heetguj

Thursday, 10 September 2015

यवतमाळात डासांचा त्रास वाढला

 .              यवतमाळात सद्या डासांचा त्रास वाढला असून यवतमाळकरांना सतत डास पिटाळून लावणारया ऑल ऑउट ,मच्छर अगरबत्ती या सारख्या साधनांचा वापर करावा लागतो मध्यंतरी डासांचा त्रास होऊ नये म्हणून फवारणी यंत्र ( fogging machine  )आणले गेले काही दिवस नियमित फवारणी करण्यात आली पण नंतर ते यंत्र व फवारणी दोन्हीही दिसेनासे झाले.               
             सद्या सर्वत्र डासांमुळे उदभवणारया मलेरिया व डेंग्यू ह्या रोगाची साथ आहे डासांमुळे हत्तीरोगहि होऊ शकतो यवतमाळ जिल्ह्यात मागे हत्तीरोगाचे रुग्ण आढळले होते पण तरीही नगरपरिषदेकडून डास निर्मूलनाचे उपाय केल्या जात नाहीत. वाढलेले गाजर गवतही नियमित काढले जात नाही सतत तक्रार केल्यावर कधीतरी गवत काढून रस्त्यावरच टाकले जाते घंटागाडीत फक्त घरातीलच कचरा गोळा केल्या जातो रस्त्यावरचा कचरा तसाच पडून राहतो त्या मुळेही डास वाढतात शिवाय ह्या गवताची काहीजणांना allergy होते. 
           डासांची उत्पत्ती उघडया नाल्यामुळेही होते.नालीत उडून आलेल्या कचरयामुळे किंवा काही नागरिकांनी टाकलेल्या कचरयामुळे नाल्या तुंबतात आणि त्या भरून वाहू लागतात त्याच घाण पाण्यात रोगजंतू व डासांची पैदास होते ह्या नाल्या नियमित साफ केल्या जात नाहीत नगरसेवक व नगरपरिषद ह्या कडे दुर्लक्ष करतात नागरिक तक्रार करतात त्याहीकडे ते दुर्लक्ष करतात त्या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते 
                                    उघडया नाल्या म्हणजे डासांच्या उत्पत्तीला निमंत्रण 
कधी,कधी नाली भरल्याने हे घाणपाणी रस्त्यावरून वहात नागरिकांच्या घरातही शिरते. शिवाय ह्या नाल्यात डूकरेही शिरतात आणि घाणीत भर टाकतात म्हणूनच नगराध्यक्षांनी ह्या कडे लक्ष देऊन कडक कारवाई करणे आवश्यक आहे शिवाय जे नगरसेवक कामे करत नाहीत त्यांच्यावरही कडक कारवाई करणे आवश्यक आहे नाली साफ केल्यानंतर काही कर्मचारी काढलेला कचरा तिथेच टाकून निघून जातात त्यामुळे सुद्धा डासांचे प्रमाण वाढते त्या मुळे तो कचरा लगेचच उचलून गाडीत टाकण्यास बाध्य करावे.
                                       अंडर ग्राउंड नाल्यांची आवश्यकता 
                बरयाच वर्षापासून यवतमाळकर नाली अंडरग्राउंड करा अशी मागणी करत आहेत आणि ती मागणी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे त्या मुळे डासांचा त्रास कमी होईल शिवाय दोन्ही बाजूच्या उघडया नाल्यांमुळे रस्त्याची रुंदी कमी होते व रहदारीस अडथळा होतो तो होणार नाही. पण अंडरग्राउंड नाल्यांना प्राधान्य न देता नको तिथे खर्च केल्या जातोय सद्या नाली शेजारी वृक्षारोपण केल्या जातेय त्या मुळे आधीच कमी असलेली रस्त्यांची रुंदी अजून कमी होईल झाडे लावणे आवश्यक आहेच पण  जिथे आवश्यकता आहे तिथे ती लावावीत रस्त्याच्या दुतर्फा गावाबाहेर जिथे वृक्षतोड झाली आहे तिथे ती अवश्य लावावीत शिवाय गरीब वस्तीतही लावावीत उगाच नको तिथे जास्तीचा निधी वापरण्यापेक्षा गरीब वस्तीत स्वच्छता गृहे बांधावीत. रस्त्यावरील खड्डे हि देखील ज्वलंत समस्या आहे त्या मुळे रस्ता दुरुस्तीसाठी निधी वापरावा व त्याचा विनियोग योग्य ठिकाणी होतोय कि नाही ह्या वर लक्ष ठेवावे  कारण रस्ता दुरुस्त झाला कि थोड्याच दिवसात पुन्हा रस्ता पूर्व पदावर येतो आणि आधी नाल्या बंद कराव्यात म्हणजे डासांचा त्रास तर कमी होईलच शिवाय यवतमाळ स्वछ व सुंदर दिसेल.
                                       fogging मशीनने फवारणी करणे आवश्यक  
बंद पडलेली fogging मशीनची फवारणी देखील पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे व डासांच्या प्रश्नाकडेही गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे कारण नुकतीच दिग्रसमध्ये डेंगू मुळे एका नागरिकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली 
                                                              लोकांनो जागृत व्हा   
                 फक्त निवडून येण्यापुरते आम्ही हे करू ते करू म्हणून आश्वासने देऊन निवडून आलेल्या व कामाकडे  व नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणारयांना नगर सेवकांना  लोकांनी परत बोलवावे नगर परिषदेची निवडणूक आधी दरवर्षी व्हायची त्या मुळे लोकांना दरवर्षी नवीन नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून देता येत होते.आता पुन्हा दरवर्षी निवडणूक घ्यावी कारण एकदा निवडून आले कि पाच वर्षापर्यंत नगरसेवक निश्चिंत होतात त्यांना लोकांच्या समस्येशी काही देणे घेणे नसते.म्हणूनच लोकांनीच त्यांना काम करण्यास बाध्य करावे नाहीतर त्यांचा राजीनामा मागावा त्या साठी लोकांनी जागृत होणे आवश्यक आहे त्या मुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल 
Posted by Yojana Duddalwar at 11:56 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Wednesday, 9 September 2015

