Wednesday, 6 August 2025

Blue Origin NS -34 मोहिमेतील सहा प्रवासी अंतराळ पर्यटनावरून परतले

 

 Blue Origin NS-34  मोहिमेतील अंतराळ पर्यटक Deborah Martorell अंतराळातून परतल्यानंतर -फोटो -Blue Origin

 Blue Origin -3 ऑगस्ट

Blue Origin च्या NS -34 मोहिमेतील सहा अंतराळ प्रवासी तीन ऑगस्टला अंतराळ पर्यटन करून परतले ह्या सहा प्रवाशांमध्ये भारतीय वंशाचे Arvinder Bahal ,Gokhan Erdem ,Deborah Martorell ,Lionel Pitchford ,JD Russelआणि H.E.Justin Sun ह्यांचा समावेश होता

व्यावसायाने रियल इस्टेट गुंतवणूकदार असलेले ऐशी वर्षीय अरविंदर मूळचे आग्र्याचे रहिवासी पण नंतर अमेरिकेत स्थायिक झाले ते खाजगी पायलट आणि हेलिकॉप्टर चालक आहेत ते साहसी आहेत यांनी जगातील अनेक देशांना भेट दिली आहे त्यांनी South Pole ,North Pole ,Mount Everest आणि गिझाच्या पिरॅमिड येथे स्काय डायविंग केले आहे

Gokham -तुर्की उद्योगपती,ऊर्जा,दूरसंचार,बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत ते फोटोग्राफरही  आहेत त्यांना अंतराळाचे आकर्षण आहे त्यांना स्थानकात वास्तव्य करून संशोधन करण्याची आणि दूरवरच्या ग्रहावर जाण्याची इच्छा आहे 

Deborah -Puerto Rican Meteorologist ,Journalist आहेत त्यांना पर्यावरण आणि अंतराळ विश्वातील रिपोर्टींग साठी अमेरिकन मेटेरॉलॉजिकल सोसायटी तर्फे आठवेळा एमी पुरस्कार आणि उत्कृष्ट सायन्स रिपोर्टींग साठी दोन वेळा पुरस्कार मिळाला आहे त्यांना अंतराळ विश्वाची आवड असल्यामुळे त्यांनी 2007 मध्ये नासाच्या ZERO-G उड्डाणात भाग घेतला होता त्यांनी प्युर्टोरिकन अंतराळवीर Joe Acaba आणि Marcos Berrios ह्यांचे रिपोर्टींग केले होते शिवाय STS-119 ,Artemis-1आणि प्युर्टोरिकोच्या Nano Satellite प्रक्षेपण मोहिमेचे देखील रिपोर्टींग केले त्या नासाच्या JPLमध्ये कार्यरत आहेत 

Lionel -मुळचे इंग्रज सध्या स्पेन मध्ये शिक्षक,अनुवादक आणि टुरिस्ट गाईड आहेत 1992 मध्ये कुटुंबियांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ काठमांडूत अनाथाश्रमाची स्थापना केली त्यांना अंतराळ उड्डाणाची आवड आहे आणि सामान्य नागरिकाला ते शक्य आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटते 

J D Russel- मालिका उद्योजक,तंत्रज्ञान विषयक व्हेंचर कॅपिटल कंपनी,अल्फा फंड आणि Aerospace Aerospace consulting & solution co.चे संस्थापक त्यांच्या मुलीच्या स्मरणार्थ Victoria Russel Foundation ची स्थापना त्यांनी ह्या आधी 22 नोव्हेंबर 2024 मध्ये पहिल्यांदा तिकीटाची बोली जिंकून अंतराळ उड्डाण केले होते 

Jastin - Grenedaचे राजदूत आणि Who चे स्थायी सदस्य आहेत Blackchain TRON चे Founder,अलीबाबा Jack Ma चे शिष्य आहेत त्यांच्या उत्कृष्ट लीडरशिप आणि कार्यामुळे त्यांना Forb च्या ग्राहक तंत्रज्ञान विषयक तीस वर्षाखालील तिस कर्तबगार यशस्वी ऊद्योजकांच्या यादित अनेक वेळा स्थान मिळाले त्यांना लहानपणापासूनच अंतराळाचे आकर्षण आणि अंतराळ उड्डाणाची इच्छा आहे 34 वर्षीय Jastin अब्जाधीश आहेत

  

  Blue Origin NS -34 मोहिमेतील अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटनासाठी निघताना -फोटो -Blue Origin

Blue Origin च्या West Texos येथील उड्डाणस्थळावरून New Shepard अंतराळयानातून हे सर्वजण अंतराळ पर्यटनास गेले होते तीन तारखेला सकाळी 7.30 (स्थानिक वेळ) मिनिटाला हे सहाही पर्यटक अंतराळ पर्यटनास निघाले आणि  दहा बारा मिनिटात अंतराळ आणि पृथ्वी ह्यांची सीमारेषा भेदून karman line पर्यंत पोहोचले  अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच त्यांनी अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत तरंगण्याचा अद्भुत अनुभव  घेतला सर्वांनी यानाच्या खिडकीतून  पृथ्वीदर्शन घेतले तेव्हा अमेझिंग !Beautiful Earth ! Oh My God !This is Great ! आपण खरेच अंतराळात पोहोचलो!  अशा  उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या Jastin ह्यांनी त्यांचा लहानपणीचा फोटो दाखवून मॉम Dad मी अंतराळात पोहोचलो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली काही क्षणाचा अद्भुत अनुभव घेऊन सर्वजण पृथ्वीवर परतले तेव्हा सर्वजण निशब्ध आणि आनंदीत झाले होते प्रतिक्रिया व्यक्त करताना Deborah म्हणाल्या मला शब्ध सुचत नाहीत खूप सुंदर अनुभव होता

ह्या सर्वांना Blue Origin तर्फे अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट आणि त्यांची कर्तृत्व वैशिष्ठे कोरलेला patch देण्यात आला 

 ह्या यशस्वी पर्यटनानंतर New Shepard चे वरिष्ठ उपाध्यक्ष Phil Joyce म्हणतात ,ह्या उड्डाणात वेवेगवेग्ळ्या देशांचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर कर्तृत्वान नागरिक सहभागी झाले हा आमचा बहुमान आहे अंतराळातून पृथ्वीदर्शन करताना एकात्मतेचे दर्शन घडते हे पाहून आनंद होतो आता ह्या अनुभवाचा पृथ्वी विकासासाठी कसा उपयोग करतात हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत 

Saturday, 2 August 2025

नासाच्या Space X Crew- 11 अंतराळ मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात पोहोचले

  The four Crew-11 members are greeted by the seven-member Expedition 73 crew aboard the International Space Station.

