick Hague ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे ह्या आधी Oct मध्ये अंतराळ स्थानकाकडे जाताना त्यांच्या अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्यांना अर्ध्यातूनच  पृथ्वीवर परतावे लागले होते
अंतराळवीर Ovichinin ह्यांची ही तिसरी अंतराळवारी आहे तर Christina Koch मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेली आहे
ह्या तिघांची 2013 मध्ये नासा संस्थेत निवड झाली होती अंतराळ स्थानकात राहायला जाण्याआधीचे आवश्यक  ट्रेनिंग त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे

No comments:

Post a Comment