सूर्याभोवती अत्यंत वेगाने फिरणारया International space stationचे हे विलोभनीय फोटो

                                                                                                            Image Credit: NASA/Bill Ingalls
नासा संस्था - Sep. 8 / 2015
प्रती सेकंद 5 मैल ह्या वेगाने सूर्याभोवती मार्गक्रमण करीत फिरणारे  International Space Station  आणि त्याचे वेवेगळ्या 5 ठिकाणी अंतराळवीरांनी  रविवारी 6 sepला घेतलेले हे एकत्रित छायाचित्र
सूर्याच्या तप्त ,भव्य प्रकाशमान पृष्ठ भागावर काळ्या आकृतीच्या रुपातले
Internatinal space stationचे हे छायाचित्र विलोभनीय दिसतेय 



Posted by Yojana Duddalwar at 15:38 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 8 September 2015

नासाच्या खगोल शास्त्रज्ञानी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने टिपली चक्राकार तेजस्वी आकाशगंगा

 The galaxy resembles a giant maelstrom of glowing gas, rippled with dark dust that swirls inwards towards the nucleus.


Hubble Peers into the Heart of a Galactic Maelstrom
नासा संस्था - 4 /9/2015

पृथ्वी पासून 35 मिलियन्स प्रकाशवर्षे दूर असलेली आकाशगंगा नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी हबल दुर्बिणीच्या सहाय्याने 
टिपली असून तिच नाव Messier 96 असे आहे 
हि आकाशगंगा प्रथम 1781 साली खगोल शास्त्रज्ञ पियरे मिचेन (Pierre Mechain) ह्यांनी शोधली 
अंतराळातील मिट्ट काळोखात धूळ ,चमकणारे वायू आणि अवकाशातील काही दुर्बल छोटया आकाशगंगांचा समूह आकाशगंगेच्या मध्यभागी( nucleus भोवती) गुरूत्वाकर्षणामुळे ओढल्या गेल्यामुळे ह्या आकाश गंगेला चक्राकार भोवरयाच स्वरूप प्राप्त झाल आहे 
लंब वर्तुळाकार आकारातील हि आकाशगंगा काळ्याकुट्ट अंधारात दुधाळ पार्श्वभूमीवर चमकणाऱ्या तेजस्वी तारकासमूहामुळे आणखीनच प्रकाशमान झालीय तीच हे आकर्षक नेत्रदीपक दृश्य नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी दुर्बिणीच्या सहाय्याने टिपून सर्वांना पाहण्यासाठी प्रकाशित केलय       