 नासाच्या Space X Crew-11अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर एकमेकांशी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - 2 ऑगस्ट

नासाच्या Space X Crew- 11अंतराळ मोहिमे अंतर्गत नासाची अंतराळवीर Zena Cardman अंतराळवीर Mike Fincke जपानचे अंतराळवीर Kimiya Yui आणि रशियन अंतराळवीर Oleg Platonov सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले आहेत हे चारही अंतराळवीर गुरुवारी 31 जुलैला स्थानकात जाणार होते पण हवामान उड्डाणासाठी अनुकूल नसल्यामुळे हे अंतराळवीर एक दिवस उशिराने एक ऑगस्टला स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले  

नासाच्या Kennedy Space center मधील 39 A ह्या ऊड्डाण स्थळावरून सकाळी 11.43 वाजता Space X Crew Dragon ह्या अंतराळविरांसह अंतराळात झेपावले ह्या मोहिमेत अंतराळवीर Zena Cardman ह्यांनी कमांडर पद Mike Fincke  ह्यांनी पायलटपद सांभाळले तर अंतराळवीर Kimiya yui आणी अंतराळवीर Oleg Platonov ह्या दोघांनी मिशन स्पेशालिस्ट पद सांभाळले  

Falcon 9 राँकेटच्या सहाय्याने अंतराळात झेपावल्यानंतर काही वेळातच Dragon मधील नियोजित प्रक्रिया पार पडल्या आणि  स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली Dragon राँकेट पासुन वेगळे झाले आणी अत्यंत वेगाने स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले ह्या अंतराळप्रवासा दरम्यान हे अंतराळवीर नासाच्या Florida येथील Johonson Space Center मधील टीम प्रमुखांच्या लाईव्ह संपर्कात होते

  The crew of NASA’s SpaceX Crew-11 mission train for their upcoming trip to the International Space Station at SpaceX facilities in Florida. From left: Oleg Platonov, Mike Fincke, Zena Cardman, and Kimiya Yui.

नासाच्या Space X 11अंतराळ मोहीमेतील अंतराळवीर Oleg Platonov अंतराळवीर Mike Fincke अंतराळवीर Zena Cardman आणि Kimiya Yui -फोटो -नासा संस्था

शनिवारी दुपारी 2.27 वाजता (स्थानिक वेळ) Dragon स्थानकाजवळ पोहोचले त्या नंतर स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि  Space X Dragon ह्यांच्यातील Docking आणि Hatching  प्रक्रिया पार पडली अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश करण्याआधी Dragon मधील लिकेज व इतर यंत्रणा तपासली त्यांनी त्यांचे स्पेससूट चेंज केले दुपारी 3.46 वाजता अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकातील अंतराळवीर Anne McClain ,Nicole Ayers ,Jony Kim आणि Takuya Onishi ह्यांनी स्थानकात त्यांचे स्वागत केले 

स्थानकात प्रवेश केल्यानंतर काही क्षण ह्या अंतराळवीरांनी एकमेकांशी बातचीत केली त्या नंतर थोड्या वेळाने स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्र जमले आणि नासाच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला त्यावेळी स्थानकाचे सध्याचे कमांडर Takuya Onishi ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले," आता तुम्हाला आमच्या सोबत काम करावयाचे आहे सध्या स्थानकात खूप काम आहे Mike आणी Kimiya तुमचे स्थानकात पुन्हा स्वागत तुमच्या पुर्वानुभवाचा आम्हाला फायदा होईल मोहीम 73 मध्ये तुमचे स्वागत ! असे म्हणत त्यांनी ह्या अंतराळवीरांना स्थानकात पोहोचल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितले !"

अंतराळवीर Zena म्हणाल्या," मी खरेच निशब्ध झालेय पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करून स्थानकात पोहोचले तुमच्या स्वागताने भारावून गेले तुमचे आभार हे स्थानक इथल वातावरण अमेझिंग आहे त्या साठी ह्या माझ्या सहकारी मित्रांचे देखील आभार त्यांच्या सोबतचा प्रवास छान होता इथे येण्याची संधी दिल्याबद्दल नासा आणि Space X चे आभार आता सर्वांसोबत संशोधन करताना मजा येईल !'

Mike -,"मी चवथ्यांदा स्थानकात प्रवेश केला तेव्हा पुन्हा ह्या अंतराळातल्या माझ्या घरी आल्याचा आनंद झाला इतक्या वर्षात अंतराळवीरांनी हे स्थानक छान सांभाळले आहे आता आपण काळजी घेऊ Takuya तुमच्या स्वागताबद्दल आभार आता मिळून संशोधन करण्याची संधी मिळालीय आधीपेक्षा उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करेन ह्या मोहीम 10 मधील अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर पोहोचणार आहेत त्यांचे नातेवाईक त्यांची वाट पाहात आहेत त्यांना सुरक्षित पृथ्वीवर पोहोचण्यासाठी शुभेच्छा !