Posted by Yojana Duddalwar at 12:42 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Tuesday, 1 September 2015

आणखी तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज

Aidyn Aimbetov of the Kazakh Space Agency, Sergei Volkov of the Russian Federal Space Agency and Andreas Mogensen of ESA (European Space Agency) will launch from the Baikonur Cosmodrome in Kazakhstan Wednesday, Sept. 2, 2015
नासा संस्था 
                     उद्या २ सप्टेंबरला आणखी तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाण्यासाठी सज्ज झाले असून त्या बाबतीतील सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती नासा संस्थेकडून कळवण्यात आलीय 
 Sergei Volkov- रशियन फेडरल स्पेस एजन्सी
Andreas Mogensen -युरोपियन स्पेस एजन्सी
आणि Aidyn Aimbetov-  कझाक स्पेस एजन्सी
हे तीन अंतराळवीर बुधवारी दि. २ सप्टेंबरला  दुपारी १२.३७ मिनिटाला काझाकीस्थांनच्या बैकोनुर कास्मोड्रोम (Biakonur Cosmodrom) येथून सोयुझ TMA-18 ह्या अंतराळ यानाने उड्डाण करतील 
Andreas Mogensen आणि  Aidyn Aimbetov हे दोन अंतराळवीर थोडया दिवसांसाठी तर  Sergei Volkov
सहा महिन्यासाठी अंतराळ स्थानकात निवास करतील.  
 शुक्रवारी 4 सप्टेंबर ला दुपारी  6.15 a.m. ला सोयुझ यान अंतराळ स्थानकाजवळ पोहोचेल तेव्हा यान अंतराळ स्थानकाला जोडल्या जाईल व अंतराळ स्थानकाचे दरवाजे उघडल्या जातील अंतराळ स्थानकावरील अंतराळ वीर त्यांचे स्वागत करतील. 
 2013 nov नंतर ह्या मोहिमेत पहिल्यांदाच 9 अंतराळवीर एकत्र येतील  Andreas Mogensen आणि  Aidyn Aimbetov 12sap.ला पृथ्वीवर परत येतील तर Scott kelly व Kornienko मात्र मार्च 2016 ला महत्वाची Biomedical  माहिती गोळा  करून पृथ्वीवर परततील हि माहिती पुढील मंगळ मोहिमेत अंतराळ स्थानकात जास्त दिवस मुक्काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल आतापर्यंत सर्व अंतराळ स्थानक निवासी अंतराळ संशोधकांनी अंतराळ स्थानकामधील प्रयोग शाळेत Biotechnology,Physical Science आणि Earth Science ह्या विषयांवर शेकडो प्रयोग केलेत व करत आहेत 

Posted by Yojana Duddalwar at 13:13 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Monday, 31 August 2015

नासा अंतराळ संशोधन स्थानकावरील अंतराळवीर ताज्या फळाचे वाटप करताना

       
 Image Credit: NASA           अंतराळवीर केजेल लिंडग्रेन ताज्या फळांचे वाटप  करण्यासाठी जाताना  
नासा अंतराळ संशोधन स्थानक                                                                  
(नासा संस्था): Aug. 27, 2015
नासा संस्थे कढून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार 
 २५ ऑगस्ट ला kounotori 5 H- II (HTV-5) ह्या मालवाहु  कार्गो हवाई जहाजातून  ( अंतराळ यानातून ) अंतराळ स्थानकावर आलेल्या ताज्या फळांचे वाटप अंतराळ स्थानकावरील अंतराळवीर केजेल लिंडग्रेन  (Kjell Lindgren  )  हे  इतर अंतराळ वीरांना करण्यासाठी जाताना त्यांची उडालेली तारांबळ ,आतील भागात तरंगणारी हि फळे आणि केजल लिंडग्रेन यांच्या हास्यमुद्रेची हि दृश्ये अंतराळवीरांनी अचूक टिपलीत आणि हा फोटो  नासा ह्या संस्थेने सर्वांना पाहण्यासाठी  उपलब्ध केलाय  


Posted by Yojana Duddalwar at 12:12 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

ग्रीनलंड जवळील बर्फ व हिमनदीचा प्रवाह


Sea Ice in the Greenland Sea
 08/24/2015
उन्हाळ्यातील उष्णतेमुळे उत्तर गोलार्धातील बर्फ वितळून त्याचे पाणी आर्टिक समुद्रात मिसळल्यामुळे वहात आलेल्या हिमनदिचे पाणी आणि  Greenland समुद्रा काठचे बर्फ