Kimiya -तुम्हा सर्वांनी आनंदाने आमचे स्वागत केले त्या बद्दल आभार !आता तुम्हा मोहीम 73 मधील अंतराळवीरांसोबत इथे संशोधन करणार आहे मी उत्कृष्ठ काम करण्यासाठी प्रयत्न करेन ह्या 11 अंतराळवीरांसोबत वास्तव्य करताना संशोधन करताना मजा येईल

Oleg -"माझ्याही अशाच भावना आहेत तुमच्या उत्साही स्वागताबद्दल आभार ! पहिला अंतराळ प्रवास,स्थानक इथल वातावरण पाहून आश्चर्यचकित झालोय असे म्हणत त्यांनी रशियावासीयांशी रशियन भाषेत संवाद साधत सर्वांचे आभार मानले !"

अंतराळवीर Zena आणी Oleg हे प्रथमच स्थानकात वास्तव्यास गेले आहेत अंतराळवीर Mike चवथ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत तर Kimiya दुसऱ्यांंदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत हे सर्वजण आता एकत्रित स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील लवकरच मोहीम 11मधील अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत

ह्या अंतराळविरांच्या launching आणी स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टि.वी वरुन करण्यात आले होते आणी हौशी नागरिकांना Virtual guest म्हणून ऊपस्थित रहाण्याची संधीही देण्यात आली होती

Tuesday, 22 July 2025

नासाच्या Artemis मोहिमेतील Lunar Terrain Vehicle साठी अत्याधुनिक उपकरणांची निवड

  In an artist's concept, two astronauts ride on a lunar terrain vehicle on the surface of the Moon

 नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील भविष्यकालीन अंतराळवीरांना चांद्रभूमीवर फिरण्यासाठी चंद्र बग्गी -फोटो नासा संस्था 

नासा संस्था - 22 जुलै

नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीर पन्नास वर्षांनी पुन्हा चंद्रावर जाणार आहेत हे अंतराळवीर खाली चंद्रावर उतरून चांद्रभूमीवर फिरणार आहेत तेथील वातावरणातील व भूगर्भातील संशोधित माहिती गोळा करणार आहेत त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे ह्या अंतराळवीरांना चंद्रभूमीवर फिरण्यासाठी ह्या आधीच Lunar Terrian Vehicle(चंद्रबग्गी) बनविण्यात आले आहेत दोन अंतराळवीरांना बसण्याची व्यवस्था असलेल्या ह्या चंद्रबग्गीत बसून आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीर चंद्रभूमीवर फिरणार आहेत आणि तेथील संशोधित माहिती मिळवणार आहेत हि चंद्रबग्गी स्वयंचलित असून अत्याधुनिक रोबोटिक यंत्रणेच्या साहाय्याने अंतराळवीरांशिवाय देखील तेथील भूपृष्ठावर दूरवरच्या भागात फिरून उपयुक्त संशोधित माहिती गोळा करणार आहे हि बग्गी चंद्राच्या दक्षिण भागात जाणार आहे 

आता नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील Lunar Terrain Vehicle साठी तीन अत्याधुनिक स्वयंचलित उपकरणांची निवड करण्यात आली आहे  नासाच्या Associate Administrator Nicky Fox म्हणतात," मानव आणि रोबोटिक अद्ययावत स्वयंचलित यंत्रणा मिळून मिळवलेली हि माहिती आधीच्या संशोधित माहितीपेक्षा वेगळी व नवी असेल ह्या निवडलेल्या नवीन उपकरणामुळे हि बग्गी चंद्रावरील दूरवरच्या आणि आजवर मानवाला अज्ञात असलेल्या भागात पोहोचेल आणि तेथील सखोल माहिती गोळा करेल आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांना चांद्रभूमीवर उतरून फिरताना,संशोधन करताना त्यांचे आणि अंतराळयानाचे संरक्षण करण्यासाठी हि संशोधित माहिती उपयुक्त ठरेल!" 

नवीन निवडक AIRES (Artemis Infrared Reflectance& Emission Spetrometer) उपकरणातील यंत्रणा चंद्रभूमी वरील मिनरल्स,केमिकल्स आणि इतर घटकांचे अस्तित्व आणि वातावरणातील अमोनिया,ऑक्सिजन कार्बन डाय ऑक्साईड सारखे वायू ज्यांची उष्णतेने सहज वाफ होऊन हवेत मिसळतात अशा वायूंच्या आणि खनिजांच्या अस्तित्वाचे ठिकाण,त्यांचे प्रमाण,घनता आणि इतर सायंटिफिक माहिती शोधून तो भाग प्रकाशित करतील LMP उपकरण Spectrometer आणि रडार यंत्रणेच्या साहाय्याने भूगर्भातील चाळीस मीटर खोलवर जाऊन तेथील रचना,तापमान आणि घनता मापन करेल हि संशोधित एकत्रित माहिती आपल्याला चंद्राची निर्मिती कशापासून झाली हे समजेल आणि चंद्रावरील बदलत्या परिस्थिती बद्दलची माहिती मिळवेल,पाण्याच्या अस्तित्वाचे,बर्फीय भागाचे ठिकाण शोधेल आणि त्यांच्या परावर्तित होण्याचे कारण समजेल 

Ultra Compact Imaging Spectrometer (UCIS-Moon) चंद्रावरील उड्डाण वाहनांसाठी ह्या ऊपकरणाची निवड झाली आहे हे ऊपकरण चंद्रबग्गी आणि अंतराळवीरांनी संशोधित केलेल्या माहीतीच्या आधारे तेथील वातावरणात उड्डाण करताना तेथील भूभागाचा नकाशा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ द्वारे इतर संशोधित माहिती गोळा करेल शिवाय शास्त्रज्ञांना संशोधन करण्यायोग्य आणि नमुने गोळा करण्यायोग्य भाग शोधेल चंद्रावरील पाणी ,खनिजे त्यांची रचना आणि थर्मोफिजिकल गुणधर्म ह्या विषीयीची संशोधित माहिती गोळा करण्यास मदत करेल 

ह्या उपकरणाच्या निवडीआधी नासा संस्थेने Intutive Machines Lunar outpost आणि Venturi Astrolab ह्या कंपनीसोबत काम केले आहे ह्या उपकरणाची निवड करताना नासा संस्थेने ठरवून दिलेल्या नियमांची पूर्तता ,डिझाईन आणि अंतराळवीर आणि अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आता अंतिम चाचणीनंतर ह्या निवडीला अंतिम मान्यता मिळेल


Tuesday, 15 July 2025

नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर Peggy Whitson,Tibor ,Slawosz आणि शुभांशु शुक्ल पृथ्वीवर सुखरूप परतले

 

नासाच्या Axiom-4 मोहिमेतील अंतराळवीरांसह Space X Dragon  मंगळवारी 5.32 a.m.ला (स्थानिक वेळ) California येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरताना फोटो -Axiom Space

नासा संस्था / Axiom Space  -15 जुलै

नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर शुभांशु शुक्ल,Peggy Whitsonअंतराळवीर Slawosz आणी अंतराळवीर Tibor पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत हे चारही अंतराळवीर 14 जुलैला सकाळी 7.10 वाजता( EST)  Space X Dragon Grace मधून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले हे अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यासाठी निघण्यापूर्वी स्थानकात त्यांचा Farewell Ceremony पार पडला 

नासा संंस्था - आम्ही नासाच्या Huston संस्थेतून तुमच्याशी लाईव्ह संपर्क साधत आहोत तुम्ही आनंदी दिसत आहात तुम्ही अंतराळस्थानकाला भेट दिली आणी संशोधनात सहभागी झालात त्या बद्दल धन्यवाद आता तुमचा Farewell Ceremony सुरू होईल

 The Axiom Mission 4 and Expedition 73 crews, join together and smile for a group portrait inside the International Space Station's Harmony module. In the front row (from left) are Ax-4 crewmates Tibor Kapu, Peggy Whitson, Shubhanshu Shukla, and Sławosz Uznański-Wiśniewski with Expedition 73 crewmates Anne McClain and Takuya Onishi. In the rear are, Expedition 73 crewmates Alexey Zubritskiy, Kirill Peskov, Sergey Ryzhikov, Jonny Kim, and Nichole Ayers. Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्रित -फोटो नासा संस्था

Takuya- "मी मोहीम 73 तर्फे Peggy,Tibor,Slawosz आणी शुभांशु तुम्हा सर्वांचे आभार मानतो आम्ही तुमच्या सोबतची कंपनी खूप enjoy केली आम्हाला खूप सारा आनंद,प्रेरणा,ऊत्साह आणखी बरेच सकारात्मक अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमची सायंटिफिक संशोधनाबद्दलची आस्था आणी व्यावसायिकता भविष्यकालीन खाजगी मोहिमेतील अंतराळवीरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल मी आशा करतो की तुम्ही देखील आमच्या सोबतचा ईथला वास्तव्याचा काळ आनंदात घालवला असेल आणि तो अविस्मरणीय ठरेल!"

Peggy - "Thanks ! खरच आम्ही देखील तुमच्या सोबतचा हा काळ खूप मजेत घालवला तुमच्यासारख्या अनुभवी अंतराळवीरांसोबत वास्तव्य करताना,संशोधन करताना नेहमीच आनंद मिळतो आणि जे घनिष्ठ मित्र बनतात त्याच्या सोबत तर हा आनंद द्विगुणित होतो मला स्पेशली तुमचे कौतुक करावयाचे आहे तुम्ही प्रेमाने आम्हाला सहकार्य केल हा अनुभव असामान्य होता त्या साठी आभार !"

Tibor -"ह्या क्षणी मी भावुक झालोय शब्द सुचत नाहीत तरीही बोलण्याचा प्रयत्न करतो आम्ही Axiom मोहिमेतील चौघे खूप व्यस्त कार्यक्रम आणि एक द्येय घेऊन इथे आलो आणि खूप शिकायला संशोधित करायला मिळाल आम्ही इथे सायंटिफिक प्रयोग केले पृथ्वीचे सौन्दर्य फोटोबद्ध केल खूप फोटो काढत गेलो फोटो चांगले निघत गेले इथल्या झीरो ग्रॅव्हीटीतले मजेशीर प्रसंग अनुभवले त्याचे व्हिडीओ काढले,पृथ्वीवरील संस्थांशी लाईव्ह संवाद साधत लोकांना आमच्या मित्रांना,कुटुंबियांना,इथून पृथ्वीदर्शन घडवले ते आनंदित झाले त्या मुळे आमचाही उत्साह वाढत गेला मुले उत्साहित झाली इथे स्थानकात सहकारी अंतराळवीरांशी मैत्री झाली रिकाम्या वेळी आम्ही काहींना विनोदी चुटकुले सांगत हसविले आणि खूप चेष्ठा मस्करी केली आम्ही हे सार ह्या साठी केल कि आपण मानव आहोत इथे स्थानकात जगभरातून वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर संशोधन करण्यासाठी एकत्र वास्तव्य करतात शांततेने कुशलतेने एकमेकांना सहकार्य करतात,मदत करतात हि वैश्विक मोहीम आहे आणि आम्ही त्यात सामील झालो मला वाटत भविष्यात हि मोहीम उत्तरोत्तर वाढत जाईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील आम्ही परतल्यावर आपापल्या देशात त्याचा विस्तार करू आणि ह्या जगात अशक्य काही नाही हे दाखऊ तुम्हा सर्वांचे नासा,Axiom आणि आमच्या संस्थेचे आभार !"