                                समुद्राच्या पाणी पातळीत वाढ संशोधकांचा निष्कर्ष 
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अंदाजे तीन इंचाने  तर काही ठिकाणी नऊ इंचाने वाढ झाली असली तरी हि पाणी पातळी सर्वत्र सारखी नाही समुद्राकाठची जामिन कमी होणे ,बर्फ वितळून त्याचे पाणी समुद्रात वहात येणे व आणि बर्फामुळे तयार झालेल्या ग्लेसियर्स मधील बर्फ अती उष्णतेमुळे वितळून त्याचेही पाणी समुद्रात मिसळल्याने काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढली असल्याचा निष्कर्ष  नासाच्या संशोधकांनी काढला आहे  
Posted by Yojana Duddalwar at 12:11 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, 27 August 2015

अंतराळ वीर मारणार सोयुझ यानातून अंतराळ स्थानका बाहेर फेरी

नासा संस्था -(अंतराळ स्थानक)

Soyuz spacecraft departs
The Soyuz TMA-08M spacecraft departs from the International Space Station's Poisk Mini-Research Module 2 (MRM2) and heads toward a landing in a remote area near the town of Zhezkazgan, Kazakhstan, on Sept. 11, 2013 (Kazakhstan time). On Friday Aug. 28, 2015, Expedition 44 crew will move the Soyuz TMA-16M spacecraft from the Poisk module to the Zvezda docking port.
Credits: NASA

इंटर national  अंतराळ स्थानकावरील अर्ध्या अंतराळवीरांच एक पथक  शुक्रवार २८ ऑगष्टला 
सोयुझ TMA -16M या अंतराळ यानातुन त्यांच्या अंतराळ स्थानका बाहेरील कक्षेत  (  orbital भोवती ) फेरी मारतील 
रशियन फेडरल स्पेस एजन्सी (Roscosmos ) मोहीम 44 चे कमांडर Gennady  Padalka, नासा उड्डाण अभियंता एस केली आणि (Roscosmos)चे मिखाइल Kornienko  Zvezda ह्यांचा त्यात समावेशआहे 
3.12 मिनिटे ते  3.37 (a.m.) मिनिटा पर्यंतच्या ह्या अंतरीक्ष भ्रमणाच्या ऐतिहासिक क्षणाचे दृश्य नासा दूरदर्शन वरून प्रसारीत केल्या जाइल 





:
Posted by Yojana Duddalwar at 16:50 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

About Me

My photo
Yojana Duddalwar
BSc (Zoology )(1st Class with distinction) (First in Zoology) Ex Beautition & freelance Journalist Foundation course of journalism Experience- अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ -मुंबई ह्यांच्या साप्ताहिक सत्ताचक्र साठी एक वर्ष काम दै लोकमत,दै लोकसत्ता (मुंबई रविवार व नागपूर आवृत्ती ),सकाळ(मराठवाडा,पुणे आवृत्ती ),देशोन्नती वै. दैनिकातून लेख,मुलाखती,ललितलेख.समस्या विषयक लेख,बातम्या व स्फुट लेखन प्रकाशित उत्तररंग,झेप ह्या दिवाळी अंकातून मुलाखत प्रकाशित दै लोकदूत मधून कथा व ललित लेख प्रकाशित दै.सकाळच्या यवतमाळ विशेष साठी कर्तुत्ववान महिलांच्या मुलाखतीच सदर व ABP माझा चॅनलच्या ब्लॉग माझा वर ब्लॉग लेखन
View my complete profile