शुभांशु - मी आता खूप वेळ बोलू शकेन मी जेव्हा Dragon मध्ये बसून इथे यायला निघालो तेव्हा वाटल नव्हत कि हि अंतराळयात्रा,ह्या सर्वासोबतच स्थानकातील वास्तव्य एव्हढ आनंदायी होईल हा स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतला अद्भुत अनुभव माझ्या मागे उभे असलेल्या अंतराळवीरांसोबतच वास्तव्य सारच अविश्वसनीय आहे ह्या अनुभवी अंतराळवीरांसोबतच वास्तव्य,संशोधन करण आनंदायी होत ह्या दोन आठवड्यात आम्ही खूप सायंटिफिक प्रयोग केले काही इतर कामे केली वेळ मिळताच स्थानकाच्या खिडकीतून पृथ्वीसौन्दर्य कामेराबद्ध केल बाहेर पहाताना हे सार जादुई वाटायच त्या साठी नासा आणि इसरो संस्थेचे आभार माझ्या कुटुंबियांच्या मित्रांच्या सपोर्ट मुळे हे शक्य झाल इसरोने सगळे प्रोटोकॅल,सायन्स आणि इतर आवश्यक गतविधी विकसित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले नासा संस्थेतील पार्टनर आणि टीममधील सर्वांनी सतत लाईव्ह संपर्क साधत सहकार्य केल म्हणून हि मोहीम यशस्वी झाली त्या साठी त्या सर्वांचे आभार इथे स्थानकात विविध देशातील कुशल अनुभवी अंतराळवीर सोबत संशोधन करतात वास्तव्य करतात तेव्हा मानवतेच दर्शन घडत चाळीस वर्षांपूर्वी अंतराळवीर राकेश शर्माला विचारल होत तिथून भारत कसा दिसतो तसच मलाही विचारल मी म्हणेन इथून भारत महत्वाकांक्षी,आत्मनिर्भर,निढर आणि गौरवशाली दिसतो आणि अजूनही आपला भारत "सारे जहाँसे अच्छा आहे"! 

Slawosz  - स्थानकातील तुम्ही केलेल्या ह्या सुंदर पाहुणचारा बद्दल तुम्हा सर्वांचे आभार,मला अजूनही तो क्षण आठवतोय hatch ओपन झाल्यावर मी तरंगत स्थानकात पहिल्यांदा प्रवेश केला आणि तुम्ही मला स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पाहायला सांगितल पृथ्वीच्या अलौकिक सौन्दर्य दर्शनाचा तो अद्भुत क्षण कायम माझ्या स्मरणात राहील इथे वास्तव्य करणाऱ्या सर्वच अंतराळवीरांनी आम्हाला आमची मोहीम पूर्ण करण्यासाठी  सहकार्य केल हे यश तुमच्याशिवाय शक्य नव्हत आमच्या पोलंड देशातील ESA ,NASA आणि Axiom संस्थेतील सहभागी सर्वांचे आभार इथे स्थानकात सर्व देशातील अंतराळवीर वास्तव्य करीत एकत्रित संशोधन करतात हे स्थानक सांभाळतात Labrachis जतन करतात हे प्रशंसनीय आहे तुमच्या सोबत इथल्या झिरो ग्रॅविटीत संशोधन करताना अस वाटत कि अंतराळाला सीमा नाही अंतराळविश्वाच भविष्य उज्वल आहे इथे नवनवीन संशोधित Technology विकसित होतील नवीन Space Stationsची निर्मिती होईल "!

 

स्थानकातून परतण्याआधी Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीरांच्या Farewell Ceremony कार्यक्रमानंतर अंतराळवीर एकमेकांचा निरोप घेताना -फोटो Axiom Space 

त्यानंतर स्थानकाचे कमांडर Takuya ह्यांनी हा चारही अंतराळवीरांना तुमचा अंतराळप्रवास सुरक्षित आणि सुखाचा  होवो अशा शुभेच्छा दिल्या आणि सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला आणि चारही अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले त्यानंतर Dragon मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणी Dragon सुरक्षित पणे स्थानकापासून वेगळे झाले काही वेळातच सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यानंतर ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासास सुरुवात झाली आणी 22 तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर मंगळवारी हे चारही अंतराळवीर सुरक्षितपणे  पृथ्वीवर पोहोचले पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर ग्रेस Dragon पॅराशूटच्या साहाय्याने California येथील समुद्राच्या खाडीत ऊतरले तेव्हा California मध्ये पहाटेचे 2.31a.m.आणि भारतात दुपारचे साडेतीन वाजले होते

ग्रेस Dragon जेव्हा California येथील समुद्रात उतरले तेव्हा नासाची रिकव्हरी टीम तेथे पोहोचली टीममधील कर्मचाऱ्यांनी Dragon ला दोरीच्या साहाय्याने होडीला बांधून ओढत बोटी पर्यंत आणले त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने Dragon ग्रेसला उचलून बोटीवर ठेवण्यात आले काही वेळाने आवश्यक प्रक्रिया पार पडल्या नंतर रिकव्हरी टीममधील कर्मचाऱ्यांनी Dragon चे दार उघडले आणि ह्या अंतराळवीरांना उचलून Dragonमधून बाहेर आणले सुरवातीला अंतराळवीर  Peggy Whitson नंतर शुभांशु शुक्ल अंतराळवीर Slawosz आणि शेवटी अंतराळवीर Tibor सुहास्य मुद्रेने सर्वांना हात दाखवुन अभिवादन करत बाहेर पडले ह्या अंतराळवीरांना नासाच्या रिकव्हरी कॅम्प मध्ये चेकअप साठी नेण्यात आले आता आठ दिवसांनी हे अंतराळवीर त्यांच्या घरी पोहोचतील  शुभांशु ह्यांचे कुटुंबीय ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याचा सोहळा पाहिल्यानंतर आनंदित झाले होते

Wednesday, 9 July 2025

अंतराळवीरांनी स्थानकातून दिल्या Happy Independence Day च्या शुभेच्छा !

 NASA’s Expedition 73 Flight Engineers Anne McClain, Nichole Ayers, and Jonny Kim called down to Earth from the International Space Station and shared a Fourth of July message.