Blog Archive

  • ▼  2026 (42)
    • ▼  September (3)
      • युरोप मध्ये अंतराळस्थानकातील Zero g इंडिकेटर Pikac...
      • अंतराळस्थानकातील अंतराळविरांनाही कामगार दिनानिमित्...
      • अंतराळस्थानकाच्या नूतनीकरणासाठी नासाच्या अंतराळवीर...
    • ►  August (6)
    • ►  July (7)
    • ►  June (4)
    • ►  May (4)
    • ►  April (5)
    • ►  March (4)
    • ►  February (4)
    • ►  January (5)
  • ►  2025 (55)
    • ►  December (6)
    • ►  November (5)
    • ►  October (4)
    • ►  September (4)
    • ►  August (4)
    • ►  July (4)
    • ►  June (5)
    • ►  May (5)
    • ►  April (5)
    • ►  March (5)
    • ►  February (4)
    • ►  January (4)
  • ►  2024 (54)
    • ►  December (5)
    • ►  November (3)
    • ►  October (4)
    • ►  September (4)
    • ►  August (4)
    • ►  July (5)
    • ►  June (4)
    • ►  May (5)
    • ►  April (5)
    • ►  March (5)
    • ►  February (4)
    • ►  January (6)
  • ►  2023 (54)
    • ►  December (6)
    • ►  November (4)
    • ►  October (4)
    • ►  September (6)
    • ►  August (5)
    • ►  July (5)
    • ►  June (4)
    • ►  May (4)
    • ►  April (4)
    • ►  March (4)
    • ►  February (4)
    • ►  January (4)
  • ►  2022 (55)
    • ►  December (6)
    • ►  November (4)
    • ►  October (4)
    • ►  September (4)
    • ►  August (4)
    • ►  July (5)
    • ►  June (4)
    • ►  May (4)
    • ►  April (5)
    • ►  March (7)
    • ►  February (4)
    • ►  January (4)
  • ►  2021 (58)
    • ►  December (5)
    • ►  November (5)
    • ►  October (4)
    • ►  September (6)
    • ►  August (3)
    • ►  July (5)
    • ►  June (4)
    • ►  May (4)
    • ►  April (9)
    • ►  March (5)
    • ►  February (5)
    • ►  January (3)
  • ►  2020 (52)
    • ►  December (4)
    • ►  November (5)
    • ►  October (4)
    • ►  September (3)
    • ►  August (4)
    • ►  July (4)
    • ►  June (5)
    • ►  May (5)
    • ►  April (6)
    • ►  March (4)
    • ►  February (4)
    • ►  January (4)
  • ►  2019 (50)
    • ►  December (3)
    • ►  November (4)
    • ►  October (3)
    • ►  September (3)
    • ►  August (4)
    • ►  July (5)
    • ►  June (4)
    • ►  May (6)
    • ►  April (2)
    • ►  March (4)
    • ►  February (3)
    • ►  January (9)
  • ►  2018 (48)
    • ►  December (7)
    • ►  November (6)
    • ►  October (6)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (2)
    • ►  June (5)
    • ►  May (2)
    • ►  April (2)
    • ►  March (2)
    • ►  February (4)
    • ►  January (3)
  • ►  2017 (47)
    • ►  December (3)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (6)
    • ►  August (6)
    • ►  July (5)
    • ►  June (4)
    • ►  May (3)
    • ►  April (8)
    • ►  March (2)
    • ►  February (5)
    • ►  January (3)
  • ►  2016 (68)
    • ►  December (5)
    • ►  November (3)
    • ►  October (3)
    • ►  September (6)
    • ►  August (7)
    • ►  July (10)
    • ►  June (8)
    • ►  May (7)
    • ►  April (3)
    • ►  March (6)
    • ►  February (7)
    • ►  January (3)
  • ►  2015 (53)
    • ►  December (7)
    • ►  November (4)
    • ►  October (9)
    • ►  September (9)
    • ►  August (8)
    • ►  July (3)
    • ►  June (1)
    • ►  May (2)
    • ►  April (3)
    • ►  March (4)
    • ►  February (1)
    • ►  January (2)
  • ►  2014 (34)
    • ►  December (4)
    • ►  November (4)
    • ►  October (3)
    • ►  September (4)
    • ►  July (3)
    • ►  June (3)
    • ►  May (2)
    • ►  April (3)
    • ►  March (4)
    • ►  February (1)
    • ►  January (3)
  • ►  2013 (29)
    • ►  December (2)
    • ►  November (3)
    • ►  October (4)
    • ►  September (4)
    • ►  August (2)
    • ►  July (2)
    • ►  June (2)
    • ►  May (1)
    • ►  April (2)
    • ►  March (1)
    • ►  February (1)
    • ►  January (5)
  • ►  2012 (19)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (3)
    • ►  August (2)
    • ►  June (2)
    • ►  May (3)
    • ►  April (4)
    • ►  February (2)

Contact

yojana.duddalwar@gmail.com
Coypright © 2012-19 heetguj.All rights reserved. Awesome Inc. theme. Powered by Blogger.