नासाचे अंतराळवीर Flight Engineer Nicole Ayers अंतराळवीर Anne MacClain आणि अंतराळवीर Jony Kim स्थानकातून लाईव्ह संवाद साधत पृथ्वीवासीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्य शुभेच्छा देताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 9 जुलै

नासाच्या अंतराळ मोहिम 73 चे अंतराळवीर सध्या स्थानकात वास्तव्य करत आहेत त्यांच्या संशोधनाच्या कामातून वेळ काढुन अमेरीकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला नासाच्या अंतराळवीर Anne McClain, Nicole Ayersआणी अंतराळवीर Jony Kim ह्यांनी पृथ्वी वासीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्य शुभेच्छा दिल्या त्या वेळी नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादा दरम्यान त्यांनी ह्या शुभेच्छा दिल्या 

Anne McClain - आम्हा तिघांकडुन आणी अंतराळ मोहीम 73 मधील अंतराळविरांच्या वतीने तुम्हा सर्वांना स्थानकातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! आता आम्ही पृथ्वीच्या वर अंतराळात 250 मैल अंतरावरून 90 मिनिटात  एक पृथ्वी परीक्रमा पुर्ण करून ह्या शुभेच्छा देत आहोत 

" Wish You Happy 4th July !"

 हे अंतराळस्थानक आपल्या साठी महत्त्वाचे आहे मी त्याची जबाबदारी सांभाळत सर्वाच्या वतीने ह्या शुभेच्छा देत असताना मला आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल थोडस सांगावस वाटतय ह्या दिवशी शुभेच्छा दिल्या जातात स्वातंत्र्याचा आनंद साजरा केला जातो आपल्या पूर्वजानी मिळवलेल हे स्वातंत्र्य आपल्या आधीच्या पिढ्यांनी जपल म्हणून आपणही स्वातंत्र्य ऊपभोगतोय आता त्यांचीही आपल्या कडून तशीच अपेक्षा आहे आपल स्वातंत्र्य भावी पिढिसाठी जतन करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे! आपल्यासाठी हा स्वातंत्र्यदिन खूप महत्वपूर्ण आहे त्याच रक्षण करू या

Nocole Ayers -सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ! 4 जुलै हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आता मी स्थानकातून अंतराळवीर म्हणून आणि आर्मी ऑफिसर म्हणून सर्वांना शुभेच्छा देत आहे माझ्यासाठी हि बहुमानाची बाब आहे मला गौरव मिळाल्यासारख वाटतय अंतराळवीर अंतराळात स्थानकाची जबाबदारी सांभाळतात आणि आर्मी ऑफिसर पृथ्वीवरील देशाचे रक्षण करतात दोघेही देशासाठी महत्वपूर्ण आहेत Anne ने सांगितल्या प्रमाणे आपल्या पूर्वजांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आपण आनंदाने उपभोग घेत आहोत भावी पिढीसाठी त्याचे रक्षण करण आवश्यक आहे 

Jony Kim - मी अंतराळयात्री आहे मी जेव्हा अमेरिकेबद्दल 4 जुलैच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल  गांभीर्याने विचार करतो तेव्हा स्वतंत्रता,लोकशाही आणि एकता आपल्यासाठी किती महत्वाची आहे ह्याची जाणीव होते अमेरिकेचा हा आदर्श सन्माननीय आहे आणि त्या सगळ्यांचा सन्मान करण गरजेच आहे जे आमच्या आधी इथे येऊन गेले ज्यांनी स्वातंत्र्यासाठी जीवाचे बलिदान दिले ज्यांनी स्वतःचा विचार न करता भावी पिढींना आनंदी जीवन दिल त्या सर्व प्रियजनांना मी संदेश देऊ इच्छितो कि,तुमच्या प्रोत्साहना मुळे प्रेमामुळे आम्ही इथे येऊ शकलो वास्तव्य करू शकलो नाहीतर आमच हे द्येय आम्ही पूर्ण करू शकलो नसतो नासा संस्थेतील सर्वजण ह्या अंतराळ स्थानकासाठी अंतराळ मोहिमेसाठी सतत प्रयत्न करतात कार्यरत राहतात जशी स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची भावना असते तसच स्वातंत्र्य,लोकशाही आपल्या देशाला महान बनवते 

 "तुम्हा सर्वांना अंतराळ स्थानकातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ! आणि Goodbye !

Thursday, 3 July 2025

नासाचे पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या करोना भागातील 24 वे भ्रमण पूर्ण करून सुरक्षित बाहेर पडले

   NASA's Parker Solar Probe -- with its heat shield facing forward and twin solar panels partially extended -- flies through particles in space.

 नासाचे पार्कर सौर यान सूर्याच्या अंतर्गत करोना भागातून भ्रमण करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-3 जून

नासाच्या पार्कर सोलर प्रोबने 19 जुनला सुर्याच्या अंतर्गत भागात शिरून अत्यंत जवळुन 3.8 मिलीयन मैल अंतरावरून 24 वी फेरी पुर्ण केली ह्या सौर मोहिमेतील शास्रज्ञांनी नियोजित केलेली हि शेवटची फेरी होती 

22 जुनला शास्त्रज्ञांनी प्रसारित केलेल्या माहिती नुसार पार्कर सोलर प्रोब सौरयान शेवटची फेरी मारून सूर्याच्या अंतर्गत कक्षेतून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले असुन हे सौरयान नियमित भ्रमण करत आहे नासाच्या सौर मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या नियोजना नुसार 2026 पर्यंत पार्कर सौरयान सूर्याच्या कक्षेत भ्रमण करून सखोल निरीक्षण करेल आणी संशोधित माहिती मिळवेल

पार्कर यान सुर्याच्या कक्षेत शिरले आणी यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली तेव्हा यानावर पृथ्वी वरील संस्थेचे नियंत्रण नव्हते पार्कर सौरयान ताशी 430,000 मैल वेगाने  करोना भागाच्या अत्यंत जवळुन मार्गक्रमण करत होते ह्या आधी डिसेंबर 2024 मध्ये आणी मार्च 2025 मध्ये देखील पार्कर सौरयानाने ईतक्याच वेगाने फेरी मारली होती 

विषेश म्हणजे सुर्याच्या अंतर्गत अत्यंत ऊष्ण असलेल्या करोना  भागातून फेरी मारुन देखील पार्कर यान सुरक्षित बाहेर पडले ह्या सौरयानाला  सुर्याच्या तीव्र ऊष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून यानाच्या Shield मध्ये Innovative Carbon Foam चा वापर करून Thermat Protection System बसविण्यात आली होती त्या मुळे पार्कर यान 1.600 ते 1700 f. (870 ते 930 c.) पर्यंत ऊष्णतेतही सुरक्षित राहुन सूर्याच्या अंतर्गत भागातून बाहेर पडू शकेल 

14 जुन ते 24 जुनपर्यंत पार्कर सौरयानातील चार अत्याधुनिक यंत्रणेद्वारे सुर्याच्या करोना भागातील निरीक्षण आणी संशोधीत सायंटिफिक माहिती गोळा करण्यात आली सध्या सुरू असलेल्या सुर्याच्या अकरा वर्षाच्या सायकल मध्ये सुर्य अत्यंत Active Phase मध्ये असताना सोलर घडामोडी सौरवारे सौरवादळांची तिव्रता मोजण्यात आली सद्या सूर्याच्या अंतर्गत भागातून अत्यंत शक्तिशाली आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत

सुर्याच्या ह्या अंतर्गत घडामोडी दरम्यान अंतराळात प्रचंड वेगाने बाहेर पडणारे आगीचे लोट अग्नी ज्वाळांंचा हानिकारक प्रभाव पृथ्वीवर,अंतराळस्थानकात रहाणाऱ्या अंतराळवीरांवर पृथ्वीवरील Satellites Powergrid आणी Air travel करणाऱ्यांवर होतो त्या बाबतीतली संशोधीत माहितीही गोळा करण्यात आली हि माहिती अंतराळ विश्वातील भविष्य कालीन दुरवरच्या चंद्र आणी मंगळ मोहिमे साठी ऊपयुक्त ठरणार आहे 

सुर्याच्या अंतर्गत भागातील मॅग्नेटिक फिल्ड मध्ये अंतराळातील प्रचंड वेगाने वाहणारे वारे धुळ आणी हानीकारक Cosmic कीरणे आत ओढल्या जातात सर्व जगाला प्रकाशमान करणारा सुर्य प्रत्यक्षात आगीचा पेटता गोळा आहे त्याच्या अंतर्गत भागात ज्वलनशील पदार्थ आणी हानिकारक वायूमुळे सतत आग घुमसत असते आणी त्यापासून तयार होणारे आगीचे लोट,ज्वाळा,विध्युत भारीत किरणे वायुकण प्रचंड वेगाने सुर्याच्या करोना ह्या भागात फेकल्या जातात त्यामुळे तेथील भागात तीव्र उष्णता आणि प्रकाश असतो ह्या भागातील चुंबकीय क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ,वायू,विद्युतभारीत किरणे,विद्युतभारीत कण गोलाकार फिरत असतात तेथे सतत ऊष्ण सौर वारे वहात असतात,सौरवादळे होतात जेव्हा ह्या वादळाची तिव्रता वाढते तेव्हा शक्तीशाली स्फोट होतात आणि त्यामुळे निर्माण झालेले आगीचे लोट ह्या चुंबकीय क्षेत्रातुन बाहेर अंतराळात फेकल्या जातात

ह्या भडकत्या शक्तीशाली ज्वाळांमधून अपायकारक विनाशकारी सौर कीरणे बाहेर पडतात पृथ्वीवरील रेडिओ Communications ,Electric Power Grids,Navigation Signals अंतराळ यान आणि अंतराळस्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी हे सौर वादळ धोकादायक ठरू शकते

24 व्या अखेरच्या फेरी नंतरही पार्कर सौरयान आश्चर्यकारकरीत्या ठिकठाक आहे यान आणी यानातील अद्ययावत यंत्रे सुरक्षित आहेत आणी पुन्हा माहिती मिळवण्यासाठी सक्षम आहेत असे नासाच्या  Washington येथील संस्थेतील पार्कर सौर मोहिमेतील Program Scientist- Arik Posner म्हणतात सध्या सुर्य त्याच्या 11व्या Cycle phase मध्ये असताना ह्या काळात सुर्यच्या आकारात helisphere मध्ये काय बदल होतात ह्या बाबतीत देखील सखोल संशोधन करण्याची हि सुवर्ण संधी आहे असेही ते म्हणतात

नासाच्या Maryland येथील  Johnson Hapkins Applied Physics Laboratory (APL) मधील शास्त्रज्ञांनी पार्कर सोलर प्रोबचे डिझाईन आणी निर्मिती केली होती

Monday, 30 June 2025

Blue Origin NS-33 मोहिमेतील अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटन करून परतले

 

 Blue Origin NS-33 मोहिमेतील अंतराळ पर्यटक Allie Kuehner,Carl Kuehner,Jim Sitkin,Freddie Rescigni, Leland Larson आणी Owolabi Salis  -फोटो -Blue Origin

Blue Origin - 29 जुन 

Blue originच्या NS-33 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत 29 जुनला Allie Kuehner,Carl Kuehner हे दोघे पती पत्नी ,Leland Larson,Freddie Rescigni,Jr Owolabi Salis,James Sitkin हे सहा नागरिक अंतराळ पर्यटन करून परतले हे सहा अंतराळयात्री 21 तारखेलाच अंतराळ पर्यटनास जाणार होते पण खराब हवामाना मुळे हे पर्यटन लांबले होते Blue Origin चे हे 13 वे मानवी अंतराळ ऊड्डाण आहे आणी आतापर्यंत चे 53 वे 

29 जुनला Blue Origin च्या West Texax येथील ऊड्डाण स्थळावरून 9.38 a.m.ला New Shepard अंतराळयान  रॉकेटच्या सहाय्याने ह्या सहा जणांसह अंतराळात झेपावले अंतराळात पोहोचताच काही मिनिटातच यान रॉकेट पासून वेगळे झाले अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणी यानाचा अत्यंत वेगाने पुढील प्रवास सुरू झाला काही मिनिटांनी यान वेग वाढवत अंतराळ व पृथ्वी ह्यांच्यातील सिमारेषा असलेल्या कर्मन लाईन पर्यंत पोहोचले 

यान कर्मन रेषा पार करून अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीत पोहोचताच सर्व अंतराळ प्रवाशांनी काही क्षण ह्या वातावरणात तरंगण्याचा आनंद घेतला आणी अवघ्या दहा बारा मिनिटात पृथ्वी ते अंतराळ असे अदभूत अंतराळ परर्यटन करून परत पृथ्वीवर परतले

अंतराळयानाने अंतराळातील कर्मन रेषा पार करून अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटीत प्रवेश केला तेव्हा सर्व सहाही प्रवासी आनंदीत झाले आणी त्यांनी अंतराळातील झीरो ग्रव्हिटीत सर्व बाजूने तरंगण्याचा आनंद घेतला खिडकीतून खाली पहात एकमेकांना पृथ्वीचे सौंदर्य दाखवत Oh ! Look Our Earth ! How Beautiful ! Oh ! My God ! आपण खरेच अंतराळात पोहोचलो आहोत असे ऊत्स्फुर्त ऊद्गगार त्यांनी काढले 

 

 Blue Origin NS -33चे अंतराळ प्रवासी दांपत्य Allie Kuehner आणि Carl Kuehner अंतराळातील झिरो ग्रॅविटीचा आनंद घेताना -फोटो -Blue Origin

अवघ्या दहा मिनिटांंचा हा अदभूत अंतराळ अनुभव घेऊन हे सहाही अंतराळप्रवासी पृथ्वीवर परतले तेव्हा Blue Origin ची रिकव्हरी टिम तेथे पोहोचली त्यांनी ह्या सर्वांंना यानाचे दार ऊघडुन बाहेर येण्यास मदत केली ह्या प्रवाशांना सोडायला व न्यायला त्याचे नातेवाईक ऊड्डाण स्थळी हजर होते सगळ्यांंनीच परतल्या नंतर आपली प्रुथ्वी खूप सुंदर आहे,अदभूत आहे भावी पिढिसाठी तिचे संरक्षण करणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

ह्या अंतराळ प्रवाशाविषयी

Allie पर्यावरणवादी वन्य जीव संरक्षक ऊत्साही साहसी संशोधक आहेत दुर्गम भागातील जंगलांना भेट देऊन वन्यजीव संरक्षण करण्याची त्यांची ईच्छा आहे Carl बिल्डिंग अँड लँड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आहेत नाविन्यपूर्ण डिझाईन काढून विकास कामे करताना वन्यजीव संरक्षण नैसर्गिक अधिवास, शाश्वत अन्न प्रणाली आणी पर्यावरण पुरक प्रकल्प टिकवण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्या वर आहे 

Larson-School Bus services ,Ink, आणी Larson Transportation services चे माजी CEO आहेत 1997 मध्ये त्यांच्या Larson legacy ह्या कौटुंबिक व्यवसायाची स्थापना झाली सुरुवातीला त्यांनी शिक्षक म्हणून काम केले नंतर त्यांनी सैनदलातील सैनिकांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे काम केले 1968 च्या संविधान अधिवेशनाचे प्रतिनिधित्व   त्यांनी केले होते आणी त्यांनी सध्याचे हवाई संविधान लिहिले त्यांना मधमाशा पालन,कोईमासे व कोबंडी पालनाची आवड आहे त्यांना तिबेटमधील ऊंच पर्वतीय प्रदेशातील भिक्षू सोबत रहायला आवडते

Freddie इटालियन,अमेरिकन ऊद्योजक आहेत ते स्पर्धात्मक गोल्फपटु आहेत ते कमोडिटी केबल्सचे अध्यक्ष आणी CEO आहेत त्यांनी राष्ट्रीय आणी राज्य स्तरावरील गोल्फ स्पर्धेत 20 वर्षे सहभाग नोंदवला त्यांना पुरातत्व संशोधनाची आवड आहे 

Owolabi - वकील,आर्थिक सल्लागार,Equitocracy चे लेखक,The Soul Maker Ministry चे प्रमुख सदस्य आहेत 

Jim- निव्रुत्त वकील आहेत त्यांनी 40 वर्षे वकिली केली ते जागतिक स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक आहेत त्यांनी सात खंडांना भेट दिली आणी त्यांचा जागतिक प्रसार केला साहसी व्रुत्तीच्या Jim यांना लहानपणी स्टार ट्रेक पहाताना अंतराळाची आवड निर्माण झाली तेव्हा पासूनच त्यांची अंतराळात ऊड्डाण करण्याची ईच्छा आहे 

 NS-33 Mission Patch

ह्या अंतराळ प्रवाशांसाठी Blue Origin ने त्यांची कर्तृत्व वैशिष्ट्ये कोरलेला Patch तयार केला होता Ali आणी Carl यांच्या पर्यावरण संरक्षणाच्या कामासाठी पाने,Leland यांच्या कौटुंबिक व्यवसायाचे प्रतिक School Bus,Freddie यांच्या पुरातत्व संशोधनाच्या आवडीचे प्रतिक चंद्र Jim यांच्या साठी न्यायाचा तराजू Owolabi यांच्या अध्यात्मिक प्रवासाचे प्रतिक कमळ आहे हि सर्व प्रतिकचिन्हे Capsul ला पातळ हिरव्या रेशेने जोडलेली असतात आणी ती अंतराळ प्रवाशांचे प्रातिनिधित्व करतात प्रुथ्वी भोवती दोन हिरव्या रेषा आहेत पहिली  रेषा क्षितिज आणी दुसरी कर्मन रेषा दर्शवते ह्या सर्वांंना हा Blue Origin चा Patch लाऊन त्यांना अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देण्यात आले